परीक्षण ए जवान - फक्त आणि फक्त शाहरूख खान !

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 September, 2023 - 18:06

हिरोगिरीचा पिक्चर म्हणजे ज्यात एक हिरो असतो. तो स्टार किंवा सुपरस्टार असतो. तो पिक्चरच्या सुरुवातीला जेव्हा फटा पोस्टर निकला हिरो स्टाईल एक फाडू एन्ट्री घेतो. तेव्हा पब्लिक शिट्टी आणि टाळ्यांनी थेटर डोक्यावर घेते.

जवानमध्ये पिता आणि पुत्र असे दोन हिरो आहेत. दोन्ही शाहरुख आहेत. दोघे मिळून पिक्चर मध्ये जवळपास दहा-बारा एन्ट्री घेतात. आणि प्रत्येक एन्ट्री वेळी.. आय रिपीट.. प्रत्येक आणि एकूण एक एन्ट्रीवेळी पब्लिकच्या शिट्ट्या आणि टाळ्यानी थेटर दणाणून उठते.

माझी नऊ वर्षाची मुलगी जिने जेमतेम पंधरा-वीस चित्रपट थिएटरला पाहिले असतील. ती म्हणाली, पप्पा मी पहिल्यांदाच असा पिक्चर बघतेय जिथे पब्लिक एवढा आरडाओरडा करतेय..
आता तिला काय सांगू, मी सुद्धा माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच हिरोच्या दर नव्या एंट्रीला इतका जल्लोष अनुभवत होतो.

काय ती स्टाईल, काय ती ॲक्शन, काय तो स्वॅग.. येस स्वॅग इज द परफेक्ट वर्ड..
आजवर ही दक्षिण भारतीय हिरोंची मक्तेदारी होती. जी आज शाहरुख ने अक्षरशः मोडून काढली. नक्कीच दिग्दर्शक तिकडचा होता आणि त्याची कमाल यात होतीच. पण तिथली पब्लिक सुद्धा तशीच असते जे हिरोला तसेच डोक्यावर घेते. आपल्याकडे तशी काही पद्धत नसूनही आज मी एका हिंदी पिक्चरला असा माहौल अनुभवत होतो. शाहरूखचे स्टारडम म्हणजे नक्की काय चीज आहे हे मी त्याचा एक कट्टर चाहता असूनही मला नव्याने समजतेय असे होत होते..

पिक्चरमध्ये नयनतारा आहे, विजय सेतुपती आहे, दीपिका आहे, झाल्यास सरप्राईज पेकेज संजूबाबा आहे, शाहरुखच्या टोळीतील मुलींनी देखील मस्त काम केले आहे, दिग्दर्शक नावाजलेला आहे, का ते पिक्चर बघून समजते, बॅकग्राऊंड म्युझिक नुसता राडा घालते, गाणी फार श्रवणीय नसली तरी कोरिओग्राफी प्रेक्षणीय आहे. बोलायला बरेच काही आहे. पण आज शाहरूख पलीकडे काही सुचणे अवघड आहे.

जर पठाणने खरेच हजार कोटी कमावले असतील तर हा दहा हजार कोटी डिझर्व्ह करतो.
पण....
या पिक्चरची पठाणशी तुलना देखील करू नका. म्हणजे हा वेगळ्या धाटणीचा पिक्चर आहे ते सोडा. म्हणजे पठाण हॉलीवुड स्टाईल ऍक्शनपट बनवण्याचा प्रयत्न होता. तर हा दक्षिण भारतीय मसालापट आहे त्यामुळे शैली भिन्न आहेच. पण दोन्हीतील शाहरूखची तुलनाच नाही. पठाणचा शाहरूख यापुढे फार सामान्य भासला. आजवर कधी असा शाहरूख पाहिला नव्हता. कोणी कल्पनाही करू शकत नाही अश्या शाहरूखची..

त्यामुळे जा, उठा, तिकीट बुक करा आणि थिएटरमध्ये जाऊनच बघा. नुसते मोठ्या पडद्यावर बघायला म्हणून नाही तर तो माहौल तुम्ही तिथेच अनुभवू शकता. माझ्या मुलीने देखील टाळ्या वाजवून एन्जॉय केला. घरी आल्यावर आईला तो अनुभव सांगून थकत नव्हती. पिक्चर संपल्यावर म्हणाली की हा पहिला चित्रपट जो मी एकही डुलकी न काढता बघितला कारण दंगाच एवढा चालू होता, झोप यायचा प्रश्नच नव्हता..

