Submitted by अँकी नं.१ on 31 March, 2022 - 08:11
उडण्याचं आकर्षण माणसाला पहिल्यापासूनच होतं, त्यातूनच वेगवेगळे प्रयोग केल्यानंतर विमानाचा शोध लागला.
सुरुवातीला सामान पोहोचवणारी ही यंत्रं प्रवासी वाहनं म्हणूनही वापरात यायला लागली.
प्रोपेलर वाल्या इंजिनापासून फरकात घेत जेट एज आलं अन त्यात आलं बोईंगचं ७४७ : क्वीन ऑफ द स्काय. आपला वेगळा शेप, अपर डेक अन शेकडो माणसं आणि कार्गो हे दोन्ही वाहून न्यायची क्षमता यामुळे बघता बघाता लोकप्रिय झालं.
अशाच वेगवेगळ्या विमानांबाबत अन त्यासंदर्भात अन्य गोष्टींबाबत चर्चा करायला उत्सुक असलेल्या विमानवेड्यांसाठी हे लाऊंज...
Check yourself in...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बंगलोर - चेन्नई (व्हाया मुंबई
बंगलोर - चेन्नई (व्हाया मुंबई) अन् चेन्नई - बंगलोर (व्हाया हैद्राबाद)
>>
एक गंमत
बंगलोर - मुंबई वन वे तिकिटापेक्षा बंगलोर - चेन्नई (व्हाया मुंबई) हे सेम विमानातलं तिकीट निम्म्या किमतीत मिळालं
अन् टोटल रिटर्न जर्नी चं तिकीट मिळून त्या वन वे तिकिटापेक्षा @१५% कमीत पडलं
बरेच मिडल ईस्ट चे रुट पण चालु
बरेच मिडल ईस्ट चे रुट पण चालु करत आहेत.
>>
यातले बरेचसे बहुतेक करून एअर इंडिया एक्सप्रेस चे असतील.
आत्तापर्यंतच्या अनुभवावरून तरी एअर इंडिया प्रामुख्यानी ३५०-९०० आणि ७७७-३०० आणि आगामी ७८७-९ अन् ७७७x अमेरिकन / आफ्रिकन / ऑस्ट्रेलिया - न्यूझीलंड रूट वर वापरेल. नवी ३५०-१०० आणि ७८७-८ युरोप / आशिया / अरेबिया रूट वर असतील अन् छोट्या शहरांमधून आशिया / अरेबिया रूट ३२१ एल आर आणि ७३७-१० नी हॅण्डल होतील असा माझा अंदाज आहे.
दिल्ली सोबत मुंबई, बंगलोर, हैद्राबाद अन् अहमदाबाद नवी हब असतील. कोलकाता बद्दल जरा साशंक आहे कारण तिथला एअरपोर्ट अजून रीनोव्हेट व्हायचा बाकी आहे आणि कपॅसिटी पण फुल आहे.
नव्या रूट मधे गोवा - रशिया, चंदीगड - कॅनडा, चंदीगड - बर्मिंगहॅम, कोलकाता - चायना वगैरे रूट पॉलिटिकल परिस्थिती नुसार चालू / बंद होतील...
बंगलोर - मुंबई वन वे
बंगलोर - मुंबई वन वे तिकिटापेक्षा बंगलोर - चेन्नई (व्हाया मुंबई) हे सेम विमानातलं तिकीट निम्म्या किमतीत मिळालं
अन् टोटल रिटर्न जर्नी चं तिकीट मिळून त्या वन वे तिकिटापेक्षा @१५% कमीत पडलं >>>
अँकी - भारतात तिकिटांबद्दल काही टिप्स असतील तर दे. एक ओळखीचे मे मधे दिल्ली/अमृतसर वगैरे प्लॅन करत आहेत. त्यांना सांगतो. सध्या ती तिकीटे खूप महाग दिसत आहेत. १३०००-१७००० रिटर्न. ही रेंज सध्या अपेक्षित आहे का (मे करता)?
बिझनेस क्लास मधे हेड रेस्ट
बिझनेस क्लास मधे हेड रेस्ट लाल केली आहेत (आधी पिवळी होती). ही केबिन डेल्टा वन टाईप हार्ड प्रॉडक्ट असलेली आहे.
