काही महिन्यांपूर्वी मी बे एरियातील वारी विषयी एक लेख लिहिला होता. त्याला संमिश्र प्रतिसाद होता. काही जणांचा सूर होता वारी म्हंटल की ती सार्वजनिक ठिकाणी ( मुख्यत्वे रस्त्यांवरून) होते.
अर्थात त्या वेळी ही वारी सर्व नियमाचे पालन करून आणि अतिशय शांतता पूर्ण आणि पवित्र वातावरणात काढल्याने मला तो मुद्दा अत्यंत गौण वाटला किंबहुना उगाच खोड काढल्यासारखंही वाटलं.
पण नंतर काही काळाने गोपाळकाला निमित्ताने उठवणाऱ्या कित्येक मजली दही हंडया, सार्वजनिक गणेशोत्सवा पायी, दांडिया पायी अडविलेले, उखडलेले रस्ते, लाऊड स्पीकर्स मुळे विद्यार्थी, आजारी व्यक्ती ह्यांना होणारा त्रास, (काळ्या?)पैशांची होणारी बेसुमार उधळपट्टी आणि ह्या सर्वांच्या मागे असलेल्या राजकीय शक्ती आणि त्यांचे सत्ता संघर्ष हे बघितलं की मात्र मग मलाही प्रश्न पडला,
उत्सवाचे असे सार्वजनिकत्व असावे किंवा नाही? किंवा उत्सव आपापले स्वतःच्या घरापुरते ठेवावेत की सार्वजनिकरीत्या साजरे करावेत?
पंढरपूर वारी विषयी खोलात जाऊन बघितलं असता, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकोबांनी अनुक्रमे आळंदी आणि देहू येथून पंढरपूरला चालत जायला सुरुवात केली. तुकारामांच्या देहवासानंतर त्यांचे वंशज नारायणबाबा ह्यांनी त्यांच्या पादुका पालखीतून न्यायला सुरुवात केली. १८२० मध्ये हैबतराव ह्या सरदारांनी पालखीतून पादुका नेवून त्याला वारी / दिंडी स्वरूप दिले. त्यानंतर त्याचे आताचे वारीचे विराट स्वरूप दिसते ज्यात कित्येक लाख लोक चालतात.
गणपतीचा उल्लेख वेदकालीन साहित्यातही आढळतो पण गणेश चतुर्थी कधी पासून आणि कुणी पहिल्यांदा साजरी केली ह्याचा उल्लेख मिळत नाही.
परंतु शिवाजी महाराजांच्या काळात गणेश उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करायला सुरुवात केली. नंतर पेशव्यांच्या काळातही ही परंपरा कायम राहिली.
नंतर ब्रिटिश राज आले तेव्हा त्यात खंड पडला. लोकं गणेश चतुर्थी आपापल्या घरी करू लागले.
परंतु लोकांना एकत्र आणण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव (आणि शिवजयंती उत्सव ) सुरु केले.
त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात त्याचे बदलत गेलेले स्वरूप तर सर्वाना परिचित आहेच. कदाचित गावांमध्ये अजूनही त्याचे सार्वजनिक रूप अक्राळ विक्राळ झाले नसावे जेव्हढे शहरात झालेले आढळते.
पूर्वी (वीसेक वर्षांपूर्वी किंवा कित्येक अंशी आजही ) गावांमधून केले जाणारे उत्सव सर्व गावाला एकत्र आणणारे होते किंवा आहेत, सर्वांचा सहभाग असल्यामुळे सहाजिकच ते निरुपद्रवी व आनंददायी होतात.
समजायला लागल्यापासून बघतेय ते बदलत जाणारे दहीहंडीचे स्वरूप, गणेशोत्सवाचे स्वरूप, हळू हळू नवरात्रीच्या देवीच्या जत्रेपासून तिचे दांडिया-डिस्को दांडियात होणारे रूपांतर. २००० च्या दशकापासून (?) नव्याने सुरु झालेल्या हिंदू नवंवर्ष यात्रा, सार्वजनिक संक्रातीचे हळदीकुंकू समारंभ, मंगळा गौर कार्यक्रम ( बहुदा यंदाच हे चालू झाले असावेत).
ह्यात ते जिथपर्यंत सोसायटी, गल्लीत सगळ्यांच्या हातभराने साजरे केले जातात तेव्हा कदाचित सार्वजनिक उत्सव सुरु करण्यामागील उद्देश सफल होत असावा असे वाटते.
पण जेव्हा त्यात (अ) राजकीय शक्ती उतरतात, मग खंडण्या, वर्गण्या, सेलिब्रिट, त्यांच्या लाखोंच्या बिदाग्या, आपले वर्चस्व प्रस्थापित करायला लावलेले ध्वनिक्षेपक, ज्याच्या नावाने उत्सवाची देणगी मागता त्याला बघवणार, ऐकवणार नाहीत अस ओंगळवाणं, हिडीस नृत्य, गायन-वादन, रस्ते बंद केल्यामुळे होणारी गैरसोय ... ही न संपणारी यादी समोर येते.
