नमस्कार,
येत्या रविवारी सकाळी पुणे माबोकरांचे ब्रेकफास्ट गटग करायचा प्लान करत आहोत.
वेळ: ४ फेब्रुवारी सकाळी ७:३० वाजता
ठिकाण: तळजाई मंदिर
लोकेशन: https://maps.app.goo.gl/fvbWhunfDrJwwpge7
माहिती: रविवारी सकाळी तळजाईवर गर्दी असते पण मंदीराच्या बाहेरच भरपूर पार्किंग व्यवस्था असल्याने फारशी चिंता नको. आणि मंदिराचे प्रवेशद्वार रस्त्याला लागूनच आहे. तिथे आत मंदिरात बसण्यासाठी बाक आहेत, भरपूर प्रशस्त जागा आहे. सर्वजण येईपर्यंत तिथे आपण बसू शकतो.
जे माबोकर येऊ इच्छीतात त्यांनी कृपया या धाग्यावर हजेरी लावा. मंदिरात सर्वजण भेटून गप्पाटप्पा, तळजाई पार्क मध्ये फिरायला जाऊ, मग तिथेच बाहेर ब्रेकफास्ट करता येईल. दररोज सकाळी तिथे बाहेर ब्रेकफास्टचे बरेच स्टॉल्स असतात. तिथे गव्हाच्या चिकापासून ते कारल्याचा/दुधीचा रस आणि इतर सर्व प्रकारचे ब्रेकफास्ट मिळतात. किंवा ब्रेकफास्ट साठी इतरत्र जायचे असेल तर तसे भेटल्यावर ठरवता येईल.
चला तर! भेटू मग रविवारी ४ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजता तळजाई मंदिरात
अपडेट (४ फेब्रुवारी २०२४)
गटग ला उपस्थित सभासद:
१. हर्पेन
२. अतुल.
३. कुमार१
४. अश्विनी११
५. अतरंगी
६. पशुपत
७. अश्विनी डोंगरे
८. तेजो
९. पियू
१०. दक्षिणा
११. बिपिनसांगळे
Photo 1:
पुढील रांगेत डावीकडून उजवीकडे:
बिपिन सांगळे, डॉक्टर कुमार , अतरंगी , हर्पेन , अतुल. आणि पशुपत
मागील रांग डावीकडून उजवीकडे:
तेजो, पियू , अश्विनी११, अश्विनी डोंगरे आणि सौ पशुपत
Photo 2
पियू, दक्षिणा, तेजो, हर्पेन, अतरंगी, बिपिनसांगळे, कुमार१, अतुल.
अरे वा !
अरे वा !
फारा दिवसांनी माबो वर गटग चा धागा निघाला.
मस्त
वर्षा गटग >> वसंत गटग ??
वर्षा गटग >> वसंत गटग ??
कल्पना चांगली आहे. पण हॉटेलात फार वेळ बसू देतात ना?
पण हॉटेलात फार वेळ बसू देतात
पण हॉटेलात फार वेळ बसू देतात ना?
>> जास्त वेळ तळजाई वर घालवून शेवटी ब्रेकफास्टला हॉटेल कडे वळू शकतो. तोपर्यंत जास्त वेळ बसू देतील अश्या हॉटेल ची नावं सुचवा लोकहो.
अरे वा !
अरे वा !
मी येणार......
भेटूच.
...
*वसंत गटग ??>>> नाही,
सध्या हेमंत ऋतू आहे.
" हेमंत वनविहार " असे नाव सुचवतो.
येथे जास्त वेळ बसू नये ही
येथे जास्त वेळ बसू नये ही पाटी नसलेले हॉटेल पुण्यात ?
हॉटेलात जास्त वेळ बसू नये. तुम्ही रिकामटेकडे असाल, पण आम्ही नाही.
हे हॉटेल शापित आहे. विनाकारण जास्त वेळ गप्पा मारत बसलेले ग्राहक इथे गायब होतात. विश्वास नसेल तर बसून बघा.
नेमके त्या वीकेंडला बाहेरगावी
नेमके त्या वीकेंडला बाहेरगावी आहे!!
मी येणार आहे .
मी येणार आहे .
जास्त वेळ तळजाई वर घालवून
जास्त वेळ तळजाई वर घालवून शेवटी ब्रेकफास्टला हॉटेल कडे वळू शकतो.
बरोबर. शिवाय कुणास अमृततुल्य,कुणास कारल्याचा/दुधीचा रस लागेल.
