चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी टॉप गन पाहिला नाहै
लोकांचे म्हणणे असे आहे की टॉप गन आणि टॉप गन मॅव्हेरिक(हे दोन्ही वेगळे प्रकार आहेत का) ला भारतीय देशभक्ती ची फोडणी देऊन फायटर बनलाय.

हे दोन्ही वेगळे प्रकार आहेत का >> मॅव्हेरिक, टॉप गनचा सिक्वेल आहे
भारतीय देशभक्ती ची फोडणी देऊन फायटर बनलाय >> धन्यवाद

सिनेमा बघून मांडा कि तुमचं मत..
इतका वायोलंस साऊथ सिनेमात कॉमन आहे..सलार,लिओ,कैथी, विक्रम,थेरी वगैरे वगैरे..
>>>>>>>>>>>>>

वर उल्लेखलेले चित्रपट मी पाहिले नाहीत. माझ्या टाईपचे नाहीत.
पण मला ॲनिमल मधील हाणामारीचा प्रॉब्लेम नाहीये. ते मोठ्याला गन घेऊन राडा घालने हे मी फन म्हणून बघू शकतो.
पण त्याचे ट्रेलर, गाणी, शॉर्ट्स, लोकांनी वर्णन केलेले काही सीन बघून मला वाटतं नाही मी तो ओटीटीवर सुद्धा बघेन. कारण तो माझ्या टाईपचा नाही हे समजायला हे पुरेसे आहे.
कारण मी पिक्चर बघताना लव सीन आला की नेहमी स्वताला हिरोच्या जागी ठेवतो. आणि मी ज्या हिरोचा चाहता आहे त्याच स्टाईलचे प्रेम आणि रोमान्स मला झेपतो आणि आवडतो Happy

“ आपण हॉलीवूड ला कॉपी करण्याच्या बेबी स्टेप्स टाकतोय.” - एका अर्थानं हे झालंच तर बरं होईल. पण तसं होणार नाही. भ्रष्ट नक्कल इथपर्यंतच मजल जाते. हॉलीवूड मधले अ‍ॅनिमेशनपट जरी बघितले तरी ते थोड्या वेळानी इतके खरे वाटतात कि तुम्ही त्यात गुंतत जाता. टॉय स्टोरीमधला बझ्झ जेव्हा रस्त्यावरून पळतो तेव्हा त्या रस्त्यावर पडलेले ऑइलचे डाग, छोटे खड्डे पण दिसतात आणि प्रेक्षक हे विसरून जातो कि तो एक अ‍ॅनिमेशन पहातोय. कार्स-२ तर तिसरी मंझिल वगैरे च्या कॅटेगरीतला रहस्यपट आहे. टॉम हँक्स, ओवेन विल्सन सारखे प्रथितयश कलाकार ह्या कॅरेक्टर्सना आवाज देतात (कुठलीही स्वतःची 'स्टार सिग्नेच्गर' न वापरता). इतकं कन्हिक्शन फार थोड्या कमर्शियल हिंदी सिनेमात पहायला मिळतं.

सिनेमा म्हटलं, किंवा कुठलिही कथा म्हटली कि त्यात अद्भूत गोष्टी असतातच - असायलाच हव्या. पण त्याच्या अवती भवती घडणार्या गोष्टी इतक्या कन्व्हिन्सिंग वाटायला हव्या कि ज्या वळणावर ते अद्भूत भेटतं तिथवर येता येता त्या अद्भूतावर सुद्धा विश्वास बसायला हवा. जर पहिल्या फ्रेमपासून प्रेक्षक, 'छ्या, काहीही दाखवतायत, असं कुठे असतं का‘ मोडमधे गेला कि ते अद्भूत हास्यास्पद होतं.

लहानपणी आजोबांकडून ऐकलेल्या ‘मयसभा’ वगैरे गोष्टीतले कृष्ण, पांडव वगैरे मंडळी त्यांच्या पराक्रमाच्या, चमत्काराच्या टर्न्स येईपर्यंत आमच्यासारखेच वागायचे, बॉल वगैरेशी खेळायचे, खीर, लाडू वगैरे खायचे, आईच्या हातून पाच घास खायचे, दमल्यावर आईजवळ झोपायचे. त्यामुळे त्यांनी चमत्कार केले, अ तिमानवी गोष्टी केल्या की डोळे विस्फारले जायचे. असं स्टोरीटेलिंग हवं.

