फटाकेमुक्त दिवाळी

Submitted by प्रकाश घाटपांडे on 26 October, 2013 - 08:12

दिवाळी हा खरा तर दिपोत्सव. त्यात हे फटाके कुठून घुसले काय समजत नाही.पुर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोला सारखी वाद्ये वाजवली जायची.कदाचित दिवाळी सारख्या मंगल सणामधे दुष्ट शक्ती चा वावर नको म्हणुन फटाके वाजवण्याची प्रथा आली असावी.

फटाकेनिर्मितीत वापरले जाणा-या रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात. फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते.त्यामुळे श्वसानाचे आजार वाढतात. ध्वनीप्रदूषणाची पातळीही वाढते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवण क्षमता कमी होते.फटाके फोडल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी वायू वातावरणात पसरतात. ओझोनचा थर पातळ होतो.एकदा मराठी विज्ञान परिषदेचा फटाक्यामागील विज्ञान या कार्यक्रमात फटाक्यात वापरल्या गेलेल्या रसायनांबदद्ल स्लाईड शो कार्यक्रम दाखवला होता.
कॉपर मुळे श्वसननलिकेत त्रास कॅडमियम मुळे किडनीला धोका आणि अ‍ॅनेमिया.शिशाचा मज्जासंस्थेवर परिणाम अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.तपशीलात थोडाफार फरक असू शकतो. अशा प्रदुषण करणार्‍या फटाक्यांपासून मुक्त राहून दिवाळी साजरी करता येणार नाही का? नक्कीच येईल. फटाक्या शिवाय दिवाळी ही कल्पनाच काहींना करवत नाही. कारण दिवाळी आणी फटाके यांची संलग्नता मेंदुमधे ठामपणे कोरली गेली आहे.पिढ्यान पिढ्या ती संक्रमित होत गेली आहे.कालसुसंगत नसलेल्या अनेक प्रथा परंपरा आज पाळल्या जातात.खर तर कालबाह्य रुढी परंपरा या एक प्रकारच्या अंधश्रद्धाच आहेत.मनाला वाटणार्‍या असुरक्षिततेमुळे ते मोडण्याचे धाडस आज बर्‍याच लोकांना होत नाही.अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ ही एक व्यापक समाज परिवर्तनाची चळवळ आहे.त्यामुळे अंनिस फटाकेमुक्त दिवाळीचे अभियान नेहमी राबवते. विद्यार्थ्यांमधे ही पर्यावरण जागृतीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे त्यांना फटाके मुक्त दिवाळीचे महत्व पटू लागले आहे.काही सुसंस्कृत पालक ही आपल्या मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम पटवून त्यापासून परावृत्त करु लागले आहेत. डॊ नरेंद्र दाभोलकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काही युवकांनी व विद्यार्थ्यांनी स्वत:हून फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे ठरवले आहे.पाहू या काय होते ते!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या वर्षी प्रचंड फटाके फुटलेत, आमच्या इथं तर नंतर अक्षरशः गुदमरून गेलोय असं वाटत होतं, दारे खिडक्या बंद केल्या तरी धूर आसमंतात पसरलेला होता
घरात पण मास्क लावून बसावं का असा वाटलेलं

ते वर्षभर गाड्यांचे प्रदूषण होत असेलच त्यात काही वाद नाही पण हा असा प्रचंड ओव्हरडोस एकदम एकाच दिवसात देणे हे कुणाला समर्थनीय वाटत असेल तर त्यांना साष्टांग दंडवत

जर कोणाला खरोखरच फटाके नको असे वाटत असेल तर त्यांनी फटाक्यांचे खूप कौतुक करा जेणेकरून लोकांच्या मनात फटाक्यांबद्दल राग निर्माण होईल.

- एक मायबोली स्पेशल लॉजिक Happy

पॉल्युशन कमी करणारे CNG फटाके लावले पाहिजेत. Wink
आवाज विरहित फटाके हां उत्तम पर्याय होऊ शकतो पण जिकडे फाइनची पर्वा न करता RE चा साइलेंसर मोठ्या आवाजात मुद्दाम सेटिंग करवला जातो तिकडे मोठ्या आवाजातील फटाक्यांचे आकर्षण कसे कमी होणार !!

पर्यावरणवाद्यानी भरपूर फटाके वाजवा , आवाजाचे प्रदूषण खूप करा असे सांगितले आणि सुप्रीम कोर्टाने वर्षभर २४/७ फटाके वाजवायला परवानगी दिली तर फटाके कमी वाजवले जातील इतकी सोपी गोष्ट कोणाच्याही लक्षात येत नाही , याचे आश्चर्य वाटते .....

