फटाकेमुक्त दिवाळी

Submitted by प्रकाश घाटपांडे on 26 October, 2013 - 08:12

दिवाळी हा खरा तर दिपोत्सव. त्यात हे फटाके कुठून घुसले काय समजत नाही.पुर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोला सारखी वाद्ये वाजवली जायची.कदाचित दिवाळी सारख्या मंगल सणामधे दुष्ट शक्ती चा वावर नको म्हणुन फटाके वाजवण्याची प्रथा आली असावी.

फटाकेनिर्मितीत वापरले जाणा-या रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात. फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते.त्यामुळे श्वसानाचे आजार वाढतात. ध्वनीप्रदूषणाची पातळीही वाढते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवण क्षमता कमी होते.फटाके फोडल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी वायू वातावरणात पसरतात. ओझोनचा थर पातळ होतो.एकदा मराठी विज्ञान परिषदेचा फटाक्यामागील विज्ञान या कार्यक्रमात फटाक्यात वापरल्या गेलेल्या रसायनांबदद्ल स्लाईड शो कार्यक्रम दाखवला होता.
कॉपर मुळे श्वसननलिकेत त्रास कॅडमियम मुळे किडनीला धोका आणि अ‍ॅनेमिया.शिशाचा मज्जासंस्थेवर परिणाम अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.तपशीलात थोडाफार फरक असू शकतो. अशा प्रदुषण करणार्‍या फटाक्यांपासून मुक्त राहून दिवाळी साजरी करता येणार नाही का? नक्कीच येईल. फटाक्या शिवाय दिवाळी ही कल्पनाच काहींना करवत नाही. कारण दिवाळी आणी फटाके यांची संलग्नता मेंदुमधे ठामपणे कोरली गेली आहे.पिढ्यान पिढ्या ती संक्रमित होत गेली आहे.कालसुसंगत नसलेल्या अनेक प्रथा परंपरा आज पाळल्या जातात.खर तर कालबाह्य रुढी परंपरा या एक प्रकारच्या अंधश्रद्धाच आहेत.मनाला वाटणार्‍या असुरक्षिततेमुळे ते मोडण्याचे धाडस आज बर्‍याच लोकांना होत नाही.अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ ही एक व्यापक समाज परिवर्तनाची चळवळ आहे.त्यामुळे अंनिस फटाकेमुक्त दिवाळीचे अभियान नेहमी राबवते. विद्यार्थ्यांमधे ही पर्यावरण जागृतीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे त्यांना फटाके मुक्त दिवाळीचे महत्व पटू लागले आहे.काही सुसंस्कृत पालक ही आपल्या मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम पटवून त्यापासून परावृत्त करु लागले आहेत. डॊ नरेंद्र दाभोलकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काही युवकांनी व विद्यार्थ्यांनी स्वत:हून फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे ठरवले आहे.पाहू या काय होते ते!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तडफडून मेले असल्या व्हॉअ‍ॅ अंकल आर्ग्युमेंटचा फॉरवर्ड करण्याशिवाय काही उपयोग नाही.>>>>>> >>>तुमच्या प्रतिक्रिया या उद्विग्नतेतून आलेल्या वाटल्या. एखादे भावनिक अपिल कोणाला विचार करायला प्रवृत्त करते तर कुणावर त्याचा काहीच परिणाम होत नाही. असे माझे व्यक्तिगत मत आहे. असो.