पण पिक्चर नुसते शाहरूखचे स्टारडमच नाही दाखवत, तर तो हसवतो, रडवतो, इमोशनल करतो, पुन्हा खुश करतो, एक सामान्य माणूस म्हणून आपला जीव सुखावतो. कारण त्यातला हिरो आणि त्याची हिरोगिरी जरी लार्जर than लाईफ दाखवली असली तरी त्यातील समस्या खऱ्याखुऱ्या आहेत.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या, ऑक्सिजन अभावी सरकारी हॉस्पिटलमध्ये मुलांचा मृत्यू, भ्रष्टाचाराने पोखरलेली सिस्टीम ज्यातून सुरक्षायंत्रणा सुद्धा वाचली नाही. या सर्वात कुठलीही आतिशयोक्ती नाहीये. त्यामुळे ते प्रसंग भिडतात आणि आपल्याला चित्रपटाशी जोडतात.

दुर्दैव असे आहे की या सिस्टीम विरुद्ध लढून कोणी जिंकताना दाखवायचे असेल तर लॉजिक गहाण ठेऊन लार्जर than लाईफ दाखवण्याला पर्याय नाही. पण हा चार घटकांचा खोटा अनुभव देखील आपल्याला आनंद देतो हे तितकेच खरे आहे.

शाहरूखचे महिलांच्या जेलमध्ये जेलर असणे, सिस्टम विरुद्ध लढायला तेथील महिलांची टोळी बनवणे, त्याचे तिथल्या महिलांशी असलेले बॉण्डिंग आणि इमोशनल लव्हेबल प्रसंग जे शाहरूखलाच शोभावेत याचीही रेलचेल आहेच. त्यामुळे शाहरूखचे चाहते यातून सर्व प्रकारचा आनंद घेऊन बाहेर पडणार हे नक्की. एंटरटेनमेंटचा निकष लावता पिक्चरला नाव कुठे ठेवावे हा प्रश्न पडतो.

तरी हा कौतुक सोहळा आवरते घेत जाता जाता एवढेच सांगेन,
यू कॅन लव्ह शाहरूख
यू कॅन हेट शाहरूख
बट यू कॅन नॉट इग्नोर शाहरूख...
त्यामुळे त्याच्या चित्रपटाची नेहमी उलट सुलट चर्चा होतेच.
यात कोण त्याच्या बंडल चित्रपटाचे मुद्दाम कौतुक करते किंवा कोण त्याच्या चांगल्या चित्रपटावर मुद्दाम टिका करते हे समजेनासे होते.
तरी अशा गैरसमजातून कोणी चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघायचे टाळले तर त्यांच्याबद्दल वाईट वाटेल..
आणि म्हणूनच रात्रीचे तीन साडेतीन वाजता पोटतिडकीने हे लिहून काढले. कारण आपल्याला आलेला चांगला अनुभव लोकांशी शेअर करावा हाच नेहमी माझा परीक्षण लिहायचा हेतू असतो. धन्यवाद Happy

ता.क. - My First Movie date with daughter... या अनुभवामुळे कायम लक्षात राहील.. लव्ह यू शाहरूख .. बदाम बदाम बदाम !

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

“ नि तू मंदाकिनीसारख्या त्या धबधब्यामधे सचैल स्नान करतो आहेस तर आनंदाने कर ना बाबा - आम्हाला त्यात खेचून त्याचा सर्वजनिक हमामखाना कशाला बनवायला हवा. काय त्रास आहे !” - Rofl असामी!!

क्रिं-जवान >>> याला एक जोरदार सुपरलोल अस्मिता Lol

मी अजून पाहिलेला नाही. पण हे सगळे पीआर-हिट्स आहेत असेच दिसते. आपल्या आसपास थिएटर मधे जाउन बघितलेले लोक शोधून सुद्धा सापडत नाहीत. कोणताही "खरा" हिट पिक्चर हा कोणाच्याही ओळखीतल्या खूप लोकांनी थिएटर मधे बघितलेला असतो - शोधावे लागत नाहीत. बाकी कमाईचे आकडे आजकाल इतर सोर्सेस ऑफ रेव्हेन्यू मधूनही येतात. खरे हिट्स म्हणजे चेन्नई एक्सप्रेस, दंगल.

