चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अ‍ॅनिमल बघायला घेतला, आधी इंटरेस्टिंग वाटला नंतर अगदीच कै च्या कै !
सुरवातीला त्याचं सायको कॅरॅक्टर विथ ह्युमर ,स्टोरी टेलिंग एन्गेजिंग वाटत होती नंतर वाट लागली..
टु बी व्हेरी स्पेसिफिक तो सुप्रसिद्ध एका वेळी हजारो बुलेट झाडणारा रणगाडा कम गोल्फ कार्ट आल्यापासून जे वेडेपणा सुरु झाला तो संपेना.. उपेन्द्र लिमयेची वाघाचं प्रिन्ट असलेली अंडरवेअर घालून रणबीर मारामारी करायला जातो आणि मर्द मराठा मोड ऑन होतो, बॅक्ग्राउंडला अजयतुलचं 'डॉल्बीवाल्या बोलाव माझ्या डीजेला" लागतं तोवर हसु येत होतं पण मग अगदीच कै च्या कै मारामार्‍या..मधेच कुर्‍हाड घेऊन एकावेळा ३०० लोकांना मारणे आणि त्याचे बॉडीगार्ड सरदारही काही मारामारी करायच्या ऐवजी ठप्प उभे राहून पंजाबी लोकगीत गाऊ लागतात तेंव्हा मात्रं हाइट ऑफ स्टुपिडीटी हहपुवा झाली Biggrin
एक व्हिलन मरतो तोवर समजतं कि का व्हिलन नह्हीच्चे.. खरा व्हिलन बसलाय स्कॉटलन्ड मधे बिचारा बॉबी देओल तब्बल २तास १५ मिनिटांनी एन्ट्री मारतो, त्याला ३ बायका दाखवायच्या म्हणून ज्॑बरदस्तीने मुस्लिम !
त्या दोघांची क्लाय्॑मॅक्स मारामारी तर हस्यास्पद आहे, वर सिक्वेल ला स्कोप ठेवलाच आहे !
असो, जी टिपिकल ट्रॅशी साउथ फिल्म आपेक्षा होती तितका वाईट वाटला नाही सिनेमा , एकदा (नावं ठेवत) पहायला ठिक आहे.
रणबीरने भारी काम केलय, एकदम स्क्रीन व्यापून टाकणारं , त्याच्यापुढे ती मिडिऑकर रश्मीका फिकी पडतेच पण अनिल कपुरलाही ओव्हरशॅडो केलय रणबीरने, फल्तं एकच प्रॉब्लेम.. सतत हे कॅरॅक्टर पूर्वीच्या संजय दत्तला डोळ्यासमोर ठेऊन केलय का असं वाटत रहातं.. ऑफिशिअल बॅडबॉय ऑफ बी टाउन !
बाकी त्याचं मिसोजनिस्ट कॅरॅक्टर इथे खपून जातं कारण डिरेक्टरची व्हिजन क्लिअर आहे, तो हिरो नाही 'अ‍ॅनिमल' आहे, वाइल्ड, रेकलेस, दयामाया नसणारा.. घरात जे वातावरण आहे ते बघत वाढलेला दुर्लक्षित प्रोब्लेमॅटिक चाइल्ड टर्न्ड इन्टु अ सायको.. तो कुठून प्रोग्रेसिव वागणार ?
रक्तरंजित व्हॉयलेन्स, अ‍ॅडल्ट लँग्वेज वगैरे ज्यांनी गेम ऑफ थ्रोन्स, मिर्झापुर पाहिलय त्यांना काही शॉकिंग /टु मच वगैरे वाटणार नाही!
कबीर सिंग सारखं इथे त्याला ग्लोरिफाय केलेलं नाहीये, तो क्रिमिनल आहे !.
प्रॉब्लेम तेंव्हा होतो जेंव्हा ऑडियन्स अ‍ॅनिमल कॅरॅक्टरला आदर्श मानतात, त्य॑ला हिरो मानून त्याचे अनुकरण करतात.. तो लोकांच्या मेन्टॅलिटीचा दोष आहे, स्टोरी टेलरचा नाही, इट्स ओके टु टेल अ स्टोरी ऑफ सायको क्रुएल पर्सन !

मृणाली,
खरय, आजकाल शेवटपर्यन्त पहावासा वाटला हे मी सिनेमा आवडण्याचं लक्षण ठरवलय Proud
बरेच सिनेमे अर्ध्यात बन्द केलेत इतक्यात इनक्लुडिंग ओव्हरहाइप्ड पठाण, डंकी , जवान वगैरे !

मला वाटतं ज्यांनी थिएटरमध्ये बघितला त्यांना इतर प्रेक्षकांच्या टाळ्या शिट्ट्या इत्यादी प्रतिसादांमुळे जास्त जाणवला असेल हिंसकपणा.

