Submitted by अँकी नं.१ on 31 March, 2022 - 08:11
उडण्याचं आकर्षण माणसाला पहिल्यापासूनच होतं, त्यातूनच वेगवेगळे प्रयोग केल्यानंतर विमानाचा शोध लागला.
सुरुवातीला सामान पोहोचवणारी ही यंत्रं प्रवासी वाहनं म्हणूनही वापरात यायला लागली.
प्रोपेलर वाल्या इंजिनापासून फरकात घेत जेट एज आलं अन त्यात आलं बोईंगचं ७४७ : क्वीन ऑफ द स्काय. आपला वेगळा शेप, अपर डेक अन शेकडो माणसं आणि कार्गो हे दोन्ही वाहून न्यायची क्षमता यामुळे बघता बघाता लोकप्रिय झालं.
अशाच वेगवेगळ्या विमानांबाबत अन त्यासंदर्भात अन्य गोष्टींबाबत चर्चा करायला उत्सुक असलेल्या विमानवेड्यांसाठी हे लाऊंज...
Check yourself in...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
फॅनभोवती नसेल असेल तर
फॅनभोवती नसेल असेल तर टर्बोफॅन आणि फॅनभोवती नसेल नसेल तर टर्बोप्रॉप - हा पांचटपणाचा मोह मी टाळला होता.>>> धन्यवाद
'नसेल' हा इथे इंग्रजी शब्द आहे, मराठी नाही >>> हे स्पष्ट केलेत म्हणून ठीक आहे, नाहीतर हे वाचून विमानात न बसता सुद्धा डोक्यात turbulence आला असता!!!
btw 'नसेल' हा शब्द तिथे इंग्रजीत लिहाल का? म्हणजे spelling तरी कळेल.
अवांतर ---
ऋन्मेऽऽष जर हा धागा वाचत असेल तर त्याला 'एकच उच्चार असणारे, परंतु विभिन्न अर्थ असणारे निरनिराळ्या भाषेतील शब्द' असा एखादा धागा काढायला वाव आहे.
YouTube वर TechBuilder म्हणून एका व्हियेतनामी का फिलिपाईन्सच्या मुलाचे channel आहे. त्याच्या भाषेत 'Hindi' असा शब्द आहे. मी त्याला अर्थ विचारला असता त्याने सांगितलाही होता, पण मी आता विसरलो.
Nacelle
Nacelle
मोबाइलमध्ये भाषांचे पर्याय
मोबाइलमध्ये भाषांचे पर्याय निवडताना ''Hindi' निवडून फसलो होतो. ती दुसरी कोणती भलतीच भाषा आली होती. मग खटाटोप करून इंग्रजी शोधली. तर पुन्हा चार पर्याय . म्हटलं दे बाबा एकदा कुठलीही.
गूगलबाबा मदतीने विमानाचे बेसिक चित्र ( भागांची नावे असणारं )शोधतोय पण नाही सापडत.
Aircraft knowledge is a rocket science असं कुणी तरी म्हटलं आहे.
ऋन्मेऽऽष आ गया तो मै गया इधरसे. सर्व विमाने व्हाया माझगाव डॅाक च जातात इथून सुरुवात.
कॉनकॉर्ड परत यायला पाहिजे.
कॉनकॉर्ड परत यायला पाहिजे. एकदा तरी त्यातून प्रवास करायचा आहे.
मी कुठे तेरी वाचलं जेव्हा gps
मी कुठे तेरी वाचलं जेव्हा gps नव्हते तेव्हा वैमानिक खिडकीतून जमिनी वरील खुणा बघून रस्ता ठरवायचे.
हे काम खरेच खूप अवघड होते .
जेव्हा कॉम्प्युटर नव्हता,ai नव्हती तेव्हा माणसाने अण्वस्त्र बनवली होती.
अणू स्फोट घडवला होता.
कशी केली असतील calculation s.
खूप कठीण नक्कीच असणार ते.
कॉनकॉर्ड परत यायला पाहिजे.
