चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऐंशीव्या वर्षी दिपिका त्याच्या आईची भूमिका करेल. आलियाची नात हिरॉईन असेल. कॅटरीना धार्मिक आजीच्या भूमिकेत असेल. शंभराव्या वर्षी आलियाची नात त्याची मम्मी असेल.

त्याचे फॅन्स व्हीलचेअर वरून नातवाच्या पाठीवर बसून हॉल मधे सिनेमा बघत असतील. नातू सारखा चेक करत असेल कि आजोबा जास्त एक्साईट तर नाही ना झाले... हार्ट अ‍ॅटॅक नको यायला.

लेकीला काय येत नाय तिला उजवायचे आहे. पोरगा हाताशी नाही. बारका फारच बारका आहे. उसको मेहनत करनाइच पडेंगा बुढापेमें
>>>>>>
शाहरूख हा भारतातील पहिल्या क्रमांकाचा आणि जगातील दुसर्‍या क्रमांकाचा श्रीमंत कलाकार आहे.
तो मेहनत करतो ते पैसे कमवायला नाही तर ते त्याचे कलेबाबतचे पॅशन आहे.
या वयात तो नाचतो, उड्या मारतो, अ‍ॅक्शन करतो, तरुणांना लाजवेल अश्या एनर्जीने मेहनत घेत परफॉर्मन्स देतो...
तो कोणाचा आवडीचा हिरो असेल वा नसेल, पण त्याचे हार्डवर्क आणि पॅशन हे सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे हे कोणीही अमान्य करू नये. याबाबतीत तो नक्कीच युथ आयकॉन आहे.

..

त्याचे फॅन्स व्हीलचेअर वरून नातवाच्या पाठीवर बसून हॉल मधे सिनेमा बघत असतील. नातू सारखा चेक करत असेल कि आजोबा जास्त एक्साईट तर नाही ना झाले... हार्ट अ‍ॅटॅक नको यायला.
>>>>>>>>
ते नातू सुद्धा त्याचे फॅन असतील Happy
आमच्या घरातच तीन पिढ्यांमध्ये शाहरूखचे फॅन आहेत!

माबोकरांची आठवी पिढी शाखाच्या नवीन चित्रपटावर चर्चा करताना आपल्या (आ?) स्व. पूर्वजांच्या बिकिनी पोस्ट्स वाचत असतील. त्यांना किती प्रश्न पडतील.
एव्हढे कपडे? तरी?

तो मेहनत करतो ते पैसे कमवायला नाही तर ते त्याचे कलेबाबतचे पॅशन आहे. >> आय गेट इट कि तु फॅन आहेस. पण तो कशासाठी काय करतो हे तुला कसे माहीत. अन्दाज आहे ना हा? म्हणजे तुला तसे वाटते.. बरोबर?
मला त्याच्या चित्रपट निवडीवरुन, त्याच्या अभिनयावरून वाटते कि तो फक्त TP म्हणुन आणि पैसे कमवायसाठी काम करतो.

यावर्षी शाहरूखने जे बॉक्स ऑफिसवर केले आहे ते पाहता त्याची स्टार पॉवर त्याची हिरो म्हणून करीअर खूप खेचणार हे नक्की. ............हिरो म्हणूनच राहणार. अफाट एनर्जी आहे त्या माणसात >> अगदी मान्य. त्याचं ॲक्टिंग, लोकांमधली क्रेझ वगैरे गोष्टी कोणीच नाकारत नाही. पण तरीही त्याचं वय चेहऱ्यावर दिसतं, ही वस्तुस्थिती आहे. त्यातल्या त्यात जर समोर राणी, जुही, काजोल सारख्या नट्या असतील तर ते कमी जाणवेल. हे फक्तं शाहरुखच नाही, तर सगळ्याच नट - नट्यांच्या बाबतीत आहे. कोणीही चिरतारुण्याचं वरदान घेऊन आलेलं नाही. ओम शांती ओम, चेन्नई एक्स्प्रेस आणि पठाण तिन्हीच्या फ्रेम शेजारी ठेवून बघितल्यावर शा खा आणि दिपिका, दोघांच्याही चेहऱ्यामधले बदल ठळक जाणवतात. ते नाकारण्याचे काहीच कारण नाही.
अमिताभ सुद्धा शहेनशाह मध्ये मिनाक्षी पुढे वयस्करच दिसत होता. रजनीकांत सुद्धा एरवी विग न घालताच फिरत असतो.
अमिताभने त्याच्या तारुण्यात केस पांढरे करुन स्वतःच्याच वडिलांचे एका पेक्षा जास्त रोल केले आहेत. त्याच्या सेकंड इनिंग मध्ये तर त्याला उत्तमोत्तम भूमिका मिळाल्या. दोघे एकाच काळातील नसल्याने दोघांच्यात तुलना करण्याचा प्रश्नच येत नाही.
सहज मनात आलं, शा खा आणि विद्या बालन ने एकत्र काम केलं आहे का?

