भाग ६
मंगेश त्याच्या कामात खरच बेस्ट असावा. लकी त्याच्याकडे रिलॅक्स होता. सिद्धीने "गो चॅम्प!" म्हंटल्या म्हंटल्या तो मंगेशच्या मागोमाग घरात आतल्या बाजूला गेला देखील न कुरकुरता.
"बघ म्हंटलं होतं ना मी he is the best"
"खरय. He is the best" तिला उत्तर देताना मनात मात्र येऊन गेलं, "ही माझ्याबद्दल कधी, म्हणेल असं?”
त्यांच्यातला स्ट्रॉंग बॉंड स्पष्ट दिसत होता. फक्त मैत्री पुरता मर्यादीत नसावा असं सिक्स्थ सेन्स सांगत होता. आज च्यायला या सिक्स्थ सेन्सच्या. त्यादिवशी नकार द्यायचं ठरवलं दोघांनी त्यावेळी का बुडी मारुन बसलेला हा सेन्स? नकार कळवताना मधे काही अडथळे नाही आले आणि आता लॉजिक गुंडाळून ठेवून मनाच ऐकावं ठरवलय तर इतके स्पर्धक वाटेत यावेत? यापेक्षा लकी सोबतची बंपी राईड कमी बंपी होती. कुछ तो कर अवी. वरना तेरी रमी तो कभी ना लगने वाली. शूज काढून आत येताना मनात ही सगळी रोलर कोस्टर राईड सुरु होती.
जोरदार किंचाळ्या ऐकू आल्या म्हणून दचकून मी समोर बघितलं. दोन मुली किंचाळत, हसत एकमेकांना मिठी मारत होत्या आणि त्यातली एक सिद्धी होती.
"त्या अशाच भेटतात कायम. नॉर्मल आहे हे. तू का अवघडून बसलायस. बस की आरामात" पाठीवर थाप मारत मंगेश मला म्हणाला.
"ही माझी बायको सारीका" त्याने सिद्धीला मिठी मारणाऱ्या मुलीची ओळख करुन देत म्हंटलं.
"आणि माझी चुलत बहीण" सिद्धीने पूर्ण दात दाखवत हसून सांगितलं.
"ओह! मंगेश तुझ्या बहिणीचा नवरा आहे तर"
"नाही. सारीका माझ्या मित्राची बायको आहे." तिने म्हंटले.
“दोन्हीत फरक आहे?”
"हो मग. फरक आहेच. मी असं म्हंटलं की मंगेशचा इगो सुखावतो आणि मग तो ओव्हर प्रोटेक्टिव्ह भावासारखा न वागता एका मित्रा सारखा वागतो"
“ओके आणि..”
"आणि रात्र झालेय, घरी एकटी कशी जाशील? असे प्रश्न न विचारता फक्त राईड शेअर कर. घरी पोहोचलीस की कळव या दोन वाक्यावर मांडवली करतो" हे वाक्य तिने मंगेश आणि सारीकाकडे बघत ऐकवलं आणि मंगेशने फक्त "बोलू आपण जेवल्यानंतर" असं तिला सांगत माझ्याकडे बघितलं.
मला जेवणापेक्षा परतीच्या प्रवासात जास्त इंटरेस्ट होता पण असं डायरेक्ट दाखवून चालणार नव्हतं.
जेवल्यानंतर मंगेश लकीला खाणं द्यायला बाहेरच्या शेडमध्ये घेऊन गेला. जाताना सिद्धीलाही चल म्हणत सोबत घेऊन गेला.
चिन्याशी बोलायला मी फोन लावला तेव्हा ताई आणि जिजूशीही थोडंफार बोलणं झालं. अजून आठवडाभर तरी त्यांना तिथे रहावे लागणार हे समजलं. "डॉक्टर राऊंडवर आलेत एक दहा मिनिटात फोन करतो, मंगेशशी पण बोलेन त्यावेळी" असं म्हणत त्याने फोन कट केला. तिथे नुसते बसून करण्यासारखे काही नव्हते म्हणून मी शेड जवळ आलो तेव्हा त्या दोघांच बोलणं माझ्या कानावर पडलं.