कॉनकॉर्ड परत यायला पाहिजे. एकदा तरी त्यातून प्रवास करायचा आहे.
>>
येस्स...
माझी कंप्लीटेड चेकलिस्टः
३१९, ३२०(साधं आणि निओ), ३२१(साधं आणि निओ), ३३०, ३५०-९००, ३८०
७३७ (७००, ८००, ९००), ७४७ (४०० आणि ८), ७५७, ७६७ (विथ आणि विदाऊट विंगलेट्स), ७७७ (२००, ३०० ईआर), ७८७-१०
फोकर (७०, १००), एंब्रेअर (१७५, १९०), सी आर जे, एटीआर ७२
विशलिस्टः
२२० सिरीज
एम्ब्रेअर ई२
३१८, ३२१ एलआर, ३३० नीओ, ३५० (१००० आणि एक्सएलआर)
७२७, ७३७ मॅक्स, एअर इंडिया ७४७, ७७७ एलआर, ७८७ (८,९)
काँकॉर्ड
डॉर्निअर डीओ २२८ / एचएएल हिंदुस्तान २२८
बोटी बंद झाल्यामुळे हा तर्रास
बोटी बंद झाल्यामुळे हा तर्रास आहे.
विमानांचे मॉडेल नंबर अन
विमानांचे मॉडेल नंबर अन त्याच्या विषयी एक जनरल गाईड : भाग १
एअरबस (याच्या मॉडेल नंबर्सच्या आधी 'ए' लावतात)
- ३२० सिरीज
बोईंगच्या ७३७ सिरीजला टक्कर द्यायला आणलेली शॉर्ट हाऊल, सिंगल आईल, नॅरो बॉडी सिरीज.
सर्वसाधारणपणे यात एका ओळीत ईकॉनॉमीच्या ३-३ सीट्स असतात अन बिझनेसच्या २-२
विमानाच्या लांबी अन कपॅसिटीला कमी करून याचे ३१९ आणि ३१८ हे व्हेरिअंट्स आहेत तर वाढीव लांबी अन कपॅसिटीवालं ३२१ आहे.
नवीन इकॉनॉमिकल इंजिन्स सह याची नीओ (न्यू इंजिन ऑप्शन) रेंजही उपलब्ध आहे.
सहसा ही विमानं डोमेस्टिक किंवा जवळपासच्या इंटरनॅशनल रूट्सवर उडवली जातात.
भविष्यात ३२१ नीओ एक्सएलआर हे एक क्रांतिकारी मॉडेल ठरणार आहे कारण याला रेंज बर्यापैकी मोठी असणार आहे, त्यामुळे लिमिटेड डिमांडवाल्या पॉईंट टू पॉईंट लाँग हाऊल कनेक्टिव्हिटीसाठी याचा मस्त उपयोग करून घेता येईल (उदा. पुणे-म्युनिक / गोवा-लिस्बन ई.)
- ३३० सिरीज
लाँग हाऊल, ट्विन आईल, वाईडबॉडी जेट्स
याच्या ईकॉनॉमीच्या ओळीत २-४-२ अन बिझनेसच्या ओळीत २-२-२ / १-२-१ सीट्स असतात
याचे ही साईझ अन कपॅसिटीनुसार -२०० आणि ३०० असे दोन व्हेरिअंट्स आहेत.
७८७ ला टक्कर द्यायला एअरबसनी याचे पंख अन इंजिन्स बदलून नीओ अवतार आणलाय (त्यात ८०० अन ९०० असे व्हेरिअंट्स आहेत)
या नीओ डेव्हलपमेंटची कॉस्ट ही ७८७ च्या डेव्हलपमेंट कॉस्ट पेक्षा बरीच कमी असल्यानी एअरबस ही विमानं स्वस्तात विकू शकतं.
