हिरोगिरीचा पिक्चर म्हणजे ज्यात एक हिरो असतो. तो स्टार किंवा सुपरस्टार असतो. तो पिक्चरच्या सुरुवातीला जेव्हा फटा पोस्टर निकला हिरो स्टाईल एक फाडू एन्ट्री घेतो. तेव्हा पब्लिक शिट्टी आणि टाळ्यांनी थेटर डोक्यावर घेते.
जवानमध्ये पिता आणि पुत्र असे दोन हिरो आहेत. दोन्ही शाहरुख आहेत. दोघे मिळून पिक्चर मध्ये जवळपास दहा-बारा एन्ट्री घेतात. आणि प्रत्येक एन्ट्री वेळी.. आय रिपीट.. प्रत्येक आणि एकूण एक एन्ट्रीवेळी पब्लिकच्या शिट्ट्या आणि टाळ्यानी थेटर दणाणून उठते.
माझी नऊ वर्षाची मुलगी जिने जेमतेम पंधरा-वीस चित्रपट थिएटरला पाहिले असतील. ती म्हणाली, पप्पा मी पहिल्यांदाच असा पिक्चर बघतेय जिथे पब्लिक एवढा आरडाओरडा करतेय..
आता तिला काय सांगू, मी सुद्धा माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच हिरोच्या दर नव्या एंट्रीला इतका जल्लोष अनुभवत होतो.
काय ती स्टाईल, काय ती ॲक्शन, काय तो स्वॅग.. येस स्वॅग इज द परफेक्ट वर्ड..
आजवर ही दक्षिण भारतीय हिरोंची मक्तेदारी होती. जी आज शाहरुख ने अक्षरशः मोडून काढली. नक्कीच दिग्दर्शक तिकडचा होता आणि त्याची कमाल यात होतीच. पण तिथली पब्लिक सुद्धा तशीच असते जे हिरोला तसेच डोक्यावर घेते. आपल्याकडे तशी काही पद्धत नसूनही आज मी एका हिंदी पिक्चरला असा माहौल अनुभवत होतो. शाहरूखचे स्टारडम म्हणजे नक्की काय चीज आहे हे मी त्याचा एक कट्टर चाहता असूनही मला नव्याने समजतेय असे होत होते..
पिक्चरमध्ये नयनतारा आहे, विजय सेतुपती आहे, दीपिका आहे, झाल्यास सरप्राईज पेकेज संजूबाबा आहे, शाहरुखच्या टोळीतील मुलींनी देखील मस्त काम केले आहे, दिग्दर्शक नावाजलेला आहे, का ते पिक्चर बघून समजते, बॅकग्राऊंड म्युझिक नुसता राडा घालते, गाणी फार श्रवणीय नसली तरी कोरिओग्राफी प्रेक्षणीय आहे. बोलायला बरेच काही आहे. पण आज शाहरूख पलीकडे काही सुचणे अवघड आहे.
जर पठाणने खरेच हजार कोटी कमावले असतील तर हा दहा हजार कोटी डिझर्व्ह करतो.
पण....
या पिक्चरची पठाणशी तुलना देखील करू नका. म्हणजे हा वेगळ्या धाटणीचा पिक्चर आहे ते सोडा. म्हणजे पठाण हॉलीवुड स्टाईल ऍक्शनपट बनवण्याचा प्रयत्न होता. तर हा दक्षिण भारतीय मसालापट आहे त्यामुळे शैली भिन्न आहेच. पण दोन्हीतील शाहरूखची तुलनाच नाही. पठाणचा शाहरूख यापुढे फार सामान्य भासला. आजवर कधी असा शाहरूख पाहिला नव्हता. कोणी कल्पनाही करू शकत नाही अश्या शाहरूखची..
त्यामुळे जा, उठा, तिकीट बुक करा आणि थिएटरमध्ये जाऊनच बघा. नुसते मोठ्या पडद्यावर बघायला म्हणून नाही तर तो माहौल तुम्ही तिथेच अनुभवू शकता. माझ्या मुलीने देखील टाळ्या वाजवून एन्जॉय केला. घरी आल्यावर आईला तो अनुभव सांगून थकत नव्हती. पिक्चर संपल्यावर म्हणाली की हा पहिला चित्रपट जो मी एकही डुलकी न काढता बघितला कारण दंगाच एवढा चालू होता, झोप यायचा प्रश्नच नव्हता..