आणि बॉलीवूड वाल्यांनी ती साउथची 'अ‍ॅक्शन' कॉपी करणे हे महा-दयनीय आहे. आता उद्या काय त्या केजीएफसारखे खाणीत फायटिंग का? लेको तुम्हाला स्वतःची पर्सनॅलिटी आहे, स्वतःची स्टाइल आहे. ही भंपकगिरी तुम्हाला करायची काय गरज आहे!

लेको तुम्हाला स्वतःची पर्सनॅलिटी आहे, स्वतःची स्टाइल आहे. ही भंपकगिरी तुम्हाला करायची काय गरज आहे! >> +१ ... बाहुबली , केजीएफ नि पुष्पा वगैरे च्या आकड्यांंमूळे डोळे पांढरे झाले रे.

च्र्प्स - फायटिंग करू नका असे नाही. साउथ मधे एक हीरो नुसता रस्त्याने चालला तर तेथे वादळे येतात. आजूबाजूच्या गाड्या पन्नास फूट हवेत उडून समरसॉल्ट्स मारतात. असले प्रकार हिंदीत नकोत.

साउथ मधे एक हीरो नुसता रस्त्याने चालला तर तेथे वादळे येतात. आजूबाजूच्या गाड्या पन्नास फूट हवेत उडून >> इथे तर हिरो मेट्रो मध्ये आहे मेट्रो मध्ये! एवढं तर करूच शकतो बॉस !!!
घाटकोपर - अंधेरी मेट्रो म्हणून चेंबूर - वडाळा का दाखवली आहे याचं गुपित ही त्यातच आहे. अंधेरी म्हणजे ईशान्येस झालं असतं. पण वडाळा म्हणजे साऊथ (ऑफ चेंबूर). आता फा च वाक्य परत वाचा. साऊथ कडे हीरो... आता रिसर्च चे कौतुक सोडून तुम्ही छिद्रान-वेशी लोक ....

असामी,
झर्याखाली आंघोळ करणारी मंदाकिनी एकच होती. शाहरूखचे चाहते करोडो आहेत. जगभरात आहेत. प्लीज आता विरोधाला विरोध म्हणून हे अमान्य करू नका.

तरी मी हे गूगल सर्च केले

Most hardworking actor in Bollywood

आणि मला हे एकच नाव मिळाले.
(अर्थात मोस्ट म्हटले की एकच नाव येणार. याचा अर्थ बाकीचे नाहीत असे नाही)

Shah Rukh Khan: Nothing in life comes easy and it holds true for King Khan. One of Bollywood's most hardworking actors, SRK lives a crazy life literally. Extremely professional and disciplined, SRK is good at time management too.

फेरफटका
चित्रपट हाऊसफुल आहे म्हणून बघणाऱ्या सगळ्यांना आवडला आहे असे नसते हे मान्य.

पण
जो चित्रपट पहिल्या दोन आठवड्या नंतर देखील चालत आहे तो लोकांना आवडत आहे म्हणून चालत आहे असे म्हणू शकतो. अन्यथा लोकांनी नाकारले तर कितीही मार्केटींग करा. मोठमोठ्या बॅनरचे चित्रपटसुद्धा फ्लॉप होतात.

असो,
तुम्ही तुमच्या हाऊसफुल थिएटरचे नाव सांगाल का?
इथे बरेच जण चित्रपट हाऊसफुल आहे आणि लोकं बघत आहेत हे देखील अमान्य करत आहेत.

मी स्वतः हाऊसफुल शो पाहिला.
माझ्या मुलीने सोसायटीतील मैत्रिणींसोबत तिसऱ्या आठवड्यात दुसऱ्यांदा पाहिला तेव्हा मधला वार असून सुद्धा शो हाऊस फुल होता. तेव्हाही शिट्ट्या टाळ्या. माहोल होता. मुलांनी तर सीटवर उभे राहून नाच केला. माझ्याकडे व्हिडिओ सुद्धा आहे त्याचा. माझ्या स्टेटसवर काहींनी पाहिला देखील असेल.

आचार्य म्हणतात 137 करोड लोकसंख्या असलेल्या देशात दोनचार करोड लोकांनी चित्रपट पाहिला तर तो हिट कसा?

आपल्या देशात खरेच किती लोकांना परवडते थिएटर मध्ये जाऊन चित्रपट बघणे?
किती लोक खेड्यात राहतात?
किती लोकांना मुळातच चित्रपटाची आवड असते?
हे आणि असे कैक फिल्टर लावले तर काय आकडा शिल्लक उरेल?
त्यातही आज मनोरंजनाचे इतके पर्याय उपलब्ध असताना, चित्रपट ओटीटी वर येत असताना, पायरेटेड कॉपी निघत असताना यातले देखील किती जण थेटरला जाऊन बघत असतील....?

