प्रियदर्शिनी पार्क - मुंबईच्या समुद्रकिनारी लपलेली एक सुंदर जागा - (फोटोंसह)

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2023 - 13:37

.
व्हॉटसपवर स्टेटस टाकले
आणि सोबत खालील फोटो टाकला

१) Guess The Place??
Somewhere in Mumbai

01_2.jpg

मझ्या फ्रेंडलिस्टमधील निम्मी जनता परेशान.
किधर है भाई, किधर है ...

मग तासाभराने दुसरा फोटो टाकला.

२) Same Place... Any guesses ??

02_2.jpg

अर्ध्याअधिक जनतेचा एकच अंदाज

RHTDM ???

(अधिक माहितीसाठी माधवन आणि दिया मिर्झाचा रेहना है तेरे दिल मे बघा. ज्यात माधवनने अश्याच एका जागेचा "मुंबई की मेरी सब से फेव्हरेट जगह" असा उल्लेख केलेला)

मग मी कोणाची फार परीक्षा न घेता त्यांना खरे काय ते उत्तर दिले.

खरे तर मी स्वतः जन्मापासून मुंबईकर असूनही आणि या जागेच्या प्रवेशद्वारापुढून कित्येक वेळा गेलो असूनही आत ईतकी सुंदर जागा आहे याची मला कल्पना नव्हती. तर मग ईतरांनी न ओळखल्यास नवल नव्हते. लाज तर मलाच वाटावी अशी ही गोष्ट होती.

तर झाले असे,

मुंबईचे घर पुन्हा ताब्यात आले, आईवडिलांनी तिथे राहायला सुरुवात केली. तसे आम्हा नवी मुंबईकरांच्या मुंबई वार्‍या सुरू झाल्या.

आला विकेंड, ऊचलली बॅग, पळालो मुंबईला.

आता दर विकेंड मुलांसोबत मुंबईला जातोय तर त्यांना शनिवार-रविवार सकाळ-संध्याकाळ फिरवणे आलेच. राणीबागेपासून जी सुरुवात झाली ते गेटवे ऑफ ईंडिया, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, हँगिग गार्डन सोबत कमला नेहरू पार्क, एके दिवशी वरळी सीफेस, तर कधी दादर परीसर, झाल्यास जवळचाच भाऊचा धक्का आणि नाक्यावरचाच माझगावचा डोंगर हे सारे एकापेक्षा जास्त वेळा फिरून झाले. सुदैवाने आमचे घर या सर्व जागांच्या केंद्रबिंदूवर असल्याने जाण्यायेण्याच्या दृष्टीने सारे सोयीचे पडायचे. पण मुलांच्या सुट्ट्या सुरू झाल्या आणि मुंबईतली वाढती गर्मी पाहता त्यांना मुंबईत आणखी कुठे कुठे फिरवायचे ही समस्या आणखी बिकट होऊ लागली.

अश्याच एका शुक्रवारी, मध्यरात्र उलटून गेली असताना, उद्या कुठे जायचे या विवंचनेत झोप येत नसताना, आपली मायबोलीकर म्हाळसा, देवीसारखी मदतीला धाऊन आली. (तिच्याकडे तेव्हा दुपार असते.)

तर व्हॉटसपवर तिचा मेसेज आला. आणि तिने ही जागा सुचवली. म्हणाली, छान दिसतेय. मी ही कधी गेले नाही. तू ने तुझ्या पोरांना आणि मला त्यांचा फिडबॅक दे. त्यांना आवडली तर मी सुद्धा भारतभेटीत माझ्या पोरांसोबत जाईन असे म्हणून अंतर्धान पावली.