"रजतला नाही म्हणालीस, ठीक. पण अरेंज मॅरेज करत्येस ना, मग ते काय ‘लव्ह अॅट फर्स्ट साईट’ सारखं असायला हवं का? कनेक्षन डेव्हलप व्हायला वेळ द्यावा लागतो." मंगेशचा आवाज स्पष्ट ऐकू आला.
तिला नसेल कनेक्टेड वाटलं आणि म्हणून नाही म्हणाली असेल तर याला काय प्रॉब्लेम आहे? मी इथे मनातल्या मनात चरफडून काय होणार म्हणा.
“त्याचं एक जाऊदे पण आसावरी म्हणाली की स्वरुपलाही नाही म्हणालीस? का? तो तर मित्र आहे ना? कनेक्षनचाही प्रश्न नाही. त्याला का नाही म्हणालीस हे शोध. Find and fix it” परत मंगेशचा चढा आवाज ऐकू आला.
याचा प्रॉब्लेम काय आहे? ती २७ ची आहे १७ ची नाही. सगळ्या जगाला नाही म्हणेना का, मर्जी तिची. मलाही म्हंटलंय नाही. त्याबद्दल काही ऐकवलं नसेलच या मंग्याने. माझ्या चरफडीला कोण भीक घालणार म्हणा. मी स्वतःही नकार देण्याचा गाढवपणा करुन झालाय. पण तरी ते काय ते find and fix it मधलं it नक्की काय आहे कळेपर्यंत चैनही नाही पडणार.
"आम्हाला काय कारण वाटतय तुला माहिती आहेच. तुलाही तेच वाटत असेल तर fix it. आणि सेकंड चान्स वगैरे वर तुझा विश्वास नाहीये असंच गेलं वर्षभर सांगत्येस आम्हाला याचाही शांतपणे विचार कर." त्याच्या या बोलण्यावर तिने काय उत्तर दिले समजले नाही कारण तोपर्यंत माझा वास येऊन लकीने भुंकून माझं लक्ष वेधायला सुरुवात केली होती.
त्याच्या भुंकण्यामुळे बोलणं थांबवून ते ही पुढे आले आणि मी ही नुकताच आतून आलोय असं भासवायच्या प्रयत्नात चिन्याला बोलायचं होतं म्हणून शोधत आलो असं म्हणत खरोखर फोन लावून मंगेशकडे दिला. फोन माझ्याकडून हातात घेताना ज्या नजरेने त्याने माझ्याकडे बघितलं त्यावरून मी सपशेल उघडा पडलो हे मलाही कळलं. पण त्याने त्याबद्दल काही सुनावलं नाही हे माझं नशीबच.
चिन्याला रोज फोटो आणि व्हिडीओ पाठवून अपडेट देईन लकीचे असं सांगून फोन कट करत त्याने माझ्याकडे परत दिला आणि मग आम्ही ओला राईड बूक करुन निघालो.
निघताना लकीला बाय करायला गेलो तर तो सगळ्यात पहिले माझ्याकडे आला. डोकं पायावर घासून मग तो सिद्धीकडे गेला. मी त्याच्यासाठी फार काही केलं नव्हतं तरी त्याने मला त्याच्या जगात सामावून घेतलं होतं. सिद्धीच्या जगात छोटी का होईना जागा हवी असेल तर लकी आणि मंडळींना माझ्या जगात प्रवेश द्यायला हवा हे मात्र मनात पक्क झालं.
आमची ओला राईड सुरु झाली. डेस्टिनेशन पर्यंत जायचा मॅप समोर दिसायला लागला.
डेस्टिनेशनला पोहोचायच्या आधी सिद्धीपाशी विषय काढायचा तर होता पण नेमका कशा पद्धतीने काढावा याबद्दल मनात द्वंद्व सुरु होतं.
मनात मांडणी सुरु होती. थोडावेळ शांततेत गेला. शेवटी विचार केला यात उडी मारावी वाटतेय यामागे काही लॉजीक नाही मग काय बोलू कसं बोलू याची लॉजिकल मांडणी तरी हवेय कशाला?
"सिद्धी विनायक" मी मनाचा हिय्या करुन तिला हाक मारली
“Yes मिस्टर अवनीश”
“मला तुझ्याशी काही बोलायचय.”