पण पिक्चर नुसते शाहरूखचे स्टारडमच नाही दाखवत, तर तो हसवतो, रडवतो, इमोशनल करतो, पुन्हा खुश करतो, एक सामान्य माणूस म्हणून आपला जीव सुखावतो. कारण त्यातला हिरो आणि त्याची हिरोगिरी जरी लार्जर than लाईफ दाखवली असली तरी त्यातील समस्या खऱ्याखुऱ्या आहेत.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या, ऑक्सिजन अभावी सरकारी हॉस्पिटलमध्ये मुलांचा मृत्यू, भ्रष्टाचाराने पोखरलेली सिस्टीम ज्यातून सुरक्षायंत्रणा सुद्धा वाचली नाही. या सर्वात कुठलीही आतिशयोक्ती नाहीये. त्यामुळे ते प्रसंग भिडतात आणि आपल्याला चित्रपटाशी जोडतात.
दुर्दैव असे आहे की या सिस्टीम विरुद्ध लढून कोणी जिंकताना दाखवायचे असेल तर लॉजिक गहाण ठेऊन लार्जर than लाईफ दाखवण्याला पर्याय नाही. पण हा चार घटकांचा खोटा अनुभव देखील आपल्याला आनंद देतो हे तितकेच खरे आहे.
शाहरूखचे महिलांच्या जेलमध्ये जेलर असणे, सिस्टम विरुद्ध लढायला तेथील महिलांची टोळी बनवणे, त्याचे तिथल्या महिलांशी असलेले बॉण्डिंग आणि इमोशनल लव्हेबल प्रसंग जे शाहरूखलाच शोभावेत याचीही रेलचेल आहेच. त्यामुळे शाहरूखचे चाहते यातून सर्व प्रकारचा आनंद घेऊन बाहेर पडणार हे नक्की. एंटरटेनमेंटचा निकष लावता पिक्चरला नाव कुठे ठेवावे हा प्रश्न पडतो.
तरी हा कौतुक सोहळा आवरते घेत जाता जाता एवढेच सांगेन,
यू कॅन लव्ह शाहरूख
यू कॅन हेट शाहरूख
बट यू कॅन नॉट इग्नोर शाहरूख...
त्यामुळे त्याच्या चित्रपटाची नेहमी उलट सुलट चर्चा होतेच.
यात कोण त्याच्या बंडल चित्रपटाचे मुद्दाम कौतुक करते किंवा कोण त्याच्या चांगल्या चित्रपटावर मुद्दाम टिका करते हे समजेनासे होते.
तरी अशा गैरसमजातून कोणी चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघायचे टाळले तर त्यांच्याबद्दल वाईट वाटेल..
आणि म्हणूनच रात्रीचे तीन साडेतीन वाजता पोटतिडकीने हे लिहून काढले. कारण आपल्याला आलेला चांगला अनुभव लोकांशी शेअर करावा हाच नेहमी माझा परीक्षण लिहायचा हेतू असतो. धन्यवाद
ता.क. - My First Movie date with daughter... या अनुभवामुळे कायम लक्षात राहील.. लव्ह यू शाहरूख .. बदाम बदाम बदाम !
म्हणजे दाखवा निर्दयी सिस्टीम
म्हणजे दाखवा निर्दयी सिस्टीम पण बँक अधिकार्याला असं फिजिकल कशाला व्हायला लावता
>>>>
बँक असे दमदाटी करणारी स्पेशल माणसे पाळतात. मी यातले काही सौम्य प्रकार शहरात पाहिले आहे. खेड्यापाड्यात, दुर्गम भागात, आदिवासी किंवा हलके समजले जाणाऱ्या जातीत, जिथे न्याय असाही खुंटीला टांगला जातो तिथे यापेक्षाही किती बेकार घडत असावे याची कल्पना आपण नाही करू शकत..