टिपिकल ट्रॅशी साउथ फिल्म आपेक्षा होती तितका वाईट वाटला नाही सिनेमा +१
संजय दत्तला डोळ्यासमोर ठेऊन केलय का असं वाटत रहातं. मला पण रणबीर च्या ठिकाणी कधी कधी संजय दत्त चा भास झाला.
फिरोझ खान दिग्दर्शित यल्गार कुणी पाहिला आहे क? त्यात सुद्धा संजय दत्त च बापावर कबीर बेदी वर प्रेम असत पण त्याच धाकट्यावर जास्त असत.
कुर्‍हाड घेऊन एकावेळा ३०० लोकांना मारणे कै च्या कै असला तरी conviction चान्गल आहे ते बोलिवूड मधे फारस दिसत नाही.
अशी कापा कापी पहिल्यान्दा kill bill मधे पाहिली होती .

सायको क्रुएल पर्सनची स्टोरी सांगण्यात गैर नाही. पण जर पब्लिक त्याच्या सीनला टाळ्या शिट्ट्या वाजवत असतील तर तो स्टोरी टेलरचाच दोष झाला. त्याचे कॅरेक्टर तसेच ग्लॅमराईज केल्याशिवाय टाळ्या शिट्ट्या येणे शक्य नाही.

सिनेमा बघून मांडा कि तुमचं मत..
इतका वायोलंस साऊथ सिनेमात कॉमन आहे..सलार,लिओ,कैथी, विक्रम,थेरी वगैरे वगैरे..
एनिमलमधले डायलॉग्ज पहिल्यांदा बॉलिवूड सिनेमात असावेत..हॉलीवूड कैटेगरी डायलॉग्ज आहेत..

अ‍ॅनिमल मी पाहिला नेटाने- What else?? Can it get any worse? असं म्हणत.
भयाण! दिडकीची भांग घेऊन बनवलेला असावा असे वाटले. काहीही म्हणजे काहीही आहे. ते लोक असे मिर्झापूर टाइप माफिया गँग का दाखवलेत? देश के सबसे बडे बिझ्नेस्मन स्टील इंडस्ट्री जायन्ट असतात ना ते, त्यांच्या मालकीच्या शाळा कॉलेजेस वगैरे असतात, (म्हणजे इमॅजिन मित्तल, अंबानी वगैरे स्वतःच्या हाताने मशीन गन्स धाड धाड उडवत फिरताना?? ) Proud त्यांच्या मुलीला कोण कसे रॅगिंग करेल? Happy हे का तर त्या रणबिर ला सो कॉल्ड अल्फा मेल का काय ते दाखवण्यासाठी. हा रुटिन १०-१००-३०० वगैरे लोकांना एका वेळी पब्लिक प्लेस मधे मारणारा. अरे तू अहेस कोण नक्की आणि काय शिकून आला आहे अमेरिकेहून? Lol टॉक्सिक प्रेम(?), मिसोजनी, व्हायलन्स, सर्व व्यवस्थित ग्लोरिफाय केलेल आहे. रणबिरचे कॅरेक्टर निगेटिव वगैरे नाही तर हिरोच दाखवायचेय त्या सायको वांग्याला. काय एकेक दिव्य विचार. सिनेमा आणि हे कॅरेक्टर भयंकर हिट गेलेले आहे हेच मला डिस्टर्बिंग वाटले.
बॉबी आणि तृप्ती डिमरीचा इतका उदो उदो झाला, मिलियन्स रील्स आले आणि सिनेमात त्यांना बघून हसावे की रडावे की डोके फोडून घ्यावे असे झाले. हार्डली ४-५ मिनिटाचे स्क्रीन टाइम आहेत त्यांचे आणि काहीही वाव नाही कसलाच स्पार्क दाखवायला. तृप्ती डिमरी मला एरव्ही आवडते खरं तर पण यात मख्ख आणि डंब वाटलेली आहे निव्वळ.
स्पॉयलर अ‍ॅलर्ट : सिक्वेल अ‍ॅनिमल पार्क म्हणून येणार आहे असे दिसले. त्यात रणबीर चा ४ पदरी रोल आहे असे दिसते आहे, स्वतः विजय, त्याचा हमशकल असलेला तो कसाई , तृप्तीचा मुलगा, रश्मिकाचा मुलगा सगळे रणबिरच Rofl आणि बॉबीचा किमान डबल रोल कारण त्याला ट्विन्स झालेत. सुपर डुपर हिट जाणार हा पण Happy

<<म्हणजे इमॅजिन मित्तल, अंबानी वगैरे स्वतःच्या हाताने मशीन गन्स धाड धाड उडवत फिरताना??>>
<<अरे तू अहेस कोण नक्की आणि काय शिकून आला आहे अमेरिकेहून>>
Lol
पळवत एवढा भाग तरी पाहून घ्यावा म्हणतो.