एअरबस आधी हेच नवीन पंख अन इंजिन्सवालं विमान ३५० म्हणून लाँच करणार होतं, पण त्यांच्या कन्सेप्ट प्रेझेंटेशन नंतर त्यांना जाम शिव्या पडल्या. म्हणून त्यांनी संपूर्णपणे नवीन डेव्हलपमेंट करून ३५० विमान आणलं (त्याविषयी डीटेल्स पुढच्या भागात)
मला स्वतःला खुर्च्यांची ३-३-३
मला स्वतःला खुर्च्यांची ३-३-३ पेक्षा २-४-२ रचना चांगली वाटते. २-४-२ ह्यात कुणाही प्रवाशाला जागेवरून उठावयाचे झाल्यास फक्त एकाच दुसर्या प्रवाशाला त्रास होऊ शकतो. पण ३-३-३ मध्ये खिडकीतला प्रवासी उठताना दोघांना त्रास होतो.
आता प्रश्न असा आहे की २-४-२ मध्ये प्रत्येक ओळीत ३-३-३ पेक्षा १ खुर्ची कमी असते. मग एकूण उतारूंची संख्या सारखी ठेवायला २-४-२ मध्ये पाय पसरायची जागा कमी करून १०% जास्तीच्या ओळी वाढवतात का?
आता प्रश्न असा आहे की २-४-२
आता प्रश्न असा आहे की २-४-२ मध्ये प्रत्येक ओळीत ३-३-३ पेक्षा १ खुर्ची कमी असते. मग एकूण उतारूंची संख्या सारखी ठेवायला २-४-२ मध्ये पाय पसरायची जागा कमी करून १०% जास्तीच्या ओळी वाढवतात का?
>>
हे सर्व विमानाच्या फ्युसलाज डायामीटरवर ठरतं
ई२ / २२० : ३-२
७३७ / ७५७ / ३२० : ३-३
७४७ / ७७७एक्स / ३८० : ३-४-३
७६७ / ७८७ / ३३० : २-४-२
७७७ / ३५० : ३-३-३
या लेआऊट्स साठी डिझाईन्ड होते / आहेत
पूर्वी ईकॉनॉमी क्लासच्या खुर्च्या (किमान) १८ इंच रुंद असायच्या. एर्गॉनॉमिकली हे अंतर योग्य आहे. या रुंदीच्या खुर्च्यांमधे बसून केलेला प्रवास हा वाढीव थकवा देत नाही.
पण मग काही नतद्रष्ट एअरलाईन्सनी १७ इंची खुर्च्या वापरायला सुरुवात केली. आधी हा प्रकार केवळ बजेट एअरलाईन्सपुरताच मर्यादित होता. पण एअरलाईन्सना असं लक्षात आलं की बोईंगच्या ७७७ आणि ७८७ विमानांचा डायामीटर हा १७ इंची खुर्च्या अन लहान आईल करून प्रत्येक ओळीत १ खुर्ची वाढवण्याइतका मॅनेजेबल आहे, पण एअर बस ३३० मधे हे करण्यासाठी खुर्ची १६ / १६.२५ इंचीच ठेवावी लागेल, कारण आईल लहान करायला स्कोप नाही.
त्यामुळे बर्याचशा मिड्ल ईस्टर्न / युरोपिअन / अमेरिकन एअरलाईन्सनी ७७७ विमानांमधे ३-३-३ ऐवजी ३-४-३ खुर्च्या लाऊन घेतल्या. थोड्याबहुत अशियाई एअरलाईन्स वगळता हे स्टँडर्ड आहे. आणि हीच डिमांड लक्षात घेऊन बोईंगनीही ७७७ एक्स डिझाईन करताना साईड पॅनेल्सचा थिकनेस कमी करून १८ इंचाच्या १० खुर्च्या ३-४-३ बसतील अशी सोय केली आहे.