चित्रपटात ज्या समस्या दाखवल्या आहेत त्या या देशात वास्तवात आहेत. आणि जे चांगले घडताना दाखवले आहे ते दुर्दैवाने स्वप्नरंजन आहे..
अस्मिता सॉलिड परीक्षण(पिसं)
अस्मिता सॉलिड परीक्षण(पिसं) मी पण हेच लिहिलेलं वास्तवाशी फारकत घेणारा अतिस्वप्नाळू चित्रपट (Extreme optimismचा उत्तम नमुना) .सगळं कसं शाहरुखच्या मनासारखं होत ! शेवटी काय तर मेजोरीटी प्रेक्षकांना तेच आवडतं स्वप्नांत रमनं.
पूर्वी बायका गळ्यात ठसठशीत
पूर्वी बायका गळ्यात ठसठशीत काळे मणी असलेले मंगळसूत्र घालायच्या. आजकाल सोन्याच्या नेकलेस मध्ये कुठेतरी एक काळा मणी असतो. त्यामुळे संसारातले नवर्याचे स्थान कळते, पण स्त्रीचे लग्न झाले आहे की नाही हे कळत नाही. -- इती वपु. ( मोबाईल पूर्व कालीन व्हॅत्सॅप)
Viku strikes.
Viku strikes.
Jail building architecture is completely incorrect. It doesn't look colonial. inmates in look like hospital staff.
मी पण काल हे पाप केले.
मी पण काल हे पाप केले. सिनेमा परीक्षण लिहायच्या पण लायकीचा नाहीये. अॅटली च्या सिनेमात सेतूपथी एव्हढा वाया घालवलेला पहिल्यांदाच पाहिला. सान्य मल्होत्रासारखी गुणी कलाकार पण अगदीच वाया घालव्ली आहे . शाहरुख तरुन असताना त्याची सेलेब्रिटी ईमेज एनकॅश करायला काढला असता तर कदाचित आवडलाही असता.
एक था टायगर'ची कट्रीना
एक था टायगर'ची कट्रीना यापेक्षा कितीतरी सरस, चपळ आणि तडफदार वाटली होती.
>>> सीरियस्ली?? कँपेरिंग नयनतारा विथ कतरिना??? हे भगवान…
हा सिनेमा थेट्रात पाहिला
हा सिनेमा थेट्रात पाहिला पाहिजे हा दावा (इतर अनेक दाव्यांप्रमाणेच) कुचकामी आहे. तद्दन टुकार सिनेमा आहे. उगाच उथळपणा करायचा आणि शेवटी एक संदेश देण्याचं नाटक करायचं हा टिपिकल सौंधिंडियन फॉर्म्युला असलेला मसालापट आहे.
उगाच उथळपणा करायचा आणि शेवटी
उगाच उथळपणा करायचा आणि शेवटी एक संदेश देण्याचं नाटक करायचं हा टिपिकल सौंधिंडियन फॉर्म्युला असलेला मसालापट आहे.
>>
अटलीकुमार चे विजय हीरो असलेले सगळे सौदिंडियन सिनेमे असेच असतात.
एका कुठल्यातरी सिनेमात GST कसा वाईट / इम्पलिमेंटेशन कसं करायला हवं होतं वगैरे मुद्द्यांवर गंभीर भासणारी पण वास्तवाशी काहीही रिलेशन नसलेली पोकळ ड्वायलागबाजी होती.
शाहरुख तरुन असताना त्याची
शाहरुख तरुन असताना त्याची सेलेब्रिटी ईमेज एनकॅश करायला काढला असता तर कदाचित आवडलाही असता.
>>>>>>
कोण किती तरुण आहे हे त्याच्या जन्मवर्षावर किंवा वयावर नाही ठरत..
आजही शाहरूख उत्साहाचा सळसळता झरा आहे. आजही त्याची पब्लिकमध्ये क्रेझ आहे. आजही जवान पिक्चरला थिएटर मध्ये ज्या टाळ्या आणि शिट्ट्या पडत होत्या त्या अटलीमुळे नाही तर शाहरूखच्या या क्रेझ मुळेच पडत होत्या
आणि हो, ओटीटीवर हा चित्रपट बघताना तो टाळ्या शिट्ट्याचा माहोल नसल्याने पिक्चर बघून चुका काढा हाच एक पर्याय शिल्लक आहे त्यामुळे वरील सर्व प्रतिसादांना माझा +786
शाहरुख तरुन असताना त्याची
शाहरुख तरुन असताना त्याची सेलेब्रिटी ईमेज एनकॅश करायला काढला असता तर कदाचित आवडलाही असता.
