Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58
आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नाही हर हर महादेव
नाही
हर हर महादेव
महेश मान्ज्रेकार सारखा
महेश मान्ज्रेकार सारखा म्हातरा , लाल डोळ्याचा माणुस जे करु शकला ,भावे हुक्ले
Influencer इंग्रजी प्राईमवर
1. Influencer इंग्रजी प्राईमवर
एक मैडिसन नावाची तरुणी असते..प्रत्येक गोष्ट सोशल मिडियावर अपडेट करत असते तीला बरेच फॉलोवर पण असतात..तीला थायलंड मधे एक मैत्रीण भेटते दोघी जणी एका आयलंडवर जातात..पुढे बघा सिनेमात..
चांगला आहे..मिस्ट्री,थ्रीलर, क्राईम.
2. Cabin in the woods इंग्रजी प्राईमवर
पाच मित्रमैत्रिणींचा ग्रुप एका जंगलातील मध्यभागी असणार्या आऊटहाऊस टाईप केबिनमध्ये राहायला जातात..मज्जा, पिकनिक म्हणून आणि जराच वेळात सुरू होतो जीवघेणा थरार..अनप्रेडिक्टेबल..खतरनाक सिनेमा... थ्रीलर, मिस्ट्री, हॉरर.... आवडला.
3.Neru मल्याळम हॉटस्टारवर हिंदीत.
एका अंध तरूणीवर तिच्याच घरात कुणी नसताना रेप होतो.तरूणी शिल्पकार असते..आरोपी ला स्पर्शाने ओळखून त्याचं शिल्प बनवते...पण ओळखलेला आरोपी हाच आरोपी आहे हे कोर्टात सिध्द करणार कसे..बघा सिनेमात.. खिळवून ठेवणारा कोर्टरूम ड्रामा..
रोज थोडा थोडा बघून संपवला
रोज थोडा थोडा बघून संपवला बाईपण भारी देवा.
अत्यंत पकाऊ सिनेमा.
Cabin in the woods
Cabin in the woods
>>>>
हा माझा प्रचंड आवडता सिनेमा आहे. हा horror comedy आहेच, पण सगळ्या क्लासिक horror सिनेमानं होमाज आहे. हेलरेझर, एविल डेड, ममी, नाईट ऑफ द लिव्हिंग डेड... आणि मला न समजलेले सुद्धा खूप असतील ज्यांचा सिनेमात संदर्भ आहे. क्लासिक horror ला लिहिलेले खुसखुशीत, विनोदी प्रेमपत्र !
महेश मान्ज्रेकार सारखा
महेश मान्ज्रेकार सारखा म्हातरा , लाल डोळ्याचा माणुस जे करु शकला ,भावे हुक्ले >>> त्याने खरे म्हणजे वाईट काम केलेले नाही त्या रोल मधे. पण पटकथा-संवाद अगदीच कायच्या काय आहेत.
थ्री ऑफ अस चा हा क्रिएटिव्ह
थ्री ऑफ अस चा हा क्रिएटिव्ह क्लायमॅक्स विकि वरचा. कदाचित चित्रपट सुसह्य झाला असता
In a criminal climax that defies expectations, Shailaja emerges as an unexpected mastermind. The trio orchestrates a daring heist that leaves law enforcement puzzled and the once-tranquil Konkan coastline forever altered. The absurdity of their criminal escapade takes center stage, leaving Shailaja and her companions to face the consequences of their actions in a conclusion that defies the conventions of a typical journey of self-discovery.
Samबहादुर बघितला. खूप आवडला.
Samबहादुर बघितला. खूप आवडला. ट्रेलर मध्ये इंदिरा गांधीची अभिनेत्री खटकली होती, पण सिनेमात नाही झाले तसे. विकी कौशलने कमाल केलीय.