प्रीमियम ईको अन् इकॉनॉमी वाले सीट्स (हार्ड प्रॉडक्ट) हे एअर इंडियाच्या ७७७ च्या नव्या प्रपोज्ड डिझाईन प्रमाणेच असल्यानं सीट कव्हर पूर्ण एअर इंडियाच्या थीम मधे आहेत. >>>>> सीट कव्हर, रंग वगैरे एअर इंडियाच्या थीम प्रमाणेच असतील. पण आतली रचना, बिझनेस वगैरेचं कॉन्फिग ह्याबद्दल म्हणत होतो.
बंगलोर - मुंबई वन वे तिकिटापेक्षा बंगलोर - चेन्नई (व्हाया मुंबई) हे सेम विमानातलं तिकीट निम्म्या किमतीत मिळालं
अन् टोटल रिटर्न जर्नी चं तिकीट मिळून त्या वन वे तिकिटापेक्षा @१५% कमीत पडलं >>>> हो, हा प्रकार इथेही पाहिला आहे. त्यांची गणितं कधीकधी समजत नाहीत!
सध्या ती तिकीटे खूप महाग दिसत
सध्या ती तिकीटे खूप महाग दिसत आहेत. १३०००-१७००० रिटर्न. ही रेंज सध्या अपेक्षित आहे का (मे करता)?
>>
दिल्ली अमृतसर रूट वर किती फ्लाईट ऑप्शन्स आहेत यावर रेट ठरेल. कदाचित विंटर शेड्युल अन् समार शेड्युल वेगळं असू शकेल. पण जर कमी ऑप्शन असतील तर हे दर असू शकतील
उदा. जैसलमेर ला जायला फक्त मुंबई, दिल्ली आणि अहमदाबाद हून रोज एक एकच फ्लाईट आहे. त्याचं रिटर्न तिकीट @२०k आहे.
आतली रचना, बिझनेस वगैरेचं
आतली रचना, बिझनेस वगैरेचं कॉन्फिग ह्याबद्दल म्हणत होतो.
>>
हार्ड प्रॉडक्ट
ते इकॉनॉमी आणि प्रीमियम ईको साठी एयर इंडियाच्या प्लॅन नुसारच आहे
बिझनेस क्लास च्या हार्ड प्रॉडक्ट मधे थोडा फरक असेल. हे (डेल्टा वन टाईप) थोडं बॉक्सी आहे, प्लॅन्ड डिझाईन थोडं स्लीक आहे. पण दोन्हीत लाय फ्लॅट बेड, केबिन डोअर, सेफ स्टोरेज, रीडिंग लाईट, मोठा स्क्रीन वगैरे आता स्टँडर्ड असलेल्या सुविधा असतील
परवा जपान एअरलाईन च्या ३५०-१००० च्या लाँच मधे बिझनेस क्लास ला हेडरेस्ट मधे इंटिग्रेटेड स्पीकर पाहिले. असलं काही एअर इंडिया मधे असायचे चान्सेस कमी आहेत
थँक्स.
थँक्स.
अमेरिकेत एक बेस्ट टाइम असतो तिकीटे बुक करायला - असे वाचले आहे. साधारण २ ते ३ महिने आधी. त्याच्या आधी किंवा नंतर रेट्स जास्त असतात. एअरलाइन्स कशी तिकीटे रिलीज करतात त्यावर असावे. तसे भारतात काही आहे का कल्पना नाही. म्हणजे मे करता त्यांनी अजून थोडी वाट पाहावी, की आत्ता ग्रॅब करून टाकावीत असा सल्ला द्यायचा आहे. एक पर्याय म्हणून ते राजधानीचाही विचार करत आहेत पण रेल्वेची तिकीटे इतक्या आधी मिळत नाहीत असे दिसते (पूर्वी ४५ दिवस आधी ओपन व्हायचे. सध्याचे माहीत नाही).
साधारण २ ते ३ महिने आधी
साधारण २ ते ३ महिने आधी
>>
जास्ती फ्लाईट वाल्या पॉप्युलर रूट वर 2 महिने आधी बेस्ट, त्याहून आधी आणि नंतर 1 महिना आधी पर्यंत थोडा जास्ती रेट. पण 1 महिन्यापेक्षा कमी दिवस म्हणजे चुना फिक्स
रेल्वे बुकिंग आता ९० दिवस आधी येतं.
रेल्वे बुकिंग आता १२० दिवस
रेल्वे बुकिंग आता १२० दिवस आधी येतं.
धन्यवाद अँकी, कुंतल.
धन्यवाद अँकी, कुंतल.
आज मध्यरात्री जाईन एअर पोर्ट
आज मध्यरात्री जाईन एअर पोर्ट वर, ३५० भेट घ्यायला.
