लक्षद्वीपमधे बघण्यासारखे, कसे जावे, कुठे रहावे ई.

Submitted by अभि_नव on 8 January, 2024 - 03:43

लक्षद्वीपमधे बघण्यासारखे काय काय आहे?
तिथे जाण्याचे, रहाण्याचे व खाण्याचे पर्याय कोणते आहेत?
स्थानिक खाद्यपदार्थ मिळण्याचे उत्तम ठिकाण कोणते?
स्वतःचे अनुभव लिहिल्यास उत्तम.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्य २-३ दिव्स सचिन तेंडुलकर, अमिताभ, सलमान खान ह्यांचे रिव्ह्यु येत आहेत. २२ तारखेपर्यंत आणखी यावेत. नंतर आपण ठरवु शकता

हो. पण यातल्या कोणी कोणी लक्षद्वीपचे म्हणून भलतेच कुठले फोटो शेअर केलेत. रणवीर सिंगने तर मालदीवचेच केले होते.

बघण्यासारखे -
उडपी हॉटेल आहे.
मारवाड्याचे रेशनचे दुकान आहे.
अण्णाचे सायकल पंक्चर आणि हवा भरण्याचे दुकान आहे,
पंजाब्यांची हॉटेलं आहेत.
गुजराती आणि राजस्थानी लोकांची हॅण्डलूम एम्पोरियम्स आहेत.
केंद्र सरकारची ऑफिसेस आहेत, ज्यात तमिळी अधिकारी आहेत.
मच्छिमार आहेत. त्यांच्या बोटी आहेत.
पर्यटकांसाठी हलदीरामची दुकानं आहेत.

धागा खरंच माहिती मिळवण्या साठी काढला आहे असं गृहीत धरून सांगते.
सर्वात जवळील शहर कोची. येथून जहाज आणि विमान हे दोन पर्याय उपलब्ध आहेत. कवरत्ती , काल्पेनी, मिनीकॉय आणि अगत्ती या बेटांवर राहण्याची सोय आहे.
टुरिस्ट शिप चा पर्याय निवडल्यास दिवस भर बेटांवर घालवून रात्रीचा प्रवास करतात. कवरत्ती येथे ग्लास बॉटम बोट, snorkeling, कायकिंग इ आकर्षणे आहेत. तसेच एक मरीन संग्रहालय आहे.
कल्पेनी बेट lagoons साठी प्रसिद्ध आहे.
खाण्यात म्हणलं तर टूना मास्याची करी इथली खास डिश आहे.
२०१० साली केलेल्या लक्षद्वीप ट्रीप चा एक फोटोIMG_20201019_105815.jpeg

मोदी जाऊन आल्यापासून अचानक सोमि वर लक्शद्वीप चे प्रमोशन्स सुरु झालेत. सामान्य लोक पण एकदम उठून "महाग मालदीव ला जाण्यापेक्षा आपल्या देशी लक्शद्वीप ला जा" असे पोस्ट करत सुटले आहेत असे (माझ्या सोमि सर्कल मधे) दिसले.
मला हे नीट समजले नाही. हे का अचानक? जर देशातले स्थळ आहे आणि मालदीवसारखेच सुंदर पण त्याच्या पेक्षा स्वस्त आहे तर ऑलरेडी टूरिस्ट नी फेमस कसे केलेले नाही? की आहेच फेमस पण आता सरकारी प्रमोशन करताहेत?

ऑलरेडी टूरिस्ट नी फेमस कसे केलेले नाही?
काही भारतीय पर्यटक हे त्यांच्या ओळखीचे,मित्र नातेवाईक कुठे जाऊन आले की लगेच तिकडे जातात. कुणीतरी चावी मारली की निघाले. ते जातात तर आम्ही का नाही टाईप. स्वतः नवीन जागा शोधत नाहीत.
गेली चार पाच वर्षे हंपि यादीत वरती आहे. ( देवळे आणि मूर्ती यातलं काही कळो वा न कळो.)

सर्वात आधी केरळ मध्ये राहणाऱ्या लोकांना लक्ष द्वीप ला जाणे सोपे असावे(थेट फ्लाईट असल्याने).केरळी लोकांचे रिव्ह्यू विचारले तर जास्त कळेल बहुतेक.
मीही काल गुगल करत होते.एकंदर माहिती ही मिळाली की अजून खूप जास्त रेझोर्ट नाहीयेत.फार लोक जात नसल्याने.त्यामुळे पब्लिक ने पण लगेच गर्दी न करता बेताने जावं असं वाटतं.त्या पर्यटनस्थळाला एकदम आलेल्या लोकप्रियतेचा ताण झेपायला हवा.

रघुजींच्या लिस्ट मधे भर घालायची तर आता सगळीकडे आदरणीय पंतप्रधान महोदयांची छबी सगळीकडे असेलच

"No need to visit New Zealand, Switzerland, everything is in Lakshadweep": Tourism Minister G Kishan Reddy

https://twitter.com/ani_digital/status/1743979422451962008

अय्या! म्हणजे लक्षद्वीपमध्ये आल्प्स सारखे डोंगर, त्यावर मऊ मऊ बर्फ असं सुद्धा आहे?