बॉस.. काही करोड हा खूप मोठा आकडा आहे थेटर ला जाऊन पिक्चर बघणारयांसाठी....

जर हे इतके सोपे असते तर उठसूट कुठलाही पिक्चर हजार करोड किंवा गेला बाजार 200 करोडचा तरी नक्कीच झाला असता..
अरे मीच माझा जॉब सोडून पिक्चर काढला असता Lol

लेको तुम्हाला स्वतःची पर्सनॅलिटी आहे, स्वतःची स्टाइल आहे. ही भंपकगिरी तुम्हाला करायची काय गरज आहे!
>>>>>

हेच तर खासियत आहे शाहरुखची...
तो सर्व करू शकतो.
तो किंग ऑफ रोमान्स आहेच..
सिक्स पॅक वाली ॲक्शन सुद्धा त्याने केली..
रावण सारखा वीएफएकस चित्रपट देखील पहिल्यांदा तोच घेऊन आला..
हॉलीवुड स्टाईल पठाण हिट केला..
आता साउथ स्टाईल एक मसालापट जवान हिट केला..
याचा अर्थ असा नाही की तो तिकडेच अडकून पडणार..
मी सगळे जॉनरचे चित्रपट करू शकतो हे सिद्ध केले आहे त्याने.. एका चाहता म्हणून मला अभिमानच आहे त्याचा.

जवान हा जवान लोकांनाच कळतो.. इथे पस्तीस क्रॉस केलेले अंकल आणि तीस क्रॉस केलेले अँटी लोक आहेत.. त्यांना नाही समजणार ऋणमेश.. हा क्लबच वेगळा आहे…
Submitted by च्रप्स on 5 November, 2023 - 20:12
>>>>>>

मी स्वतः देखील त्या वयात पोहोचलो आहे जिथे मुलांचे फ्रेंडस अंकल हाक मारतात Happy मी त्यांच्यातच जास्त रमतो ती गोष्ट वेगळी..

पण तुमचा वयाचा मुद्दा योग्य आहे. मायबोलीचे सरासरी वय जास्त आहे. आणि ते वाढतच आहे. त्यामुळे इथली बरीच मते आणि आवडी निवडी मला देखील बाहेरच्या जगापेक्षा वेगळी वाटतात जिथे मी वावरतो. यात कोणाच्याही आवडीनिवडी चुकीच्या आहेत किंवा त्यांना हलके लेखायचे आहे अशातला भाग नाही. पण ही जनरेशन गॅप आपण सर्वांनीच स्वीकारली पाहिजे. येत्या पिढीच्या आवडी आपल्याला पटत नाही म्हणून त्या आवडीला आपण देखील नावे ठेवता कामा नये.

किबाहूना शाहरूखने वेळोवेळी स्वताला सिद्ध करत आणि काळानुसार बदलत प्रत्येक जनरेशनला त्याच्या आवडीचे दिले आहे. म्हणून तो आमच्या घरात सुद्धा तीन जनरेशनना आवडतो Happy

असामी,
झर्याखाली आंघोळ करणारी मंदाकिनी एकच होती. शाहरूखचे चाहते करोडो आहेत. जगभरात आहेत. प्लीज आता विरोधाला विरोध म्हणून हे अमान्य करू नका. >> अरे तुम्हा सर्वांना एकत्र आंघोळ करायची आहे तर हरकत घेणारा मी कोण रे बाबा ? मला त्यात खेचू नका एव्हढी क्षुल्लक अपेक्षा बाळागू शकत नाही का प्लीज ? 'मला हा सिनेमा का नि कधी आवडला असता' ह्याचे कारण मी दिल्यावर 'बाकीच्यांना तो का नि कधी आवडला' ह्याचा संबंध गूगल करुन कसा मिळणार ? प्लीज आता लिहायचे म्हणून काहीही लिहू नकोस. वर ह्यात परत हार्ड वर्क कसे आले हे तुझे तूच ठरव. (आता माबो वर कसला संबंध कशाला जोडणे हे हार्डवर्क आहे वगैरे म्हणू शकशील हवं तर Wink )

मला स्वतःला शाहरूख खान सोबत झर्‍याखाली अंघोळ करण्यापेक्षा (त्या वयातल्या ) मंदाकिनी बरोबर एकत्र....
झरा झुळुझुळू वाहताना पाहणे जास्त आवडेल.