सन 3024 मधे शाखाच्या पठाण 1200 या नव्या चित्रपटाच्या प्रमोशन च्या वेळेस त्याला मानवी इतिहासाचे एक सहस्त्रक या विषयावर प्रश्न विचारले जातील. त्या वेळची हिंदी आणि मराठी वेगळीच असेल.
तेव्हा कदाचित विसाव्या शतकातील प्रभाव टाकणारी व्यक्ती म्हणून शाखा हर्दनहळ्ळी दोड्डेगौडा देवेगौडा यांच्या आठवणी भावूक होऊन सांगत असेल.

आय गेट इट कि तु फॅन आहेस. >>> हो, पण मी जे शाहरूखबाबत लिहिले आहे ते फॅक्ट आहे Happy

पण तो कशासाठी काय करतो हे तुला कसे माहीत. अन्दाज आहे ना हा? म्हणजे तुला तसे वाटते.. बरोबर?
मला त्याच्या चित्रपट निवडीवरुन, त्याच्या अभिनयावरून वाटते कि तो फक्त TP म्हणुन आणि पैसे कमवायसाठी काम करतो.
>>>>>>
तुमचाही अन्दाज आहे ना हा? म्हणजे तुम्हाला तसे वाटते.. बरोबर? Happy

जो माणूस आधीच ईतका श्रीमंत आहे त्याला अजून पैसे कमवायला दिवसाचे सोळा सोळा तास जीवाचे हाल करून काम करायची काय गरज आहे? त्याचे पॅशन दिसून यायला त्याचे फॅन असने गरजेचे नाही. त्याचे चित्रपट व्यावसायिक असतात किंवा तो व्यावसायिक कलाकार आहे म्हणून तो मेहनत करत नाही असे नसते. पठाण, जवान, डंकी हे चित्रपट त्याने कुठल्या एसी ऑफिसमध्ये कॉफी पित पित नेट सर्फिण्ग करत केले नाहीयेत. आजही या वयात तो आपले सुपर्रस्टारपद टिकवून आहे ते मेहनतीमुळेच.

पण तरीही त्याचं वय चेहऱ्यावर दिसतं, ही वस्तुस्थिती आहे.>>> दिसू दे की. किंबहुना ते अमान्य करत नाहीयेच. या वयात ते कमीजास्त दिसणारच. पण त्याच्यात जी ग्रेस आहे ती त्याला कायम तरुणच ठेवणार Happy
बाकी बॉक्स ऑफिसवर त्याने जो धुमाकुळ घातला आहे आणि त्याच्या एंट्रीला ज्या शिट्ट्या आणि टाळ्या मे अनुभवल्या आहेत ते पाहता चित्रपटप्रेमी दर्दी पब्लिक त्याला स्विकारत आहे. मग एज इझ जस्ट ए नंबर...

शा खा आणि विद्या बालन ने एकत्र काम केलं आहे का? >>>> मुन्नाभाईला त्याने डेट नसल्याने नकार दिला नसता तर दुसर्या भागात असती दोघांची जोडी Happy

तुमचाही अन्दाज आहे ना हा? म्हणजे तुम्हाला तसे वाटते.. बरोबर? >> हो, तसे मी मान्य पण करते.
हो, पण मी जे शाहरूखबाबत लिहिले आहे ते फॅक्ट आहे >> आणि मी म्हणत नाही की ते फॅक्ट आहे म्हणुन

फॅक्ट काय आहे हे आपल्याला माहीत नाही. माझा आक्षेप फक्त फॅक्ट असल्यासारखे स्टेट करण्याला होता.

हे.मा.शे.पो.

फॅक्ट काय आहे हे आपल्याला माहीत नाही.
>>>>

तो जगातला दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत आहे.
तरी तो आजही प्रचंड मेहनत करतो.
हे फॅक्ट आहे हे मला माहीत आहे.

'777 चार्ली ' हा कानडी सिनेमा जिओ सिनेमा वर आहे. 777 वाचून मला खरंतर 555 साबणाची जाहिरात आठवली. पण मग नॅशनल अवॉर्ड मिळालंय असं म्हटल्यावर पाहिला. एकही कलाकार माझ्या ओळखीचा आणि माहितीचा नसल्याने त्यावर लिहायचा प्रश्नच नाही. म्हैसूर आणि आसपासचं चित्रिकरण छान आहे. बऱ्याच घटना ' अतिशयोक्ती ' प्रकारात मोडतात. मात्र ' चार्ली ' चं काम मस्त झालंय. त्यासाठी हा सिनेमा नक्की बघावा.
कथेविषयी जास्त काही न सांगता एवढंच सांगेन की ' 777 चार्ली '
मधील मध्यवर्ती पात्र 'चार्ली ' हे एक गोंडस भुभू आहे.