प्रत्यक्षात ती जागा मला आणि माझ्या पोरांना ईतकी आवडली की महिन्याभरात आम्ही तिथे तीनदा जाऊन आलो. पोरांनाच नाही तर बायकोलाही सोबत घेऊन गेलो. कारण जागा केवळ पोरांनाच आवडेल अशी नव्हती तर तिला एक रोमांटीक टच सुद्धा होता Happy

चला तर मग त्या जागेची, म्हणजेच प्रियदर्शिनी पार्कची, एका दिवसाची सैर करूया Happy

३) दुपारी कडक ऊन असते, काही हरकत नाही. पार्क सकाळी ६ वाजता ऊघडते. मॉर्निंग वॉकलाच बाहेर पडूया. जरा ऊशीर झाला तरी ऊन कोवळंच मिळेल Happy

03_2.jpg
.

४) हे गेटमधून आत शिरल्यावरचे पहिले द्रुश्य. पण फोटो मात्र आम्ही निघताना टिपला आहे. ईथेच गेटच्या आत स्नॅक्स कोल्ड्रींकचा स्टॉल आहे. तिथेच आईसक्रीम खाता खाता क्लिक केला.

04_2.jpg
.

५) तिथून लहान मुलांच्या गार्डनला जाणारा रस्ता. सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक करणारी मंडळी ईथून भेटायला सुरुवात होईल.

05_2.jpg
.

६) पोहोचलो. हेच ते गार्डन. समुद्राच्या बाजूने नारळाच्या झाडांनी आच्छादलेले.

06_2.jpg
.

७) आजकाल कुठल्याही गार्डनमध्ये हे ऑल ईन वन स्लाईडस असते आणि मुलांना खेळायला पुरते. ईथेही अपवाद नाही.

07_2.jpg
.

८) सोबत झोके आहेतच!

08_2.jpg
.

९) पण आम्हाला चार झोके झाल्यावर मातीतच खेळायला आवडते Happy

09_2.jpg
.

१०) हे एक मचान आहे. पण साधेसुधे नाही तर महान आहे. याच्या मधोमध एक झाड प्रगट झाले आहे.

10_2.jpg
.

११) पोरांना काही एडवेंचरस हवे असल्यास... त्याचीही सोय आहे.

11_2.jpg
.

१२) खेळून मन भरले की समुद्राच्या कडेकडेने वॉकला निघायला हरकत नाही.

12_2.jpg
.

१३) बारकाईने पाहिले तर आपल्या रंग बदलण्याच्या शक्तीचा गैरफायदा उचलत झाडांवर असे सरडे लपलेले दिसतात. पण चालता चालता रस्त्यावरच्या मुंग्या टिपणारी आमची पोरं, त्यांच्या नजरेपासून ईतके अजस्त्र प्राणी लपणे अवघडच.

13_2.jpg
.

१४) चला तर मग वॉकचा आनंदम लुटत अजून पुढे जाऊया

14_2.jpg

१५)
15_2.jpg
.

१६) छान स्वच्छ आणि शांत रस्ते वाटत आहेत ना. सोबत नजरेला सुखावणारा समुद्र. कानावर अलगद आदळणारा लाटांचा आवाज. आणि अंगावर येणारी थंडगार खार्‍या वार्‍याची झुळूक... मॉर्निंग वॉकचे सुख सुख म्हणतात ते हेच Happy

16_2.jpg
.

१७) हा क्षितिजाकडून येणारा उताराचा रस्ता आम्हाला ईतका आवडला आहे की लेकीने पुढच्यावेळी ईथे नाचाची ईन्स्टा रील बनवायचे ठरवले आहे.

17_1.jpg
.

१८) हे आतले स्पोर्टस कॉम्प्लेक्स. ईथे आत शिरायला पैसे भरून मेंबरशिप घ्यावी लागेल.

18_1.jpg
.

१९) या बाहेरच्या हिरवळीचा आनंद मात्र मोफत लुटू शकतो.

19_0.jpg
.

२०) अरे हो, हा खालील फोटो टिपल्यावर या रस्त्यावर आम्हाला एक ऊच्चभ्रू कुत्र्यांची जोडी दिसली. मला कुत्र्यांमधील फारसे म्हणजे काहीच कळत नाही. पण ते चक्क क्यूटसे कोल्हेच वाटत होते. त्यांचेही फोटो मालकाची परवानगी घेत काढायला हवे होते असे आता वाटतेय. पण असो, पुढच्यावेळी... त्यांना टाटा बाय बाय करत आम्ही आमची प्रभातफेरी संपवून तिथून निघालो.