____________
वसंत व्याख्यानमाला पूर्वी होत असत. वसंताची चाहूल संक्रांतीच्या नंतर महिन्याभरात लागते. पक्षी गाऊ लागतात . शाल्मलीच्या फुलांवर गर्दी करतात.
वसंत पंचमी १४ फेब्रुवारीला आहे.
हॉटेल ची नावं सुचवा लोकहो.
हॉटेल ची नावं सुचवा लोकहो.
>>> नवरत्न / वेदान्त , सातारा रस्ता.
नवरत्नमध्ये बाहेरची मोकळी जागा आहे.
फारा दिवसांनी माबोवर गटगचा
फारा दिवसांनी माबोवर गटगचा धागा निघाला. >>> +१
खरंच छान वाटलं.
मी येणार.
मी येणार.
मुंबईकर येऊ शकतात का?
मुंबईकर येऊ शकतात का?
की काही एन्ट्री फी लागेल?
हो सर्व माबोकर येऊ शकतात.
हो सर्व माबोकर येऊ शकतात.
येवा गटग आपलाच आसा
ठिकाण: तळजाई, सहकारनगर, पुणे
अंटार्क्टिकावासी सुद्धा येऊ
अंटार्क्टिकावासी सुद्धा येऊ शकतात ..
या तर !
मी पण येणार.
मी पण येणार.
खूप मागे एकदा असे बोलणे झाले होते.
https://www.maayboli.com/node/45033
अखेरीस होतंय
पुण्यात असते तर नक्की आले
पुण्यात असते तर नक्की आले असते.
हर्पेन, काय सुंदर फोटो आहेत त्या धाग्यातले! आहा!
मीही कॉलेजमध्ये असताना कधीकधी तळजाईवर फिरायला जायचे मैत्रिणीबरोबर. संध्याकाळी जायचो. फारशी गर्दी नसायची. फार छान हवा असायची. आम्ही तेव्हा सारंग सोसायटी (बहुतेक) च्या साईडने जायचो. दशभुज गणपती मंदिर आहे तिकडून.
आता तळजाई जरा जास्तच चकाचक वाटते. तेव्हाचा साधेपणा गेला. (पूर्वीचं पुणं राहिलं नाही )
गटगला शुभेच्छा, एन्जॉय करा,
गटगला शुभेच्छा, एन्जॉय करा, फोटो नक्की शेअर करा इथे.
यावरून स्फुर्ती घेऊन पिंचि
यावरून स्फुर्ती घेऊन पिंचि आकुर्डी निगडी माबोकरांनी दुर्गा टेकडीवर गटग करावे.. खाली श्रीकृष्ण मधे नाष्टा..
विविध शहरांतील माबोकरांनी
विविध शहरांतील माबोकरांनी स्थानिक वसंत गटग आयोजित करावीत. ती शक्यतो फेब्रुवारीत ठेवावीत. वर्षा ते वसंत या गटगांत सहा महिन्यांचे अंतर पडते तसेच वातावरणही वेगळे. एकाच ठिकाणी ठेवलेल्या वविला अवास्तव खर्चिक आयोजन करावे लागते ते टळेल. इकडे मुंबई ते कल्याण/ बोरिवली चे माबोकर राणीचा बाग भायखळा इथे (९:३० ते १२) भेटू शकतील. ( सिक्युरिटी, टॉयलेट्स आहेतच) .विविध वसंत गटांचे वृतांत वाचायला मजा येईल. फारसे आयोजन , नाव नोंदणी लागणार नाही.
बाकी काय जलद हालचाली करा.
हर्पेन, काय सुंदर फोटो आहेत
हर्पेन, काय सुंदर फोटो आहेत त्या धाग्यातले! आहा!
>>>
धन्यवाद वावे
कधी काळी मी फोटोपण काढायचो
>> जास्त वेळ तळजाई वर घालवून
>> जास्त वेळ तळजाई वर घालवून शेवटी ब्रेकफास्टला हॉटेल कडे वळू शकतो.
+1
जे तळजाईला येऊन गेलेत त्यांना माहिती असेलच. खूप निसर्गरम्य ठिकाण आहे. जंगलझाडीतून फिरायला तब्बल सात-आठ किलोमीटर लांब पायवाट (jogging track) आहे. तसेच जागोजागी गप्पा मारत बसायला बाक व जागा केलेल्या आहेत. इथे पहा:
https://maps.app.goo.gl/6YSkazJU6QaorvsW8
>> शिवाय कुणास अमृततुल्य, कुणास कारल्याचा/दुधीचा रस लागेल.