मै Lol

आजकाल मी कोठे मोठ्या तोफा वगैरेंचा फोटो पाहिला (फेबु फीड मधे येतात, का कोणास ठाउक. वर्ल्ड वॉर २ मधल्या जर्मन, रशियन तोफा ई. आता हे लिहील्यावर अजूनच येतील बहुधा) की विचार करतो की यापेक्षा मोठी गन अ‍ॅनिमल मधे हे लोक घेउन फिरत असतात. उद्या "गन्स ऑफ अ‍ॅनिमल" नावाने इतर नायकांची "दोस्त राष्ट्रे" या गन्स निकामी करतात असाही पिक्चर निघेल Happy

स्वतः विजय, त्याचा हमशकल असलेला तो कसाई , तृप्तीचा मुलगा, रश्मिकाचा मुलगा सगळे रणबिरच >> Lol
आता यात एका अभिनेत्याचे नाव टाकले जाईल. तृप्तीच्या मुलाचा मुलगा Wink

चित्रपट चांगला आहे कि वाईट आहे हे व्यक्ती सापेक्ष आहे..पण सिनेमा हिट झालाय म्हणजे सोसायटी कुठल्या गोष्टीत इंटरेस्टेड आहे आणि काय पाहणे पसंत करते हे कळतंय.
सिनेमा म्हणजे एक बिझनेस ऑफ आर्ट..समाजाची डिमांड असेल अशा सिनेमांची म्हणजे हे येणारच.. हे सिनेमे कॉमन माणसांपर्यंत पोचतात कशे मग..सेन्सॉर बोर्ड ने सेन्सॉर करून ए सर्टिफिकेट देऊन आपल्यापर्यंत पोचवलाय आणि अडल्ट हा सिनेमा बघू शकतात हे त्यांनी डिसाईड केलंय..हाच एक मोठा जोक आहे..सरकारला पैसा हवाय..
सगळ्यांना हे स्वातंत्र्य आहे सिनेमा बघायचा कि नाही बघायचा...आपण हॉलीवूड ला कॉपी करण्याच्या बेबी स्टेप्स टाकतोय.. हॉलीवूड तर भयंकर सेक्स, टॉर्चर,वायोलंस,डिस्टर्बिंग मुव्हीजच्या लेवलला पोचलेत आधीच..आता काय करणार मग ह्यालाच प्रगती म्हणत असावेत...

काल मुलीला हिरो लावून दिला. तिने पहिल्या गाण्यापर्यंत पाहिला. खूप दिवसांनी जुनी मारामारी पाहिली.
मारामारीला पण स्टोरी होती. ढिश्युम ढिश्युम आवाजाने कान तृप्त झाले. हिरो आधी मार खाणार, मग तिरक्या नजरेने व्हिलनकडे बघणार आणि मग दे दणादण. मग दोघेही उडून हातगाडी, लाकडाची वखार, ताडपत्रीची भिंत पाडणार. भावनेला हात घालायची मारामारी.

आताच्या साऊथच्या हिरोला बघून हे फिलिंग येतच नाही. असं वाटतं कि याच्या बसायच्या जागेत लाखो सेल बसवलेले आहेत,ज्यामुळे कुणी टच केला कि ते उडून जाणार (चिटकायला हवेत पण साऊथचे फिजिक्स असल्याने वायरिंग उलटे असते).

चित्रपट चांगला आहे कि वाईट आहे हे व्यक्ती सापेक्ष आहे..पण सिनेमा हिट झालाय म्हणजे सोसायटी कुठल्या गोष्टीत इंटरेस्टेड आहे आणि काय पाहणे पसंत करते हे कळतंय. >>> एक वेगळा आणि गंभीर धागा हवा यावर. त्यात एका विशिष्ट हिरोच्या इरीटेटिंग पोस्टी नकोत. माझ्या मते सिनेमा चांगला आहे कि नाही हे समजायच्या आतच तो हिट झालेला असतो. चांगल्या चित्रपटाला स्क्रीन्सच मिळत नाहीत. ट्वेल्थ फेल चांगला आहे हे ओटीटी वर आल्यावर समजते. ही चर्चा इथे होऊ शकत नाही ही कल्पना असल्याने थांबतो.