बॉक्स ऑफिस कमाईचे आकडे खरे खोटे करणे आवडते अश्यांच्या बुद्धीला अजून थोडे खाद्य Happy

Tiger 3 advance booking: Salman Khan starrer among top 3 advance collections of 2023; Fails to beat Shah Rukh Khan's Jawan

शाहरुख को सिर्फ एक ही बंदा हरा सकता है...

खुद शाहरूख !

जवान हा जवान लोकांनाच कळतो.. इथे पस्तीस क्रॉस केलेले अंकल आणि तीस क्रॉस केलेले अँटी लोक आहेत.. त्यांना नाही समजणार ऋणमेश.. हा क्लबच वेगळा आहे…
Submitted by च्रप्स on 5 November, 2023 -
काय रे चपड तू जवान आहे का म्हातारा?

काल बघायचा प्रयत्न केला. महाभिकार सिनेमा!
हे असलं तरुण पिढीला आवडत असेल तर अवघड आहे.

मैत्रीयीला अनुमोदन...आज बघण्याचा प्रयत्न केला अक्षरशः १५-२० मिनिट सुद्धा बघु शकणार नाही इतका बन्डल मुव्ही आहे...

सेम हिअर - १५-२० मिनीटेच पाहिला आहे. कंटाळा येउन बंद केला. एक शॉट सलग नॉर्मल स्पीड मधे नाही. दर मिनिटांनी सर्र्कन स्लोमो करून पॉज. प्रत्येकाची "काय भारी एण्ट्री आहे बघा" पोज. बोअर झाला. नयनतारा आली आणि आणि काहीतरी निगोशिएशन होणार आहे इथपर्यंत आलो आहे. त्याआधी ती फॅमिली मॅन मधली हिरॉइन आली मला आधी तीच नयनतारा आहे असे वाटले.

धन्यवाद फा.

काय भारी एण्ट्री आहे बघा" पोज
आणि पोकळी >>>> Lol आधी वारं सुटतं मग हिरो जितका बुटका तितका खालून, कदाचित (शब्दशः) खड्ड्यातही जात असतील कॅमेरा ॲन्गल फिरवताना. जुनीच दारू होती मग बाटली तरी नवीन द्यायची.

अजय देवगण, सलमान खान, आमीर खान, शाहरुख खान, सैफ अली खान, वरूण धवन ह्यांची बांधा आणि उंची आकर्षक नाही. त्यांच्यामुळे हिरवनींना हिल्स घालता येत नाहीत.

डंकी बघायचा आहे राजू हिरानी साठी. त्याच्या वर आताच धागा काढून मूड घालवू नये ही नम्र विनंती.

आम्हास शाखा बद्दल अढी नाही. पण शाखाला ट्रोल करणारे एक वेळ परवडले असे शाखाच्या आडून माबोकरांना वेठीस धरल्याने वाटत राहते. टायगर ३ चा धागा आलेला नाही म्हणजे तो चालावा अशी इच्छा दिसतेय. चुकून जवान आणि पठाण चालले.

वयाचा मुद्दा पटला नाही.
आपल्यासारख्या millenials साठी Fourty is the new thirty (-even twenty five). आपण आपल्या आईवडीलांपेक्षा त्या-त्या वयात जास्त वैचारिक स्पष्टता असलेले, ॲक्टिव्ह, कॉन्फिडन्ट, तरूण आणि आकर्षक आहोत. आंतरजालाच्या मदतीने आपण धारदारही राहू शकतो. हा काळच वेगळा आहे. वी शुड बी थॅन्कफुल.

आपल्यासारख्या millenials साठी Fourty is the new thirty (-even twenty five).
>>
हिंदी सिनेमा च्या बाबतीत तर नक्कीच

आपल्या आधीच्या पिढीचे बऱ्यापैकी हीरो ज्या वयात मुख्य भूमिकेतून चरित्र भूमिकेत गेले होते, त्या वयात आपल्या पिढीचे हीरो अजूनही मेन लीड आहेत
ते रेलेव्हंट आहेत कारण आपणही आहोत...

फक्त जवान टाईप गोष्टी त्यांनी करू नयेत इतकी माफक अपेक्षा...

आम्हास शाखा बद्दल अढी नाही. पण शाखाला ट्रोल करणारे एक वेळ परवडले असे शाखाच्या आडून माबोकरांना वेठीस धरल्याने वाटत राहते. >> +७८६ Lol

Pages