Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23
चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नाळ व आत्मपॅम्प्लेट
नाळ व आत्मपॅम्प्लेट अमेरिकेतल्या माबोकरांनी कुठे बघितला सांगा. लोक धडाधड बघितला असं सांगत आहेत, मीच एकटी राहिले आहे बहुतेक.
ऋषिकेश जोशी आवडतो. वैभव
ऋषिकेश जोशी आवडतो. वैभव तत्त्ववादी अजिबात आवडत नाही. तत्त्ववादी हे आडनाव कि व्यवसाय असा त्याचा मुद्राभिनय वाटतो.
तत्त्ववादी नेहमी आक्रमक
तत्त्ववादी नेहमी आक्रमक देहबोलीत वावरतो असं वाटतं, संयत नाही.
हिरो मटेरिअल नाही.
हिरो मटेरिअल नाही.
आचार्य, दुष्काळ पडलाय इथं
आचार्य, दुष्काळ पडलाय इथं देखण्या हिरोंचा आणि तुम्ही वळवाच्या पावसाला छत्री धरताय.
गश्मीर, अनिकेत विश्वासराव असे
गश्मीर, अनिकेत विश्वासराव असे आहे कि मराठीच्या बजेटमधे बसणारे देखणेपण. अगदीच विजयकांत सारखे बिग बजेट देखणे असावेत असं पण नाही.
अस्मिता
अस्मिता
कुणाचंच काम खटकत नाही पण मजा येत नाही >>> ही रड बऱ्याच पिक्चरांची आहे हल्ली असं वाटतं. त्यात भाषिक भेदभाव नाही.
अस्मिता, आयपी टिव्हीवर दोन्ही
अस्मिता, आयपी टिव्हीवर दोन्ही आहेत पण नाळचा साऊंड अजिबात चांगला नाहीये. बघ तुला जमतोय का.
सीतारामचं शुटींग लंडनला झालंआ? मागच्या वेळी प्राजक्ता माळी लंडनला जाऊन आल्यावर नाव ठेवत देशभक्तीपर प्रवचनं देत होती इन्स्टावर. मग जाऊ नये परदेशात शूटींगला. पिक्चरच नाकारावा. प्रचंड चीड आली तिचा खोटेपणा पाहून.
थॅंक्स सायो. आयपीटीव्ही नाही
थॅंक्स सायो. आयपीटीव्ही नाहीये , 'शंभर ओटीटी तरी शोधती' गत झाली आहे. हो, मलाही ती 'देशभक्ती' कदाचित त्या शूटिंग दरम्यान उफाळून आली असेल असं बघताना वाटलं.
रड बऱ्याच पिक्चरांची आहे हल्ली असं वाटतं.+१
विजयकांत
विजयकांत पहा सांगुन फसवणुक
विजयकांत पहा सांगुन फसवणुक केलीत रघुआचार्य.
बारा ओटीटीचा अर्क, भन्नाट आहे
बारा ओटीटीचा अर्क, भन्नाट आहे हे अस्मिता
Btw तत्ववादी कधी कधी आवडतो मला.
आत्मपॅम्प्लेट झी-५
आत्मपॅम्प्लेट झी-५
अगदीच विजयकांत सारखे बिग बजेट देखणे असावेत असं पण नाही. >>> मला तमिळ शिकावे असे लाइफ मधे दोनतीन वेळा वाटले आहे. त्यातले एक म्हणजे "साधारण मनुष्याला करंटमुळे शॉक लागतो. पण मी नरसिंहा आहे. मला करंट लागला तर करंटलाच शॉक लागतो" हे वाक्य सबटायटल्स न वाचता समजून घेण्याकरता होते.
बारा ओटीटीचा अर्क >>>
पण मी नरसिंहा आहे. मला करंट
पण मी नरसिंहा आहे. मला करंट लागला तर करंटलाच शॉक लागतो" >>>>> अगागा
वळवाच्या पावसाला छत्री >>>
वळवाच्या पावसाला छत्री >>>
मला करंट लागला तर करंटलाच शॉक लागतो >>>
बारा ओटीटीचा अर्क >>>> हे रत्न मिसलं होतं. बाराचे शंभर केलेत का वर ?
रड बऱ्याच पिक्चरांची आहे हल्ली असं वाटतं.+१
“ वळवाच्या पावसाला छत्री”,
“ वळवाच्या पावसाला छत्री”,
“मला करंट लागला तर करंटलाच शॉक लागतो”
“बारा ओटीटीचा अर्क” -
>>> मराठी कलाकार 'आम्ही काय
>>> मराठी कलाकार 'आम्ही काय भारी करतोय बघा/आता तुमचे डोळेच दिपवून टाकतो की नाही बघा'- हा जो आव आणतात त्याचं 'बारा ओटीटींचा अर्क' काढलेल्या प्रेक्षकांना काय अप्रूप वाटणारे..! हे नेहमी मराठीच्या 'मानाने' सिनेमे काढतात आणि स्पर्धा विसरतात. प्रेक्षक कशाला सबसिडी देईल, तो काही 'युके' नाही.
टोटली!
अस्मिता, पर्फेक्टली कॅप्चर्ड
अस्मिता, पर्फेक्टली कॅप्चर्ड
हे खरं आहे. त्या वेलिंगकर
हे खरं आहे. त्या वेलिंगकर मध्ये 4 वेळा एकच सीन रिपीट केला तेव्हा वैताग आला होता. हे म्हणजे आम्हाला उत्तरं आली नाही की आम्ही खूप जास्तीचे शब्द लिहून जागा भरतो 'actually','referring to' 'in accordance with' 'the difference is listed below' तसे.
