विमानवेडे, अर्थात Avgeeks

Submitted by अँकी नं.१ on 31 March, 2022 - 08:11
Let's Take Off...!!!

उडण्याचं आकर्षण माणसाला पहिल्यापासूनच होतं, त्यातूनच वेगवेगळे प्रयोग केल्यानंतर विमानाचा शोध लागला.
सुरुवातीला सामान पोहोचवणारी ही यंत्रं प्रवासी वाहनं म्हणूनही वापरात यायला लागली.
प्रोपेलर वाल्या इंजिनापासून फरकात घेत जेट एज आलं अन त्यात आलं बोईंगचं ७४७ : क्वीन ऑफ द स्काय. आपला वेगळा शेप, अपर डेक अन शेकडो माणसं आणि कार्गो हे दोन्ही वाहून न्यायची क्षमता यामुळे बघता बघाता लोकप्रिय झालं.

अशाच वेगवेगळ्या विमानांबाबत अन त्यासंदर्भात अन्य गोष्टींबाबत चर्चा करायला उत्सुक असलेल्या विमानवेड्यांसाठी हे लाऊंज...

Check yourself in...

Group content visibility: 
Use group defaults

एअर इंडिया ची नवी स्कीम त्याच्या मागच्या व्हिजन चा व्हीडिओ बघे पर्यंत फार भावली नव्हती, नंतर बऱ्यापैकी सेन्स करती आहे. खिडक्यांच्या महिरापीचं मोटिफ घेऊन गोल्डन विंडो फॉर्म केली आहे. एकूण रंग फ्रेश आहेत. लिव्हरी बनवताना प्रॅक्टिकल अप्रोच ठेवला आहे. आधीची महिरप, इंजिन अन् टेल वरचं डिझाईन हे अती कॉम्प्लेक्स होतं.

याचं बरोबरएअर इंडिया नी नवीन केबिन प्रॉडक्ट पण रिव्हील केलेत. फर्स्ट क्लास अन् बिझनेस क्लास सीट मधे फारसा फरक नाहीये. क्वांटास नी पण हेच हार्ड प्रॉडक्ट चूज केलंय. प्रीमियम इकॉनॉमी सीट्स पण बऱ्या आहेत. इकॉनॉमी ला मात्र 777 मधे 3-4-3 ले आऊट येण्याचे संकेत आहेत...

एअरक्राफ्ट मधे मोडकी सीट्स, न चालणारे सीटबॅक व्हिडीओज वगैरे बद्दल काही ऑफिशियल प्लॅन आला आहे का? खूप लोकांकडून हे अनुभव ऐकले आहेत.

एअरक्राफ्ट मधे मोडकी सीट्स, न चालणारे सीटबॅक व्हिडीओज वगैरे बद्दल काही ऑफिशियल प्लॅन आला आहे का?
>>
सर्व 777 आणि 787 चे पूर्ण इंटेरियर चेंज होणार
मिड २०२४ पासून ही अपग्रेडेड प्लेन दिसायला लागतील, २०२५ पर्यंत पूर्ण लाँग हाऊल फ्लीट अपग्रेड होईल.

शॉर्ट हाऊल प्रीमियम केबिन बद्दल उत्सुकता आहे.
विस्तारा मधे ही 321 नीओला फुल फ्लॅट बेड वाला बिझनेस क्लास आहे. त्यापेक्षा बेटर हार्ड प्रॉडक्ट एक्सपेक्टेड आहे (जेट ब्लू च्या नवीन प्लेन टाईप)

थँक्स अँकी. होप ते लौकर करून पुढेही ते नीट चालेल हे बघतील. अमेरिकेहून एअर इण्डियाच्या फ्लाइट्स सगळ्या १०+ तासांच्या आहेत. त्यात व्हिडीओ नसणे म्हणजे वैताग येइल. किमान युनायटेड लेव्हलच्या सोयी आणि सर्व्हिस मिळाली तरी एअर इण्डिया हा खूप चांगला पर्याय होईल.