“हम्म! ऐकतेय”
“मगाशी तुमचं बोलणं मी ऐकलं”
तिने चमकून पाहिलं
“I swear मुद्दाम नाही. मुद्दाम अजिबात नाही. चिन्याला बोलायच होतं म्हणून शोधत आलो तेव्हा कानावर पडलं.”
“हम्म!”
“अरे! सिद्धी यार नुसतं हम्म नको. डोकं त्याबद्दलच विचार करतय. काय असेल ज्याबद्दल तो तुला find and fix it म्हणाला. आणि सेकंड चान्सवर तुझा विश्वास नाही असं का?”
“काय फरक पडतो?”
“म्हणजे?”
“म्हणजे हे काय आहे ते कळलं किंवा नाही कळलं फरक पडणार आहे का?”
“फरक पडतो म्हणून तर विचारतोय. डोक्यात निरनिराळ्या कहाण्या जन्म घेऊन युद्ध करतायत इथे. तुझ्या उत्तराने हे वॉर तरी कमी होईल.”
एकदा तिने ओला ड्रायव्हरकडे नजर टाकली. एकदा वाटलं हे असं तिसरी व्यक्ती बरोबर असताना नकोच होतं विचारायला. मी तिला तसं म्हणणारच होतो पण तिने तोपर्यंत बोलायला सुरुवात केली.
“दोन वर्षांपूर्वी माझं ब्रेक-अप झालं. आमच्या ब्रेक-अपचं एक कारण आमच्या दोघांचे प्रोफेशनल इंटरेस्ट वेगळे असणे हे होतं. त्याहूनही पेट्सशिवाय आयुष्य माहिती नसलेली माणसे आणि पेट्स आयुष्यात सहन न होणारी माणसे या रेषेच्या अलिकडे पलिकडे आमच्या दोघांचे जग फिरत होते. ही मधली रेषा ओलांडणे दोघांनाही शक्य नाही झाले"”
मी काही तरी बोलणार होतो पण तिने हातानेच थांबवलं आणि बोलणं पूर्ण करुदेत आधी असं सांगितलं म्हणून मी ही थांबलो.
“आमची सुरुवात एकमेकांविषयी आकर्षण वाटलं म्हणूनच झाली. त्यानंतर आम्हाला एकमेकांशी गप्पा मारायला आवडतात हे समजलं. दोघेही फुडी होतो सगळं छान छानच होतं.
त्यावेळेस मी वॉलेंटिअरिंग करत होते अॅनिमल शेल्टरमधे. महिन्यातून एक दिवस किंवा कधीतरी दोन तास, मी तिथे वेळ देत होते तोपर्यंत ठीकच होतं.
आम्ही भेटलो त्यावर्षीच खरंतर मी डॉग ट्रेनर म्हणून ट्रेनिंग पूर्ण करुन एका ट्रेनरकडे अनुभव घेत होते. म्हणजे प्रपोज करताना माझं प्रोफेशन हेच असणार हे त्याला माहिती होतं.
पण तो अजिबात पेट पर्सन नव्हता आणि माझ्याकडे तर झुबी आली होती तोपर्यंत.
आम्ही त्यावेळी म्हणायचो हा एक अॅस्पेक्ट आम्ही एकमेकांच्या जगाची घडी न विस्कटता सेपरेट ठेवून मॅनेज करु. पण असं नाही होतं.
झुबी माझ्या जगाचा एक भाग होती आणि त्याच्या जगात फक्त माझ्यासाठीच जागा होती. आम्ही तेव्हा काहीतरी मधला मार्ग काढायला हवा होता पण आम्ही त्या ऐवजी एकमेकांना बदलायला गेलो आणि तोंडावर आपटलो. ब्लेम गेम सुरु झाले, सरकॅझम उग्र पद्धतीने बाहेर आला आणि संपलं नातं एक कडवटपणा मागे ठेवून. त्या नंतर जो राग, गिल्ट, बर्निंग इफेक्ट्स राहिले ते जाण्यासाठी मला स्वतःलाच पेट थेरपी घ्यावी लागली. गेल्या वर्षी येऊन त्याने माफी मागून परत संधी देण्याची रिक्वेस्ट केली पण माझ्या बाजूने काही उरलच नव्हतं ज्यासाठी परत एकमेकांना संधी द्यावी.