धन्यवाद कॉमी, तुम्ही लिहिलंय
धन्यवाद कॉमी, तुम्ही लिहिलंय म्हणजे बघायला हरकत नाही. बघतो. नाहीतर हल्ली ऐतिहासिक पात्रावर/ घटनेवर सिनेमा असला की भीतीच वाटते आणि टाळतो.
मी सुद्धा फ्लर्ट पासून सुरवात
मी सुद्धा फ्लर्ट पासून सुरवात झाली पाहून बंद केला होता थोडा पाहुन, बघु नंतर म्हणुन.
आता बघेन पूर्ण.
हल्ली ऐतिहासिक पात्रावर/
हल्ली ऐतिहासिक पात्रावर/ घटनेवर सिनेमा असला की भीतीच वाटते आणि टाळतो. >>> अगदी अगदी. माझेही तसेच झाले आहे. ट्राय करेन आता.
मी सुद्धा फ्लर्ट पासून सुरवात
मी सुद्धा फ्लर्ट पासून सुरवात झाली पाहून बंद केला>>>>
सुरूवातीला ऑड वाटतं. पण ते बायकांनी घेरलेले असणे याचा छान वापर केला आहे सिनेमात. कथेची वीण घट्ट नाहीये पण हेही नसे थोडके कॅटेगरीतला आहे. जरूर पहा.
विकी कौशलचा उधमसिंगच्या तोडीस तोड परफॉर्मन्स, उलट हा काकणभर सरस. कारण सरदार उधमसिंग यांची दृश्य प्रतिमा भारतियांच्या मनावर ठसलेली नाही तर सॅम बहादूर हे चिरपरीचित व्यक्तिमत्व.
कथेची वीण घट्ट नाहीये पण हेही
कथेची वीण घट्ट नाहीये पण हेही नसे थोडके कॅटेगरीतला आहे. जरूर पहा.
+१
तुम्ही लिहिलंय म्हणजे बघायला हरकत नाही.
>>>मला टेन्शन आले की राव !
मी पण हप्त्याहप्त्यात बघत
मी पण हप्त्याहप्त्यात बघत असल्याने हा ही २/३ बघून झाला आहे. साधारण बांगलादेश युद्धाच्या सुरूवातीपर्यंत. आधी जरा संथ आहे त्यामुळे थोडा पेशन्स ठेवावा लागेल पण नंतर रंगत जातो.
अमित - ती काळजी नाही. अजूनतरी लीड कॅरेक्टरला स्वतःच्याच नव्हे तर इतर सर्व क्षेत्रातले त्या त्या क्षेत्रातील लोकांपेक्षाही जास्त समजत होते वगैरे आलेले नाही
विकी कौशलने कमाल केली आहे >> +१
गेल्या काही महिन्यांत पाहिलेल्यांपैकी - रणवीर सिंगचा कपिल आणि विकी कौशलचा सॅम - दोन्ही बेअरिंग्ज इतकी भारी आहेत की ते कॅरेक्टरच आपल्याला दिसते. मूळ अभिनेता नाही.
अॅनिमल मधे रणबीर चा संजय दत्तही तसाच म्हणता आला असता. पण ते unintentional होते
बाई पण भारी देवा... असह्य
बाई पण भारी देवा... असह्य पकाऊ सिनेमा आहे. मला तर सिनेमात नक्की काय सुरु आहे तेच कळत नव्हतं. अर्थातच पूर्ण पाहू शकले नाही.
ओले आले पाहिला का कुणी?
ओले आले पाहिला का कुणी?
नाही बा केया... असलं धाडस मी
नाही बा केया... असलं धाडस मी तरी करू शकत नाही
ओले आले चा रिव्ह्यू वाचलाय
ओले आले चा रिव्ह्यू वाचलाय लिंक देते
https://www.facebook.com/story.php/?id=360423554642670&story_fbid=132631...
बाई पण भारी देवा आता हिंदीत.
बाई पण भारी देवा आता हिंदीत.