>>>>>>
कोण किती तरुण आहे हे त्याच्या जन्मवर्षावर किंवा वयावर नाही ठरत..
आजही शाहरूख उत्साहाचा सळसळता झरा आहे. आजही त्याची पब्लिकमध्ये क्रेझ आहे. आजही जवान पिक्चरला थिएटर मध्ये ज्या टाळ्या आणि शिट्ट्या पडत होत्या त्या अटलीमुळे नाही तर शाहरूखच्या या क्रेझ मुळेच पडत होत्या
आणि हो, ओटीटीवर हा चित्रपट बघताना तो टाळ्या शिट्ट्याचा माहोल नसल्याने पिक्चर बघून चुका काढा हाच एक पर्याय शिल्लक आहे त्यामुळे वरील सर्व प्रतिसादांना माझा +786
टाळ्या शिट्ट्याचा माहोल
टाळ्या शिट्ट्याचा माहोल नसल्याने पिक्चर बघून चुका काढा
>>> टाळ्या वाजवून कोव्हिडचे जंतू गेले तसं का ? Mass hallucinations चा भाग झाल्यावरच आवडणार का ?
अजून एक तांत्रिक गोष्ट म्हणजे सिनेमाच्या स्क्रीनवर जे काही चालले आहे ते झरझर बदलत राहते, त्याने यूट्यूब शॉर्ट्स बघितल्यावर जसा मेंदू भंजाळतो तसं काही तरी वाटलं. If the content is weak just overwhelm the human brain by flash photography and really loud sounds. हे मला ब्रह्मास्त्र थेटरमध्ये बघून आल्यावरही जाणवलं. तुम्हाला ते फिजिकली सुद्धा थकवतात. हे जाणिवा बधिर करणं फक्त मलाच जाणवतं आहे का अजूनही कुणी आहे? सिनेमा चांगला- वाईट कसाही असो, त्यांच्या आर्थिक नफ्यासाठी इंद्रियांवर अतिक्रमण केलं जातं. ज्या अर्थी घरी बघूनही मला हे बटबटीत वाटलं, थेटरमध्ये तर तात्पुरता भ्रमिष्टच होईल माणूस !
---------
धन्यवाद कल्की , मार्मिक पोस्ट.
“ ओटीटीवर हा चित्रपट बघताना
“ ओटीटीवर हा चित्रपट बघताना तो टाळ्या शिट्ट्याचा माहोल नसल्याने पिक्चर बघून चुका काढा हाच एक पर्याय शिल्लक आहे” - थिएटरमधे हाऊसफुल शो बघूनही ‘हा सिनेमा तद्दन भिकार आहे‘ असंच मत आहे. उगाच ओटीटी चं एक्स्क्यूज जोडायची गरज नाही.
थिएटरमधे हाऊसफुल शो बघूनही
थिएटरमधे हाऊसफुल शो बघूनही ‘हा सिनेमा तद्दन भिकार आहे‘ असंच मत आहे. उगाच ओटीटी चं एक्स्क्यूज जोडायची गरज नाही.
>>>>>
आपल्या मताचा आदर आहे.
मी बहुमताबद्दल बोलत आहे
बाई दवे कुठल्या हाऊसफुल थिएटरला पाहिले हे समजू शकेल का?
टाळ्या शिट्ट्याचा माहोल
टाळ्या शिट्ट्याचा माहोल नसल्याने पिक्चर बघून चुका काढा
>>> टाळ्या वाजवून कोव्हिडचे जंतू गेले तसं का ? Mass hallucinations चा भाग झाल्यावरच आवडणार का ?
>>>>>
याचे उत्तर थोडक्यात नाही देऊ शकत.
यावर वेगळा धागा काढूया...
