परीक्षण ए जवान - फक्त आणि फक्त शाहरूख खान !

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 September, 2023 - 18:06

हिरोगिरीचा पिक्चर म्हणजे ज्यात एक हिरो असतो. तो स्टार किंवा सुपरस्टार असतो. तो पिक्चरच्या सुरुवातीला जेव्हा फटा पोस्टर निकला हिरो स्टाईल एक फाडू एन्ट्री घेतो. तेव्हा पब्लिक शिट्टी आणि टाळ्यांनी थेटर डोक्यावर घेते.

जवानमध्ये पिता आणि पुत्र असे दोन हिरो आहेत. दोन्ही शाहरुख आहेत. दोघे मिळून पिक्चर मध्ये जवळपास दहा-बारा एन्ट्री घेतात. आणि प्रत्येक एन्ट्री वेळी.. आय रिपीट.. प्रत्येक आणि एकूण एक एन्ट्रीवेळी पब्लिकच्या शिट्ट्या आणि टाळ्यानी थेटर दणाणून उठते.

माझी नऊ वर्षाची मुलगी जिने जेमतेम पंधरा-वीस चित्रपट थिएटरला पाहिले असतील. ती म्हणाली, पप्पा मी पहिल्यांदाच असा पिक्चर बघतेय जिथे पब्लिक एवढा आरडाओरडा करतेय..
आता तिला काय सांगू, मी सुद्धा माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच हिरोच्या दर नव्या एंट्रीला इतका जल्लोष अनुभवत होतो.

काय ती स्टाईल, काय ती ॲक्शन, काय तो स्वॅग.. येस स्वॅग इज द परफेक्ट वर्ड..
आजवर ही दक्षिण भारतीय हिरोंची मक्तेदारी होती. जी आज शाहरुख ने अक्षरशः मोडून काढली. नक्कीच दिग्दर्शक तिकडचा होता आणि त्याची कमाल यात होतीच. पण तिथली पब्लिक सुद्धा तशीच असते जे हिरोला तसेच डोक्यावर घेते. आपल्याकडे तशी काही पद्धत नसूनही आज मी एका हिंदी पिक्चरला असा माहौल अनुभवत होतो. शाहरूखचे स्टारडम म्हणजे नक्की काय चीज आहे हे मी त्याचा एक कट्टर चाहता असूनही मला नव्याने समजतेय असे होत होते..

पिक्चरमध्ये नयनतारा आहे, विजय सेतुपती आहे, दीपिका आहे, झाल्यास सरप्राईज पेकेज संजूबाबा आहे, शाहरुखच्या टोळीतील मुलींनी देखील मस्त काम केले आहे, दिग्दर्शक नावाजलेला आहे, का ते पिक्चर बघून समजते, बॅकग्राऊंड म्युझिक नुसता राडा घालते, गाणी फार श्रवणीय नसली तरी कोरिओग्राफी प्रेक्षणीय आहे. बोलायला बरेच काही आहे. पण आज शाहरूख पलीकडे काही सुचणे अवघड आहे.

जर पठाणने खरेच हजार कोटी कमावले असतील तर हा दहा हजार कोटी डिझर्व्ह करतो.
पण....
या पिक्चरची पठाणशी तुलना देखील करू नका. म्हणजे हा वेगळ्या धाटणीचा पिक्चर आहे ते सोडा. म्हणजे पठाण हॉलीवुड स्टाईल ऍक्शनपट बनवण्याचा प्रयत्न होता. तर हा दक्षिण भारतीय मसालापट आहे त्यामुळे शैली भिन्न आहेच. पण दोन्हीतील शाहरूखची तुलनाच नाही. पठाणचा शाहरूख यापुढे फार सामान्य भासला. आजवर कधी असा शाहरूख पाहिला नव्हता. कोणी कल्पनाही करू शकत नाही अश्या शाहरूखची..

त्यामुळे जा, उठा, तिकीट बुक करा आणि थिएटरमध्ये जाऊनच बघा. नुसते मोठ्या पडद्यावर बघायला म्हणून नाही तर तो माहौल तुम्ही तिथेच अनुभवू शकता. माझ्या मुलीने देखील टाळ्या वाजवून एन्जॉय केला. घरी आल्यावर आईला तो अनुभव सांगून थकत नव्हती. पिक्चर संपल्यावर म्हणाली की हा पहिला चित्रपट जो मी एकही डुलकी न काढता बघितला कारण दंगाच एवढा चालू होता, झोप यायचा प्रश्नच नव्हता..