काल फायटर बघितला आणि अस्मिताची आठवण आली. ह्याच बीबीवर तिने कुठेतरी वळवळणार्‍या दिपीकाबद्दल लिहिलंय ते परफेक्ट आहे. इथेही तेच आहे. ५ फूट उंचीचे पाय मोकळे टाकून नाचतेय, लोळतेय. काहीही आचरटपणा आहे. डायरेक्टरला ह्या लोकांना कॉलेज कीड्स दाखवावं की एअर फोर्समधले फायटर्स दाखवावं ह्याचं कन्फ्युजन झाल्याने दोन्ही दाखवलं आहे. मध्येच चाळे कॉलेज मुलांचे आणि मध्ये काम काम. मध्येच बावळट त्या जवानमध्ये होती तशी नाच गाणी.
फक्त आवडलेली गोष्ट म्हणजे स्टंट्स.

खून, रक्त, अतिरंजीत मारामार्‍या, ग्राफिक सीन्स हा प्रॉब्लेम नाहीच आहे.
मै +१. रणबीर कुठेही निगेटिव्ह वाटत नाही. तो हिरोच वाटतो. मला आवडला नाही, मला हीरो वाटला. मी बघितलेल्या थेटरात आवडलेली तरुण मुलं मुली होत्या. त्यांनी शिट्ट्या मारुन तो हिरो आहे हे सिद्धच केले. सो तो हिरो नाही, अ‍ॅनिमल दाखवलाय याला काही अर्थ नाही. चक्क ग्लोरिफाय केलेलं आहे. पळवाट म्हणून अ‍ॅनिमल इ. आहे.
हॉलिवुडला कॉपी केलं तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. साउथ इंडिअन सायकी/ मसाला/ मिसाजनीला केलं तर आहे. लोकांना तसंच हवंय हे कारण असुच शकत नाही. पिरिएड.
भारताची लोकसंख्या इतकी आहे की सतीला ग्लोरिफाय करायचे, गँगरेप हा त्या मुलीच्या बिहेविअरचा, कपड्यांचा प्रॉब्लेम आहे इ. वर पिक्चर काढले तरी हिट जातील. अमेरिकेत ५०% लोकांना ट्रंप हवा आहे, म्हणून जिओपी ट्रंपला सपोर्ट करते सारखंच चीड आणणारं आर्ग्युमेंट आहे ते.

I SEE YOU बघितला. थँक्स फॉर रेको माधव.
सस्पेन्स ठेवलाय छान पण त्या ग्रेग चा हेतूच कळला नाही या सगळ्यामागचा..

फायटर पाहिला. टाईमपास आहे. इसमें एक्शन हैं, ड्रामा हैं, ट्रेजेडी हैं। गूड ओल्ड हिंदी मूव्ही. मजा आली.

इंडिया-पाक टशन वर इतक्यात आलेल्या पठान पेक्षा हा पुष्कळ चांगला वाटला.

I see you मी पण बघितला काल..
अंजली>>+११ मोटिव कळला नाही..सिनेमा एंगेजिंग आहे..
थँक्स माधव.

ग्रेग चा हेतूच कळला नाही या सगळ्यामागचा.. >>>

*** स्पॉयलर अलर्ट ***

फ्रॉगींग म्हणजे एखाद्याच्या नकळत त्याच्या घरात राहणे. त्यात फक्त थ्रील असते घरमालकाला त्रास द्यायचा हेतू नसतो. थ्रील म्हणून फ्रॉगींग करायला आलेल्या दोन टीन एज मुलांना ग्रेगचे खरे रुप कळते आणि मग तो त्यांच्याच जीवावर उठतो.