मुंबई - चेन्नई सेक्टर ला sam chui आणि josh cahill हे दोघं ही असतील.
बघू काय काय संवाद होतो.
या निमित्ताने एक रिक्षा:
planes.and.flights या नावानी इन्स्टा अन् युट्यूब चॅनल सुरू करतो आहे. Aviation रेलिटेड कंटेंट टाकेन म्हणतोय.
इच्छुकांनी लाभ घ्यावा ..
मस्त अँकी. शोधतो आणि फॉलो
मस्त अँकी. शोधतो आणि फॉलो करतो.
ग्रेट...
ग्रेट...
मस्त अँकी. फॉलो करतो युट्यूब
मस्त अँकी. फॉलो करतो युट्यूब चॅनेल.
३५० चे अनुभव इथे पण लिही.
रच्याकने एअर इंडीया ह्या वर्षी युएसला तीन नवे रुट सुरू करणार आहे अशी बातमी होती. एलए, डॅलस आणि सिअॅटल. ह्यात बॉस्टन पण अॅड होऊ शकतं. आत्तातरी सगळ्या फ्लाईट दिल्लीहून असणार असं म्हंटलय.
विस्ताराने नुकतच मुंबई पॅरीस फ्लाईट सुरू केलं. विस्तारा-एअर इंडीया मर्जर मार्च २०२५ पर्यंत होऊ शकेल असं म्हण्तायत.
ह्यात बॉस्टन पण अॅड होऊ शकतं
ह्यात बॉस्टन पण अॅड होऊ शकतं. >>>>> हे बरं होईल. न्यूयॉर्क पर्यंत जायला नको.
Anky,
Anky,
सॅम चुई च्या vlog मध्ये तू आहेस !!! भारी
https://youtu.be/vZHFxLXHPSQ?si=U1X_Wg0Id7NVBv0i
तुझा अनुभव पण लिही इथे.
Anky,
Anky,
सॅम चुई च्या vlog मध्ये तू आहेस>> भारी. तो vlog पाहीला. बर्याच लोकांचे Videos आहेत. एकंदरीत पब्लिक मधे उत्साह भरपुर होता ह्या inaugural flight बद्दल.
तुझा अनुभव पण लिही इथे.>>+१
सॅम चुई च्या vlog मध्ये तू
सॅम चुई च्या vlog मध्ये तू आहेस !!! भारी >>> आणि जॉश कहिल च्या पण.
तुझे अनुभव पण वाचायला आवडतील.
३५० च्या पहिल्या कमर्शियल रन चे या दोघांचे व्हिडिओज पाहिले. सध्या बहुतेक डोमेस्टिक सर्विसेस होतील ३५० च्या. पण खरी मजा लाँग हाउल ला येईल. बिझनेस किंवा प्रिमिअर एकॉनॉमी च्या सिटा एकदम कंफर्टेबल आहेत. न्युयॉर्क किंवा नेवार्क साठी आलं पाहिजे ३५०.
मस्त अनुभव होता ३५० चा
मस्त अनुभव होता ३५० चा
जरा बिझलोय,त्यामुळे अजून व्हिडिओ एडिट पण सुरू करायचं आहे.
काही बुलेट पॉइंट्स:
- नव्या विमानात येणारा पहिला पॅसेंजर होता आलं, सुमारे १० मिनिटं आधी बोर्ड केलं
- कॅप्टन शी बोलता आलं
- बंगलोर मुंबई रूट वर केवळ उत्साही पब्लिक होतं (विमान फुल होतं) त्यामुळे सीट बेल्ट साईन चालू असलेला वेळ सोडला तर बाकी वेळ उभं राहून गप्पा आणि इकडे तिकडे फिरण्यातच गेला
- विंग्ज इंडिया मधे लाँच केलेल्या केबिन accessories अजून विमानात आल्या नव्हत्या
- कुठलेही अमेनिटी किट्स / सुव्हेनीर नव्हते
- पब्लिक फारच धसमुसळे पणानी गोष्टी वापरत होतं
- केक वर ३५० लिहून ७८७-९ चा फोटो प्रिंट केला होता
- क्रू फार उत्साहात होता
- नवीन युनिफॉर्म छान आहे
- Sam आणि Josh दोघांशी ५-१० मिनिटं बोलता आलं
- बिझनेस सीट बेड मोड मधे असताना उठून उभं रहाणं थोडं ट्रिकी आहे, कारण ९०% पाय फुटवेल मधे जातात
- साईड प्लॅटफॉर्म वर ग्लास / कप साठी खड्डा नाही, लँडिंग च्या वेळी कप पडता पडता कॅच केला
- टेल अन् फ्रंट कॅमेरा व्ह्यू मस्त आहे, पण मॅप सोबत PIP मोड मधे लावता येत नाही
- फूड फारच मस्त होतं
- प्रीमियम इको पेक्षा इको मधल्या बाल्कहेड सीट ला जास्ती लेगारूम आहे
- शेवटी बंगलोर ला आल्यावर कॉक पिटमधे जाऊन पायलट्स शी पण बोलता आलं
- मार्च मधे २ अन् मे पर्यंत उरलेली ३ ३५० येतील
- ही विमानं बंगलोर / मुंबई / दोन्ही ठिकाणी स्टेशन होतील
- पहिला रूट बहुतेक बंगलोर - न्यूयॉर्क असेल
बाकी नंतर सविस्तर लिहितो
पण once in a lifetime अनुभव होता हे मात्र नक्की
- बहुतेक ही विमानं
मस्त अनुभव अँकी.