पण पिक्चर नुसते शाहरूखचे स्टारडमच नाही दाखवत, तर तो हसवतो, रडवतो, इमोशनल करतो, पुन्हा खुश करतो, एक सामान्य माणूस म्हणून आपला जीव सुखावतो. कारण त्यातला हिरो आणि त्याची हिरोगिरी जरी लार्जर than लाईफ दाखवली असली तरी त्यातील समस्या खऱ्याखुऱ्या आहेत.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या, ऑक्सिजन अभावी सरकारी हॉस्पिटलमध्ये मुलांचा मृत्यू, भ्रष्टाचाराने पोखरलेली सिस्टीम ज्यातून सुरक्षायंत्रणा सुद्धा वाचली नाही. या सर्वात कुठलीही आतिशयोक्ती नाहीये. त्यामुळे ते प्रसंग भिडतात आणि आपल्याला चित्रपटाशी जोडतात.

दुर्दैव असे आहे की या सिस्टीम विरुद्ध लढून कोणी जिंकताना दाखवायचे असेल तर लॉजिक गहाण ठेऊन लार्जर than लाईफ दाखवण्याला पर्याय नाही. पण हा चार घटकांचा खोटा अनुभव देखील आपल्याला आनंद देतो हे तितकेच खरे आहे.

शाहरूखचे महिलांच्या जेलमध्ये जेलर असणे, सिस्टम विरुद्ध लढायला तेथील महिलांची टोळी बनवणे, त्याचे तिथल्या महिलांशी असलेले बॉण्डिंग आणि इमोशनल लव्हेबल प्रसंग जे शाहरूखलाच शोभावेत याचीही रेलचेल आहेच. त्यामुळे शाहरूखचे चाहते यातून सर्व प्रकारचा आनंद घेऊन बाहेर पडणार हे नक्की. एंटरटेनमेंटचा निकष लावता पिक्चरला नाव कुठे ठेवावे हा प्रश्न पडतो.

तरी हा कौतुक सोहळा आवरते घेत जाता जाता एवढेच सांगेन,
यू कॅन लव्ह शाहरूख
यू कॅन हेट शाहरूख
बट यू कॅन नॉट इग्नोर शाहरूख...
त्यामुळे त्याच्या चित्रपटाची नेहमी उलट सुलट चर्चा होतेच.
यात कोण त्याच्या बंडल चित्रपटाचे मुद्दाम कौतुक करते किंवा कोण त्याच्या चांगल्या चित्रपटावर मुद्दाम टिका करते हे समजेनासे होते.
तरी अशा गैरसमजातून कोणी चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघायचे टाळले तर त्यांच्याबद्दल वाईट वाटेल..
आणि म्हणूनच रात्रीचे तीन साडेतीन वाजता पोटतिडकीने हे लिहून काढले. कारण आपल्याला आलेला चांगला अनुभव लोकांशी शेअर करावा हाच नेहमी माझा परीक्षण लिहायचा हेतू असतो. धन्यवाद Happy

ता.क. - My First Movie date with daughter... या अनुभवामुळे कायम लक्षात राहील.. लव्ह यू शाहरूख .. बदाम बदाम बदाम !

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

“ आम्हास शाखा बद्दल अढी नाही. पण शाखाला ट्रोल करणारे एक वेळ परवडले असे शाखाच्या आडून माबोकरांना वेठीस धरल्याने वाटत राहते. >> +७८६ ” - आचार्य आणि असामी Lol

आम्हास शाखा / रोहित शर्मा / MSD बद्दल अढी नाही. पण शाखा / शर्मा / धोनी ला ट्रोल करणारे एक वेळ परवडले असे शाशधो च्या आडून माबोकरांना वेठीस धरल्याने वाटत राहते...

पंत accident मुळे वाचला, नाहीतर या यादीत त्यालाही घ्यायला लागलं असतं...

अरे वाह.. सेम पिंच लोकहो ..
माझ्याही मनात शाहरूख बद्दल अढी नाही !