लोहगावमध्ये काल लक्ष्मीपूजनाचे फटाके वाजवत असताना स्कायशॉट नामक फटाका दुसऱ्याच एका कुटुंबाच्या सदस्यांवर जाऊन फुटला. त्यात एक गरोदर महिला होती, त्यांचे तोंड भाजले. दोनजणींचे केस व कपडे जळाले, अजून दोघींना हाताला आणि डोक्याला जखमा झाल्या तर एका दोन वर्षाच्या बाळाला डोळ्याला जखम झाली. सर्वांवर उपचार सुरु आहेत.

Inhaling toxic smoke to own the libs.

याच अर्थाची सवत वगैरे असलेली मराठी म्हण आहे. ती तशीही बदलत्या काळात पॉलिटिकली करेक्ट नाही. त्या ऐवजी हीच म्हण वापरावी.

पुण्याचा एअर क्वालीटी इंडेक्स २९० पर्यंत गेला आहे. जो हवा गुणवत्ता निर्देशांकाच्या श्रेणी नुसार खराब मानला जातो. सर्वाधिक धोक्याची परिस्थिती भोसरी परिसरात असून, येथे इंडेक्स ३९४ मोजला गेला आहे. ही सर्व प्रदुषण वाढ ही रविवारी (१२ नोव्हेंबर) या एकाच दिवशी दुपटीने वाढली आहे.

मी काही दिवसांपूर्वी गॅलरीत गेलो आणि जोरात ओरडलो 'नागरिकांनो मला या दिवाळीत फटाक्यांची आतिशबाजी बघायची आहे' आणि काय आश्चर्य काही दिवसातच फटाक्यांचे स्टॉल चौकाचौकात दिसायला लागले. सगळे फटाके खरेदी करताना दिसले. मला छान वाटावं म्हणून पाऊस, चक्र्या, बॉम्ब, आकाशात जाऊन फुटणारे असे नाना तऱ्हेचे फटाके लोकं घेत होते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी मी टेरेसवर गेलो आणि जोरात म्हणालो सुरू करा आणि काय आश्चर्य नाना तऱ्हेचे फटाके माझ्यासमोर आकाशात फुटायला लागले.

अतिरेक्यांनी शक्तिशाली फटाके फोडले तर त्याला मात्र बॉंबस्फोट म्हणतात. जर दिवाळीच्या धमाक्यात अतिरेक्यांनी हळूच एखादा बॉंबस्फोट घडवून आणला तर? ही शक्यता भविष्यात नाकारता येत नाही.

जर दिवाळीच्या धमाक्यात अतिरेक्यांनी हळूच एखादा बॉंबस्फोट घडवून आणला तर? ही शक्यता भविष्यात नाकारता येत नाही.>>> +१११११

तसेही आपले हिंदूंचे सण दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असतातच!

जर लहान मुलांच्या हातात फटाक्याच्या बंदुकीऐवजी हळूच AK-47 दिली तर???? बापरे पळा पळा बॅगा भरा

वैयक्तिक अजेंडा बाजूला ठेवून फटाके उत्पादनापासूनच पूर्ण बंदीची गरज आहे>>Yes this is the only solution. फटाके मिळायचेच बंद झाले पाहिजेत. But court always only put ban or restrictions on burning fire crackers. So it is upto individual to follow this ban or else it is not possible for police to implement this ban.

दिवाळीच्या दिवसांत फटाक्यांच्या आवाजात एखादा बॉम्ब स्फोट घडवून आणला गेला तर त्या मागची सुपीक कल्पना या धाग्यावरुन च घेतली होती असे समजायला हरकत नाही Happy

बाय द वे , फटाक्यामुळे होणाऱ्या ध्वनी आणि वायू प्रदूषणाच्या काळजीने येथील सजग आणि सुशिक्षित नागरिकांनी इथे शे दोनशे प्रतिसाद नक्कीच हाणले असतील .
त्यांची प्रदूषण विरोधातील तळमळ बघून मन अक्षरशः द्रवले !
आता येत्या ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या संध्येला त्यांनी फाटक्या विरोधात अशीच तळमळ दाखवून किमान दोन चार प्रतिसाद तरी हाणून प्रदूषण कमी करण्यात पुढाकार घ्यावा ही विनम्र इच्छा !!!!!

फटाके फोडण्यावर बंदी पण त्याच्या उत्पादनावर नाही असे का?