नेवार्क-मुंबई युनायटेड फ्लाइट सध्या बंद असल्याने एअर इण्डियाला खूप बिझिनेस मिळू शकतो. पण या ऐकीव गोष्टींमुळे अजून ट्राय केलेली नाही.

भारतात डोमेस्टिकला विस्तारा एक दोन वेळा वापरली आहे. चांगली वाटली. मागच्या वर्षी लता मंगेशकर गेल्यानंतर या फ्लाइट्स मधे टर्मिनलवर असताना तिची गाणी लावली होती.

अजुनही दिल्लीहुन जास्त रुटस आहेत >>>> हो.. अर्थातच. असलेले रूट्स बंद करून लगेच मुंबईला शिफ्ट होणार नाहीत. पण मुंबईहून डायरेक्ट फ्लाईट खूप कमी झाल्या होत्या ज्या आता टाटांच्या काळात पुन्हा सुरू व्हायला लागल्या आहेत.

(Air India, Vistara, Indigo, spicejet all HQs in NCR) >>>> इंडीगो, स्पाईसजेट टाटांच्या अखत्यारीत येत नाहीत. एअर इंडीयाचं हेड क्वार्टर सरकारने २०११-१२ ला दिल्लीला हलवलं. इंजिनियरींगचं बेस अजूनही मुंबईच आहे.

असो. जर टाटा "लेट्स मेक मुंबई एअरपोर्ट ग्रेट अगेन (फॉर एअर इंडीया)" अशी कँपेन चालवणार असतील तर त्याला माझा पाठिंबा. Happy

आधीची महिरप, इंजिन अन् टेल वरचं डिझाईन हे अती कॉम्प्लेक्स होतं. >>>> हो ते चक्र मला आवडायचं नाही. एकूण ते बदलायची गरज होतीच. पण आहे ते अजून थोडं "elegant" चाललं असतं.. विशेषतः फाँट

त्यात व्हिडीओ नसणे म्हणजे वैताग येइल. >>>> मी एव्हड्यात व्हँकुअर दिल्ली फ्लाईटने दोनदा गेलो. दोन्ही वेळा सगळं मोडलेलं होतं. स्क्रिन बंद, पुशबॅक जेमतेम, ओव्हरहेड लाईट्स कधी कधी चालायचे. फक्त त्या फ्लाईटचा फायदा हाच की १९ तासांत पुण्यात पोहोचवते आणि पुणे एअरपोर्टवरून अर्ध्यातासात घरी!

एअर इंडीयाच्या नवीन ऑर्डरमधलं पहिलं ए-३५० डिलिव्हर झालं असं फेबु फीडवर दिसलं. आता नवीन पेंटींग करून सेवेत दाखल होईल.

एअर इंडीयाच्या नवीन ऑर्डरमधलं पहिलं ए-३५० डिलिव्हर झालं असं फेबु फीडवर दिसलं. आता नवीन पेंटींग करून सेवेत दाखल होईल.
>>
एअर इंडिया घेत असलेली 6 ए ३५०-९०० ही रशियन एरोफ्लोट साठी तयार अवस्थेत होती. नवी लिव्हरी पेंट होऊन येणारं हे पाहिलं विमान असेल. पण सप्लाय चेन डीलेज मुळे यात एरोफ्लोट चेच इंटेरियर असतील (जे आत्ता डेल्टा कडून लीज केलेल्या 5 बी ७७७-२०० सारखेच आहेत)

याशिवाय एअर इंडिया सुमारे १३ बी ७७७-३०० विमानं लीज करतं आहे. (६ सिंगापूर एअरलाईन्स कडून अन् ७ एतीहाद कडून) सध्याच्या विमानांच्या केबिन अपाग्रेड प्रोसेस मधे सबस्टीट्यूट म्हणून ही वापरली जातील
त्यामुळे येती 2 वर्ष एअर इंडियाच्या फ्लीट प्रॉडक्टस मधे जोरदार तफावत अनुभवता येईल. पण चालता है...

त्यामुळे येती 2 वर्ष एअर इंडियाच्या फ्लीट प्रॉडक्टस मधे जोरदार तफावत अनुभवता येईल. पण चालता है... >>>>> आत्ता असलेल्या पेक्षा लाँग हाऊलमध्ये बरी विमानं असतील तर खरच चलता है.