ग्रेग चाइल्ड अ‍ॅब्युसर आहे. १५ वर्षापूर्वी त्याने दोन मुलांना (जी रुळांवरून चालताना दाखवली आहेत) अ‍ॅब्युस केले असते. (पण त्याकरता दुसराच कुणी दोषी ठरवला गेला असतो.) त्या दोन मुलांपैकी एक म्हणजे फ्रॉगींग करायला आलेला अ‍ॅलेक. जेंव्हा अ‍ॅलेकला समजते ते घर ग्रेगचे आहे तेंव्हा त्याच्याकरता ते फक्त निर्हेतुक फ्रॉगींग राहत नाही. तो थोडा हिंसक बनतो आणि ग्रेगच्या मुलाला जखमी करतो.

मी पण I see you पाहिला. चांगला वाटला . बाकी मोटिव बाबत अंजली आणि मृणाली ला अनुमोदन.

माधव थँक्स..
तो अ‍ॅलेक प्रकरण आलं होतं लक्षात आणि चाईल्ड अब्युज असावं अशी शंका पण आलेली..

एकंदरीत ॲनिमल आणि टायगर ३ ह्या दोन्हींत पिसं काढायला खूप वाव आहे. जाणकारांनी मनावर घ्यावं.

काल डिस्नीवर Secretariat नावाचा सुंदर सिनेमा पाहिला. खर्‍या घटनांवर आधारित आहे.

१९६९ मध्ये एका अमेरिकन गृहिणीचं आयुष्य अचानक बदलून जातं. तीन मुलं, नवरा आणि घरकाम यात गुंतून गेलेली ही स्त्री, या अचानक समोर आलेल्या परीस्थितीत सगळी सुत्रं हातात घेते आणि योग्य निर्णय घेऊन अगदी थोड्या कालावधीत प्रसिद्ध होते.

सगळा सिनेमा घोडे, घोड्यांचे मालक, रेसेस याभोवती आहे. सिनेमाचे हिरो दोन - पेनी आणि तिचा सेक्रेटेरिएट नावाचा घोडा. पेनीचं काम Diane Lane या अत्यंत गुणी अभिनेत्रीनं केलंय. एक किंचित, छोटासा अगदी चिमुटभर व्हिलनही आहे. एकूणात एकदम फील गुड, पॉझिटिव्ह सिनेमा.

सिनेमा बघताना Dick Francis च्या क्राईम कादंबर्‍यांची आठवण येत राहते. अर्थात या सिनेमात क्राईम वगैरे नाहीये.

अ‍ॅनिमल सिनेमा बघून पोळलेल्या लोकांना या उमद्या अ‍ॅनिमलचा सिनेमा बघून नक्कीच उभारी येईल.

फ्रॉगींग म्हणजे एखाद्याच्या नकळत त्याच्या घरात राहणे >> अच्छा. मग 'घेतल शिंगावर' हे मराठी नाटक फ्रॉगिंगवर आधारित आहे.

उद्या "गन्स ऑफ अ‍ॅनिमल" नावाने इतर नायकांची "दोस्त राष्ट्रे" या गन्स निकामी करतात असाही पिक्चर निघेल >>> Lol

मामी - धन्यवाद माहितीबद्दल. काही वर्षांपूर्वी अमेरिकेत या पिक्चरची आणि या पुस्तकाची खूप चर्चा होत होती. अनेकांकडे हे दिसायचे. बहुधा लोक समर रिडिंग वगैरे करताही वापरत. किंवा नुसते शो करताही ठेवत असतील. पण तेव्हा पुस्तके (हार्ड कॉपी) वाचण्याचे कल्चर होते, त्यामुळे खूप चर्चेत होते हे. रेस च्या घोड्याबद्दल आहे इतकेच माहीत होते पण इतर माहिती नव्हती.

बोजॅक हॉर्समन सिरीज मध्ये सेक्रेटरीयटचा संदर्भ होता. बोजॅक हा एक घोडा असतो. त्याचे एक सिटकॉम ९०s मध्ये खूप गाजलेले असते. पण आता तो आऊट ऑफ वर्क असतो. त्याला चालून येणारी संधी म्हणजे सेक्रेटरीयटचा बायोपिक असतो Lol

माधव येस फ्रॉगिंग कळलं पण चाईल्ड अ‍ॅब्युजरचा रेफरन्स/संवाद मिस झाला होता समहाऊ माझ्याकडून.

यावरून आठवलं नवीन Friday the 13th The awakening येणार होता गेल्या वर्षा अखेर. आला का, कुणी पाहिला का?