मस्त अनुभव अँकी.
तू म्हणतोस त्याप्रमाणे, नविन रुटवर देण्यात येणारी सुव्हेनीर्स दिसली नाहीत, त्याचप्रमाणे मुंबई आणि चेन्नई ला वॉटर कॅनन्स पण नव्हती असं वाटलं.
एकंदरीतच एअर ईंडियाला भा. रे. कडुन या बाबतीत बरच काही शिकण्यासारखं आहे. वंदे भारत च्या सगळ्या पहिल्या फेरीच्या उत्सवाचे असंख्य व्हिडिओज बघितले आहेत. म्हणुनच कदाचित एअर ईंडियाकडून तशी किंवा त्यापेक्षा अधिकची अपेक्षा होती.
क्रू युनिफॉर्म मला पण आवडला. रंग मस्त आहे.
बिझिनेस सीट्चा हा प्रॉब्लेम बर्याच मॉडेल्स मध्ये आहे. सीट परत अप-राईट पोझिशन ला आणल्याशिवाय उठता येत नाही हे खरंय. पण या ३५० मधलं सीट्स चं फॅब्रिक आणि त्यावरचे कलर्स आवडले.
बाहेरच्या बाजुने खिडक्यांना ती एअर ईंडीया ची टिपिकल रांगोळी नाही, हे पण थोडं खटंकलं. पण कदाचित होईल सवय बघून बघून.
या ३५० मधलं सीट्स चं फॅब्रिक
या ३५० मधलं सीट्स चं फॅब्रिक आणि त्यावरचे कलर्स आवडले.
>>
बिझनेस क्लास मधे हेडरेस्ट फक्त एअर इंडिया च्या रंगात आहे. बाकी. फॅब्रिक, पॅनल कलर्स, पॅनल पॅटर्न, इव्हन lamp shade वरचा पॅटर्न हे सर्व एरोफ्लोट चंच आहे. क्लास पार्टिशन पॅनल, रॅक इंटेरियर, बार स्टायलिंग हे ही त्यांचंच आहे.
प्रीमियम इको अन् इको केबिन अपहोलस्ट्री मात्र एअर इंडियाच्या रंगात आहे.
जबरी अनुभव अँकी!
जबरी अनुभव अँकी!
बाकी. फॅब्रिक, पॅनल कलर्स,
बाकी. फॅब्रिक, पॅनल कलर्स, पॅनल पॅटर्न, इव्हन lamp shade वरचा पॅटर्न हे सर्व एरोफ्लोट चंच आहे. >>>> म्हणूनच कदाचित वेगळेपणमुळे चटकन भावलं असावं.
एअर इंडीयाचा नवा फ्लाईट
एअर इंडीयाचा नवा फ्लाईट सेफ्टी व्हिडीयो बघा
https://www.youtube.com/watch?v=al51WZcN2_U
एअर इंडीयाचा नवा फ्लाईट
एअर इंडीयाचा नवा फ्लाईट सेफ्टी व्हिडीयो बघा
https://www.youtube.com/watch?v=al51WZcN2_U
एअर इंडीयाचा नवा फ्लाईट
एअर इंडीयाचा नवा फ्लाईट सेफ्टी व्हिडीयो
>>
मस्त आहे
पण महाराष्ट्र दिसलं नाही...
https://www.cbc.ca/news
https://www.cbc.ca/news/canada/calgary/lynx-air-creditor-protection-airl...