प्रदूषणाची काळजी करणाऱ्या सगळ्यांची महाग्रू ती हाऊ डेअर यू वाली ग्रेटा थनबर्ग असावी .
बर त्या ग्रेटा च्या नाकावर टिच्चून तिच्याच देशातील फुटबॉल प्रेमी ग्रेटर स्काय शॉट्स वाजवून आनंद साजरा करतात .
काल सेमी फायनल जिंकल्या नंतर संपूर्ण भारतात बऱ्यापैकी पुन्हा फटाके वाजवून प्रदूषणात भर पाडली गेली .
आमच्या भागात देखील भरपूर वाजवले गेले , त्या नंतर अक्षरशः खिडक्या बंद कराव्या लागल्या इतकी हवा प्रदूषित होती.
फाटक्या मुळे हवेचे प्रदूषण वाढते , फुफ्सांचे कॅन्सर होऊ शकतात या साठी फटाक्यांचे उत्पादन बंद करणे हाच एकमेव उपाय पण कोणताही देश अशी कारवाई करू शकलेला नाही .
भारतात तर फटाके आणि हिंदू धर्माची न तुटणारी जोडी आहे , ती जोडी कोणतेही सरकार तोडण्याची हिम्मत करू शकणार नाही .
बर प्रदूषणाची काळजी सर्वांनाच असते फटका प्रेमी जी हवा फुफसात ओढणार तीच हवा फटाका विरोधक देखील ओढणार आहे , मग आपल्या महाराष्ट्रात फटाक्यामुळे प्रदूषण वाढते पण दिवाळीच्या आठ दिवस अगोदरच दिल्ली मधील हवा खतरनाक लेव्हल ला पोहोचली होती .
कारण काय तर पंजाब , हरियाणा ,उत्तर प्रदेशातील शेतकरी भाताचे उत्पादन काढल्या नंतर शिल्लक राहिलेले भातवान जमीन भाजून काढण्यासाठी सर्रास पेटवून देतात.
भात नंतर गहू चे उत्पादन घेतील त्यावेळी सुद्धा शिल्लक राहिलेला कचरा कोंडा जाळला जाईल.
दर वर्षी दिल्ली मधील हवा प्रदूषित होते आणि तेथील शाळांना देखील सुट्ट्या देयाची वेळ तेथील सरकार वर येते .
थोडक्यात काय तर दिल्ली मधील प्रदुष्णसाठी मुख्यत्वे
जबाबदार असलेल्या आप संचालित पंजाब विरोधात बोलावे लागू नये आणि केजरी प्रेमापोटी बहुतांश लिब्ब्रुज गप्प बसले होते .पण जशी दिवाळी आली तसे सगळे पोपटा सारखे बोलू लागले .
आहे की नाही चमत्कार ?

या बाबत अंनिस ची व सनातन संस्थेची भुमिका यावर एकमत आहे. >> +११११११

सनातन संस्थेद्वारे दरवर्षी दिवाळीचे कंदील बनवले जातात, ज्यावर विविध संदेश लिहिलेले असतात. २-३ वर्षांपूर्वीच्या कंदिलांवर 'फटाक्यांवर पैसे खर्च करण्यापेक्षा ते धन राष्ट्रकार्याला द्या' अशा अर्थाचा संदेश होता.
-------------------------------------------------------------------------
फटाक्यांचे समर्थन करणाऱ्यांसाठी :
फटाके.jpg

मी अजिबात फटाके समर्थन करत नाही पण वरचे उदाहरण फारच गंडलेलं आहे

या न्यायाने मग तेलाचा दिवा लावणेही बंद करावं लागेल कारण दहा रुपये तरी त्याला लागत असतील आणि कुणीही सुज्ञ माणूस दहा रुपयांची नोट जाळणार नाही

धन राष्ट्रकार्याला द्या' अशा अर्थाचा संदेश होता.

खूप लोकांची इच्छा असते राष्ट्र कार्यासाठी आर्थिक मदत द्यावी.

पण स्वच्छ,प्रामाणिक पने राष्ट्रहित चे काम करणाऱ्या संस्था च लोकांना सापडत नाहीत.

झोलर संघटना च खूप आहेत
-------------------------------------------------------

घाटपांडे sir ना फक्त .
फटाके मुक्त दिवाळी हवी आहे.
फटाके मुक्त भारत नको आहे.

पण आम्हाला फटाके मुक्त भारत हवा आहे.
घाटपांडे sir ना..
Dj, डॉब्ली मुक्त गणेश उत्सव हवा आहे .
पण आम्हाला dj, डॉल्बी मुक्त भारत हवा आहे.

हे दिवाळी,आणि गणेश ustav ह्या वर च आडून आहेत.

