लक्षद्वीपमधे बघण्यासारखे, कसे जावे, कुठे रहावे ई.

Submitted by अभि_नव on 8 January, 2024 - 03:43

लक्षद्वीपमधे बघण्यासारखे काय काय आहे?
तिथे जाण्याचे, रहाण्याचे व खाण्याचे पर्याय कोणते आहेत?
स्थानिक खाद्यपदार्थ मिळण्याचे उत्तम ठिकाण कोणते?
स्वतःचे अनुभव लिहिल्यास उत्तम.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

‘No plane from India’ – 14-year-old boy dies after Maldives President Muizzu denies permission for Indian plane in medical emergency

Since Muizzu took charge in the Maldives, Indian helicopters and planes are not used for emergency evacuation. They can be used only by direct permission from the President.
https://www.opindia.com/2024/01/14-year-old-boy-dies-maldives-president-...

भरत, तसं तर सात समुद्र ओलांडून जाणं हे देखील सनातन धर्मबाह्य आहे की.
Submitted by भ्रमर on 11 January, 2024 - 09:14
>>
याचे अधिकृत peer reviewed पुरावे असतीलच. तेवढे द्याल का? असे नक्की कुठल्या हिंदु धर्मग्रंथात कोणत्या संदर्भात म्हटले आहे?

>>>> बौधायन धर्मसूत्रात दिले आहे. इथे वाचू शकता (पान सुद्धा काढले आहे, फक्त दुवा उघडा.)
https://archive.org/details/dli.ernet.476505/page/n219/mode/2up?view=the...
सदर ग्रंथ प्रश्नोत्तर रूपात आहे. शिष्य गुरूंना विचारतो, पतन अथवा वर्ण हानी होते अशी कुठली कर्मे आहेत. त्यावर गुरु उत्तर देतात- समुद्राचा प्रवास, ब्राम्हणाची संपत्ती चोरणे, कोणत्याही वस्तूंचा व्यापार करणे, शूद्र माणसाची सेवा करणे, शूद्र स्त्री सोबत गर्भ धारण करणे. ह्यांचे प्रायश्चित्त आहे की दिवसातून एकदाच अल्पभोजन करणे, दिवसा उभे राहणे आणि रात्री बसून राहावे, असे तीन वर्ष करायचे मग पापमुक्त व्हाल.

धन्यवाद कॉमी

तुम्ही माझे डु आय आहात हे आता नक्की झाले Proud

दुर्गविहारी, मुळात मोदींनी लक्षद्वीपचा फोटो टाकलेला त्यात मालदीवचा अप्रत्यक्ष उल्लेखही अजिबात नव्हता. त्यामुळे त्या लोकांनी एकदम त्यांच्या वारुळात उकळतं तेल ओतल्यासारखा थयथयाट का सुरू केला तेच कळत नाही. काही भारतीय लोकांना ते खटकलं आणि त्यांनी आपले ट्रिप प्लॅन बदलले तर तुम्ही त्यांना काय आता मालदीवला गेलंच पाहिजे अशी सक्ती करताय का? तशी सक्ती करता येणार नाही. ज्या पुरोगामी वगैरे लोकांना आता आवर्जून मालदीवलाच जायचं असेल त्यांचा बिझनेस उलट वाढेल आणि तुम्हाला मिळेल.
आणि जे लोक मालदीवला जाणार नाहीत ते इतरत्र जातील व तोही बिझनेस भरपुर असेल. शेवटी ज्याने त्याने आपले पैसे खर्च करून कुठे फिरायला जायचं हे स्वातंत्र्य आहेच ना.
Submitted by WHITEHAT on 11 January, 2024 - 11:03

मी कोणालाही कसली सक्ती केलेली नाही. एकतर मोदीनी थेट काही सांगितले नसले तरी मालदीवच्या मंत्र्यांनी आक्षेप घेउन चुकीच्या शब्दात भारताच्या पंतप्रधानावर टीका केली, जे अयोग्य आहे.
पण यानिमित्ताने मेडीया भक्त सुरु होउन त्यांनी जो धुमाकुळ घालून बॉयकॉट वगैरे ट्रेन्ड सुरु केल्यामुळे लक्षद्वीपचे नाव पुढे आले. आणि मी कोणालाही सक्ती केलेली नाही. ज्याला जिथे जायचे आहे तिथे जाईल.

तुमचा ट्रेवल ग्रुप फक्त राजकीय चर्चा करतो की ट्रॅवल पण करतो?
मालदिवला न जाण्यामधे भारताचे नुकसान कसे काय होते?
मालदिव ज्यांच्या कॅम्पमधे जायचा प्रयत्न करतोय ते पण सॉफ्ट टार्गेट आहेत का?
समस्या सगळीकडेच आहेत. सुधारणा होत आहेत.

माझ्या ट्रव्हल ग्रुपवर पर्यटनविषयकच चर्चा चालतात. अंधभ्क्तांच्या कृपेने हा विषय पुढे आला म्हणून दुसरी बाजु मांडली गेली, बाकी तुम्हाला नक्की काय झोंबले आहे ? मालदीवला जाण्याने भारताचे नुकसान होईल हे मी कोठे म्हणले आहे ?
ज्यांनी भारताच्या पायाभुत सुविधात सुधारणा व्हायला हवे असे सांगितले किंवा इतर अडचणी व्यक्त केल्या ते सर्व गेली कित्येक वर्ष पर्यटन व्यवसायात आहेत. त्यांना जे जाणवले ते व्यक्तही करायचे नाही का ?

मालदीव कि लक्षद्वीप या गदारोळात अभिनेत्री बिपाशा बासुने मालदीवला भेट दिली. तीच्यावर भरपुर टीका झाली. वास्तविक मालदीव म्हणजे काही माथेरान नव्हे कि मनात आले आणि मालदीवला भेट दिली. बिपाशाने तिथल्या विमानाचे आणि हॉटेलचे बरेच आधी बुकिंग केले असणार. केवळ देशभक्ती सिध्द करण्यासाठी तीने सुट्टीचा प्लॅन रद्द करायला हवा होता का ?

आणि परत आल्यावर तीला तीच्या सुट्टीचे फोटो डिलीट करायची वेळ आली. अर्थात ट्रोलभैरव अंधभक्तांची कृपा.

Pages