म्हणजे मीच काढतो
“ मी बहुमताबद्दल बोलत आहे” -
“ मी बहुमताबद्दल बोलत आहे” - थोडी करेक्शन. तुझ्या सँपल सेटमधलं बहूमत.
जवान बघितला..
जवान बघितला..
मला आवडला... टाळ्या आणि शिट्ट्यांचा सिनेमा आहे..
अटलीच्या सिनेमांचा एक पैटर्न असतो..तसाच हा पण आहे..
आम्ही सहपरिवार एन्जॉय केला..
मी बहुमताबद्दल बोलत आहे” -
मी बहुमताबद्दल बोलत आहे” - थोडी करेक्शन. तुझ्या सँपल सेटमधलं बहूमत.
>>>>
हजार करोडवर धंदा झाला. त्यामुळे हे माझे ना तुमचे तर अखंड भारतातले सँपल सेट आहे
आणि तुमचेही थिएटर हाऊसफुल होते असे वर तुम्हीच लिहिले आहेत (कुठले थिएटर? भारताबाहेरचे का? शाहरूखची क्रेझ जगभरात आहे)
काल चितचोर पाहिला. स्टार्ट टू
काल चितचोर पाहिला. स्टार्ट टू एण्ड अॅक्शन.
पब्लिक नुसतं शिट्ट्या आणि टाळ्या मारत होतं. अमोल पालेकरचे स्टंट्स तर नेत्रदीपक. पण ए के हंगल यांचे फाईट सिक्वेन्सेस पण थरारक होते.
आणि नंतर विजयेंद्र ने कल्ला केलाय.
बासू चटर्जी म्हटले कि स्टार्ट टू एण्ड अॅक्शनची फुल्ल ग्यारण्टी.
झरीन वहाबने जे बोल्ड सीन्स दिलेत त्या पुढे कत्रिना बित्रिना एकदम रिबिनी बांधून फिरणार्या शेंबड्या पोरी वाटतात.
कॅमिओ म्हणून एका सीन मधल्या कुत्र्याची अॅक्टींग पण मस्त होती.
“ हजार करोडवर धंदा झाला.
“ हजार करोडवर धंदा झाला. त्यामुळे हे माझे ना तुमचे तर अखंड भारतातले सँपल सेट आहे” - सिनेमा बघितल्यावर तो वाईट असल्याचं मत झालं त्यामुळे त्या भरलेल्या गल्ल्यात माझाही वाटा आहे. पण म्हणून सिनेमा बहूमताने चांगला आहे असा निश्कर्ष निघत नाही. बहूमताला स्टॅटिस्टिक्स चा आधार असतो. सिनेमाचं कलेक्शन म्हणजे प्रेक्षकांपैकी अमुक टक्के लोकांना तो आवडला असं गणित नाहीये. म्हणून म्हटलं कि तुझ्या सँपल सेटमधल्या बहूमताला आवडला असेल.
दुसरं म्हणजे मी सिनेमा भिकार असण्याविषयी बोलतोय. शाहरुख खानच्या फॅनबेसविषयी नाही. हे दोन वेगळे विषय आहेत.
आचार्य
आचार्य
आय वान्ट टू बिलिव्ह की सिनेमा
आय वान्ट टू बिलिव्ह की सिनेमा प्रमोट केला जातो आहे तेवढा गेलेलाच नाहीये हिट तसे नसेल तर पब्लिकचा ओवरऑल करमणुकीचा बारच आता माझ्या डॉक्याला टॅन्जन्ट झालेला आहे असे म्हणावे झाले.
सिनेमा चांगला नसावा असं प्रोमो बघूनच वाटत होतं, अपेक्षा कमी होती पण तरीही शॉकिंगली भयाण निघाला. माझ्या एरवीच्या टॉलरन्सची कल्पना असल्यामुळे नवरा म्हणाला तू सुद्धा अर्ध्या तासाच्या आत बंद केलास म्हणजे खरोखर कमाल असह्य असला पाहिजे.