७८७ मधे बोईंगचं स्टँडर्ड २-४-२ लेआऊट डिझाईन फक्त ऑल निप्पॉन अन जपान एअरलाईन्सनी स्वीकारलं, बाकी सगळ्या एअरलाईन्सनी ही विमानं १७ इंची सीट्सच्या ३-३-३ कॉन्फिगरेशनमधेच घेतली. ऑल निप्पॉन नी त्यांची २-४-२ वाली विमानं ३-३-३ मधे कन्व्हर्ट करून घेतली, तर जपान एअरलाईन्सनीही नंतरच्या विमानांची ऑर्डर ही ३-३-३ प्रमाणे घेतली. त्यांच्या सुरुवातीच्या काही मॉडेल्सवर मात्र २-४-२ फॉर्मॅट अजूनही आहे.
एअर अशियानी एअरबस ३३० मधे १६.२५ इंची खुर्च्यांचा ३-३-३ फॉर्मॅट ठेवलाय, पण तो जबरदस्त अन्कम्फर्टेबल होत असल्यानी मोठ्या एअरलाईन्सनी तो स्वीकारला नाही. एअरबसनी ३५० डिझाईनच्यावेळी कपॅसिटी वाढवायला फ्युसलाज डायामीटर पण वाढवला अन १८ इंची खुर्च्यांचा ३-३-३ लेआऊट स्टँडर्ड ठेवला. यातही ३-४-३ फॉर्मॅट करायला कम्फर्टवर ओव्हर काँप्रोमाईज करायला लागेल, म्हणून कुणी त्या वाट्याला गेलं नाहीये.
युनायटेडच्या काही केवळ डोमेस्टिक रूट्सवर उडणार्या ७७७ मधे ९ सीट्स ३-३-३ ऐवजी २-५-२ अशा अतरंगी फॉर्मॅट मधे लावल्या होत्या. मधल्या सीटवर बसणार्याच्या हालांची कल्पनाच केलेली बरी. या विमानांमधे बिझनेस क्लास सुद्धा २-४-२ फॉर्मॅट मधे असायचा (ते ही उलट सुलट रोज मधे)
लाँग हाऊल रूट्समधे १७ इंची सीट्सवर झोपायला त्रास होतो. अॅव्हरेज स्लीप टाईम हा १८ इंची सीटच्या तुलनेत २५% पर्यंत कमी होतो असं रिपोर्ट्स म्हणतात. एअरबस शक्यतो आपल्या विमानांमधे १८ इंचाच्या खालच्या सीट्स लावायला मनाई करतं. त्यामुळेच ३८० ला ३-५-३ लेआऊट ची मागणी त्यांनी रिजेक्ट केली होती.
खूप छान माहिती अँकी. २-५-२
खूप छान माहिती अँकी. २-५-२ ऐकून वेडा झालो मी.
एअरबस ३५० ने फ्युजलाज रुंद ठेवून ड्रॅग कसा काय कमी राखू शकले हे जाणून घ्यायला आवडेल.
बाकी वाढत्या इंधन स्पर्धा आणि नफेखोरीमुळे एर्गोनोमिक्स धाब्यावर बसवणे सर्रास होऊ लागले आहे.
एअरबस ३५० ने फ्युजलाज रुंद
एअरबस ३५० ने फ्युजलाज रुंद ठेवून ड्रॅग कसा काय कमी राखू शकले हे जाणून घ्यायला आवडेल.
>>
हे माहिती नाही, पण याहून वाईड फ्युसलाज त्यांनी ३८० च्या वेळी आणल्यानी तसं सोपं गेलं असावं.
बोईंगकडेही ७४७ डिझाईनमुळे पर्फेक्टली सर्क्युलर नसलेल्या वाईड फ्युसलाजचा अनुभव होता. त्यामुळे ७५७, ७६७, ७७७, ७८७ च्या वेळी फार त्रास झाला नसावा.
विमानाचे इंटेरियर किंवा आकार
विमानाचे इंटेरियर किंवा आकार रचना ह्या वरून फरक करण्या पेक्षा.
विमानाचे इंजिन,हवेत उडण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणारा त्याचा बाह्य आकार.
विमान चालवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व अती आवशक्या आधुनिक सुविधा.
ह्या वर चर्चा व्हावी.
बसण्याची सुविधा .