हेतू दृष्ट आहे

ह्ममम
दिवाळीत फटाके पूर्ण बंदी आणि लग्नात किंवा निवडणुका जिंकल्यावर वाजवायचे असे केले तर पब्लिक याला कशी मान्य होईल?
कायदा करायचे झाल्यास तो समान हवा...

दिवाळी किंवा गणेश उत्सव हे हिंदू न चे सण आहेत.
दिवाळी मध्ये फटाके वाजवले जातात प्रदूषण होते अगदी योग्य आहे.

पण फटाके वाजवतो कोण मुल.
प्रौढ व्यक्ती किंवा मध्यम वयीन वाजवत नाहीत
घरातील आजोबा बुध्दी पाजळत असतात त्यांचेच नातू फटाके वाजवत असतात
घाटपांडे च्या घरात पण असेच घडत असणार.
हल्ली एक च मुल असते त्या मुळे पालक फालतू लाड पोरांचे करत असतात.
असंख्य आजार मुला न मध्ये निर्माण होण्याचे हे कारण आहे.
इथे धर्माचा काही संबंध नाही.

.dj आणि डॉल्बी सर्व जाती धर्म, ह्या मधील लोक वापरतात .
आणि dj डॉल्बी ची आवड असणारी मूर्ख लोक देशाच्या काहीच कामाची नसतात.
सरसकट पकडा आणि फाशी वर चढवा.
ही आमची पण मागणी आहे.
Dj, आणि डॉल्बी फक्त हिंदूच्या सणात च वापरले जातात.
हा समज महामूर्ख पणाचा आहे

डॉल्बी/भोंगे/ढोल- ध्वनीप्रदूषण
फटाके- ध्वनी + वायुप्रदूषण
दोन्ही आरोग्याला घातक हा साधा विचार आहे. इथे धर्माचा विचार नाही

घरातील आजोबा बुध्दी पाजळत असतात त्यांचेच नातू फटाके वाजवत असतात
घाटपांडे च्या घरात पण असेच घडत असणार.>> असे कोणकोण आहेत, ज्यांनी फटाक्याना विरोध केला आणि त्यांच्या मुला नातवांनी फटाके वाजवले?
प्रांजळपणे सांगावे.

घाटपांडे च्या घरात पण असेच घडत असणार.>> असे कोणकोण आहेत, ज्यांनी फटाक्याना विरोध केला आणि त्यांच्या मुला नातवांनी फटाके वाजवले?
प्रांजळपणे सांगावे.>>>>>>>
एकदम प्रामाणिकपणे ......
गेली कित्तेक वर्ष मी देखील पर्यावरण वादी होतो म्हणजे आत्ता देखील आहे.
मुलांना आवाजाच्या प्रदूषण चे तोटे सांगीतल्यामूळे ( घराच्या आजूबाजूच्या झाडात बऱ्याच पक्षांची घरटी आहेत ) दहा पंधरा वर्षांपासून आवाजाचे फटाके लक्ष्मी बॉम्ब वैगरे वाजवणे बंद केले आहे , भुईचक्रे पाऊस वाजवत होते .

पण या वर्षी सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे मुलं चिडली हो , मग काय दे दाणादाण स्काय शॉट्स !

घडत असणार.>> असे कोणकोण आहेत, ज्यांनी फटाक्याना विरोध केला आणि त्यांच्या मुला नातवांनी फटाके वाजवले?
प्रांजळपणे सांगावे.>>>>>>>

सरासरी प्रतेक घरात हीच अवस्था आहे.
फटाके विरोध करणारे समजमध्यमावर ९०% तरी आहेत.
ह्याच धाग्यावर 90% वर आहेत.
मग फटाके वाजवत कोण?
Alien येतात काय फटाके वाजवणे साठी

ट्विटर फेम ,सर्च च कायदे कानुन ,नियम, समाजस्वास्थ्य, राज्य घटना,भारताचा इतिहास, भारतीय पुरात्त्व ज्ञान कसे खोटे आहे.
आयुर्वेद कसा खोटा आहे
इत्यादी इत्यादी .खूप.
ह्याचे ज्ञान असणाऱ्या व्यक्ती ल सर्वोच्च न्यायालय च निर्णय माहीत नाही.