फटाक्यांचा वापर फोडण्याव्यतिरिक्त आणखी काही असतो का ज्यात ध्वनी आणि वायू प्रदूषण होत नाही किंवा ज्यात एखादे समाजउपयोगी कार्य केले जाते?

ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या संध्येला## काही विदा असेल ना, ह्यावेळी किती प्रदूषण होते ?? अगदीच मंद जोशात येऊन पोस्टि टाकू नका

ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या संध्येला## काही विदा असेल ना, ह्यावेळी किती प्रदूषण होते ?? अगदीच मंद जोशात येऊन पोस्टि टाकू नका
>>>>>>>>>https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/air-quality-heads-to-...
घ्या !
आयते खायची सवय कधी जाणार कोणास ठाऊक ?
>>>>>>>>>

काल आमच्या भागात रात्री 2 वाजेपर्यंत फटाके वाजवणे सुरू होते. धर्माच्या रक्षणासाठी वेळ आणि पैसा घालवणाऱ्या ह्या युवा वर्गाबद्दल अभिमान वाटतो

Submitted by भ्रमर on 13 November, 2023 - 00:12>>>>>>>>>>>>>
ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या वेळेस असाच निष्पक्ष प्रतिसाद अपेक्षित करू शकतो ना ?
का तेथे नेहमीचे बोटचेपे धोरण ?

आदर्णीय फुरोगामींनी दिलेली ही बातमी https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/air-quality-heads-to-...
तर लक्ष्मीपूजनाच्या रात्री फटाक्यांमुळे झालेल्या प्रदूषणाची आहे.

नवीन वर्ष संध्येला सगळी हिंदू पोरं फटाके फोडत फिरत असतात. आणि दारू ही ढोसत असतात.

https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/air-quality-heads-to-...

पुन्हा एकदा आपलेच पाय आपल्या तोंडात खुपसून घेतले आहेत

भरत यांनी वरचीच लिंक कॉपी केली आहे.

कोणताही हिंदू सण मुस्लिम/ ख्रिस्चनंना मध्ये आणल्याशिवाय साजराच करता येत नाही मोदीभक्तांना. रामनवमीलाही हे मशीदीसमोर जाऊन मुजराच करणार, मग मंदिर हवेच कशाला?

ब्रिटन मध्ये लहान मुलांना सिगारेट विकायला बंदीच आहे व ती मर्यादा दरवर्षी एकेक वर्ष वाढवत नेणार आहेत. म्हणजे एका पिढीत सिगारेट पूर्ण बंद होईल. आपल्याकडेही फटाके उत्पादनावर बंदीच हवी.

नवीन वर्षाच्या संध्येला## काही विदा असेल >> नववर्षसंध्या म्हण़जे हिंदू / गुज्जू नववर्ष संध्या हे चटकन ध्यानात नाही आलं! पण बरोबर आहे. लक्ष्मीपूजन म्हणजे नववर्षं संध्याच की. तेव्हा फार प्रदुषण असते. लिंक आणि आरोप अगदी योग्य आहे.

आता दिवाळी संपल्यात जमा आहे!
३१ डिसेंबर आणि ख्रिसमस ला लिबरुज गप्प बसले तर ते फक्त हिंदू सणाच्या वेळेस प्रदूषण बद्दल बोंबलत बसतात असा त्याचा अर्थ होईल .
आता हा डाग धुवून काढायचे काम त्यांचेच आहे ......

अमितव सही पकडे है. मोदीभक्त गुज्जु लोकांची हुजरेगिरी करतात हे खरे आहे, पण नववर्षाची व्याख्याही बदलून टाकली....

बोकलत बाजारात फिरत असताना आम्ही अतिरेक्यांनी हळूच त्याचा मोबाईल चोरलाय. बोकलतसारखा महान वैज्ञानिक तुमच्या भारत देशात असताना आम्हला लपूनछपून काहीही करणं खूप कठीण जातंय. बोकलतने खूप वर्ष मेहनत करून नवीन फटाके बनवलेत. ते फटाके धूर सोडत नाहीत उलट ओझोन थर आणि ध्रुवीय प्रदेशातील बर्फ घट्ट करतात. ते फटाके जो माणूस लावेल त्यालाच दिसतात आणि ऐकू येतात. असा महान शास्त्रज्ञ तुमच्या भारत देशात असताना आमची हिम्मत होत नाही काही करायची. बोकलत ईज ग्रेट. आता हळूच मोबाईल परत त्याच्या खिशात ठेवतोय. त्याला प्लीज सांगू नका.

Pages