बसण्याची सुविधा .
ह्याचा विचार केला तर बस आणि विमानात काही फरक करता येणार नाही.
आरामात बसता येण्यासाठी सर्वात गरजेचं असतो तो सीट चा आकार,सीट ची परफेक्ट रचना.
दोन सीट मधील अंतर.
पहिल्या बस पण 3*2 अशा असायच्या.
आता 2 बाय 2 आहेत .
पण दीन सीट मध्ये खूप कमी अंतर असल्या मुळे आरामात बसता येत नाही.
विमानात पण कमीत कमी जागेत जास्त सीट हव्यात ह्या हव्यास पोटी लोकांचा आरामशीर प्रवासाचा हक्क हिरावून घेतला असेल.
ह्या वर चर्चा व्हावी.
ह्या वर चर्चा व्हावी.
>>
गुरू, हो जाओ शुरू
कमीत कमी जागेत जास्त सीट
कमीत कमी जागेत जास्त सीट हव्यात ह्या हव्यास पोटी लोकांचा आरामशीर प्रवासाचा हक्क हिरावून घेतला असेल.
>>
हा हक्क अबाधित आहे
फक्त इकॉनॉमी ऐवजी प्रीमियम इकॉनॉमी किंवा बिझनेस क्लास नी जावं
पूर्वी जेंव्हा इकॉनॉमी क्लास कंफर्टेबल होता तेंव्हा जसे तिकीट दर होते तसेच आज बिझनेस क्लास चे आहेत.
इकॉनॉमी मधे आज बऱ्याच कमी दरात बऱ्याच लोकांना प्रवास कराता येतोय (जो पूर्वी परावडायचा नाही) ज्याने त्यांचा बहुमूल्य वेळ वाचतोय.
2016 मध्ये असे नोंदवले गेले
2016 मध्ये असे नोंदवले गेले की आसन पंक्ती (पिच) मधील सरासरी अंतर 89 सेंटीमीटर (35 इंच) वरून 79 सेंटीमीटर (31 इंच) पर्यंत घसरले आहे, तर सरासरी आसन रुंदी 46 वरून 43 सेंटीमीटर (17 इंच) पर्यंत कमी झाली आहे.
सीट पिच कमी झालं पण लेग रूम
सीट पिच कमी झालं पण लेग रूम कमी झाली नाही. कारण, स्लिम लाईन सीट्स.
सीट पिच म्हणजे एका सीटच्या पाठीपासून मागच्या सीटच्या पाठीपर्यंतचं अंतर. पूर्वी सीट्स जाडजूड असायच्या. यांनी विमानाच्या ऑन बोर्ड वेट मधे वाढ व्हायची, पर्यायानी जास्त इंधन खपात आणि अन्इकॉनॉमिकल फ्लाईट
स्लिम लाईन सीट्स मधे थिकनेस कमी, वजन कमी, लेगास्पेस जास्त अन् वाचलेल्या जागेत एक-दोन अधिक रोज
इंधन जास्त खपलं तरी पॅसेंजर वाढल्याने पर सीट कॉस्ट कमी...
विमानांचे मॉडेल नंबर अन
विमानांचे मॉडेल नंबर अन त्याच्या विषयी एक जनरल गाईड : भाग २
एअरबस (याच्या मॉडेल नंबर्सच्या आधी 'ए' लावतात)
- ३४० सिरीज
(३३० सिरीज ची क्लोन)
लाँग हाऊल, ट्विन आईल, वाईडबॉडी जेट्स
याच्या ही ईकॉनॉमीच्या ओळीत २-४-२ अन बिझनेसच्या ओळीत २-२-२ / १-२-१ सीट्स असतात
याचे ही साईझ अन कपॅसिटीनुसार -२००, ३००, ५००, ६०० असे चार व्हेरिअंट्स आहेत. -६०० हे बोईंग ७७७ एक्स पूर्वीचं सर्वात लांब फ्युसलाज वालं विमान.
