हैदराबादी बोली, हैदराबादी स्वॅग

Submitted by अनिंद्य on 18 July, 2022 - 07:56

(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)

हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.

नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.

पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.

तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !

आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.

तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां Happy

कित्तेबी आये तो कमीच है Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Lol

म्हणून पूर्वी बायकांनी नवर्‍याच्या चरणांशी राहावे म्हणत. बेगमला ते पाय लगेच ओळखता आले असते. लक्ष्मणाने पैंजणे ओळखली तसे Happy

…. बेगमला ते पाय लगेच ओळखता आले असते…

हा हा हा, खराय !

पण मग ही एम्पॉवर्ड बेगम सिरीज़ जन्मली नसती Proud

खरी गंमत भाषेच्या लहेजाची आहे. Lol
अनिंद्य, 'दावत ए ईश्क' नावाचा सिनेमा तुम्हाला आवडेल असं वाटतंय. अनुपम खेर व परिणिती चोप्रा यांची हीच भाषा आहे व लखनौची खास मेजवानी आहे. सिनेमा हलकाफुलका आहे. मला आवडला होता. Happy

बीड़ी जलाईले झकास !

लिहाफ़ आणि गिलाफ पांघरूण म्हणून समानार्थी वापरतात पण सूक्ष्म फरक आहे

लिहाफ़ = पांघरूण आणि गिलाफ म्हणजे cover, उदा. तकिया गिलाफ = उशीचे अभ्रे

BTW, “लिहाफ़” ही इस्मत चुगताईंची कथा उर्दू साहित्यात मैलाचा दगड मानली जाते

बेटा इस्कुल से रोतावा घर कू आया.

अम्मी : कायकू रोरा रे नामुराद ?

बेटा : टीचर मारी मेरे कू

अम्मी : कायकू मारी वो चुडैल तेरे कू ?

बेटा : मै मुर्गी बोला उस कू

अम्मी : अरे हौले, काय कू ऐसा बोला रे ?

बेटा : काय कू बोले तो ? हर एक्साम मे मेरे कू अंडाच देरी ना वो Proud Proud

Lol

आणि त्याला जाब विचारताना ही स्वतः तिला चुडैल म्हणत आहे Happy

एक और लतीफा :

बेगम: अम्मी की सुनती, शादी के वास्ते तुम कू ना बोलती तो आज खुश रहती मैं देखो

शौहर: मतलब ? तुम्हारे अम्मी कू मेरा रिश्ता पंसद नै था ? वो मेरे से शादी को नक्को बोले थे ?

बेगम: हौ. उनों मना किए थे मेरे कू…

शौहर : खुदा रहम ! और मैं उस भली औरत कू बेकार मे बुरा बोलरा कित्ते दिनों से Proud

अनिंद्य, Proud

हे लतीफे ऑडिओ क्लिप्स मध्ये ऐकायला किती मज्जा येईल...!

विडिओ स्वरूपात असतात की युट्युब वर...

हो हो, बरेच चॅनेल्स आहेत.

मी लिहिलेले काही किस्से मात्र नाहीत त्या चॅनेल वर.

'एम्पॉवर्ड बेगम सिरीज' तर फक्त माबोकरांच्या प्रेरणेने (हा मजेशीर शब्द सामो यांनी कॉइन केलाय) माबोसाठी निर्माण झालेले फ्रेश कंटेन्ट आहे Happy

>>>>>>.'एम्पॉवर्ड बेगम सिरीज' तर फक्त माबोकरांच्या प्रेरणेने माबोसाठी निर्माण झालेले फ्रेश कंटेन्ट आहे
Happy

Pages