सहकारनगर, पुणे गटग

Submitted by अतुल. on 30 January, 2024 - 11:19
ठिकाण/पत्ता: 
तळजाई मंदिर.

नमस्कार,

येत्या रविवारी सकाळी पुणे माबोकरांचे ब्रेकफास्ट गटग करायचा प्लान करत आहोत.

वेळ: ४ फेब्रुवारी सकाळी ७:३० वाजता
ठिकाण: तळजाई मंदिर
लोकेशन: https://maps.app.goo.gl/fvbWhunfDrJwwpge7
माहिती:
रविवारी सकाळी तळजाईवर गर्दी असते पण मंदीराच्या बाहेरच भरपूर पार्किंग व्यवस्था असल्याने फारशी चिंता नको. आणि मंदिराचे प्रवेशद्वार रस्त्याला लागूनच आहे. तिथे आत मंदिरात बसण्यासाठी बाक आहेत, भरपूर प्रशस्त जागा आहे. सर्वजण येईपर्यंत तिथे आपण बसू शकतो.

PXL_20240201_120638638.jpg

जे माबोकर येऊ इच्छीतात त्यांनी कृपया या धाग्यावर हजेरी लावा. मंदिरात सर्वजण भेटून गप्पाटप्पा, तळजाई पार्क मध्ये फिरायला जाऊ, मग तिथेच बाहेर ब्रेकफास्ट करता येईल. दररोज सकाळी तिथे बाहेर ब्रेकफास्टचे बरेच स्टॉल्स असतात. तिथे गव्हाच्या चिकापासून ते कारल्याचा/दुधीचा रस आणि इतर सर्व प्रकारचे ब्रेकफास्ट मिळतात. किंवा ब्रेकफास्ट साठी इतरत्र जायचे असेल तर तसे भेटल्यावर ठरवता येईल.

चला तर! भेटू मग रविवारी ४ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजता तळजाई मंदिरात Happy

अपडेट (४ फेब्रुवारी २०२४)
गटग ला उपस्थित सभासद:
१. हर्पेन
२. अतुल.
३. कुमार१
४. अश्विनी११
५. अतरंगी
६. पशुपत
७. अश्विनी डोंगरे
८. तेजो
९. पियू
१०. दक्षिणा
११. बिपिनसांगळे

Photo 1:

Screenshot_20240204-110232.png
पुढील रांगेत डावीकडून उजवीकडे:
बिपिन सांगळे, डॉक्टर कुमार , अतरंगी , हर्पेन , अतुल. आणि पशुपत

मागील रांग डावीकडून उजवीकडे:
तेजो, पियू , अश्विनी११, अश्विनी डोंगरे आणि सौ पशुपत

Photo 2
Screenshot_20240204-105253.png
पियू, दक्षिणा, तेजो, हर्पेन, अतरंगी, बिपिनसांगळे, कुमार१, अतुल.

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शनिवार, February 3, 2024 - 21:00 to 23:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आधी तळजाई पार्कला भेटू. सकाळी साडेआठची वेळ ठरवली आहे. पण त्याआधीही जर सर्वाना शक्य असेल तर चांगलेच होईल. कारण रविवारी सकाळी गर्दी खूप असते.

वर लिहिल्याप्रमाणे तिथे ब्रेकफास्टसाठी भरपूर पर्याय (स्टॉल्स) आहेत. पण तरीही आपल्याला बेफा साठी दुसरीकडे जायचे असेल तर तो निर्णय तिथे घेऊ.

यावरून स्फुर्ती घेऊन पिंचि आकुर्डी निगडी माबोकरांनी दुर्गा टेकडीवर गटग करावे.. खाली श्रीकृष्ण मधे नाष्टा..

नवीन Submitted by धनवन्ती on 31 January, 2024 - 10:08

>>>> छान कल्पना... तुम्हीच घ्या पुढाकार Happy

तळजाईच्या वनविहारामध्ये फिरण्याची सकाळची वेळ नऊ वाजेपर्यंतचीच असते.आणि त्यानंतर बाहेरच्या त्या स्टॉलच्या भागात ऊन खूप असते म्हणून सकाळी साडेआठच्या ऐवजी संध्याकाळी ची पाच ची वेळ कशी वाटते? वनविहाराच्या परिसरात सात वाजेपर्यंत थांबताही येईल.

ओहो
फार फार वर्षांनी ( ववि सोडून हां) असा धागा निघालाय,
गटग ला शुभेच्छा.

आता अद्याप इतके ऊन नसते सकाळी. आणि ९ वेळ लिहिली असली तरी १० पर्यंत गेट उघडे असते रविवारी सकाळी. सकाळी साडेआठ च्य आधीच ज्यांना शक्य आहे त्यांनी सर्वांनी कृपया आले तर छान होईल.
सकाळचे प्लानिंग जास्त सोयीचे वाटते कारण सकाळी एकदा गटग झाले कि बाकी रविवार आपापली कामे सर्वाना करता येतील.