20_1.jpg
.

चला तर मग, आता संध्याकाळची मजा बघूया. संध्याकाळचे फोटो बघूया.

पण जी मजा फोटोत समजणार नाही ती म्हणजे या गर्मीच्या सीजनमध्ये जिथे दिवसभर वार्‍याच्या नावावर गरम वाफ झेलावी लागते. तिथे या ठिकाणी मात्र संध्याकाळच्या वेळी बेफाम बेछूट थंड वारे सुटले होते. जणू आपण वेगळ्याच अवकाशात प्रवेश केला असे गार्डनमध्ये पहिले पाऊल ठेवताच वाटू लागले.

२१) ही तीच सकाळची मचान, आता संध्याकाळच्या संधीप्रकाशात न्हाऊन निघाली आहे.

21_0.jpg
.

२२) हे तिथून टिपलेले बागेचे विहंगम दृश्य.

22_0.jpg
.

२३) आणि हे ही तिथूनच, पण समुद्राच्या दिशेने, नारळीच्या बागांचे..

23_0.jpg
.

२४) त्याच नारळाच्या बागेत संध्याकाळचे मतलई वारे खात बसलेली एक फॅमिली..

24_0.jpg
.

२५) सोबत पफकॉर्न खाणारी खारूताई

25.jpg
.

२६) चला थोडे ऊन कमी झालेय तसे समुद्राकडे जाऊया

26.jpg
.

२७) समुद्राचे वारे आता थेट खाऊया Happy

27.jpg
.

२८) हा अस्सा पसरलेला समुद्र दिसतो समोर

28.jpg
.

२९) की जणू सुर्यही आपला सोबती वाटतो.

29.jpg
.

३०) वारा ईतका की बारक्या पोरांचेही केसं ऊडतात

30.jpg
.

३१) लोकं घरच्यासारखे मिळेल ती जागा पकडून पसरतात.

31.jpg
.

३२) कारण समोरचे द्रुश्यच ईतके भन्नाट आणि विलोभनीय असते.

32.jpg
.

३३) समुद्र! समुद्र! समुद्र!... हिच तर मजा आहे मुंबईची Happy

33.jpg
.

३४) एक दगड पकडून आपल्यालाही तो जवळून बघायचा मोह आवरत नाही.

34.jpg
.

३५) काहींना पुढे जाऊन त्याला स्पर्श करावेसे वाटते. पण तुम्ही थोडे अंतर राखण्यातच धन्यता मानता.

35.jpg
.

३६) पण मग तो स्वतः तुम्हाला स्पर्श करायला पुढे सरसावतो Happy

36.jpg
.

३७) पण जर तुम्ही आधीच त्याच्या ओढीने पुढे गेलात....

37.jpg
.

३८) तर मग जरा जपून...

38.jpg
.

३९) हे असे होण्याची दाट शक्यता असते.
लगेचच ती धोक्याची घंटा, परतीचा इशारा समजावा...

39.jpg
.

४०) जर तुमच्यासोबत तुमची प्रेयसी/प्रियकर नसेल, तर मावळत्या सुर्याला निरोप देऊन घरी परतायला हरकत नाही.... पुढची मजा प्रेमी युगुलांना करू द्यावी. बाकी तसा त्यांचा ऊच्छाद ईथे कुठे दिसला नाही हे विशेष.

40.jpg

------------------------------------------------

खालील नकाश्यात जवळपासच्या फिरायच्या जागा हायलाईट केल्या आहेत. आम्ही खादाडीसाठी माझगाव, भायखळा, गिरगाव चौपाटीचा रस्ता धरल्याने जवळच्या खाऊगल्ली ठिकाणांची कल्पना नाही.