दररोज सकाळी तिथे बाहेर ब्रेकफास्टचे बरेच स्टॉल्स असतात. तिथे गव्हाच्या चिकापासून ते कारल्याचा/दुधीचा रस आणि इतर सर्व प्रकारचे ब्रेकफास्ट मिळतात. खूप लोक फिरायला येतात. रविवारी तर भरपूर गर्दी असते. खाली पार्किंग सुद्धा बरेच मोठे आहे. फक्त तिथे रेस्टॉरंट नाहीत, स्टॉल्स आहेत त्यामुळे advance booking वगैरे करता येत नाही इतकेच.
त्यामुळे, थेट तळजाई पार्क मध्ये भेटणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. या व्यतिरिक्त तळजाई/सहकारनगर भागात अजून कोणत्या हॉटेल/रेस्टॉरंट चा पर्याय कोणास माहित असेल तर सांगणे.
>> हर्पेन, काय सुंदर फोटो
>> हर्पेन, काय सुंदर फोटो आहेत त्या धाग्यातले! आहा!
आता बघितले. खरोखरच मस्त फोटो आहेत. सकाळी तिथे असेच वातावरण असते.
अॅडमिन, माझा या धाग्यावरील
अॅडमिन, माझा या धाग्यावरील प्रतिसाद डिलीट कराल का प्लीज ? हा ही डिलीट करावा.
भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व.
तारीख/वेळ:
तारीख/वेळ:
रविवार, February 4, 2024 - 03:00 to 05:00
--------------------------
हे सकाळी ३ ते ५ आहे का
ब्रेकफास्ट चा विषय आहे म्हणून
तारीख/वेळ:
तारीख/वेळ:
रविवार, February 4, 2024 - 08:30 to 10:30 असे मला दिसते.
कोलकाता असे सेटिंग आपल्या खात्यात करावे लागते.
>> हॉटेल ची नावं सुचवा लोकहो.
>> हॉटेल ची नावं सुचवा लोकहो.
>> >>> नवरत्न / वेदान्त , सातारा रस्ता.
>> नवरत्नमध्ये बाहेरची मोकळी जागा आहे.
हे सुद्धा चांगला पर्याय आहेत. सातारा रस्त्यावरच दिसत आहेत.
हॉटेल नवरत्न:
https://maps.app.goo.gl/yTKvJ2L8GWT2njUc9
हॉटेल वेदांत:
https://maps.app.goo.gl/1CU5EAyBY8YAL5Em9
वरील दोन्ही ठिकाणी पार्किंग/टेबल रिजर्व बाबत माहिती घ्यावी लागेल.
माझ्या माहितीचे "अण्णा" म्हणून एक साऊथ इंडियन रेस्टॉरंट आहे. सिटी प्राईड पासून आत मार्केट यार्ड रस्त्यावर:
https://maps.app.goo.gl/91m3YJqgPJfQLkCy5
बरेच मोठे आहे. ग्रुप साठी मस्त आहे. दुसऱ्या एका ग्रुपचे गटग आम्ही इथे केले होते. बराच वेळ बसलो होतो आम्ही. टेबल रिजर्व करता येते आणि पार्किंग सुद्धा आहे भरपूर.
>> माझा या धाग्यावरील
>> माझा या धाग्यावरील प्रतिसाद डिलीट कराल का प्लीज ?
असू द्या हो फी बां तुम्ही शापित हॉटेल सुचवले. हा विषय ववि ग्रुप वर सुरु झाला तेंव्हा मी तर तळजाईतला शापित बंगलाच (पडका) सुचवला होता
>> रविवार, February 4, 2024 - 08:30 to 10:30 असे मला दिसते.
>> कोलकाता असे सेटिंग आपल्या खात्यात करावे लागते.
हो तसेच आहे. वेगळ्या टाईमझोन मध्ये असेल तर त्यांना वेगळे टाईम दिसत असेल.
नवरत्न / वेदान्त
नवरत्न / वेदान्त
वेगळे पार्किंग नाही
एकूणच गजबजलेला भाग
मलाही वेळ १२.०० ते १४.०० असे
मलाही वेळ १२.०० ते १४.०० असे दिसतेय. आधी तळजाई पार्क ला भेटायचे आहे ना ?
पुणे माबोकरांचा ठरलं मुंबईकर
पुणे माबोकरांचं गटग ठरलं. मुंबईकर,नाशिककर मागे का?
मायबोली वसंत गटग - जागे प्रमाणे, शहरांप्रमाणे असा धागा नसल्याने.
Pages