सण सार्वजनिक साजरे करावेत किंवा नाही?

Submitted by छन्दिफन्दि on 15 September, 2023 - 03:22

काही महिन्यांपूर्वी मी बे एरियातील वारी विषयी एक लेख लिहिला होता. त्याला संमिश्र प्रतिसाद होता. काही जणांचा सूर होता वारी म्हंटल की ती सार्वजनिक ठिकाणी ( मुख्यत्वे रस्त्यांवरून) होते.
अर्थात त्या वेळी ही वारी सर्व नियमाचे पालन करून आणि अतिशय शांतता पूर्ण आणि पवित्र वातावरणात काढल्याने मला तो मुद्दा अत्यंत गौण वाटला किंबहुना उगाच खोड काढल्यासारखंही वाटलं.
पण नंतर काही काळाने गोपाळकाला निमित्ताने उठवणाऱ्या कित्येक मजली दही हंडया, सार्वजनिक गणेशोत्सवा पायी, दांडिया पायी अडविलेले, उखडलेले रस्ते, लाऊड स्पीकर्स मुळे विद्यार्थी, आजारी व्यक्ती ह्यांना होणारा त्रास, (काळ्या?)पैशांची होणारी बेसुमार उधळपट्टी आणि ह्या सर्वांच्या मागे असलेल्या राजकीय शक्ती आणि त्यांचे सत्ता संघर्ष हे बघितलं की मात्र मग मलाही प्रश्न पडला,
उत्सवाचे असे सार्वजनिकत्व असावे किंवा नाही? किंवा उत्सव आपापले स्वतःच्या घरापुरते ठेवावेत की सार्वजनिकरीत्या साजरे करावेत?
पंढरपूर वारी विषयी खोलात जाऊन बघितलं असता, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकोबांनी अनुक्रमे आळंदी आणि देहू येथून पंढरपूरला चालत जायला सुरुवात केली. तुकारामांच्या देहवासानंतर त्यांचे वंशज नारायणबाबा ह्यांनी त्यांच्या पादुका पालखीतून न्यायला सुरुवात केली. १८२० मध्ये हैबतराव ह्या सरदारांनी पालखीतून पादुका नेवून त्याला वारी / दिंडी स्वरूप दिले. त्यानंतर त्याचे आताचे वारीचे विराट स्वरूप दिसते ज्यात कित्येक लाख लोक चालतात.
गणपतीचा उल्लेख वेदकालीन साहित्यातही आढळतो पण गणेश चतुर्थी कधी पासून आणि कुणी पहिल्यांदा साजरी केली ह्याचा उल्लेख मिळत नाही.
परंतु शिवाजी महाराजांच्या काळात गणेश उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करायला सुरुवात केली. नंतर पेशव्यांच्या काळातही ही परंपरा कायम राहिली.
नंतर ब्रिटिश राज आले तेव्हा त्यात खंड पडला. लोकं गणेश चतुर्थी आपापल्या घरी करू लागले.
परंतु लोकांना एकत्र आणण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव (आणि शिवजयंती उत्सव ) सुरु केले.
त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात त्याचे बदलत गेलेले स्वरूप तर सर्वाना परिचित आहेच. कदाचित गावांमध्ये अजूनही त्याचे सार्वजनिक रूप अक्राळ विक्राळ झाले नसावे जेव्हढे शहरात झालेले आढळते.
पूर्वी (वीसेक वर्षांपूर्वी किंवा कित्येक अंशी आजही ) गावांमधून केले जाणारे उत्सव सर्व गावाला एकत्र आणणारे होते किंवा आहेत, सर्वांचा सहभाग असल्यामुळे सहाजिकच ते निरुपद्रवी व आनंददायी होतात.
समजायला लागल्यापासून बघतेय ते बदलत जाणारे दहीहंडीचे स्वरूप, गणेशोत्सवाचे स्वरूप, हळू हळू नवरात्रीच्या देवीच्या जत्रेपासून तिचे दांडिया-डिस्को दांडियात होणारे रूपांतर. २००० च्या दशकापासून (?) नव्याने सुरु झालेल्या हिंदू नवंवर्ष यात्रा, सार्वजनिक संक्रातीचे हळदीकुंकू समारंभ, मंगळा गौर कार्यक्रम ( बहुदा यंदाच हे चालू झाले असावेत).
ह्यात ते जिथपर्यंत सोसायटी, गल्लीत सगळ्यांच्या हातभराने साजरे केले जातात तेव्हा कदाचित सार्वजनिक उत्सव सुरु करण्यामागील उद्देश सफल होत असावा असे वाटते.
पण जेव्हा त्यात (अ) राजकीय शक्ती उतरतात, मग खंडण्या, वर्गण्या, सेलिब्रिट, त्यांच्या लाखोंच्या बिदाग्या, आपले वर्चस्व प्रस्थापित करायला लावलेले ध्वनिक्षेपक, ज्याच्या नावाने उत्सवाची देणगी मागता त्याला बघवणार, ऐकवणार नाहीत अस ओंगळवाणं, हिडीस नृत्य, गायन-वादन, रस्ते बंद केल्यामुळे होणारी गैरसोय ... ही न संपणारी यादी समोर येते.
आणि मग प्रश्न पडतो की उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करावेत का?
म्हणजे मूळ चांगला उद्देश बाजूला सारून त्याचा आपमतलबासाठी वापर करून त्याचे स्वरूप इतके बिभित्स केले जाते की प्रश्न पडावा मुळात हे सुरूच कधी, कोणी आणि कशासाठी केले. त्यामुळे खरा प्रश्न सार्वजनिकरित्या कशाप्रकारे करावेत आणि त्यावर काही निर्बंध घालून त्याचा मूळ उद्देश सफल करता येईल का असा असायला हवा.

