भाषा (२) : शब्दवेध व शब्दरंग

Submitted by कुमार१ on 31 March, 2023 - 21:53

भाग १ इथे : https://www.maayboli.com/node/78349
......................................................................................................................
दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पहिल्या भागाची पृष्ठसंख्या बरीच वाढल्याने नवा भाग काढत आहे.
सर्व नव्याजुन्या वाचकांचे आणि प्रतिसादकांचे स्वागत !

नव्या वाचकांसाठी सूचना :
१. या भागात शक्यतो मराठी आणि अन्य मूळ भारतीय भाषांबद्दल लिहावे.
२. इंग्लिश आणि अन्य परदेशी भाषांमधील रंजक मुद्दे लिहिण्यासाठी हा धागा उपलब्ध आहे (https://www.maayboli.com/node/62893).

अर्थात ही विभागणी ढोबळमानाने आहे ;चर्चेच्या दरम्यान आंतरभाषिकता येऊ शकते.
सुस्वागतम !

येऊद्या भाषेविषयी काहीही..

अपभ्रंश, अर्थभ्रंश.. .. बहुरंगी आणि बहुढंगी शब्दप्रयोग.. आणि बरंच काही रंजन ..........

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

“एकभुक्त” >>>
आणि ते एकच जेवण दिवसभर उपास करून थेट रात्री घेतले तर झाले 'नक्त'
[सं. नक्तं = रात्र]

आणि ते एकच जेवण दिवसभर उपास करून थेट रात्री घेतले तर झाले 'नक्त'. >> वा. हे मस्त. आई एक प्रकारचं मूगाचं वरण करत असे आणि त्या वरणाला 'नक्त्याचं वरण' म्हणत असे. रात्रीच्या जेवणासाठी पचायला हलकं असं ते असावं. आईला रेसिपी विचारते.

नक्त
नक्त्याचं वरण - बेस्ट.

Net Asset Value ला “नक्त मूल्य” असेही वाचलेय. बरोबर आहे का की ज़बरदस्तीचे भाषांतर आहे ?

बरोबर !
नक्त चे २ अर्थ :

१. (सं) न० संध्याकाळपर्यंतचा उपास.
२ (फा.) वि० रोख पैसा, नगद.

सुरेख चर्चा.
रामरक्षेतही ' सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तंचरांतकम्' असे रामाचे वर्णन आहे. 'नक्तचर' म्हणजे 'निशाचर' किंवा आताच्या काळात 'नाईट लाईफ' असणारे. कुठंकुठं 'नक्तं' आणि 'चरांतकम्' वेगवेगळं लिहिलंय पण आम्ही असेच म्हणायचो.

नक्त्याचं वरण - बेस्ट.
प्रोटोइंडोयुरोपियन मूळ >> होय, रोचक ! >>>> +१

अनिंद्य , यांच्या नक्त मूल्य वरून 'निक्का माल' आठवलं, नक्तचाच अपभ्रंश असावा.

Oh! मी पण 'नक्तं' आणि 'चरांतकम्' वेगवेगळं म्हणायचो. पण 'नक्तचरांतकम्' मेक्स सेन्स. (अनुस्वार वगळून)

नक्त्याचं वरण - बेस्ट. >> +१

शब्दसागर[सम्पादन]नक्त ^१ संज्ञा पुं॰ [सं॰]

१. वह समय जब दिन केवल एक मुहूर्त ही रह गया हो । बिलकुल संध्या का समय ।

२. रात रात्रि ।

३. एक प्रकार का व्रत जो अगहन महीने के शुक्ल पक्ष की प्रतिपदा को किया जाता है । विशेष—इसमें दिन से समय बिलकुल भोजन नहीं किया जाताः केवल रात को तारे देखकर भोजन किया जाता है । किसी किसी के मत से इस व्रत में ठीक संध्या के समय, जब दिन केवल मुहूर्त भर रह गया हो, भोजन करना चाहिए । यह व्रत प्रायः यति और विधवाएँ करती है । इस व्रत में रात के समय विश्णु की पूजा भी की जाती है ।

४. शिव ।

५. राजा पृथु के पुत्र का नाम ।

नक्त ^२ वि॰ लज्जित । जो शरमा गया हो ।

तर अशा तर्‍हेने नक्त्याच्या वरणाला सत्राशेसाठ विघ्नं न येता त्याची रेसिपी आली आहे.