आज पहिल्यांदा मायबोलीच्या इतिहासात असे घडले.
शाहरूखने भिन्नविभिन्न विचारांच्या सर्व माबोकरांना एकत्र आणले Happy

या अशा धाग्यावर एकट्याने यायचे धाडस कधीच करत नाही.
मध्यरात्री नंतर सुनसान गल्लीबोळातून बाहेरच्या गावावरून परत घरी येताना एखाद्या गल्लीत चार पाच झोपलेले आयडी अंगावर यावेत तशी स्थिती होते. टू व्हीलर असेल तर दोन्ही बाजूंनी हे आयडी धावायला लागतात. आत्ताच चावतील, मगच चावतील ही भीती वाटते. त्या भीतीतून बाजूला पडलेली काठी किंवा दगड घ्यावा तर अचानक एखाद्या घराचा दरवाजा उघडून या आयडींना शिळंपाकं घालणारी एखादी माऊली आपला उद्धार करू लागते. मुक्या आयडींना दगड घालतोस का म्हणून शेलक्या शब्दांनी उद्धार होत असतानाच त्यातला मूळचा जो आयडी ज्याने हे रान उठवलेलं असते ,तो जवळ येऊन चाटायला लागतो, शेपूट हलवायला लागतो...

ते बघून मग आणखी एखादी माऊली म्हणते " बघ गं बघ, कसं मुकं बिचारं दगड खाऊन सुद्धा माया करतंय "
आता आपली खलनायक म्हणून पुरती बदनामी झालेली असतानाच गल्लीचे मालक असलेले एक काका बनियन आणि चट्ट्यापट्ट्याच्या विजारीवर आपला पिच्छा पार या गल्लीतून त्या गल्लीत, घरापर्यंत, ऑफीसपर्यंत करत राहतात. जिथे जाईल तिथे त्या आयडीसाठी चावे घेत राहतात....

आज इतक्या वर्षांनी सुद्धा एखाद्याची ताल सोडून वारेमाप स्तुती केयावर त्यातला फोलपणा दाखवायला जाणार्‍यांची होणारी ही अवस्था ध्यानात आली नाही तर मग चूक आपलीच.

र आ...
काय हाणलंय..
एवढी चपखल रुपकं /के...
वा.. वा..
(शिळंपाकं घालणाऱ्या माऊली तर सगळ्यात जास्त डोक्यात जातात..)

र आ... काय हाणलंय.. >> एकदमच भारी !

शिळंपाकं घालणाऱ्या माऊली तर सगळ्यात जास्त डोक्यात जातात >> ह्यांना पोत्यात घालून दूर कुठे तरी सोडून यावे असे हिंसक विचार नेहमी डोक्यात येतात Lol

" बघ गं बघ, कसं मुकं बिचारं दगड खाऊन सुद्धा माया करतंय "
>>
याच्यावरून आठवलं
"बघा बघा, कसा सत्य वदे वचनाला म्हणतोय..."

मी पाहिला नाही पण ज्यांनीज्यांनी पाहिला त्या सर्वांनी झाडुन समाचार घेतलाय. कोणीही १५-२० मिनिटांवर पाहु शकले नाही. मिष्टर सुनिधी यांनी, “शारुक स्वताच सगळी तिकिटे विकत घेत असेल का?‘ अशी छोटीशी शंकाही उपस्थित केली. मी वाचले.

आज १९८० साली आलेला बासू चटर्जींचा अपने पराये पाहिला. हा कसा मिस झाला कळलं नाही. बघताना सतत जाणवत होतं कि उत्तम चित्रपट म्हणजे आददांड खर्च, वारेमाप व्हीएफएक्स आणि पडदाभर हिंसाचार एव्हढेच फक्त नसते. जे काही मिसिंग आहे ते या सिनेमात आहे.

सलमानचा टायगर ३ आज रिलीज झाल्याची बातमी थेट लोकसत्तेने माझ्या फोन मधे गुगल द्वारे दिलीय . हा बिल्कुल बघणार नाही. कारण पठाण पेक्षा वाईट असण्याची शक्यता आहे.

सलमान हा अभिनय येत नाही किंवा त्याच्या ऑफस्क्रीन कामगिरीमुळे सध्या फ्लॉप झालाय असे नाही तर एकेकाळी तिन्ही खानात, अक्षय, अजय पेक्षा कितीतरी पुढे निघून गेलेला असताना त्याने किक वगैरेंसारखे भंगार सिनेमे करून जनतेची अक्षम्य फसवणूक केली. ट्यूबलाईट असेल किंवा तीनचा फॉर्म्युला वाला त्याचा कुठलातरी function at() { [native code] }अर्क्य चित्रपट असेल, त्यामुळे हल्लीच्या तुफान मार्केटिंग करून दोन आठवड्यात गल्ल्यावर डल्ल मारून जाणार्या सिनेमांचं आकर्षणच उरलेलं नाही. पठाण तर ओटीटी वर सुद्धा नाही पाहिला. टायगर पण नाही बघणार. ब्रह्मास्त्र चे पुढचे भाग सुद्धा पाहण्याची शक्यता नाही. चोप्राज पैकी फक्त विधू विनोद बाकिच्यांना टाटा बाय बाय !