रच्याकने, अजून एअर इंडीयाचा अजून एक अनुभव. चेक-इनच्या वेळी दाखवलेला सीट मॅप आणि प्रत्यक्ष विमानात असलेल्या सिट्स वेगवेगळ्या होत्या. हे दुसर्‍यांदा झालं! लेग स्पेस हवी म्हणून गॅली जवळच्या एग्जिट रो मधली सीट घेतली. प्रत्यक्ष बोर्डींग झाल्यावर बघितलं तर त्या सिटच्या पुढे अजून एक रो होती!! आणि हे सिलेक्शन विमानाच्या वेळेच्या २४ तासापेक्षा कमी काळात केलं होतं. म्हणजे त्यावेळी नक्की कुठलं एअर-क्राफ्ट येणार हे नक्की होतं. विमानात त्यांनी बदलून दिलं पण मुळात ही तफावतच विचित्र होती!

मुंबईहून डायरेक्ट फ्लाईट खूप कमी झाल्या होत्या ज्या आता टाटांच्या काळात पुन्हा सुरू व्हायला लागल्या आहेत.>> हो लॉक डाऊन नंतर तर पार वाट लागली होती. आता परत सुरु होत आहेत. अजुन Mumbai - Seoul चालु झाला नाही. होपफुली करतील लवकर.

७७७ मध्ये ३-४-३ हे फारच वाईट आहे>> हे तर Economy class std आहे ७७७ चे. २-४-२ हे फक्त मी ANA च्या दिल्ली टोकियो मधे बघीतले होते २०१५ ला. पण ते ७७७ का ७८७ आठवत नाही आता.

२-४-२ ने गेल्याच १ वर्षात अनेक प्रवास मी स्वतः किंवा जवळच्या परिचितांनी केले आहेत. ते बहुतेक सर्व बी७८७ होते. ३-३-३ ने काहीवेळा केले आहेत, पण आवडत नाही. ३-४-३ अमेरिका प्रवासात कॉमन आहे का? मी कधीच तिकडे गेलो नाहीये आणि अश्या सीटांवर (किंवा २-५-२ सुद्धा) बसायची वेळही सुदैवाने आली नाहीये. गूगल केल्यावर समजले की ए३८० किंवा बी७४७ मध्ये ३-४-३ शिटं आहेत म्हणून.

अमेरिका-भारत फ्लाइट्स मधे मी बहुतांश ३-४-३ पाहिले आहे. एअरक्राफ्टशी मॅच केलेले नाही. कधीकधी ३-३-३ ही होते. २-४-२ किंवा २-५-२ क्वचित पाहिले आहे.

मी फ्लाइट बुक केली की सहसा या साइटवर जाउन सीट प्लॅन चेक करतो. आता विमान कंपन्यांचीही अ‍ॅप्स असल्याने त्यावरही जास्त अचूक मिळते. पण या साइटवर एखाद्या स्पेसिफिक सीटबद्दल माहिती असते - लेग रूम कमी आहे, रिक्लाइन कसा आहे, काही कडेच्या सीट्सना खिडकीच नसते वगैरे. लोकांचे अगदी स्पेसिफिक सीटचे रिव्यूज पण असतात. अनेक लोक तेथे १ए वगैरे फर्स्ट क्लास सीट्सबद्दल तक्रारी करून आपल्याला कॉम्प्लेक्स देतात Happy
https://www.seatguru.com/

गूगल केल्यावर समजले की ए३८० किंवा बी७४७ मध्ये ३-४-३ शिटं आहेत म्हणून. >>>> मी फक्त एमिरेट्सच्या ए३८० नेच प्रवास केला आहे आणि त्यात ३-४-३ मधली सीट्स खूपच चांगली आणि प्रशस्त होती. एअर इंडीयाच्या जुन्या ७४७ मधलीही चांगली असायची. मला डेल्टामधली ३-४-३ ची सिट्सही एकदम आरामदायी वाटलेली, विशेषतः केलएएम आणि एअर फ्रान्सने पाहिला लेग केल्यावर. फक्त विमान कुठलं होतं ते आठवत नाहीये.