तरीही एखाद्या पिक्चर चा ट्रेलर आवडला तर जाऊन बघतो.सदा परांजपे आवडला थिएटर ला बघून.वाळवी पण.आत्मपापलेट ला स्लॉट अजिबात सोयीचे नसल्याने तो ott वर पाहिला.
मराठी कलाकार 'आम्ही काय भारी
मराठी कलाकार 'आम्ही काय भारी करतोय बघा/आता तुमचे डोळेच दिपवून टाकतो की नाही बघा'- हा जो आव आणतात
>>>> अगदी अगदी
प्रेक्षक कशाला सबसिडी देईल,
प्रेक्षक कशाला सबसिडी देईल, तो काही 'युके' नाही. >>
तीन अडकुन पाहिला.. एकुण
तीन अडकुन पाहिला.. एकुण प्रकार प्रचंड नविनोदी आहे....
पहिला अर्धा तास .. आम्ही तीन मित्र (जे अजिबात एका वयाचे वाटत नाहीत) किती कुल आहोत हे तुम्ही बघाच मधे जातो...
मग त्यातला एक म्हणे काउंटी क्रिकेट खेळायला जातो ईंग्लंडला (आता जातो, आले देवाजीच्या मनात... घेतला असेल त्याला यॉर्कशायर कडुन, आपल्याला काय माहित...आता तो सचिन तेंडुलकर का कोणसा नाही खेळला काउंटी)... दुसर्याला फुटबॉलचे प्रचंड प्रेम असते म्हणुन त्याच्या खोलीत रोनाल्डोचे पोस्टर अन लंडनला जातानाही हातात फुटबॉल असतो... तिसरा असतो तो अतिच कुल असतो... तो कुठलेही वाक्य स्पष्ट बोलत असतो अन कोणीही मारामार्या वगैरे करत असेल तरी खाणे संपविल्याशिवाय हलत नसतो....
मग अगदीच नविनोदी प्रकार आहेत.. म्हणजे परदेशात पोलिसांनी पकडाल्यवर पण "कुल आहोत ना आम्ही.. मग आमची विनोदबुद्धी तेव्हाही शाबुतच राहणार ना.. आम्ही मग लंडनच्या पोलिसांसमोर द्वयर्थी मराठी जोक्सा मारणार" हे आपण प्रेक्षकांनी समजुन घ्यायचं...
च्यायला आम्हाला ईथे सगळी कागदपत्रे असताना पण ईमिग्रेशन काउंटरवर ईतरांपेक्षा २०-३० सेकंद जास्ती लागायला लागली तरी भिती वाटते... पण आम्ही कुल कुठे आहोत
अन मंग सगळ मंडळ एकदमच सुधारते.. अन जगभर शाखा असलेले काहीतरी "अहिंसावादी रिव्हेंज मंडळ" स्थापन करतात.... एकदम मराठी माणसाची गरुडझेप.... सिनेमा संपला....
असो, एकुण मराठि विनोदी सिनेमे म्हणजे बहुधा लक्ष्याच नशिबात आहे असे वाटते....
हो, हृषिकेश जोशीची मित्र
हो, हृषिकेश जोशीची मित्र म्हणे वर मुलाखत बघून फार भारी असेल असं वाटलं होतं. पूर्ण भ्रमनिरास झाला. मी वीस एक मिनिटात बंद केला.
हो, हृषिकेश जोशीची मित्र
हो, हृषिकेश जोशीची मित्र म्हणे वर मुलाखत बघून>> हाइप्ड आहे तो मैने बोला था.
तभी सुन्या नई ना! अब भोग्या
तभी सुन्या नई ना! अब भोग्या अपने कर्मों की फळं!
मराठी कलाकार 'आम्ही काय भारी
मराठी कलाकार 'आम्ही काय भारी करतोय बघा/आता तुमचे डोळेच दिपवून टाकतो की नाही बघा'- हा जो आव आणतात त्याचं 'बारा ओटीटींचा अर्क' काढलेल्या प्रेक्षकांना काय अप्रूप वाटणारे..! हे नेहमी मराठीच्या 'मानाने' सिनेमे काढतात आणि स्पर्धा विसरतात. प्रेक्षक कशाला सबसिडी देईल, तो काही 'युके' नाही. Happy
>> पर्फेक्ट !!
हृषिकेश जोशी ने निराश केले
हृषिकेश जोशी ने निराश केले
तत्त्ववादी आधी आवडत नव्हता पण हन्टर मधे खुप मस्त काअल केलय...
हृषिकेश जोशीची मुलाखत
हृषिकेश जोशीची मुलाखत बघितल्याने आणि तो जनरली आवडत असल्याने बर्याच अपेक्षा होत्या. अगदीच भ्रमनिरास झाला. बंदच केला.
तीन अडकून सीताराम.... च्यायला
तीन अडकून सीताराम.... च्यायला मला तर हे नावच झेपले नाही... महाबकवास... त्यांना शूटिन्ग करताना कळत नाही का हे जे आपण करतोय ते बकवास आहे....
कुणालाच कळत नाही सगळं बकवास
कुणालाच कळत नाही सगळं बकवास आहे हे. स्टोरी लिहिणार्यांनाही नाही. सगळ्यांना भारीच काही चालू आहे असा गैस असतो.
तीन अडकून पेक्षा जवान बरा
तीन अडकून पेक्षा जवान बरा असे म्हणायची वेळ आली
“ वळवाच्या पावसाला छत्री”, >> अस्मिता च्या समुद्रमंथनातून आलेले हे रत्न आहे
Pages