"Lynx Air" नावाची कॅल्गरी बेस्ड एअरलाईन फक्त 22 महिन्यात बंद पडली . मी गेल्या शुक्रवारीच यांच्या विमानातून प्रवास केला होता. LCC होती पण ok होती. लो कॉस्ट करिअर हा फारच रिस्क असलेला उद्योग होऊ लागला आहे.
काही (थोडे जुने) एविएशन
काही (थोडे जुने) एविएशन अपडेट्स
- एअर इंडियाच्या पाठोपाठ इंडिगो नी पण ए३५० घेतली. ३० विमानांची फर्म ऑर्डर आहे तर आणखी ७० ची तयारी. केवळ इकॉनॉमी लेआऊट असलेल्या ३५० मधे इंडिगो ३-४-३ असं १० अब्रेस्ट सीटिंग लावणार का हे बघायचं. एअरबस नी ३५० पॅनेल कंपोझिशन बदलून हे करता येईल असं सुतोवाच केलेलं आहेच. मला वाटलं होतं की इंडिगो ए३३०नीओ घेईल. एअरबस नी बहुतेक इंडिया मार्केट एक्सपांशन आणि मेंटेनन्स लक्षात घेता ३५० वर बेटर डील ऑफर केलं असेल.
- एअर इंडियाचे सगळे ६ एक्स एरोफ्लोट एअरफ्रेम डिलीव्हर झाले. आता पुढचे ३४ एअर इंडियाच्या इंटेरियर केबिन डिझाईन प्रमाणे येतील. त्यातल्या पहिल्या विमानासाठी VT-JRD कोड राखून ठेवला असावा असं वाटतं आहे. या आणि सध्याच्या रीफार्बिश होणाऱ्या विमानांच्या प्रीमियम आणि इको केबिन साठी रिकरो कंपनीला कंत्राट दिलं आहे. मीडिया एंटरटेनमेंट सिस्टीम थॅलस ची असेल (इकॉनॉमी मधे ही ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी मिळेल). एरोफ्लोट मधे कॉलिन्स एअरस्पेस च्या सीट अन् पॅनासॉनिक ची एंटरटेनमेंट सिस्टीम आहे. ऑनाबोर्ड इंटरनेट प्रोव्हाईडर चं डील अजून बाकी आहे.
- ए ३५० चे पहिले दोन इंटरनॅशनल रूट सुरू झालेत. सगळ्या अंदाजांना फोल ठरवत एअर इंडिया नी दिल्ली - दुबई आणि मुंबई - दुबई सर्व्हिस सुरू केली आहे
रच्याकने,
रच्याकने,
फेब - मार्च मधे ऑफसाइट, फॅमिली इव्हेंट, लीडरशिप व्हिजिट, अन् पुणे भेट असं सलग बऱ्यापैकी ट्रॅव्हल झालं. वेगवेगळ्या कारणांसाठी लागणारे विविध कपडे अन् इतर सामान असलेली सुमारे १६ किलो ची बॅग घेऊन विस्तारा, एअर इडिया एक्सप्रेस, इंडिगो, स्पाइस अन् आकासा या सर्वांच्या विमानातून गेलो. पुण्याला येईपर्यंत कुणीही बॅग ओव्हर वेट असल्याबद्दल चकार शब्द काढला नव्हता. पुण्यातून बंगलोरला येताना आकासा च्या काट्यावर बॅग १६.२ किलो भरली. समोर तद्दन पेठी काकू होत्या. त्यांनी नियमावर बोट ठेऊन २ किलो (राऊंड ऑफ वरच्या पूर्ण आकड्याला) जास्त सामानाचे चार्जेस वसूल केले. इतर कुठल्या एअरलाईन नी असं न केल्याचं सांगून बोर्डिंग पासेस पण दाखवले. पण काकूंनी चेहेऱ्यावर सुरकुती ही न येऊ देता पावती फाडली अन् कार्ड कॅश की यूपिआय असा सवाल केला. गप पैसे भरले.
अँकी , फारच इंटरेस्टिंग
अँकी , फारच इंटरेस्टिंग माहिती आहे. ३३० आणि ३५० च्या रेंज बद्दल फार माहिती नाही पण इंडिगोचा काही अजून लांब लंडन/न्यू यॉर्क वगैरेचा विचार असेल तर ३५० बरे पडेल ना?
तसा इंडिगो मधून दोहा मुंबई प्रवास केलेला आहे. अजिबात आवडला नव्हता त्यामुळे अजून लांबचा प्रवास तर नकोच होईल.
Pages