टायगर ३ चा सकाळचा रिव्ह्यू पाहिला. अपेक्षेप्रमाणेच भरकटलेली कथा. तरीसुद्धा सलमान फॅन्स ने त्याच्या एण्ट्रीला थेटरमधे फटाके फोडल्याचा व्हिडीओ त्या फॅन्सची लेव्हल सांगतो. रॉकेट आणि असे फटाके उडवलेत. बाकिच्या प्रेक्षकांची पळापळ झाली. थेटरने पेट घेतला असता तर हेच ओरडले असते. इतके रद्दड सिनेमे येऊनही फॅन्स असणार्‍यांना सलाम !

काल विशिष्ट कारणामुळे जवान पाहिला. साऊथ मधे या थीमवर अनेको चित्रपट येऊन गेलेले आहेत. काहीच नवीन नाही. फक्त मोदी सरकारच्या काळात घडलेल्या घटनांची उजळणी हा युएसपी असावा असे वाटते. डबल रोल चं प्रयोजन गंडलेलं आहे. बाप बदला घेत असतो आणि "तरूण" शाहरूख ड्युटी बजावत मदत करत असतो अशी आखरी रास्ता टाईप मांडणी करता आली असती. बापाला जर काही आठवतच नसतं तर तो एव्हढे स्टंट कसे करतो हे कोडंच आहे.

बापाला जर काही आठवतच नसतं तर तो एव्हढे स्टंट कसे करतो हे कोडंच आहे. >> ते सुरक्षा वरून उचललय. सुरक्षा बॉर्न सिरीज वरून उचलला होता. मसल मेमरी !

बापाला जर काही आठवतच नसतं तर तो एव्हढे स्टंट कसे करतो हे कोडंच आहे
>>>>>

त्याचा काय संबंध?
मासा समुद्रातील एका खडकाला जाऊन आपटला आणि त्याची याद्दाश गेली तरी तो पोहायचे विसरत नाही..

मासा समुद्रातील एका खडकाला जाऊन आपटला आणि त्याची याद्दाश गेली तरी तो पोहायचे विसरत नाही..
>>
कशावरून???

अवैध दारूचा साठा करणारे लोक पोलीसांची रेड पडणार अशी माहिती मिळाली की तो साठा नदीत / समुद्रात ओततात.
त्यानंतर काही काळाने तिथले मासे बेफामपणे पोहतात आणि एकमेकांवर , खडकांवर आपटतात.
जास्त जखमी नाही झाले तर मग डाराडूर झोपतात आणि उठल्यावर एक विशिष्ट समुद्र वनस्पती खातात ज्याने त्यांचे डोके दुखणे थांबते आणि मग आधी सारखे व्यवस्थित पोहु लागतात.

मानव Lol

जवान बघताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे यातला नायक अस्वच्छ आहे. हिरॉईन स्नान करतात हे पडद्यावर पाहिलेले असल्याने यात दीपिकेची अंघोळ दाखवली नाही तरी सूज्ञ प्रेक्षक म्हणून समजून घेतले. पण मोठा शाखा तर बेडवरच असतो, त्यानंतर याददाश जाते. त्याआधीही त्याने अंघोळ केल्याचे ऐकिवात (दर्शनात) नाही. कदाचित त्यामुळेच दीपिका हायकोर्टात अपील न करता फासावर लटकणे पसंत करत असेल. करण जोहरच्या शो मधे सांग्तल्याप्रमाणे तिच्या बॅक अप माईंड मधे तिचा सध्याचा पतीच असल्याने केवळ अंघोळ करत नाही म्हणून त्याला पर्याय शोधण्यापेक्षा ही इहलोकीची यात्रा संपवून स्वर्गाच्या सुवासिक दुनियेत जावं असा विचार तिने केला असणार..... म्हणून त्याला एक डाव माफी देऊ.

पण धाकट्या शाखाने अंघोळ करायला काय हरकत होती ? वास झाकायला जे बँडेज बांधलंय ते ही वासमारेच दिसत होतं.

“ वास झाकायला जे बँडेज बांधलंय ते ही वासमारेच दिसत होतं.” - ते अगदीच ‘वासांसी जीर्णानी‘ होतं. Happy

फेफ Lol

Pages