लक्षद्वीप ला गेल्यावर वजन कमी होते. बीएम आय 18 ते 20 होतो.
पुरुषांची छाती 56 इंच होते. सिक्स पॅक बॉडी बनते. कंबर एक वीत होते. पूर्ण व्ही शेप येतो. रंग युरोपियन गोरा होतो. नको असेल तर सांगता येते. केस सोनेरी होतात. डोळे निळे होतात.
पुरूष / महिलांचा आवाज अनुक्रमे अल्फा मेल आणि गोड होतो.बुद्ध्यांक 1000 च्या पुढे जातो.
पुरूष ऋत्विक रोशन टायगर श्रॉफ ते प्रवीण तरडे सारखे दिसू लागतात. महिलांसाठी आलिया, माधुरी, ऐश्वर्या पासून वैजयंतीमाला, मधुबाला पर्यंत रेंज आहे..

एक्झिक्युटिव्ह क्लासेस साठी पीअर्स ब्रॉस्नन, ग्रेगरी पेक, देव आनंद, जॅकी श्रॉफ, कपूर्स, कुमार्स असे पर्याय मिळतात.

आम्ही गेल्या वर्षी हा एक ऑप्शन बघत होतो पण जाणे येणे फारसे चांगले वाटले नाही, पावसाळा संपत आलेला असताना ह्या टुर्स सुरू होतात. आपले आपण ठरवुन जाता येत नाही, टुरच घ्यावी लागते. (बहुतेक याच कारणामुळे फारसे लोक जात नसावेत). सरकारी टुर बुक केली तरी ती प्रायवेट एजेंटनाच आउटसोर्स केली जाते. साधारण ५०,००० च्या आसपास खर्च केला तर बर्यापैकी टुर मिळते. तिथे कुठे फिरायचे वगैरे आधीच ठरलेले असते, आपल्याला आयत्या वेळेला हवा तसा बदल करता येत नाही. मोजक्या ठिकाणीच जाता येते. यापेक्षा अंदमान बरे असे वाटुन ऑप्शन होल्डवर टाकला.

मोदींनी स्वतःच्या ट्विटरवर लक्षद्विपचे फोटो टाकल्यावर मालदिवच्या तिन मंत्र्यांनी त्यांवर टेररिस्ट, इस्रायलचे गुलाम वगैरे कमेंट केल्या. मालदिव टुरिस्टांवर चालते आणि सगळ्यात जास्त संख्या भारतीय टुरिस्टांची आहे हे लक्षात घेता त्यांनी स्वतःच्या पायावर धोंडा पाडुन घ्यायला नको होता. त्यांच्या सरकारने मंत्र्यांना सस्पेंड केले आणि ही त्यांची व्यक्तिगत मते आहेत हे जाहिर केले. असे असले तरी गेल्या ऑक्टोबरात तिथे जे नवे सरकार आलेय त्यांना भारत नकोय आणि चीन हवाय. हे सगळे नाटक सुरू असताना त्यांचा पिएम का कोणी प्रिमियर चीनमध्ये फिरतोय. त्यामुळे वर वर आपल्याला जे दिसतेय ते आत तसेच असेल याची काहीही गॅरंटी नाही.

मालदिव्स भारतीय महासागरातील एक महत्वाचे ठाणे आहे आणि त्यावर कंट्रोल राखण्यासाठी भारत व चीनमध्ये चुरस आहे.

For the first time, I am cancelling my Maldives trip due to *Diplomatic issue*

Else,

Every year, I used to cancel it due to *Financial issue*

मालदीव इतकं कट्टर आणि आयसिस ला टेरेरिस्ट पुरवणारं बेट आहे माहीत नव्हतं. राईट विंगर्सनी आतां मालदीव टाळावं.
पण म्हणून लक्षद्वीपला गर्दी करू नका. आमच्या कोकणात तर अजिबातच टुरिस्ट गर्दी नको.
त्यापेक्षा कॅरेबियन बेटं, ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड , आफ्रिका,युरोप उत्तम पर्याय आहेत.क्लोजर टू होम श्रीलंका किंवा आपल्या राहुलजी गांधींचं लाडकं थायलंड!
पुरोगामी पब्लिकने आता आवर्जून मालदीवलाच जावं. तुम्ही तिकडे जाणं हीच त्यांना पूरेशी शिक्षा होईल!

कंट्रोल मिळवण्यासाठी बहीष्कारासारखे द्सरे साधन नाही. >>> Lol यातली खोच वाया गेलेली नाही हे कळवण्याकरता हे Happy

पण मला असेही वाटते की हे त्यांच्यावर प्रेशर टाकण्याकरता आहे. तेथील विरोधी पक्ष भारताला अनुकूल आहे असे वाचले. आर्थिक नुकसान दिसले तर त्या सरकारलाही काहीतरी करावे लागेल. कारण चीन काय लगेच इतके लोक तिकडे पाठवेल असे नाही.