फा, मी वर लिहिलेला अनुभव सीटगुरू वर चेक करून मगच आलेला आहे. Happy

विमानं आणि टिपीकल इकॉनॉमी सीट लेआऊट:

A220 : 2-3
A320 : 3-3 (318, 319, 321)
A330 : 2-4-2 (3-3-3 on ultra low cost carriers)
A340 : 2-4-2 (3-3-3 on ultra low cost carriers)
A350 : 3-3-3 (3-4-3 proposed)
A380 : 3-4-3 (3-5-3 propose, never implemented)

B737 : 3-3
B747 : 3-4-3 (originally designed for 2-4-3)
B757 : 3-3
B767 : 2-3-2
B777 : 3-3-3 / 3-4-3 (this was a popular choice post 787, 777x designed for this layout)
B787 : 3-3-3 (originally designed for 2-4-2, few planes of JAL still have it, ANA had it on few but then got it replaced...)

फा, मी वर लिहिलेला अनुभव सीटगुरू वर चेक करून मगच आलेला आहे >>> ओह Happy मी पूर्वी कायम चेक करायचो तेथे. आता अ‍ॅप वर बरीचशी माहिती मिळते.

थँक्स अँकी. आता यापुढे एअरक्राफ्ट कोणते आहे याकडे लक्ष जाईल. इतके दिवस मी इतके लक्ष देत नव्हतो. म्हणजे आयटिनररी मधे दिसायचे पण लक्षात राहायचे नाही.

वरच्या खेरीज इथे अमेरिकेत अगदी शॉर्ट हॉल फ्लाइट्स असतात - दीड दोन तासाच्या - त्याला २-२ पॅटर्नही बघितलेला आहे. अगदी नॅरो बॉडी. वरची बिन स्पेस अगदी लहान असते. कॅरी ऑन बॅगा गेटवर चेक इन करून टाकतात कारण वरच्या बिन मधे त्या बसत नाहीत. एक दोन वेळा तर १-२ असा पॅटर्नही होता.

फार पूर्वी कोरियन एअर ची जुनी विमाने होती. सीटबॅक टीव्ही नसत. थोड्या थोड्या अंतराने केबिन मधे एकच टीव्ही असे. तेथे इंग्रजी व कोरियन पिक्चर आलटून पालटून लावत. त्या कधीतरी २-५-२ पॅटर्न पाहिल्याचे आठवते.

बाय द वे, विमानातील सीट्स च्या मधे जे पार्टिशन असते (फर्स्ट व इकॉनॉमीच्या मधे उदा:) त्याला "बल्कहेड" म्हणतात त्याचा संबंध विमानाच्या एखाद्या पार्टशी संबंधित आहे की हा केवळ एक प्रचलित झालेला शब्द आहे? लाँग हॉल फ्लाईट्स मधे (वाइड बॉडी जेट्स) सीट्सच्या २०-२५ रांगांनंतर मधे मोठे सेक्शन असते - त्याला तो शब्द वापरलेला पाहिला आहे. डोमेस्टिक नॅरो बॉडी जेट्स मधे बहुधा नाही - कारण तेथे फक्त एक पातळ पार्टिशन असते.

थँक्यू अँकी. हे वाचून मी जुने फ्लाईट डिटेल्स चेक केले आणि माझी चूक लक्षात आली. ते ७८७ नसून ए३३०-३०० होते. ते वरच्या तुझ्या माहितीशी जुळत आहे. मला का ७८७ आठवत होते कुणास ठाऊक!