४१) नकाशा क्रमांक १

41 pdp map 1.jpg

४२) नकाशा क्रमांक २

42 pdp map 2.jpg

------------------------------------------------

Priyadarshini Park

Address: Nepean Sea Rd, Malabar Hill, Mumbai, Maharashtra 400006

Timing: 6–11 am, 4–9 pm

धन्यवाद,
ऋन्मेष Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जुन्या आठवणी जाग्या झाल्या. परंतु आता बऱ्याच चांगल्या सुधारणा झाल्या आहेत. प्रत्येक प्रचिला साजेसा वृत्तांत वाचनीय. लेखकाला धन्यवाद.

आज अचानक गेलेच प्रियदर्शिनी पार्कला. पोहोचेपर्यंत सूर्यास्त झाला त्यामुळे समुद्राचा नजारा नाही मिळाला. पण लाटांचा आवाज, खारा वारा आणि मरीन ड्राईव्हसारखा गजबजाट नसल्याने छान वाटले. चिल्ड्रन एरीआमधेही मज्जा आल्याचा फीडबॅक मिळाल्यामुळे व्हिजीटचं सार्थक झालं. आता ही जागा आवडत्या लिस्टीत आली आहे.
मुंबईतील एक निवांत जागा इंट्रोड्युस केल्याबद्दल ऋन्मेषचे खास आभार…

चौपाटीवरून इथे जात असताना भल्याभल्यांचे स्वप्न असलेला ‘वर्षा’ बंगलाही दिसला ही चेरी ऑन द टॉप….

मरीन ड्राईव्हसारखा गजबजाट नसल्याने छान वाटले. चिल्ड्रन एरीआमधेही मज्जा आल्याचा

मरीन ड्राईव्ह सारखा गजबजाट नाही कारण प्रियदर्शनी पार्क हे ठिकाण रेल्वे स्टेशन पासून लांब तर आहेच आणि आड मार्गाला आहे.
. सुरक्षा हा सर्वात मोठा इश्यू आहे एक दुर्लक्षित ठिकाण, आड मार्गावर त्या मुळे तिथे रात्री जाणे कोणीच संरक्षित समजणार नाही.
मरीन ड्राईव्ह ला रात्री दोन वाजता गेला तरी सुरक्षित असाल.

मरीन ड्राईव्ह फक्त आणि फक्त सार्वजनिक आहे.
कोणाचा प्रभाव नाही

आड मार्गावर त्या मुळे तिथे रात्री जाणे कोणीच संरक्षित समजणार नाही.
>>>> मरीन ड्राईव आणि पार्कची तुलना होऊ शकत नाही.
तरीही पार्क नेपिअन सी रोडवर आहे. पार्क असल्याने रोज रात्री ९ वाजता बंद होते. मुंबईमध्ये ९ वाजेपर्यंत वाहत्या रस्त्याच्या कडेला वेल लिट पार्कमधे काही सुरक्षेचा इश्यु होईल असे वाटत नाही. पोलिसही होतेच काल.

प्रियदर्शनी पार्क हे रहदारी च्या रस्त्यावर नाही.
ज्या रस्त्याच्या बाजूला ते आहे तो रस्ता पण लवकर सूनसान होतो.

मरीन ड्राईव्ह महत्वाच्या रस्त्या ला लागून आहे.
हा रस्ता रात्र भर गजबजलेला असतो .

लाईट च झगमगाट मरीन ड्राईव्ह ला रात्र भर असतो .
प्रियदर्शनी पार्क ल ह्या दोन्ही गोष्टी लागू होत नाहीत

>>>आड मार्गाला आहे.
. सुरक्षा हा सर्वात मोठा इश्यू आहे एक दुर्लक्षित ठिकाण, आड मार्गावर त्या मुळे तिथे रात्री जाणे कोणीच संरक्षित समजणार नाही.

बाप रे!!! रात्री/ अपरात्री जाऊच नका कोणी.

अरे देवा...

हेमंत तुम्ही कुठे राहता आणि तिथे कितीदा गेला आहात? कोणत्या वेळी गेला आहात?