त्यानंतर मी ठरवलं. पेट्स ज्याच्या जगात असतील अशा व्यक्तीचीच निवड करायची. अरेंज मॅरेज इतकी तर सवलत नक्कीच देतं ना तुम्हाला”, ती म्हणाली
मी काही न बोलता पाण्याची बाटली पुढे केली आणि तिनेही काही न बोलता ती तोंडाला लावली. मधे जरा वेळ फक्त शांतता बोलत होती.
“तर हा आहे माझा भूतकाळ. पण सध्या प्रॉब्लेम असा झालाय की माझ्या पेट्सवाल्या क्रायटेरियात बसणाऱ्या व्यक्तीला भेटूनही मला तिथे पुढे जावे असे वाटत नाहीये. याच्या कारणापासून मी पळतेय असं आसावरी, सारिका, मंगेश सगळ्यांनाच वाटतय. ते Find & Fix it म्हणाले असले तरी मला कारण माहिती आहेच. ते शोधायची गरज नाहीये मला. Fix it तेव्हढं नाही जमलंय अजून, का ते मात्र विचारु नकोस आत्ता.” ती म्हणाली आणि ते कारण मी माझ्या फेवरमधे असेल असं मानून पुढचं बोलूनच टाकलं
“ठीक आहे. आज नाही विचारत. पण आता माझा भूतकाळ सांगतो. चालेल?”
“ऐकतेय.”
“माझ्या जगात मी अत्यंत सुखी होतो आणि माझ्या टर्म्सवर जगत होतो. मग एक दिवस ती माझ्या जगात आली. सुरवातीला मला लक्षातंही नाही आलं तिने आत जागा केलेय. मी तर समजत होतो आमचं जगच वेगळं आहे. पण तिचे विचार आले मनात की छान वाटायचं. तिचा मेसेज आला की शीळ घालावी वाटायचं. लॉजिक नव्हतं कळत पण काही गोष्टींचं लॉजिक शोधायचं नसतं हे ही तिनेच लक्षात आणून दिलं. रमीत प्युअर सिक्वेन्स लागला होता पण पत्ता खाली टाकल्यावर समजलं हे आणि आता समजतय की ती सेकंड चान्सच देत नाही.”
सुरवातीला गंभीर होऊन ऐकत असलेल्या तिच्या चेहऱ्यावर आधी संभ्रम आणि नंतर हलके हसू पसरलं.
ते बघूनच आर या पार म्हणत मी एकदाचं विचारुनच टाकलं.
“तुला नकार देणं हा जगातला मोठा गाढवपणा होता हे मला रोज, अक्षरशः रोज तितक्याच तीव्रतेने जाणवतंय. आपली सुरवात नकाराने झाली पण आपल्यातली केमिस्ट्री तेव्हाही नव्हती लपली. आपण एकमेकांना कधीच दुखावणार नाही, याची खात्री तर मी देऊ शकत नाही. पण अडचणी आल्या तर भिडू ना एकत्र. सिद्धी विनायक, मला तुझ्या बरोबर एकत्र प्रवास आवडेल. तुझ्या बरोबर म्हातारं व्हायला आवडेल. काही गोष्टीत लॉजीक नसते बघायचे असं तूच म्हणालीस ना! मग प्लीज या लॉजिक नसलेल्या कनेक्षनला एक संधी देऊन पहाशील? मला परत एकदा ग्रॅंडमामाज कॅफेमधे उद्या संध्याकाळी भेटशील?” हे बोलून झाल्यावर धडधड १०० पट वाढली होती. श्वास रोखून मी तिच्या उत्तराची वाट बघत होतो. तिच्या एका निर्णयावर माझ्या सिक्वेन्सचं स्टेटस ठरणार होतं.
“चालेल, पण यावेळी आतलं टेबल रिझर्व्ह करणार असशील तरच" माझा हात हातात घेऊन ती इतकंच बोलली पण त्या एका वाक्याने माझी अख्खी राईड पार मख्खन राईड होऊन गेली.