बाईपण पाहिला hotstar वर
केदार शिंदेच्या चित्रपटात फील गुड वातावरण असतं, छोटे प्रॉब्लेम्स असतात त्यावर सोप्पे सोल्युशन्स असतात.
तसाच टिपिकल चित्रपट. एकदा बघू शकता.

कष्टाचे काम करणारे मेहनत करत नसल्याने ते बाद.
मेहनत केल्याने शाखा अमर होणार आहे. पुढे कुणीही जिवंत राहिले नाही तर स्वतःलाच सिनेमे बनवून स्वतःच तिकीट काढून पहावे लागतील.
खाण्यापिण्यासाठी मेहनत करण्यातून वेळ मिळाला तर शेतीकाम, धरण बांधणे, पाटाचे पाणी सोडणे, पीकपाणी घेणे अशी किरकोळ कामे टीपी म्हणून केली कि स्वैपाक वगैरे करावा लागेल. त्यासाठी जंगलात जाऊन लाकडे तोडून आणावी लागतील. जंगल नसेल तर झाडे लावावी लागतील. ही काही मेहनत घ्यायची कामे नसल्याने आरामात होतील.

मेहनतीचा आदर्श चित्रपटात काम केल्यावर समजतो.

बांगडू Wink
कधीकधी माबोवर मला महाकाली आणि रक्तबिजाच्या पौराणिक मिथकातले युद्ध आठवते. रक्ताच्या एका थेंबापासून नवा रक्तबीज निर्माण होऊन पुन्हा त्याच्याशी लढावं लागायचं. शेवटी तिने थेंब वाडग्यात कॅच करून त्याचा नाश केला. तसं आपल्या पोस्टीतला एक थेंबही सांडू देऊ नका, पुन्हा नव्याने रक्तबीज निर्माण होतो. लेखणी आणि तलवार सारखीच असते. Proud

रक्तबीज वरून आठवलं. पठाण मधे शाहरूख खानने जिवाची बाजी लावून रक्तबीज आणले.
दुसर्‍या कुणालाही जमले नसते. Wink

12th Fail पहिला. आवडला. कथेव्यतिरिक्त व्यक्तिचित्रण फारच प्रभावी वाटलं.

गँग्ज ऑफ वासेपूर - I पाहिला. म्हणजे आधीही पाहिलेला पण तेव्हा लहान असताना फारसा काळाला नव्हता. आता पाहिल्यावर खूपच आवडला. गाणी तर अगदी मस्त आहेत, अर्थ कळत नव्हता म्हणून गुगल करून समजून घेतला, मस्तच आहेत सगळी गाणी. वूमनिया खेळकर, चावट आहे. केह के लुंगा सगळ्यात थरकाप उडवेल असे सूड गीत आहे.

काल मुलीला जुना ज्वेल थीफ दाखवला. आवडला तिला.
मी ही तिच्यासोबत बसून पाहिला. त्या काळचं पब्लीक भाग्यवान.

कधीकधी माबोवर मला महाकाली आणि रक्तबिजाच्या पौराणिक मिथकातले युद्ध आठवते >> हे महान आहे अस्मिता ! Lol

पठाण, जवान वगैरे ला शाहरुख चा नवा अवतार - त्याचे कुतूहल नि सध्याच्या साऊदी सिनेमांच्या तोडीस तोड अचाट नि अतर्क्य प्रकाळे, बरोबर काँट्रोव्हर्सी ची फोडणी देत केलेले मिडीया मॅनेजमेंट ह्यामूळे चालले. हीच गाडी शाहरुख ने पुढे ठेवली तर शाहरुख असला तरी खरच चालतील का ?

कधीकधी माबोवर मला महाकाली आणि रक्तबिजाच्या पौराणिक मिथकातले युद्ध आठवते >> हे महान आहे अस्मिता ! >>> टोटली Happy

कॉमी - कोठे पाहिलात?

बाईपण पाहिला hotstar वर >>>
बाईपण भारी देवा मी थिएटर मधे बघितला. काय चिक फ्लिक बघायला चाललोय असा चेहरा करून पाय ओढत गेलो. पण थिएटरच्या माहौल मधे धमाल आली. का हिट्ट आहे ते थिएटर मधे पब्लिकची रिअ‍ॅक्शन बघून जाणवते.

Pages