फटाकेमुक्त दिवाळी

Submitted by प्रकाश घाटपांडे on 26 October, 2013 - 08:12

दिवाळी हा खरा तर दिपोत्सव. त्यात हे फटाके कुठून घुसले काय समजत नाही.पुर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोला सारखी वाद्ये वाजवली जायची.कदाचित दिवाळी सारख्या मंगल सणामधे दुष्ट शक्ती चा वावर नको म्हणुन फटाके वाजवण्याची प्रथा आली असावी.

फटाकेनिर्मितीत वापरले जाणा-या रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात. फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते.त्यामुळे श्वसानाचे आजार वाढतात. ध्वनीप्रदूषणाची पातळीही वाढते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवण क्षमता कमी होते.फटाके फोडल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी वायू वातावरणात पसरतात. ओझोनचा थर पातळ होतो.एकदा मराठी विज्ञान परिषदेचा फटाक्यामागील विज्ञान या कार्यक्रमात फटाक्यात वापरल्या गेलेल्या रसायनांबदद्ल स्लाईड शो कार्यक्रम दाखवला होता.
कॉपर मुळे श्वसननलिकेत त्रास कॅडमियम मुळे किडनीला धोका आणि अ‍ॅनेमिया.शिशाचा मज्जासंस्थेवर परिणाम अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.तपशीलात थोडाफार फरक असू शकतो. अशा प्रदुषण करणार्‍या फटाक्यांपासून मुक्त राहून दिवाळी साजरी करता येणार नाही का? नक्कीच येईल. फटाक्या शिवाय दिवाळी ही कल्पनाच काहींना करवत नाही. कारण दिवाळी आणी फटाके यांची संलग्नता मेंदुमधे ठामपणे कोरली गेली आहे.पिढ्यान पिढ्या ती संक्रमित होत गेली आहे.कालसुसंगत नसलेल्या अनेक प्रथा परंपरा आज पाळल्या जातात.खर तर कालबाह्य रुढी परंपरा या एक प्रकारच्या अंधश्रद्धाच आहेत.मनाला वाटणार्‍या असुरक्षिततेमुळे ते मोडण्याचे धाडस आज बर्‍याच लोकांना होत नाही.अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ ही एक व्यापक समाज परिवर्तनाची चळवळ आहे.त्यामुळे अंनिस फटाकेमुक्त दिवाळीचे अभियान नेहमी राबवते. विद्यार्थ्यांमधे ही पर्यावरण जागृतीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे त्यांना फटाके मुक्त दिवाळीचे महत्व पटू लागले आहे.काही सुसंस्कृत पालक ही आपल्या मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम पटवून त्यापासून परावृत्त करु लागले आहेत. डॊ नरेंद्र दाभोलकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काही युवकांनी व विद्यार्थ्यांनी स्वत:हून फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे ठरवले आहे.पाहू या काय होते ते!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या आजूबाजूला एकही ख्रिश्चन राहत नाहीत, मशीद नाही, कुणीही माझ्या दारात बकरे कापत नाहीत, दारू पिऊन लोळत नाहीत
मी 42 वर्षांचा आहे आणि आजवर व्यक्तीगतरित्या या सगळ्याचा मला एकदाही उपद्रव झालेला नाही

माझ्या आजूबाजूला सगळे हिंदू राहतात, धार्मिक वाले, ते सण साजरा करायचा म्हणून मनमुरादपणे फटाके उडवतात, इतका की श्वास घ्यायला त्रास व्हावा, प्रचंड मोठ्या आवाजात आरत्या म्हणतात, घंटानाद करतात भल्या पहाटे
कॅनॉल मध्ये निर्माल्याचा खच टाकतात, एकाने तर अत्यंत निर्विकारपणे आदले दिवशीचा प्रसाद ओतला सगळा पाण्यात

तरीही फटाक्यांचा त्रास होत असेल तर त्याची तक्रार करताना मी या सगळ्याचा निषेध करणे सक्तीचे आहे का हो फुरोगामी?

तरच माझी तक्रार व्हॅलीड होईल का?

माझ्या आजूबाजूला सगळे हिंदू राहतात, धार्मिक वाले, ते सण साजरा करायचा म्हणून मनमुरादपणे फटाके उडवतात, इतका की श्वास घ्यायला त्रास व्हावा, प्रचंड मोठ्या आवाजात आरत्या म्हणतात, घंटानाद करतात भल्या पहाटे
कॅनॉल मध्ये निर्माल्याचा खच टाकतात, एकाने तर अत्यंत निर्विकारपणे आदले दिवशीचा प्रसाद ओतला सगळा पाण्यात
>>>>>>>>>
हिंदू लोकसंख्या जास्त असलेल्या भागातील त्रास आणि मुस्लिम लोकसंख्या जास्त असलेल्या भागातील त्रासात जास्त फरक असेल असे मला वाटत नाही .
दोन्ही धर्मातील लोक थोतांडगीरी करण्यात अव्वल आहेत .
पण राष्ट्रीय स्तरावर लिब्ब्याकडून फक्त हिंदू सण ना टार्गेट केले जाते हे सत्य आहे .