मला पार्क बंद व्हायची वेळ माहीत नाही पण नऊ धरली तरी मुंबईत कुठे नऊ वाजता असुरक्षित असते?
भले कुठे असेलही पण त्या तिथे आम्ही आठ वाजता निघताना बाहेरील रस्त्यावर मिनिटाला शे दोनशे वाहने पास होतील असा रहदारीचा एरिया आहे.

उलट हेंगिंग गार्डनला तिथूनच एका रस्ता जातो आणि तिथे तुलनेत रहदारी कमी होत जाते. तुम्ही उलटे त्याला सुरक्षित म्हणत आहात.

तुम्ही नक्की कुठल्या भागाबद्दल बोलत आहात मला प्रश्न पडलाय.

हो, आता रात्री एका दोन वाजता मरीन ड्राईव्हला जाताना त्यावेळी तुम्ही ते गार्डन रस्त्यात पाहिले असेल आणि मरीन ड्राईव्हच्या तुलनेत रात्रीचे एक दोन वाजता ते असुरक्षित आहे म्हणत असाल तर कोणी तिथे त्यावेळी जाऊ नका हा सल्ला मी सुद्धा देईन Happy

आड मार्गाला आहे.>>> नेपिअन सी रोड आड मार्ग कसा?

मीच ८ः३० पर्यंत पार्कमधे होते. मुंबईतील ८ः३० म्हणजे ५ः३० इतकाच प्राईम टाईम असतो. ८ नंतर बाहेरून येणारी मंडळी कमी होतात तेव्हा आजूबाजूच्या रेसिडेन्शिअल एरीआतील लोकं जॉगिंग, चालण्यासाठी उतरतात.
अतिशय अफ्लुअंट (आर्थिक व राजकिय दृष्ट्या) भागात पार्क आहे. त्यामुळे बर्यापैकी सुरक्षा आहे.
आणि पार्क ९ वाजता बंदच होते तर अपरात्री जायचा काय प्रश्न आहे? ९ वाजता तर वॉचमनच हाकलून देईल.

हां, अंधार पडल्यावर समुद्रात उतरलात तर प्रॉब्लेम होईल. माबोकर तेवढे सुज्ञ आहेत.

रुपाली धन्यवाद Happy

हँगिंग गार्डन मध्ये नुसते तेच पकडले तर ते मुलांना नाही आवडतं. तिथे जो क्राउड येतो तो समोरच्या कमला नेहरू पार्क (म्हातारीचा बूट) मुळे येतो. पण आमच्या मुलांना ते सुद्धा नाही आवडत कारण आमच्याकडे घराजवळच माझगावचा डोंगर आहे.
माझगाव डोंगर बद्दल जाणून घेण्यास हा धागा बघा.
माझगावची शान - माझगावचा डोंगर - (फोटोसह)
https://www.maayboli.com/node/83604

कमला नेहरू पार्क मध्ये एक स्पॉट आहे जिथून गिरगाव चौपाटीचा छान व्यू दिसतो. मुलांना तो दाखवला तर त्यांना प्रश्न पडला की चौपाटी इथे खालीच आहे तर आपण वर काय करतोय Happy लगेच वरची सहल पॅकअप करून खाली चौपाटीवर वाळूत खेळायला जावे लागले.

विषय निघालाच आहे तर या तिन्ही जागांचा मिळून एक धागा काढायला हरकत नाही असा विचार मनात आला. वेळ मिळाला तर घेतो मनावर Happy

>>>>>>चौपाटी इथे खालीच आहे तर आपण वर काय करतोय Happy लगेच वरची सहल पॅकअप करून खाली चौपाटीवर वाळूत खेळायला जावे लागले.
हाहाहा

PDP - कालच्या संध्याकाळी

IMG-20240127-WA0028.jpg

जरा वेळाने

IMG-20240128-WA0032.jpg

आहाहा.. सुंदर मामी.. काय मस्त कलर आलेत फोटोत !

आज मुंबईत असल्याने हे फोटो बघून. आता इथेच जावेसे वाटतेय.. पण उशीरा जाणे होणार असल्याने सूर्यास्त नशिबात नाही.. तर मरीन ड्राईव्हच जाईन..

Pages

Back to top