तुमचे मत काय आहे जरूर लिहा.

तळटीप- मते कितीही विरोधात किंवा न पटणारी असतील तरी असभ्य भाषा वापरू नये. आणि वैयक्तीक पातळीवर घसरू नये.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सरांचे फॅन्स असलेल्यांना सरांच्या प्रतिसादांचे पुस्तक काढणे सोपे जावे यासाठी आयतेच संकलन करून दिले आहे. काही प्रतिसाद सुटले असे वाटले तर मोठ्या मनाने क्षमा करावी.
त्या पुस्तकात प्रस्तावनेत काही लोक हे हिंदूंचे सण नको म्हणत होते आणि इतर धर्माच्या सणांमधे डीजे, लेझर हवा म्हणून आग्रह धरून बसले होते. त्यांची सरांनी कशी दाणादाण उडवली असे फॅन्सने लिहावे. हातोहात पुस्तक खपेल. मायबोलीने पुस्तकाचे प्रकाशन करावे.

उस्तवमूर्ती बुरख्यातून ऑनलाईन हजर राहतील.

आणि काही असेच छोटे मोठे किरकोळ दुखापत ग्रस्त आहेत त्यांचीही यादी लवकरच सूत्रांकडून उपलब्ध होण्याची शक्यता आहे. >>> Rofl

कंपू बनवू नका.
इथे काही निवडणूक लढवून सत्ता मिळणार नाही.

कंपू गिरी करणे च असभ्य पणाचे आणि लबाडी चे पाहिले लक्षण आहे.
नीतिमान व्हा.
कंपू गिरी सोडा.
सुधारायच की नाही हा तुमचा निर्णय.
मला काही फरक पडत नाही.
जे सत्य ते मी मांडतच राहणार.

अरे आता त्यात माझ्या पोस्ट कोट कश्याला.?
माझ्यावर जिथे तिथे चर्चा झालीच पाहिजे असा काही नियम आहे का? >> काहीच समजले नाही.

रच्याकने, याबद्दल आहे का ?

हेमन्त३३३ हे कुणाहाही अद्वातद्वा बोलत नाहीत. प्रत्येक वेळी लॉजीकल मुद्दा मांडतात. क्वचितच रिग्रेसिव्ह विचारसरणी असते पण दोष कुणात नसतो. त्यामुळे इथे लोकांना त्यांचे लेग पुलिंग करायला आवडते. मी त्यांची पंखा आहे. Happy
नवीन Submitted by सामो on 4 October, 2023 - 17:38
>>>>

+७८६

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2023 - 17:43

कि याबद्दल ?

एक नाथ पै म्हणून होते
>>>

असेना
शिंदे कोण आहेत..
एक नाथ की एकनाथ?
मुख्यमंत्री आहेत तर नाव चुकीचे लिहू नका इतकीच अपेक्षा Happy

की शुद्धलेखनाच्या चुका फक्त हेमंत यांच्याच काढायच्या आहेत का? Happy

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 October, 2023 - 15:30

सोन्याच्या कोंदणात हिर्‍याची झळाळी उठून दिसत असेल तर उलट अभिमानच वाटायला पाहिजे.
काही तरी विचार करूनच दिलेले असतील ना प्रतिसाद ? एण्जॉय !

अहो सर, कुणी कशाला कंपू बनवेल ?
लोकांना शॉर्ट टर्म मेमरी लॉसचा प्रॉब्लेम असतो. त्यामुळे त्यांच्या माहितीसाठी सुरूवातीपासूनचे सर्व प्रतिसाद कोट केले. आता या सर्व प्रतिसादांचा एकत्रित लसावि बरोब्बर डोक्यात शिरेल त्यांच्या.

उलट नजरेखालून जाताना माझ्या लक्षात आले कि तुमचे म्हणणे आहे कि २०० वर्षांपूर्वी गाड्या, घोडे, इंडस्ट्री काहीही नव्हते. त्यामुळे हे सगळे सोडून द्या. प्रत्येकाने धोतर नेसा. बंडी घाला अंगात. चुन्याची डब्बी आणि तंबाखू मळत मळत शेतीची कामे करा.

पण २०० वर्षांपूर्वी सणात स्पीकर्स आणि लेझर होते का ओ सर ?

सर ज्या धाग्यावर तलवारबाजी सुरु करतात त्याचे नोटीफिकेशन वगैरे मिळतील अशी काही सुविधा आहे का माबोवर?

सर ज्या धाग्यावर तलवारबाजी सुरु करतात त्याचे नोटीफिकेशन वगैरे मिळतील अशी काही सुविधा आहे का माबोवर?>>> मी ही सबस्क्रिप्शन घेनार. +१

सरांचा दांडपट्टा सुरू झाला की ते कोणाला ऐकत नाहीत
विषय, धागा, लॉजिक, विसंगती, मुद्देसूदपणा आणि अभ्यास या षड्रिपूशी ते एकट्यानेच सामना करत दे दणादण शत्रूच्या गोटात शिरतात आणि पोत्यात भरून त्यांना पाकिस्तानला सोडून येतात

Pages