सरकार (सत्ताधारी) काहीही म्हणो, अर्थकारण महत्वाचे. तिथल्या टुरिस्ट असोसिएशनने मालादिवच्या मंत्र्यांचा निषेध केला आहे (ते करू शकले हे ही खरेच, कदाचित राईट विंगर सरकार नसल्याने असेल Wink ) बाकी मायदेशात टूर वर आलेल्यानी कोणी कुठे जावे ह्याचा सल्ला देणे म्हणजे जरा अ आणि अ आहे

खरं तर असं मजा करण्यासाठी पर्यटन करणं हे आपल्या संस्कृतीत बसत नाही. आपलं जुनं वाड्मय पहा. फक्त धार्मिक पर्यटनाचे उल्लेख आहेत. आणि तेही हाल अपेष्टा सहन करत. आदर्णीय मोदीजींना शानशौकीची हौस आणि सवय आहे, म्हणून ते असली पाश्चात्य थेरं करतात.

आपण लक्षद्वीप सारखी पर्यटन स्थळं विकसित करावीत ती फक्त परदेशी धनाढ्य पर्यटकांसाठी. त्यांच्याकडून परकी चलन मिळवण्यासाठी. देशातल्या धनाढ्यांनाही तिथे जाऊ द्यायला हरकत नाही. तेवढाच पैसा खेळता राहील आणि अदाणीर्थव्यवस्था मजबूत होईल. नाहीतरी त्यांच्यात देश सोडून जाण्याचं प्रमाण वाढतं आहे.

आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी ही स्थळं नकोत.

भरत, तसं तर सात समुद्र ओलांडून जाणं हे देखील सनातन धर्मबाह्य आहे की. त्याचं प्रायश्चित्त म्हणून राहुल राहुल अशी सनई वाजवतात का ?

आमच्या ट्रॅव्हल ग्रुपवर यावर चर्चा झाली. अनेकांच्या मताचे एकत्रिकरण करुन पोस्ट मांडतो.

आभासी राष्ट्रवाद ( Pseudo Nationalism )
मालदीव सॉफ्ट टारगेट आहे म्हणून हे चाललंय. पण यात लाँग टर्म दोन्ही देशांचं नुकसानच आहे.मालदीवला भेट देणाऱ्या एकूण पर्यटकांमध्ये भारतीयांचे प्रमाण १०% आहे . गृहीत धरले की या १०% पैकी सर्वांनीच #BoycottMaldives केले तरी मालदीवच्या पर्यटन व्यवसायाला फटका बसेल पण अर्थव्यवस्था कोलमडून पडेल वैगरे अतिशयोक्ती आहे .
या विषयावर अनेक मुद्दे मांडता येतील. आजही पर्यटन व्यवसायाला सरकार दरबारी मान्यता नाही. कुठल्याही प्रकारचे कायदे कानुन किंवा काहीही संरक्षण नाही. पर्यटक असो वा पर्यटन कंपनी, सरसकट तोलले जातात. आज लक्षद्वीप बेटे highlight केली गेली आहेत. पण तिथे मोजून दोन हॉटेल आहेत, तीही सरकारने चालवलेली 3*. वॉटर बंगलो वगैरे काही नाही. बेटावर जाण्यासाठी दिवसाला एक विमान जाते, तेही बरेचदा शेवटच्या क्षणी रद्द होते. अशा वेळी पर्यटक एजंटला जबाबदार धरतो. यात सगळ्यांची गळचेपी होते. पर्यटक पोहोचला नाही म्हणून हॉटेल पूर्ण cancelation चार्ज लावतात. विमान कंपनी प्रवास रद्द झाला म्हणून काही पैसे परत देऊन हात वर करते. अशा परिस्थितीत पर्यटन विकास कसा करणार? पर्यटन संबधित सगळ्या संस्था आपापल्या प्रतलात काम करतात. सरकारी आणि खाजगी संस्थांनी मिळून काम केले तरच त्यातून कदाचित काही मधला मार्ग निघू शकतो.
काय आहे social media मुळे सगळ्याच गोष्टी एका रात्रीत highlight होतात , पण प्रत्यक्षात तिथे काय आहे ? अजून नक्की किती प्रमाणात बदल होयला हवेत .? हे फक्त तिथे अनेकदा जाऊन आलेला एक जाणकार सांगू शकतो..
आज अंदमानला सुध्दा जाताना govt चे किचकट नियम गृहित धरूनच जायला लागतं. अजूनही तिथे बऱ्याच गोष्टी चांगल्या तऱ्हेने हाताळता येऊ शकतात. भारतातूनच ईतकी लाखो लोकं दरवर्षी अंदमानला भेट देतात ,ईतकं बऱ्यापैकी पर्यटन होऊनसुध्दा म्हणावं तसं अंदमान सुधारलेल नाही.

Pages