पठाण आणि जवान हे दोन्ही
पठाण आणि जवान हे दोन्ही सिनेमे सौंदेडियन भाषेत रिलीज झाल्याने सौंदेंडियन मार्केटचे किमान ३०० ते ४०० करोड भरीचे भारतात आणि भारताबाहेर वेगळे मिळाले असल्याची शक्यता आहे. सौदेंडियन टेरीटेरीच्या बाहेर पाचशे ते सहाशे करोडचा धंदा झाला आहे. तो ही चांगलाच आहे. पण गदरचा पण त्यापेक्षा जास्त आहे. शिवाय गदर एकाच भाषेत रिलीज झाला. याचा अर्थ गदर एक उत्कृष्ट चित्रपट आहे असा काढायचा का ?
चोप्राज मॅन्युप्युलेशन साठी कुप्रसिद्ध आहेत. म्हणजे एक हजार कोटी मधे सॅटेलाईट + म्युझिक + युट्यूब चे उत्पन्न + ओटीटी असे सगळे उत्पन्न धरलेले असते. त्यामुळे निव्वळ हिंदी बेल्ट मधे आणि दक्षिणेत थेटरमधली कमाई किती, एकूण किती तिकीटे विकली गेली असा डेटा गरजेचा आहे.
२ कोटी लोक साधारणपणे सिनेमा हिट करतात असे म्हणतात. जवान, पठाण, लिओ, जेलर सारख्या सिनेमांचे पहिल्या आठवड्याचे तिकीटाचे दर सुद्धा जास्त असतात. ४०० रूपये ते १००० रूपये असे दर होते. नंतर कमी झाले.
आपण जर २०० रूपये दराने २ कोटी लोकांनी सिनेमा पाहिला असे गणित मांडले तरी त्याचेच चारशे कोटी रूपये होतात. लोकसंख्या १३० कोटी आहे. आता पर्यंत १३७ कोटी झालेली आहे.
१३५ कोटी लोकांनी सिनेमा न पाहताही तो सुपर डुपर हिट होत असतो.
आचार्य- धन्यवाद! यू नेल्ड इट!
आचार्य- धन्यवाद! यू नेल्ड इट!!
इथे मिळेल डेटाhttps://www
इथे मिळेल डेटा
https://www.bollymoviereviewz.com/2023/10/jawan-box-office-collection-da...
आचार्य दुसरी पोस्टही पटली .
आचार्य
दुसरी पोस्टही पटली .
कोण किती तरुण आहे हे त्याच्या
कोण किती तरुण आहे हे त्याच्या जन्मवर्षावर किंवा वयावर नाही ठरत.. >> मी नम्रपणे नमूद करू इच्छितो कि ते वाक्य मला कधी नि का आवडला असता कि नाही ह्याबद्दल लिहिले आहे . इथे मला काय आवडते ते ठरवायला जनमताचा आधार कशाला हवा ? "आजही शाहरूख उत्साहाचा सळसळता झरा आहे" नि तू मंदाकिनीसारख्या त्या धबधब्यामधे सचैल स्नान करतो आहेस तर आनंदाने कर ना बाबा - आम्हाला त्यात खेचून त्याचा सर्वजनिक हमामखाना कशाला बनवायला हवा. काय त्रास आहे !
१३५ कोटी लोकांनी सिनेमा न पाहताही तो सुपर डुपर हिट होत असतो. >> आचार्य, तो आकड्यांवर विश्वास ठेवत नाही हे माहित नाही का ?
हो. म्हणूनच मी हे यन्ना
हो. म्हणूनच मी हे यन्ना रास्कला धागे टाळत असतो एरव्ही
जवान हा जवान लोकांनाच कळतो..
जवान हा जवान लोकांनाच कळतो.. इथे पस्तीस क्रॉस केलेले अंकल आणि तीस क्रॉस केलेले अँटी लोक आहेत.. त्यांना नाही समजणार ऋणमेश.. हा क्लबच वेगळा आहे…
कायतरीच, मागच्याच महीन्यात
कायतरीच, मागच्याच महीन्यात तिशीचा वाढदिवस केला.
या महिन्यात सोळावं वरीस लागलंय. स्वत: वरून इतरांना का म्हातारे करायचं ?
बरोबर च्रप्स, म्हणून
बरोबर च्रप्स, म्हणून शाहरुखलाच कळलं नाही तो काय करतोय.
Pages