आमची आई मुगाचं वरण अथवा मोड आणलेल्या मुगाचं बिरडं या पद्धतीनं अधूनमधून करत असे. तिनं सांगितलेल्या माहितीनुसार तिची आई म्हणजे माझी आजी या रेसिपीनं अधिक महिन्यात हे वरण / बिरडं करत असे.

आईला आता वयोमानामुळे सगळंच लख्खं आठवत नाहीये. पण जे आठवलं त्यानुसार .....

अधिक महिन्यात आजी हे व्रत घ्यायची. त्यात अधिक महिनाभर एकच धान्य खायचं असा नेम असे. दिवसभर उपास करायचा आणि सुर्यास्ताआधी जेवायचं. एकाच धान्याचा एखादा प्रकार रांधून तोच खायचा. हा प्रकार रांधताना हळद, तिखट, कांदा, लसूण व्यर्ज्य.

आता आईनं स्वतः हे कधी केलं नसल्याने तिच्या आठवणी खूपच जुन्या आहेत. आजी महिनाभर व्रत करायची की आठवड्याच्या एखाद्या दिवशी हे तिला आता आठवत नाही. ही स्पेशल प्रकार चपाती, भात आणि इतर पदार्थ उदा. भाज्या वगैरेंबरोबर खायचा की फक्त तेवढाच खायचा ते आठवत नाही. कांदा लसूण मात्र फक्त या स्पेशल पदार्थातच नसे आणि घरातील बाकी मंडळींना नेहमीसारखंच जेवण असे. ते आजी खायची का ते ही माहित नाही. अधिक महिन्यात सूर्यास्ताआधी सर्व जेवण तयार होत असल्याने आई ऑफिसमधून आल्या आल्या गरमागरम जेवण जेवायला मिळायचं हे सर्वात जास्त सुख होतं. (ही सर्व अतिरिक्त माहिती आहे पण एकत्रित असावी म्हणून लिहून ठेवत आहे.)

तर रेसिपी : नक्त्याचं वरण / बिरडं
मुगाची डाळ शिजवून किंवा मोड आलेले मुग सोलून घेणे. तुपावर जिर्‍याची फोडणी त्यात कढिपत्ता, हिंग, मुगाचं जे काय आहे ते, आंबोशी किंवा आमसूल, पाणी, ओला नारळ खवलेला, मीठ, साखर आणि तिखटाऐवजी मीरपूड. फारच चविष्ट प्रकार साधला जातो.

या धाग्यामुळे हा प्रकार मलाच अनेक वर्षांनी आठवला. आता करून आईलाही खायला घालेन.

नक्त्याचं वरण>>
झकास आहे. आवडले !
...
एकंदरीत....
"नक्तायन" छान रंगले... Happy

नक्त वरुन नुकतेच आठवले की

ग्रामीण भागात काही वर्षांपूर्वीपर्यंत गावजेवणात गोड म्हणजे हमखास बुंदी (किंवा बुंदीचे लाडू) असत आणि त्याला म्हणत

“नुक्ती”

उत्तम !
नवा मुद्दा घेतो..

वादग्रस्त आणि विवादास्पद या दोन शब्दांत काही सूक्ष्म फरक आहे का ?
का समानार्थीच ?

वादग्रस्त >> ज्या गोष्टीला ऑलरेडी वादाने ग्रासले आहे. इथे वाद ठामपणे आहेच.
विवादास्पद >> ज्या गोष्टीवर विवाद उत्पन्न होऊ शकतो. इथे वाद होईलच असे नाही, पण शक्यता आहे.

आस्पद = स्थान >> अच्छा. हे माहीत नव्हतं. म्हणजे जिथे 'विवादाला जागा आहे' असं म्हणजे विवादास्पद, बरोबर ना?

मस्त चर्चा. +१
>>आस्पद = स्थान >>> माहीत नव्हते.

संशयास्पद, कौतुकास्पद हे सुद्धा संशयाला जागा आहे , कौतुकाला जागा आहे अशा अर्थाने वापरले जातात की

होय.
....................................................................................................
पंचम” चे अनेक अर्थ आपल्याला माहित आहेत. परंतु, त्याचा एक लाक्षणिक अर्थ भन्नाट म्हणजे अगदी भन्नाट आहे..
सांगताय ?

कुठेही शोध घेण्याआधी थोडा विचार करून तर बघा..
नाही सुचले तर उत्तर खाली देतोच आहे .. Happy
..
..
..
..
तंबाखू !!!

( असे का बरे म्हणत असावेत ?)

अच्छा !
म्हणजे हे हिंदी वाक्प्रचार आहेत का ?

Pages