चालेल तिथे. छान जागा आहे.
तसेही आत गेल्या गेल्या सुद्धा समोरच पाच सहा बाक दिसतात तिथेही जमू शकतो. आपण कितीजण आहोत त्यावर अवलंबून.

पाहुणे आहेत नेमके बरेच त्यादिवशी घरी.
यायला आवडल(ल वर टिंब :D) असतं खरतर..(पहिल्या र वर पण).

गटग laa शुभेच्छा

खूप निसर्गरम्य ठिकाण आहे. जंगलझाडीतून फिरायला तब्बल सात-आठ किलोमीटर लांब पायवाट (jogging track) आहे. >>>

होय.
सकाळी जितक्या लवकर भेटू तितके चांगले.
मी येत्या रविवारी तिकडेच धावेन म्हणतो. अजूनही कोणाला यायचे असल्यास स्वागत आहे.

कुठे भेटायचे? तळजाई पार्क मध्ये कि बाहेर? डावीकडे कि उजवीकडे? मंदिराच्या कोणत्या बाजूला? इत्यादी संदिग्धता नको म्हणून भेटण्याचे ठिकाण तळजाई मंदिर निश्चित केले आहे. तसेच तिथे रविवरी होणारी गर्दी आणि सर्वाना आपापल्या घरी परत जायला उशीर या दोन्हींचा विचार करून वेळ सकाळी साडेसात ठरवली आहे. त्यानुसार धागा अपडेट केला आहे.

मी येत्या रविवारी तिकडेच धावेन म्हणतो. अजूनही कोणाला यायचे असल्यास स्वागत आहे.>>>

तुमच्यासोबत १०० मीटर धावायचे असेल तरी मला आधी एक वर्ष सराव करावा लागेल. त्यामुळे मी तर नाहीच….. Proud

पियू,

माझा धाकटा मुलगा बऱ्याचदा वर्षा विहारची आठवण काढत असतो. तो जर त्या दिवशी लवकर ऊठला तर त्याला आणणार आहे.

लिस्ट बनवा नं..
अजून येणारे शेवटची लिस्ट काॅपी करुन स्वतःचं नांव ॲड करुन पेस्ट करतील..

तुमच्यासोबत १०० मीटर धावायचे असेल तरी मला आधी एक वर्ष सराव करावा लागेल. त्यामुळे मी तर नाहीच >>>

अरे तू नको धावू माझ्यासोबत मी धावेन तुझ्यासोबत तुझ्यागतीने मग तर झाले!

येणार्‍यांची नावे वरती धाग्यातच अपडेट करावी ही विनंती

पियू येणार आहात ना? तुमचे नावही यादीत टाकतोय.
यादी याप्रमाणे:

१. हर्पेन
२. अतुल.
३. कुमार१
४. अश्विनी११
५. अतरंगी
६. पशुपत
७. अश्विनी डोंगरे
८. तेजो
९. WallE (येण्याचा प्रयत्न करतील)
१०. पियू (कन्फर्म?)

कोणाचे नाव अनवधानाने राहिले असेल त्यांनी तसेच नवीन येणाऱ्यानी कृपया आपले नाव यादीत समाविष्ट करावे.

>> येणार्‍यांची नावे वरती धाग्यातच अपडेट करावी ही विनंती

हो थोड्याच वेळात करतो

>> माझा धाकटा मुलगा बऱ्याचदा वर्षा विहारची आठवण काढत असतो. तो जर त्या दिवशी लवकर ऊठला तर त्याला आणणार आहे.

+१
सेम पिंच. तो उठला लवकर तर मीही त्याला घेऊन येईन.

पिंची मध्ये gtg होईल तेव्हा येईन. आता इच्छा आहे पण वेळ आणि जागा सोयीची नाही/ दूर पडेल ३०+ km. रविवारी इतर खोलबलेली बरीच कामे आहेत.

पिंची मध्ये gtg वेगळे करा. नाशिक, मुंबई, बोरिवली, ठाणे, कल्याण, विरार सर्व ठिकाणी त्याच दिवशी करा. गटगांचा, आणि वृतांत आणा पाऊस पाडा. मला वाटलं कुणीतरी मुंबईत फुडाकार(पुढाकार) घेईल. मुंबईत भायखळा फुले फळे प्रदर्शन ८-९-१० फेब्रुवारीला आहे. त्याला जोडता येईल.

येणाऱ्या लिस्ट मध्ये बरेच आवडते माबोकर आहेत. त्यामुळे इच्छा होती पण तुंबलेली कामे आहेत काही शिवाय ठिकाण दूर आहे।.
पुढच्या वेळी नक्कीच
एन्जॉय करा.

आर्या धागा हॅक नको हा. वेगळा धागा काढ तू, तुझ्यासारख्या सिनियर शिवाय पिंची मधील माबोकर कोणाचं ऐकणार सांग बघू. Happy

Pages