आश्चर्य आहे

सर्वज्ञ सर, ज्यांना प्रश्न विचारलाय त्यांना उत्तर देऊ द्या. त्यांनी तुम्हांला वकील नेमलंय का? By the way तुम्हीसुद्धा त्यांच्यासारखेच ट्रोल आणि वैरभाव बाळगणारे होतं आहात.
त्या आदेशात मुलांनी चिडण्यासारखं नेमकं काय आहे ते मला समजून घ्यायचं आहे.

डॉल्बी/भोंगे/ढोल- ध्वनीप्रदूषण
फटाके- ध्वनी + वायुप्रदूषण
दोन्ही आरोग्याला घातक हा साधा विचार आहे. इथे धर्माचा विचार नाही>>>>>>
तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे !
पण काकड आरती ला सकाळी पाच वाजता चालू होणारे भोंग्या विरोधात ( याला माझा देखील विरोध आहे ) आणि फटाक्यांच्या विरोधात कोकलणारे मशिदीवरील दिवसातून पाच वेळ कोकलनाऱ्या भोंगे विरोधात मौन बाळगून असतात त्याच काय ?
मूळात प्रॉब्लेम असा आहे की देशभरातील चवन्नी छाप लिब्बूना फक्त हिंदू धर्मा विरोधात बोलताना जरा जास्तच धार लाऊन व्यक्त होतात आणि मुस्लिमांच्या सणाच्या वेळी प्रत्येक सणावेळी बिळात जाऊन बसतात हे कित्तेक वेळा दिसून आले आहे .

हे लिब्रू स्वतः सर्व नियम धाब्यावर बसवून व्यक्ती स्वतंत्र,लोकशाही नी दिलेले अधिकार ,ह्याचे भांडवल करून खूप नंगानाच करतात.
त्यांना विरोध केला की .
व्यक्ती स्वतंत्र,अभिव्यक्ती स्वतंत्र,घटनेने दिलेले अधिकार काही पण जे सोयीचे आहे तितकेच घेवून स्वतःच्या नंगानाच चे समर्थन करतात

काल फटाके वाजवत असताना अपघात झाला. एकाने रॉकेट लावला तो वर न जाता समांतर उडाला आणि एका बघणाऱ्याच्या छातीत घुसला. सगळे त्याच्याजवळ गेले आणि छातीत घुसलेला रॉकेट काढणार इतक्यात मी त्यांना बोललो थांबा. पिक्चरमध्ये दाखवतात छातीत बाण वैगरे घुसला आणि तो काढला की माणूस मरतो तसंच रॉकेट काढलात तर हा पण जाईल. सगळ्यांना ते पटलं आणि रॉकेट तसाच ठेवला. हळूहळू त्या माणसाला बरं वाटायला लागलं आणि आज तो ठणठणीत बरा झालाय पण छातीत रॉकेट तसाच आहे.

रॉकेट कधीही मोकळ्या मैदानावर मध्यभागीच लावावे. समांतर नाही गेले तरी तिरपे जातेच. बरेच आगी या रॉकेट मुळेच लागतात. पण जास्त आकर्षण देखील याचेच असते.

मजेशीर आहे.
पणतुम्ही हा व्हिडिओ गंमत म्हणून शेअर केला आहे असे लिहा.
अन्यथा हे बघून कोणी असे केले तर कोण जबाबदार वगैरे आरोप झेलायला तयार राहा.

विश्वचषक सामन्यातील अंतिम फेरी भारत हरल्यामुळे आणि फटाके न वाजल्यामुळे बऱ्याच जणांचा जीव भगुल्यात पडला असेल .

दिवाळी संपली आहे त्या मुळे तुम्ही आता फटाके वाजवू शकता.
फटाक्यांची ध्वनी आणि वायू प्रदूषण करण्याची क्षमता आता नष्ट झाली आहे.
फक्त दिवाळी मध्ये तुझ्या अस्तित्वाची जाणीव लोकांना होईल असा वर आहे फटाक्यांना

Pages