मुस्लिम लोकसंख्या जास्त असलेल्या भागातील त्रासात जास्त फरक असेल असे मला वाटत नाही .>>>

नक्कीच, पण ज्याचा त्रास होतोय त्याचीच तक्रार व्हावी
धर्म कुठला आहे ते न बघता

थिएटरमध्ये फटाके Uhoh
काय मुर्खपणा आहे हा Sad>>>>>>>
दिल्ली मधील उपहार थेटर मधील घटना लोकं कसे काय विसरू शकतात ?
फटाक्यामुळे आग लागली असती तर होलसेल मध्ये प्रेक्षक मेले नसते काय ?

मुस्लिम लोकसंख्या जास्त असलेल्या भागात दिवाळीला फटाक्यांचा धूर होतो का ? कैच्यकै.
हिंदुत्ववाद्यांना हिंदु धर्मात अभिमान वाटावे असे काही सापडत नाही, म्हणून ते कोणत्याही प्रश्नाचे उत्तर दुसर्‍याच धर्माकडे बोट दाखवून देतात. बरं, हिंदु धर्मात असलेया गोष्टीचा अभिमान एकवेळ समजू शकतो, पण फटाके मुळात चायना कडूनच आले आहेत. चायनाला घाबरून असतात ते ठीक आहे पण ..

सनातन संस्था देखील फटाक्यांच्या विरोधात आहे. त्यांची सनातन प्रभात मधील
संपादकीय भूमिका
फटाके फोडू नयेत, असा आदेश देतांना त्यांची निर्मिती, विक्री आणि साठा करण्यात येऊ नये, असा आदेशही आता देणे क्रमप्राप्त झाले आहे !
केवळ फटाक्यांमुळे प्रदूषण होते, असे नाही, तर वर्षभर विविध कारणांमुळे प्रदूषण होत असते, त्यावरही तितक्याच कठोरपणे उपाय काढून त्याची कार्यवाही होणेही आवश्यक आहे !

या बाबत अंनिस ची व सनातन संस्थेची भुमिका यावर एकमत आहे

जाई, हे व्हिडीओ पाहून या सुभाषिताची आठवण झाली
घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद्रासभरोहणम् ।
येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत्

काय माहीत कोणेत ! असला बिनडोकपणा करुन स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालत आहेत खरे .

इतके मूर्ख दिसत आहेत की यांच्याताल एकाचा जीव अथवा कोणी जायबंदी झाले तरीही फरक पडणार नाही इतराना .

इतके मूर्ख दिसत आहेत की यांच्याताल एकाचा जीव अथवा कोणी जायबंदी झाले तरीही फरक पडणार नाही इतराना>> कितीही लोकांचा जीव गेला तरी फटाके फोडणारच असा हेका धरणारे यांनाही नाही फरक पडत

दुसर्यांच्या सणाकडे बोट दाखवल्याने आपल्या सणांना झालेलं प्रदूषण कमी होणार नाही की आपल्याला आपल्याच मुलांना जेष्ठ नागरिकांना होणारा होत असलेला त्रास अजिबात कमी होणार नाही
फटाक्यांवर पूर्ण बंदी हा एकमेव आणि अत्यावश्यक उपाय आहे

जाईचा व्हिडिओ दिसला नाही. थिएटर मधला मूर्खपणाची कमाल आहे. म्हणूनच भारतात स्कॅन करुन थिएटर मध्ये पाठवत असणार. मूर्खांची कमी नाही.

म्हणूनच भारतात स्कॅन करुन थिएटर मध्ये पाठवत असणार.
>>>>>
अमेरिकेत नाही का करत? तिथे तर लोकं गन बाळगतात आणि गोळीबार सुद्धा करतात ना.. मग सुरक्षितता म्हणून स्कॅन नसते का. थिएटर किंवा मॉल वगैरे मध्ये?

धर्म बाजूला ठेवा.
शिक्षित लोकांस प्रदूषण चे महत्व कळते असा विश्वास लोकांना होता.
शिक्षण मुळे लोक शहाणी होतात असा समज होता.

पण फटाके वाजवणारे प्रचंड प्रमाणत ही लोक कोण आहेत.
श्रीमंत लोक.
अधिकारी, .
उच्च मध्यवर्गीय ..
हे सर्व शिक्षित आहेत.
त्यांना प्रदूषण काय हे चांगले माहीत आहे

सर्वोच्च न्यायालय ची काय मजबूरी आहे माहीत नाही पण सर सकट बंदी कोर्ट टाकू शकत नाही हेच पालपुद त्यांचे चालू असते.
सरकार कडून काही अपेक्षा ठेवू नका.
अडाणी,बिनडोक लोकांनी निवडलेले सरकार हुशार असेल ही अपेक्षाच गैर आहे
..समाज सुधारणा होईल आणि लोकांस प्रदूषणाचे महत्व समजेल आणि सर्व प्रकारच्या प्रदूषणाला लोक विरोध करतील.
हीच एक आशा आहे .
भारतात समाज सुधारणा पुढील हजार वर्ष होण्याची तरी बिलकुल सुतराम शक्यता आहे.
..त्या मुळे स्वतःचे मन शांत ठेवा आणि आवाज आणि हवा प्रदूषण आपल्या पर्यंत पोचू नये इतकी काळजी घ्यावी

सर्व प्रकारच्या प्रदूषणाला लोक विरोध करतील.>> +111
काही जण प्रतिसाद प्रदूषण करतात त्यालाही लोक विरोध करतील हळूहळू.