त्या कधीतरी २-५-२ पॅटर्न पाहिल्याचे आठवते.
>>
युनायटेड च्या डोमेस्टिक रुट नेटवर्क ला ही अघोरी विमानं होती.. बहुतेक याच विमानांमधे 2-4-2 वाला 'बिझनेस' क्लास पण असे (तो पण ट्रेन बोगी सारखा पाठीला पाठ लावून उलट सुलट सीट रो असलेला)

2-2 / 2-1 वगैरे ले आऊट असणारी एम्ब्रेअर, फॉकर, बांबार्डियर वगैरे रीजनल जेट्स मी वरच्या लिस्ट मधे घेतली नाही आहेत.
तसंच चायनीज - रशियन कोलाबरेशन वालं कॉमॅक पण नाही (त्यात C919 ला 3-3 लेआऊट आहे)

चेक-इनच्या वेळी दाखवलेला सीट मॅप आणि प्रत्यक्ष विमानात असलेल्या सिट्स वेगवेगळ्या होत्या. हे दुसर्‍यांदा झालं! लेग स्पेस हवी म्हणून गॅली जवळच्या एग्जिट रो मधली सीट घेतली. प्रत्यक्ष बोर्डींग झाल्यावर बघितलं तर त्या सिटच्या पुढे अजून एक रो होती!!
>>
बल्कहेड वर बेबी बॅसीनेट ची अटॅचमेंट असते. त्यामुळे काही एरालाईनच्या वेब चेक् इन फ्लो वर त्या सीट फक्त इन्फंट सोबत प्रवास करणाऱ्यांना दिसतात. किंवा काही वेळा फक्त अक्रॉस द काऊंटर मिळतात.
लुफ्तांसा नी ऑफिस साठी प्रवास करताना मी एक ट्रिक ४-५ वेळा वापरली आहे. वेब चेक इन करताना ही सीट घ्यायची. लुफ्तांसा अशा सीट वरच्या सोलो प्रवाशांना प्रीमियम इकॉनॉमी किंवा बिझनेस मधे अपग्रेड करत असे. मला दोन्ही अपग्रेड २-२ वेळा मिळाले होते. एकदा मात्र 3-4-3 च्या मधल्या बेंच वर बसावं लागलं होतं...

ए३५० हे नवीन मॉडेल आहे का? परवा लुफ्तांसाच्या नुवर्क-म्युनिक फ्लाइटला हे एअरक्राफ्ट होते. वेगळीच अ‍ॅरेंजमेण्ट आहे. सगळी टॉयलेट्स एकत्र एक ८-१० पायर्‍यांचा जिना उतरून एकाच ठिकाणी आहेत. चांगली वाटली अ‍ॅरेंजमेण्ट. एक फायदा म्हणजे सीट्सजवळ कोठेही टॉयलेट्स नाहीत. असे विमान आधी पाहिल्याचे आठवत नाही.

ए३५० हे नवीन मॉडेल आहे का?

मार्केट लाँच होऊन सुमारे ८-९ वर्ष झाली
बोईंग ७८७ ड्रीमलायनर ला टक्कर द्यायला ए३३० ला नवे पंख अन् इंजिन जोडून बनवायचा प्लॅन होता. पण इन्वेस्टर नी शिव्या घातल्यावर एअरबस नी ७८७-१० + ७७७ ला टक्कर देईल असं क्लीन शीट डिझाईन वालं प्लेन बनवलं.
नवे पंख अन् इंजिन वालं ए ३३० नीओ आलं खरं, पण ७८७ च्या तुलनेत विक्री फारच कमी आहे.

७७७X ला लागणारा उशीर बघता पुढची काही वर्ष लाँग हाऊल वर ३५० प्लेन बऱ्यापैकी दिसणार आहेत.

नव्या वर्षी नवं विमान...
२२ जानेवारी पासून एअर इंडिया चं ए३५० डोमेस्टिक रूट वर क्रू फॅमिलरायजेशन साठी वापरायला सुरुवात होणार आहे.
AI 389 बंगलोर - मुंबई - चेन्नई - बंगलोर
AI 387 बंगलोर - चेन्नई - हैद्राबाद - बंगलोर
AI 868 बंगलोर - दिल्ली
AI 869 दिल्ली - बंगलोर
असा रूट असेल.

मी जाईन म्हणतोय...

एअर इंडियाचं नवं ए३५० छान वाटतय (लोगो वगळता). हे एअरोफ्लोटच्या ऑर्डरमधलं इकडे राऊट केलेलं ना ?