एक हॉरर थ्रीलर ससपेन्स इंग्रजी पिक्चर सुचवा बरं कुणी तरी..
>>>(सगळे चांगले आहेत पण तारांकित खूप आवडते आहेत.)
रोजमेरीज बेबी*
एलियन
हॅलोविन
द थिंग*
इन द माऊथ ऑफ मॅडनेस
द कॅबिन इन द वूड्स*
कॅरी
मिजरी*

थँक्स कॉमी, फिबां.

कॅबिन इन द वूड्स*
कॅरी>>>> हे दोन पाहिलेत..दोन्ही आवडलेले..
बाकीचे टाकले यादीत

किक ओरिजिनल तेलुगू सुपरहिट आहे..तो पण पाहिलाय..हिंदी पण पाहिलाय..

अ‍ॅनिमल चा सगळ्यात मोठा वांदा हा आहे कि रणबीर चे त्याच्या बापावर असलेले बेसुमार सायको लेव्हलचे प्रेम (ऑबसेशन) दीड प्रसंग सोडले तर कुठेच डेव्हलप केलेले नाही. चित्रपटाचा गाभा ज्याच्यावर उभा आहे ते वर वर स्पर्श लावलेले आहे. जेव्हढा वेळ निर्रथक हिंसेमधे नि तोफा/बंदूक्,अंडरवेअर च्या चर्चेमधे घातलाय तेव्हढ्या वेळात बाप नि बेटा ह्यांचे रीलेशन दाखवले असते तर सिनेमाला काही बेस मिळाला असता. बर बापाचे कॅरॅक्टर असते नसते तरी फरक पडला नसता अशा प्रकारचे आहे. रणबीर त्याचे कॅरॅक्टर कॅरी करतो हे मान्य करूनही ते पूर्णपणे एकांगी वाटत राहते. कबीर सिंग मधे शाहिदचे कॅरॅक्टर जसे उभे होत गेले आहे ते करण्यात वांगा रेड्डीला फेल गेलाय - त्याचा सगळा फोकस, क्लिक बेट म्हणून सेक्सुअल संवाद, सीन नि उगाच भडक साऊथी हींसा ह्यावर आहे. वांगा रेड्डी ने स्टोरी लिहून पटकथा, संवाद मेघना गुलझार, अभिशेक दुबे , झोया अख्त्रर अशा कोणाकडे दिले असते तर जबरदस्त सिनेमा उभा करता आला असता.

एक बेसिक इंस्टींक्ट म्हणून सिनेमात आलेले सेक्शुअल रेफरेन्स रणबीर ला अ‍ॅनिमलिस्टीक दाखवण्यात कमी पडतात असे मला वाटले. जवळजवळ तशा प्रत्येक सीन किंवा संवादा नंतर त्याची काही ना काही टेंडर मोमेंट आहे ज्यामूळे तो अ‍ॅनिमलिस्टिपेक्षा सायको नि मनोविकृत कॅटेगरी मधला अधिक वाटतो. बॉबीचे १० मिनिटापुरते आलेले कॅरॅक्टर एकदम परफेक्ट अ‍ॅनिमलिस्टिक वाटते. त्याला अजून जास्त स्कोप द्यायला हवा होता असे वाटले.

बाकी सिनेमातला अचाट नि अतर्क्य भाग कमेंट करण्याच्याही लायकीचा नाही.

गर्दीश मधे बाप - मुलगा नाते फार छान उलगडत जाते. >> +१. (त्यात शेवट थोडा भरकटलाय पण तेव्हढे चालायचेच) शक्ती बघा, दोन सुपरस्टार असूनही नि मसाला असूनही हे फ्लॉड नाते कसे उलगडून नेलेले आहे.

शक्ती म्हटलं कि कणेकरच आठवतात.
मै तुम्हारे सामने पँट पहनकर नही लुंगी पहनकर खडा हूं Lol

शनिवार रविवारची सोय झाली
१. बसंती तांगेवाली २. हसीना और नगीना आणि ३. अव्वल नंबर सापडलेत.
देव आनंदचे शेवटचे सिनेमे हा स्वतंत्र विषय आहे.

Pages