समाप्त.
खूप छान! आवडली
खूप छान! आवडली
मस्त शेवट!
मस्त शेवट!
पण अचानक संपली असं वाटलं. अजून १-२ भाग चालले असते.. म्हणजे असं आपलं माझं मत हां.. पण सुंदर आणि क्यूट स्टोरी!
Cute गोष्ट. पण फार लवकर संपली
Cute गोष्ट. पण फार लवकर संपली ग. (But I believe in second chance.. part 2 यायला हवा.
)
खुप वेगवान भावना तरल कथानक
खुप वेगवान भावनाप्रधान तरल कथानक आणि तरीही सर्वच कंगोरे नीट मांडत पूर्ण केल्याबद्दल करावे तितके कौतुक कमीच असेल. ह्या लव्ह स्टोरीचा सिकवेल तो बनता ही है । आणि त्यात झुबी आणि मालकिणीची नव्याने पेट लव्हर बनलेल्या अविबद्दलची स्टोरी आणि तेच अविचा नव्या गोष्टीसोबत जुळवून घेण्याच्या तारांबळ + गमती जमती वाचायला नक्कीच आवडेल.
फार गोड. दुसरा भाग पण लिही.
फार गोड. दुसरा भाग पण लिही.
आत्ता कुठे सुरु झाली होती आणि
आत्ता कुठे सुरु झाली होती आणि संपलीही? खरंच, सिक्वेल येऊ द्या.
मस्त
मस्त
फारच गोड गोष्ट.
फारच गोड गोष्ट.
काल सलग पहिले ५ भाग वाचले होते. आज शेवटचा वाचला. प्रपोझ करण्याची स्टाईल आवडली.
आवडली.
आवडली.
कसली सुपर क्युट गोष्ट आणि
कसली सुपर क्युट गोष्ट आणि शेवटही तितकाच सहज आणि गोड.
अवि आपला भूतकाळ सांगतो म्हणून मनातलं गुपित उघड करतो हे इतकं छान आलंय आणि त्यानंतरचं प्रपोज करतानाचं बोलणं पण.
कथा आणि मांडणी फार फार आवडली कविन.
मस्त गोष्ट.इथे संपवली हे बरं
मस्त गोष्ट.इथे संपवली हे बरं झालं.एकंदर वाहते वारे पाहता अवनीश ला आपला धर्म (पेट विषयक दृष्टी) बदलावा लागणार आणि मग सुखी संसार होणार असं दिसतंय
वा मस्त
वा मस्त
दोघांनी एकमेकांकडे मन मोकळं करणं छान जमवलयस. हे असं साधं सरळ लिहिणं खरच सोपं नाही.
आवडली ग सगळी गोष्ट अन ती सांगण्याची शैली.
मस्त मस्त
मस्त मस्त
धन्यवाद rr38, अवल, अनु, मामी,
धन्यवाद rr38, अवल, अनु, मामी, गिरीकंद, नताशा, उर्मिला, राहुल, धनश्री, अज्ञानी, मनीमाऊ, प्रज्ञा, झकासराव
आवडली गोष्ट
आवडली गोष्ट
आता एका लग्नाची दुसरी गोष्ट
आता एका लग्नाची दुसरी गोष्ट पण होऊन जाऊदे
सगळे भाग वाचले. कथा आवडली.
सगळे भाग वाचले. कथा आवडली. लवकर आटोपली असं वाटलं. पण अवनीशला तो ताण असह्य होत होता, त्यामुळे त्याच्यासाठी हे प्रकरण योग्य जागी संपलं.
पात्रांचं वेगळं प्रोफेशन निवडून त्याचा अभ्यास करून त्या भोवती फिरणारं कथानक रचणं हे विशेष आहे. यात अवनीशच्या व्यवसायाचाही भाग थोडा पसरला असता तर कथा परिपूर्ण झाली असती .
शेवटचं तुझ्याबरोबर म्हातारं व्हायला आवडेल, हे मराठी वाटत नाही.
अरे काय क्यूट लिहलयस! फारच
अरे काय क्यूट लिहलयस! फारच आवडलं!