यु ट्यूब ला सुराग हा कॉमेडी शो बघताना जाहिरात येते.
हिंदीत नाव बदलले पाहिजे होते.... औरतपण खंग्री भगवान
(No subject)
Badland hunters कोरीयन
Badland hunters कोरीयन नेटफ्लीक्स हिंदीत
एका भुकंपानंतर उध्वस्त झालेले एक शहर..तीन वर्षांपासून दुर्दशेत राहणारे उरले सुरले लोक...आम्ही तुमच्या मुलांचं उज्वल भविष्य घडवू म्हणून हेल्पलेस लोकांमधून टिनेज आणि धडधाकट लोकं हेरून घेऊन जाणारी सभ्य वाटणारी टोळी..थ्रीलर, हॉरर, मिस्ट्री.. चांगला आहे..
ओले आले पाहिला का कुणी?>>>मी
ओले आले पाहिला का कुणी?>>>मी पाहिला...चांगला आहे...काही काही पंचेस आवडले त्यातले...अगदीच लॉजिक न लावता केवळ मनोरंजना साठी पाहिला तर better आहे...one time watch आहे...पण त्यातील वडील मुलाचं जे नातं दाखवलं आहे ते पाहून नकळत animal शी तुलना झाली आणि मराठीचा अभिमान वाटला...
अनु अल्हाद महाबळ यानी
अनु अल्हाद महाबळ यानी लिहिलेलं परिक्षण वाचूनच कल्पना आली सिनेमा कसा असेल याची. बघण्याचा तर प्लॅन काही नव्हताच.
मी थिएटर मध्ये जाऊन सिनेमा बघणं बंद करून ४ वर्ष झाली. शेवटचा सिनेमा जोकर (ईन्ग्लिश) पाहिला होता.
अॅनिमल साठी हीरो ला फिल्म
अॅनिमल साठी हीरो ला फिल्म फेयर मिळाले म्हणे... ३ सो कॉल्ड हीट देणारा शाखा सोडून रनबीर ला अवॉर्ड
अजिबात मिळायला नको होते.पण
अजिबात मिळायला नको होते.पण त्यांनी 12थ फेल ला क्रिटिक अवार्ड दिल्याने माझा राग शांत झाला आणि मी त्यांना सोडून दिले
लोकप्रियता हा निकष धरून दिले असेल तर बरोबर आहे.
३ सो कॉल्ड हीट देणारा शाखा
३ सो कॉल्ड हीट देणारा शाखा सोडून रनबीर ला अवॉर्ड
>>>>
कारण तो कपूर आहे
घराणेशाही
Nepotism की काय म्हणतात ते...
३ सो कॉल्ड हीट देणारा शाखा
३ सो कॉल्ड हीट देणारा शाखा सोडून रनबीर ला अवॉर्ड
>>>>
कारण तो कपूर आहे
घराणेशाही
Nepotism की काय म्हणतात ते...
बार्र्र्र्र्र्र
शाखा ला आधी एक डझन अवार्ड मिळाल तेवा घराणे शाही नवती?
अनु..review वाचते.. दक्षिणा:)
अनु..review वाचते.. दक्षिणा:)
मोक्षू हो ना काही family members ना आवडला आहे ...म्हणूनच विचारलं..OTT वर आला तर बघीन
शाखाचे तिनही आणी अॅनिमल
शाखाचे तिनही आणी अॅनिमल सगळेच कचरा होते...त्यामुळे प्रामाणीकपणे बघायला गेल तर कुणालाही अॅवॉर्ड द्यायला नको होते ...पण हे अॅवॉर्ड काय ऑस्कर सारखे वैगरे नाही ....चक्क विकतात फिल्मफेअर वाले.. त्यामुळे असल्या बन्डल अॅवॉर्ड्ची creditability शुन्य आहे.
कोल्ड हीट देणे हे काही खायचे
कोल्ड हीट देणे हे काही खायचे काम नाही.
Pages