ही क्वाडजेट प्लेन्स आहेत. चार इंजिन्समुळे ही विमानं खूप इंधन प्यायची. याची इंजिन्स डायामीटरला छोटी असल्यानी त्यांना गमतीनी हेअर ड्रायर जेट्स पण म्हटलं जायचं. या विमानाची ईकॉनॉमी सुधारण्यासाठी त्याला २०० अन ३०० मॉडेल्स मधे मोठी २ च इंजिन्स लाऊन ३३० अवतारात लाँच केलं होतं. आता खूप कमी रूट्सवर ही विमानं उडतात. लुफ्तांसाच्या या विमानांमधे फर्स्ट क्लास केबिन असल्यानी ते अजूनही ही वापरतात.
- ३५० सिरीज
गेल्या भागात म्हंटल्याप्रमाणे ३३० नीओ कन्सेप्ट ३५० म्हणून लाँच करायच्या मनसुब्यांना जबरा शिव्या पडल्यावर एअरबसनी क्लीन स्लेट डिझाईनला सुरुवात केली. आधीचं डिझाईन हे ७८७ ला पर्याय असणार होतं पण त्या ऐवजी एअरबसनी ७७७ ला ही पर्याय ठरेल अशा विमानावर काम करायला सुरुवात केली अन कार्बन फायबर बेस्ड फ्युसलाज (जे बोईंगनी ७८७ मधे आणलं होतं) वापरून हे नवीन विमान आणलं.
याच्या ही ईकॉनॉमीच्या ओळीत ३-३-३ अन बिझनेसच्या ओळीत १-२-१ सीट्स असतात
याचे ही साईझ अन कपॅसिटीनुसार -९००, १००० आणि ९०० यूएलआर असे ३ व्हेरिअंट्स आहेत. यात. ला ९०० व्हेरिअंट हा ७८७-१० च्या आसपास कपॅसिटी अन रेंज वाला आहे तर १००० हा ७७७ ९ एक्स ला पर्यायी. ९०० यूएलआर : अल्ट्रा लाँग रेंज ही विमानं खास सिंगापूर एअरलाईन्सच्या आग्रगासाठी बनवली आहेत. यात फक्त बिझनेस अन प्रीमियम ईकॉनॉमी सीट्स देऊन पेलोड कमी केलंय अन बदल्यात अॅडिशनल फ्युएल टँक्स लाऊन रेंज वाढवली आहे. या विमानांमुळे सिंगापूर पासून अमेरिकेत डायरेक्ट फ्लाईट्स उडवता येतात. क्वांटास पण त्यांच्या प्रोजेक्ट सनराईज (सिडनी / मेलबोर्न ते अमेरिका / लंडन डायरेक्ट फ्लाईट्स) साठी हीच विमानं घेतंय.
हाय फ्लायर्स,
हाय फ्लायर्स,
मधे थोडा बिझलो होतो म्हणून ए ३८० आणि बोईंग सिरीज वर लिहायचं जरा पुढे ढकलावं लागलं.
पण पन्नासाव्या पोस्टमधे बातमीही तशीच तगडी आहे...
टाटा ग्रूपच्या एअर इंडिया फ्लीट रॅशनलायजेशन प्लॅन मधे २००६ नंतर पहिल्यांदाच नवीन विमानांची खरेदी होणार असं दिसतंय.
प्रॉडक्शन होल्डवर असलेल्या बी ७८७ अन सर्टिफिकेशन्स अन डीलेज मुळे २०२५ पर्यंत पुढे ढकलल्या गेलेल्या बी ७७७ एक्स वर मात करत ए ३५० ची एअर इंडियाच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता जबरदस्त उंचावली आहे. सर्वकाही सुरळीत झालं तर मार्च २०२३ पर्यंत पहिलं ए ३५० - ९०० प्रवासी वहातुकीत रुजू झालं असेल. (कतार एअरवेजनी पेंट इश्यूवरून एअरबसला कोर्टात खेचल्यानी, त्यांच्यासाठी बनणारी ३५० सिरीज विमानं एअर इंडियाला द्यायला लागणारा लीगल क्लिअरन्स एअरबसनी मिळवला आहे).
