(* Sea Fever : BY JOHN MASEFIELD या कवितेचा स्वैर अनुवाद)
(लेकाने काढलेला फोटो)
आज गेलंच पाहिजे, खोल खोल एकांत समुद्रात आभाळासोबत,
संगतीला हवीय उंच शिडाची होडी अन तिलाच न्याहाळणारा एक तारा;
सुकाणूचा ताबा अन वाऱ्याच्या शिळेवर फडफडणारे शुभ्र पांढरे शीड,
सागरावरच्या गूढ गडद धुक्याला कापत जाणारा संधीप्रकाश.
मला पुन्हा जायलाच हवं, समुद्रात खोल खोल, बोलावतेय प्रत्येक लाट
वाऱ्याचा तो पुकारा, अगदी आतून आलेला पुकारा, नाहीच टाळता येणार आता;
शुभ्र नभांनी गच्च भरलेला वादळी दिवस हवाय फक्त,
फेसाळलेल्या फुटणाऱ्या लाटांचे तुषार, सीगलचा आर्त पुकारा.
मला गेलच पाहिजे समुद्रात खोल खोल, त्या वेड्या दर्यावर्दीसारखं,
उजेडाच्या तिरिपीसारख्या त्या, गील आणि व्हेलच्या वाटेवरून;
आठवणींच्या लडीतून घुसत, हास्याच्या धबधब्यातून वाट काढत,
आणि शांत, सुमधुर स्वप्नात हरवून जायचय, ती गूढ गप संपायच्या आत!
---
(https://www.poetryfoundation.org/poems/54932/sea-fever-56d235e0d871e)
वर वर एकदा वाचली. तालबद्ध
वर वर एकदा वाचली. तालबद्ध वाटली. चित्रंप्रतिमा स्पष्ट आहेत. सुरेख चित्र, कुंचल्याचे फटकारे असावेत तसे थोडक्या शब्दात उभी केलेली चित्रकविता.
मूळ कवितेसोबत नंतर पुन्हा वाचेन.
धन्यवाद आचार्य
धन्यवाद आचार्य
मला आवडला हा स्वैर अनुवाद.
मला आवडला हा स्वैर अनुवाद.
एकदम मस्त!
छान झालाय अनुवाद. ती कविताही
छान झालाय अनुवाद. ती कविताही वाचली.
अनुवाद आवडला अवल.
अनुवाद आवडला अवल.
>>>>ती गूढ गप संपायच्या आत!
गप म्हणजे काय?
सुरेख तरल अनुवाद.
सुरेख तरल अनुवाद.
लेकाचा फोटो छान.
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना
गप म्हणजे हूल, जी वास्तवातली घटना नाही ती, जी वास्तवात घडत नाही अशी घटना, अफवा, कपोलकल्पित गोष्ट.... सगळ्याचं मिश्रण
खरं तर तोच शब्द किवर्ड आहे
मूळ कवितेत लॉंग ट्रिक म्हटलय कवीने
छान लिहिली आहे. मलाही गप
छान लिहिली आहे. मलाही गप शब्दाचा अर्थ माहीत नव्हता.
: मोल्सवर्थ
: मोल्सवर्थ
हपांनी असं म्हटल्यावर
हपांनी असं म्हटल्यावर मोल्सवर्थला बोलवणं भाग पडलं
हलके घ्या हो हपा
तुमच्यावर विश्वास आहे हो.
तुमच्यावर विश्वास आहे हो. मोलस्वर्थ काकांना कशाला तेवढ्यासाठी पाचारण! मी आता गप बसतो.
अहो मी ही या निमित्ताने चेक
अहो मी ही या निमित्ताने तपासून घेतलं. बरं असतं असं अधूनमधून करणं.
मी आता गप बसतो.
मी आता गप बसतो.
>>>> मलाही गप चा हाच अर्थ माहीत होता.
ह पा
ह पा
छान आहे कविता, ही वाचली
छान आहे कविता, ही वाचली नव्हती.
कोलंबसाच्या गर्वगीताची, तसंच 'घर पाण्यावरी, बंदराला करतो ये-जा'ची आठवण येणं अपरिहार्यच होतं.
>>>and a star to steer her by
म्हणजे तिला न्याहाळणारा तारा की तिला दिशा दाखवणारा तारा?
मला - https://www
मला - https://www.poetryfoundation.org/poems/45474/o-captain-my-captain
कॅप्टन माय कॅप्टन ही कविता आठवली. फार आवडती आहे. अवल, जमलं तर हिचा अनुवाद करा. जमल्यास
सामो अगं माझं इंग्रजी फार बरं
सामो अगं माझं इंग्रजी फार बरं नाही ग, एखादी कविता भावते मग काही सुचतं इतकच. पण ही कविता जरूर वाचेन.
स्वाती, माझ्या लहानपणीची गोष्ट सांगते

खाली खेळायला जायचो, तर एके दिवशी तिथल्या उंच खांबावर एक घुबड बसलेलं. माझं लक्ष गेलं तशी ताईला म्हटलं "ते घुबड बघ माझ्याकडे बघतय." ताईने टप्पू दिला अन म्हणाली "वेडे, तू त्याच्याकडे बघतेयस म्हणून तुला ते तुझ्याकडे बघतय असं वाटतय."
सो आपलाच नजरियाँ
(No subject)
मला वाटतं stare आणि steer
मला वाटतं stare आणि steer मध्ये गडबड झालीये.
steering हा शब्द नौकाप्रवासात महत्त्वाचा आहे (आता तो कार्सच्या संदर्भातही आपण वापरतो). नौका चालत असताना तिला दिशा देणे असा याचा अर्थ. पूर्वीच्या काळी समुद्रावर ( दिशा ठरवण्यासाठी आजूबाजूला काहीही संदर्भ नसताना) नावेची दिशा तार्यांवरून ठरवली जात असे. म्हणून तारा आणि steering यांची घट्ट सांगड आहे आणि त्याचा संदर्भ कवितेत आला आहे.
अवांतर
to steer / steering वरून अनेक शब्दप्रयोग, वाक्प्रचार आहेत. उदा. steer ahead, steer clear, steer toward (something). मराठीतही सुकाणु सांभाळणे असं म्हणतात.
मामी, म्हणून तर "तिलाच"
मामी, म्हणून तर "तिलाच" न्याहाळणारा म्हटलं न
होडीचं शीड अन सुकाणू हेच तर मुख्य. अर्थात तराफाही
मामींचा मुद्दा बरोब र आहे.
मामींचा मुद्दा बरोब र आहे. न्याहाळणारा तारा असू शकतो. पण मेनली सेलिन्ग मध्ये धृव तारा/ नॉर्थ स्टार वर नजर ठेवून बोटीची दिशा बरोबर की चूक ते ठरते. मग त्या प्रमाणे कोर्स करेक्षन करतात. स्टीअर इज करेक्ट.
संगतीला हवीय उंच शिडाची होडी अन तिलाच न्याहाळणारा एक तारा;>> हे तिला दिशा दाखवणारा तेजस्वी तारा असे जास्त संयुक्तिक वा टते आहे.