म्हणजे नक्की काय करावे ??>>> हे काय विचारणं झालं?
आफ्रिकेत की कुठेतरी जाऊन राहावे. नक्की कुठे ते त्या दुसऱ्या गणेशेत्सवाच्या धाग्यात शोधावे लागेल.

पण फटाके वाजवणारे प्रचंड प्रमाणत ही लोक कोण आहेत.
श्रीमंत लोक.
अधिकारी, .
उच्च मध्यवर्गीय ..
हे सर्व शिक्षित आहेत.
त्यांना प्रदूषण काय हे चांगले माहीत आहे >>>>>>>>>>कारण दिवाळी आणी फटाके यांची संलग्नता मेंदुमधे ठामपणे कोरली गेली आहे.पिढ्यान पिढ्या ती संक्रमित होत गेली आहे.कालसुसंगत नसलेल्या अनेक प्रथा परंपरा आज पाळल्या जातात.खर तर कालबाह्य रुढी परंपरा या एक प्रकारच्या अंधश्रद्धाच आहेत. हे मी मूळ लेखात लिहिले आहेच. करोना काळात प्राणवायु अभावी जे तडफडून मेले त्यावरुन देखील पर्यावरण, प्रदूषण या बाबींचे महत्व समजत नसेल तर ते खरोखरच चिंताजनक आहे.

गेले त्यांची झाली माती, नशिबन अपुले अपुल्या हाती!

प्राणवायू अभावी कोणी गेलं त्याचा आणि फटाक्यांचा बादरायण संबंध आहे. करोनात सॅनिटायझर लावायचात, मास्क लावायचात म्हणून वाचलात नाही तर गेलाच असतात. बरोबरच आहे. पण आता म्हणून चक्रम सारखा रोज सॅनिटाउझर न लावणार्‍यांना बोल लावाल तर कसं चालेल.
नाही मिळाला ऑक्सिजन आणि गेलं कुणी म्हणून कोणी श्वास घेणं थांबवणार नाही, सिमेंटच्या कंपन्या थांबणार नाहीत की फटाके.
हिंदू धर्मात फटाके नाहीत ह्या मुद्द्याला ही काहीही अर्थ नाही. धर्म असा कॉन्स्टंट काही नसतो. हिंदूत तरी नसतो. गणपती डांस, दोन दोन दिवस चालणार्‍या मिरवणुका, त्यात अपेयपान, जुगार... हे सगळं सगळं धर्मात आहे. पूर्वी नसेल. आता आहे. तसंच फटाके आणि दिवाळी हे असोसिएशन तुमच्या आमच्या मनात आहे. म्हणजे आता धर्मात आहेच. ते नष्ट करायला सारासार विवेक बुद्धी जागृत असेल तरच शक्य आहे. ती अशी सेंटी मारुन येत नाही. विचार करुनच येते. आज कोणाला विचार करायचा नाही. तो विचार करायला काही करता आलं तर करा.
तडफडून मेले असल्या व्हॉअ‍ॅ अंकल आर्ग्युमेंटचा फॉरवर्ड करण्याशिवाय काही उपयोग नाही.

सर्वोच्च न्यायालय म्हणते बंदी टाकता येत नाही.
सरकार बंदी करू शकत नाही( कारण धर्माचा संबंध जोडला गेल्या मुळे)
कोर्ट नी आदेश दिला होता फटाके किती तास वाजावय चे त्या विषयी.

कोर्टाचा आदेश पाळला गेला नाही .कारण शेवटी आदेशाची अमालबजाव नी पोलिस करतात .
ते निष्क्रिय राहिले एक पण केस दाखल केली नाही तर कागदावर तरी कोर्टाचा आदेश पाळला गेला असेच समजावे लागते.

आता एकमेव उपाय राहिला लोकांनी स्वतः पासून सुरुवात करावी .स्वतः,
फटाके वाजवू नयेत.

<< आवाज आणि हवा प्रदूषण आपल्या पर्यंत पोचू नये इतकी काळजी घ्यावी ### म्हणजे नक्की काय करावे ??
नवीन Submitted by भ्रमर on 15 November, 2023 - 04:26. >>

-------- ( गणपतीच्या वेळी DJच्या आवाजाबद्दल ) तक्रार करणार्‍यांना विमानांत बसवायचे आणि अफ्रिकेला सोडायचे हा एक उपाय येथे समोर आला होता.

Pages