वर्षानुवर्ष लाँग हाऊल मधे बोईंग लॉयल असलेल्या इंडियन एविएशन मार्केटमधे एअरबसचा हा प्रवेशही पुढच्या काळात महत्वाचा ठरू शकतो.
नव्या प्लेनसोबत एअर इंडियानी नवीन स्टेट ऑफ द आर्ट केबिन प्रॉडक्ट्सही लाँच करावीत ही इच्छा.
तसंच प्रीमियम ईकॉनॉमी केबिनही लाँग टाईम ड्यू आहे.
प्रीमियम ईकॉनॉमी >> ही शुद्ध
प्रीमियम ईकॉनॉमी >> ही शुद्ध फसवणूक आहे असे मला वाटते. उगीच इकॉनॉमीच्या माणसांना काही तरी भारी विकतोय असे दाखवून पैसे उकळणे. अॅव्हरेज भारतीय माणसांना त्या एक्स्ट्रा स्पेसचा फार काही उपयोग नाही. इकॉनॉमीने जावे, पैसे वाचवावेत, आणि डेस्टीनेशनला मज्जा करावी.
प्रीमियम ईकॉनॉमी लाँग टाईम
प्रीमियम ईकॉनॉमी लाँग टाईम ड्यू
+१
ही शुद्ध फसवणूक...
नाही हो, बिझिनेस क्लास न परवडणाऱ्या आणि आमच्यासारख्या उंच आणि दीर्घांगी व्यक्तींसाठी हा स्लॉट एक चांगला मध्यममार्ग आहे.
स्टेट ऑफ द आर्ट केबिन
स्टेट ऑफ द आर्ट केबिन प्रॉडक्ट्सही >>>>> त्या आधी ताफ्यात असलेल्या ७७७ ची डागडुजी करावी! अर्धे स्क्रिन चालत नाहीत, आपला दिवा लावायचा प्रयत्न केला की शेजारच्याचा लागतो, सीट रिक्लाईन केलं की परत पुढेच येत नाही असले अचाट प्रकारा लाँग हाऊल फ्लाईटना हल्लीच अनुभवलेल. टाटांच्या काळात लवकरात लवकर सुधारणा होतील अशी अपेक्षा आहे. त्यांनी आल्या आल्या अॅप तरी सुधारलं आहे.
ए ३५० ची बातमी वाचली. चांगली मुव्ह आहे.
मधे थोडा बिझलो होतो म्हणून ए
मधे थोडा बिझलो होतो म्हणून ए ३८० आणि बोईंग सिरीज वर लिहायचं जरा पुढे ढकलावं लागलं>> नक्की लिहा
मी साधारण २०१० च्या सुमारास एमिरेट्स च्या ३८० ने बराच फिरलो होतो. दुबई जेद्दा रुट वर नेहमी ३८० असायचे. हा रूट short haul (1.5-2 hr) आहे. पण खुप बिझी आहे त्यामुळे असेल. त्यांचा ईकॉनॉमी पण चांगला होता. एकदा तर वरच्या मजल्यावर बिझनेसला अपग्रेड केले होते. तो एकदम भारी आहे. पण या रुटवर दारु मिळत नाही.
मी एअर बसच्या ए ३८०, ३३० ने गेलो बोईंग ७४७,७७७,७८७ ड्रिमलायनर नी पण. ए ३२०/३२१ ७६३,७३७ हे तर नेहमीचे डोमेस्टिक.
मधे थोडा बिझलो होतो >> हे
मधे थोडा बिझलो होतो >> हे वर्डीकरण आवडलं आहे.
ही शुद्ध फसवणूक आहे असे मला
ही शुद्ध फसवणूक आहे असे मला वाटते.
>>
नाही, ही आता काळाची गरज आहे.