बादवे, टाटांच्या राज्यात एअर इंडीयाच्या मुंबई उड्डाणांना चांगले दिवस आलेत!
मुंबई - जेएफके, मुंबई- सॅन फ्रॅन्सिस्को ह्या फ्लाईट गेल्यावर्षी सुरू झाल्याच होत्या. आता डिसेंबरमध्ये मुंबई- मेलबर्न नॉनस्टॉपपण सुरू झाली. हिथ्रोच्या फेर्‍या पण वाढल्या आहेत. आता पॅरीस, फ्रँकफर्ट पुन्हा सुरू झाली की मी सुडोमी ! Happy
मुंबई एअरपोर्ट खूप बिझी आहेच पण त्या बिझीनेसपेक्षा मी मागे म्हटलं तसं सरकारी काळात नसलेली इच्छा हे मुंबईच्या फ्लाईट कमी व्हायचं कारण होतं!

हे एअरोफ्लोटच्या ऑर्डरमधलं इकडे राऊट केलेलं ना ?
>>
हो
अशी 5 अजून येतील
एअर इंडिया नी ओरिजिनल ऑर्डर मधे लगेच तयार असलेली ही 6 ३५०-९०० अन् बाकी 34 ३५०-१००० घेतली होती
पण आता ते बदलून दोन्ही प्रकारची 20-20 घ्यायचं नक्की केलं आहे.
दरम्यान डेल्टा च्या 5 ७७७-२००एल आर नंतर आता एअर इंडिया नी सिंगापूर एअरलाइन्स ची 3 अन् एतीहाद ची 6 ७७७-३००ई आर लीज वर घेतली आहेत
त्यांची स्वतः ची जुनी 3 ७७७-२००एल आर एप्रिल पासून डीकमिशन होतील (ए ३५० यांना रीप्लेस करतील) तसच जून पासून जुनी 13 ७७७-३००ई आर आणि 27 ७८७-८ केबिन रिफ्रेश करून घ्यायला जातील

जुनी ७७७ डीकमिशन करत आहेत ते बरं आहे. ती फारच जुनी झाली होती खरच.

एअरोफ्लोट मधल्यांचं केबिन अपडेट नाही करणार आहेत ना ? त्यांचं कॉन्फिग तसचं ठेवणार आहेत असं वाचलं.

जुनी ७७७ डीकमिशन करत आहेत ते बरं आहे. ती फारच जुनी झाली होती खरच.

एअरोफ्लोट मधल्यांचं केबिन अपडेट नाही करणार आहेत ना ? त्यांचं कॉन्फिग तसचं ठेवणार आहेत असं वाचलं.

बादवे, टाटांच्या राज्यात एअर इंडीयाच्या मुंबई उड्डाणांना चांगले दिवस आलेत!>> होय. बरेच मिडल ईस्ट चे रुट पण चालु करत आहेत.

एअरोफ्लोट मधल्यांचं केबिन अपडेट नाही करणार आहेत ना ? त्यांचं कॉन्फिग तसचं ठेवणार आहेत असं वाचलं.
>>
मोठे बदल नाही आहेत
बिझनेस क्लास मधे हेड रेस्ट लाल केली आहेत (आधी पिवळी होती). ही केबिन डेल्टा वन टाईप हार्ड प्रॉडक्ट असलेली आहे.
प्रीमियम ईको अन् इकॉनॉमी वाले सीट्स (हार्ड प्रॉडक्ट) हे एअर इंडियाच्या ७७७ च्या नव्या प्रपोज्ड डिझाईन प्रमाणेच असल्यानं सीट कव्हर पूर्ण एअर इंडियाच्या थीम मधे आहेत.

२२ तारखेचं बुकिंग झालं आहे. बंगलोर - चेन्नई (व्हाया मुंबई) अन् चेन्नई - बंगलोर (व्हाया हैद्राबाद)
प्रत्यक्ष बघून सांगतो...

२२ तारखेचं बुकिंग झालं आहे. बंगलोर - चेन्नई (व्हाया मुंबई) अन् चेन्नई - बंगलोर (व्हाया हैद्राबाद)
प्रत्यक्ष बघून सांगतो...>> you are really a avgeek. Enjoy

Pages