12th फेल हा सिनेमा फक्त इन्सीपीरेशनल कैटेगरीत येतो.. असे सिनेमे ओटिटिवर आणि टिव्हीवर आल्यावर लोक बघतात..थिएटरमधे जाऊन बघणे लोक प्रीफर करत नाहीत.. अशा सिनेमांना स्क्रीन्स मिळत नाहीत पण कमर्शियल सिनेमांना मिळतात हे सगळ्या राज्यात आहे..हाच तर बिझनेस माफिया आहे..आर्ट सिनेमे दहा टक्के लोक थिएटरमध्ये बघणं पसंत करतात..बाकी ९० टक्के (बहुतांश तरुण वर्ग) कमर्शियल सिनेमे पसंत करतात.. आणि हेच ९०% लोक जास्त करून सिनेमा हिट करतात..

आपण हॉलीवूड ला कॉपी करण्याच्या बेबी स्टेप्स टाकतोय.. हॉलीवूड तर भयंकर सेक्स, टॉर्चर,वायोलंस,डिस्टर्बिंग मुव्हीजच्या लेवलला पोचलेत >>>> हॉलिवुड सिनेम्यांना कशाला ब्लेम करायचे? सेक्स , वायलन्स असला म्हणजे वाईट सिनेमा असेही नाही.

Saw series, hostel सीरीज,Texas चेनसॉ सीरीज,अमेरिकन पाय सिरीज काय आहे यात मग..
वी आर द मीलर्स चांगला हिट सिनेमा आहे..बघा किती अडल्ट कॉमेडी आहे, असे अजून बरेच सिनेमे आहेत.. वर लिहिलेले जस्ट छोटीशी उदाहरणंं...असे सिनेमे अजून तरी भारतात बनले नाहीत..
तिकडं फक्त अवतार, जुरासिक पार्क,स्टुअर्ट लिटल सारखेच सिनेमे बनवत नाहीत...

12th फेल हा सिनेमा फक्त इन्सीपीरेशनल कैटेगरीत येतो. >>> हे फक्त सहज आठवलेले उदाहरण आहे. यादी देणे शक्य नाही. पण इथे किक सारखा बकवास सिनेमा सुद्धा हिट झालेला आहे. काही कळायच्या आत गल्ल्यावर डल्ला मारून गेला.
९०% वगैरे काही खरं नाही. २% लोकांनी सिनेमा पाहिला तर तो हिट होतो. सरासरी तीनशे रूपये तिकीटाने सहाशे कोटीचा गल्ला गाठला तर २ कोटी लोक बघतात असे साधे गणित आहे. या दोन कोटी लोकांना पहायला एकच पर्याय उपलब्ध केला जातो, त्याची हाईप केली जाते. एका आठवड्यात या दोन कोटीमधल्या जास्तीत जास्त लोकांनी चित्रपट पाहिला पाहिजे हे ते तंत्र आहे. जर पूर्वीसारखे पंचवीस आठवडे चित्रपट चालत असते तर असे सिनेमे तग धरून राहिले असते का ? माऊथ पब्लिसिटीला वावच नाही आता.

अ‍ॅनिमल एवढी चर्चा करण्याच्या लायकीचा पण नाही. पब्लिक बघुन विसरुन पण गेली. पण माबोकर उगाच किस पाडत बसतात Happy असो कुणी फायटर बघितला का? कसा आहे?

फायटर पाहिला.
पहिल्यांदा सर्व हिरोंपेक्षा व्हिलन जास्त आवडला.खूप जास्त विमानं आहेत.त्यामुळे मध्ये मध्ये हरवल्या सारखं होतं(अर्थात पिक्चर पायलटस वर आहे त्यामुळे..)
दीपिका छान दिसते पण सेम पठाण सारखीच. ह्रितिक युनिफॉर्म मध्ये अर्थातच ग्रीक गॉड दिसतो.बॉडी परफेक्ट.डान्स स्टेप्स फारश्या गुंतागुंत वाल्या दिलेल्या नाहीत.ह्रितिक च्या डोळ्यात एक थकलेला भाव दिसतोय हल्ली.(म्हणजे 'आता नको बाबा हे ऍक्शन बिक्षन, काहीतरी वैचारिक किंवा जाहिराती करतो' असं म्हणत असल्या सारखा.)
एकदा पाहायला फायटर ठीक आहे.पण नथींग लाईक वॉर.वॉर मध्ये ह्रितीक टायगर दोघे सॉलिड होते.
शरीब हाश्मी उर्फ तळपदे ला एकदम 5 मिनिटांचा फनी रोल दिला आहे.
ह्रितीक चा वेदनादायक भूतकाळ पलक झपकते ही संपेल इतका सेकंदात गुंडाळला आहे.
अनिल कपूर मस्त.पण त्यालाही फार काम दिलेलं नाही.
टीम मधले इतर लोक(बिपाशापती, दुसरा कर्नल,शीख) सगळे आवडले.

Pages