बऱ्याच एरलाईन्स मधे आता बिझनेस क्लास इतका लक्झरियस झालाय की फर्स्ट क्लासची गरजच उरली नाही (या बिझनेस क्लास च्या वर अजून काय सुविधा देणार अशी गत). त्यामुळे इकॉनॉमी अन बिझनेस च्या मधे एका क्लास ची गरज निर्माण झाली आहे.
@पराग,
एअर इंडियाच्या बी ७७७ ना रीप्लेस करायलाच ए ३५० घेताहेत. त्यामुळे जुन्या ७७७ वर खर्च करण्यात पॉइंट नाही. इतर एरलाईन्स सारखीच ही जुनी विमान अजून काही वर्ष नॉन प्रीमिअम रूट वर उडवता येतील.
माझ्यामते ही विमान वापरून नॉन हब सिटीज ना काही नव्या डेस्टिनेशन ना टार्गेट करता येईल, उदा.
हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद, चंदीगड, कोची वगैरे ठिकाणाहून सान होजे, कोलंबस, फिनिक्स, बर्मिंगहॅम, म्युनिक, वॉर्सो, गंगझो, हांगझो, जकार्ता, पर्थ, केपटाऊन, मॉरिशस वगैरे वगैरे
इतर एरलाईन्स सारखीच ही जुनी
इतर एरलाईन्स सारखीच ही जुनी विमान अजून काही वर्ष नॉन प्रीमिअम रूट वर उडवता येतील. >>>> "काहीही हां श्री"! जरी नॉन प्रीमिअम रूटवर असली तरी विमानात आहेत त्या गोष्टी चालू अवस्थेत असाव्यात ना! खर्च करायचा नसेल तर रिटायर करून टाका.
न चालणारे स्क्रिन, न लागणारे किंवा चुकीचे लागणारे दिवे, मोडक्या खुर्च्या हे मी लो कॉस्ट एअरलाईन्स मध्येही बघितलेलं नाही.
Parag is right. Basic
Parag is right. Basic maintenance तरी करावा लागेल. मेजर face-lift नाही केला तरी
न चालणारे स्क्रिन, न लागणारे
न चालणारे स्क्रिन, न लागणारे किंवा चुकीचे लागणारे दिवे, मोडक्या खुर्च्या हे मी लो कॉस्ट एअरलाईन्स मध्येही बघितलेलं नाही.
>>
थाई ची जुनी ७७७, ड्रॅगन ची ३३० (ही तर केथे ची जुनी ड्रॅगन कडे आली आहेत) लुफ्तान्साची रिजनल रूट वराची ३२१, जुनी ७४७-४०० (यातल्या काहींमध्ये तर विडिओ कोच सारखे कॉमन टीव्ही आहेत), टर्किशची जेट ची उचललेली ७७७ वगैरे मधून एकदा उडून ये
एअर इंडियाच्या ७७७ ला क्लासी म्हणशील.
यातल्या काहींमध्ये तर विडिओ
यातल्या काहींमध्ये तर विडिओ कोच सारखे कॉमन टीव्ही आहेत >>> हे पाहिले आहेत. एअर इंडीयाच्या ७४७ मध्ये असायचे. तो जर चालू असेल तर मला त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही.
लुफ्तान्साची रिजनल रूट वराची ३२१ >>> ह्यातून गेलो आहे.
एअर इंडियाच्या ७७७ ला क्लासी म्हणशील. >>>> एअर इंडीयाच्या ७७७ मधून अनेकदा प्रवास केलेला अहे. त्यावेळी ती क्लासी होतीच. हल्ली केलेल्या प्रवासांमध्ये संपूर्ण वाट लागलेली विमाने होती. एअर बसचा निर्णय आत्ता झालाय. आधी खाजगीकरण करायचं घाटत असल्याने हेळसांड सुरू असेल. पण तरीही "पुढे नवीन विमानं घ्यायचीच आहेत म्हाणून सध्या आहेत तशी चांगल्या सुविधा नसलेली विमानं चालवून घ्या" हे काही जस्टीफिकेश होऊ शकत नाही.
Pages