पुढचे भाग लिही पण अरे संसार संसार भाग नकोत
धन्यवाद हर्पेन, भरत
धन्यवाद हर्पेन, भरत
आता एका लग्नाची दुसरी गोष्ट पण होऊन जाऊदे Proud>>
नको नको.
शेवटचं तुझ्याबरोबर म्हातारं व्हायला आवडेल, हे मराठी वाटत नाही.>> खरय. आधी इन्ग्रजीत वाक्य लिहिले गेले आणि मग त्याचे गुगल भाषांतर केल्यासारखे झाले इथे. यावर विचार करते. धन्यवाद
यात अवनीशच्या व्यवसायाचाही भाग थोडा पसरला असता तर कथा परिपूर्ण झाली असती .>> खरय. लिहीत असताना बराच विचार केला होता यावर. अगदी वकील मैत्रिणींशी डिस्कसही केले होते काही सिनॅरिओज पण ते तितके सहज पेरायला नाही जमले म्हणून स्किप केले मी.
पुढचे भाग लिही पण अरे संसार
पुढचे भाग लिही पण अरे संसार संसार भाग नकोत Proud>>>
दृष्टी आड सृष्टी म्हणून जगूदेत त्यांचे त्यांना आता कसेही.
आधी इन्ग्रजीत वाक्य लिहिले
आधी इन्ग्रजीत वाक्य लिहिले गेले आणि मग त्याचे गुगल भाषांतर केल्यासारखे झाले<<< सोनम, फवाद चा खुबसुरत बघितला नाही होय?
सोनम, फवाद चा खुबसुरत बघितला
सोनम, फवाद चा खुबसुरत बघितला नाही होय? Wink>>> तिथे फवाद सोडून इतर काही आहे?
खुप क्यूट झाली गोष्ट! आजच
खुप क्यूट झाली गोष्ट! आजच सगळे भाग एकदम वाचले. पेट पेरेंटिंग आता सगळीकडे डोकावतंय तुझं

अवनीशचा क्लायमॅक्सचा डायलॉग वाचून एकदम अह्हा! झालं
अजून एक दोन भाग हवे होते.
शेवट नसलेला शेवट आवडला.
शेवट नसलेला शेवट आवडला.
पेट पेरेंटिंग आता सगळीकडे
पेट पेरेंटिंग आता सगळीकडे डोकावतंय तुझं Wink>>
पूर्वी मी कम्प्लीट अवनीश होते, मग माऊ घरी आली आणि धाकधूक लेव्हल पार करत सिद्धीचं जग माझं झालं
अवनीशचा क्लायमॅक्सचा डायलॉग वाचून एकदम अह्हा! झालं Happy>> Thank you Meg
शेवट नसलेला शेवट आवडला.>>
शेवट नसलेला शेवट आवडला.>>
तसं बघायला एकमेकांना सेकंड चान्स द्यायचे ठरवतात इथेच प्युअर सिक्वेन्स लागतोय ना म्हणून तोच शेवट. पुढे कहानी घर घर की होते की आणखी काही तो भाग प्युअर सिक्वेन्सच्या पल्याडचा आहे.
मस्त.. मस्त.. मस्त..
मस्त.. मस्त.. मस्त..
छान झाला शेवट . !!!
छान झाला शेवट . !!!
तसं बघायला एकमेकांना सेकंड
तसं बघायला एकमेकांना सेकंड चान्स द्यायचे ठरवतात इथेच प्युअर सिक्वेन्स लागतोय ना म्हणून तोच शेवट. पुढे कहानी घर घर की होते की आणखी काही तो भाग प्युअर सिक्वेन्सच्या पल्याडचा आहे. >>> येस्स ते तर आहेच. प्युअर सिक्वेन्स परफेक्ट लागला आहे पण आम्हा बॉलिवूडप्रेमींना जबतक हिरो हिरोईन मिलते नही तबतक पिच्कर अभी बाकी है मेरे दोस्त
बॉलिवूडप्रेमींना जबतक हिरो
बॉलिवूडप्रेमींना जबतक हिरो हिरोईन मिलते नही तबतक पिच्कर अभी बाकी है मेरे दोस्त Lol>>
Pages