आणि मग प्रश्न पडतो की उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करावेत का?
म्हणजे मूळ चांगला उद्देश बाजूला सारून त्याचा आपमतलबासाठी वापर करून त्याचे स्वरूप इतके बिभित्स केले जाते की प्रश्न पडावा मुळात हे सुरूच कधी, कोणी आणि कशासाठी केले. त्यामुळे खरा प्रश्न सार्वजनिकरित्या कशाप्रकारे करावेत आणि त्यावर काही निर्बंध घालून त्याचा मूळ उद्देश सफल करता येईल का असा असायला हवा.
तुमचे मत काय आहे जरूर लिहा.
तळटीप- मते कितीही विरोधात किंवा न पटणारी असतील तरी असभ्य भाषा वापरू नये. आणि वैयक्तीक पातळीवर घसरू नये.
मायबोलीवर अशी काही व्यवस्था
मायबोलीवर अशी काही व्यवस्था नाही का म्हणजे ब्लॅॅक बोर्ड सारख. त्यावर कुणीही येऊन कुठल्याही विषयावर छोट्या छोट्या पोस्टी लिहू शकेल. जुन्या पोस्टी आपोआप पुसल्या जातील. अशी व्यवस्था असेल तर अवश्य सुरु करावी.
खरड़फळा प्रस्ताव अनेकदा देवून
खरड़फळा प्रस्ताव अनेकदा देवून झालाय ह्यापूर्वीसुद्धा
पण...
अज्ञानी.
अज्ञानी.
आपण वाहता धागा काढून खरडफळा सिम्युलेट करू शकत नाही का? माफ करा ,पण मला वाहता धागा हा प्रकार नीटसा समजलेला नाही. समजा आपण "खरडफळा" ह्या नावानेच असा धागा सुरु केला तर?
सण सार्वजनिक साजरे करावेत किंवा नाही? हा धागा आता आपण खरडफळा करूयात का?
वरचा बोकलत ह्यांचा किस्सा वाचून मी म्हणतोय .
घ्या
घ्या
केले सुरु वाहते पान
खरड़ फळा
मला का दिसत नाही? कुठल्या
मला का दिसत नाही? कुठल्या ग्रुप चे मेंबर व्हायला पाहिजे का?
विरंगुळा गृप
विरंगुळा गृप
गणपतीसोबतच विसर्जन झाल्या
गणपतीसोबतच विसर्जन झाल्या सारखी वाटलेली ही बिमारी नवरात्र उत्सवाच्या रूपाने पुन्हा जिवंत झाल्या सारखी वाटत आहे. सर्व मराठी लोक रातोरात गुजराती झाले की काय अशी शंका यावी इतक्या प्रमाणात गल्लोगल्ली दांडिया-गरबा नाचाची दुकाने उघडली आहेत. प्रत्येक दुकानात कर्णकर्कश DJ आहेच. बरं गाणी तीच जी गणपती मध्ये वाजत होती.
लेझीम खेळल्यासारखे दांडिया खेळणारी गावठी मराठी मुले बघून कीव येते.
जोपर्यंत देशातील सर्व जयंत्या
जोपर्यंत देशातील सर्व जयंत्या,सर्व धर्मीय लोकांचे सार्वजनिक सण, सर्व धर्मीय लोकांची प्रार्थना स्थळ ह्यांच्यावर असणारे लाऊड speaker.
कोणत्या ही कारणाने निघालेल्या मिरवणुका,निषेध मोर्चे, बंद, जाहीर सभा हे सर्व बंद होत नाही .
तो वपर्यंत कोणालाच हक्क नाही .
गणपती उत्सव,आणि दुर्गा उत्सव ह्या वर बोलण्याचा
https://twitter.com/PTI_News
https://twitter.com/PTI_News/status/1715769120124191034
गर्भ्याला सकाळ पर्यंत परवानगी
गर्भ्याला सकाळ पर्यंत परवानगी केंद्र सरकार नी पूर्ण देशात लागू केली पाहिजे.
जयंत्या पुण्या tithya चालतात तर garabha का नको
बोकलत नी प्रत्येक धाग्यावर
बोकलत नी प्रत्येक धाग्यावर सुगंधित थंडगार पाण्याचा शिडकावा करण्याचे व्रत घेतले आहे का ?
नाचता नाचता तरुण पोरं अशी
नाचता नाचता तरुण पोरं अशी मारायला लागली तर अखंड हिंदू राष्ट्र बनवायला भाड्यानी शेजारच्या देशातून लोक आणावे लागतील.
https://www.patrika.com/national-news/12-people-died-in-24-hours-in-gujarat-in-navratri-while-playing-garba-8548724/
बाकी, नवरात्र दांडिया गरबा साजरा करायला प्रथम शिवाजी महाराजांनी सुरुवात केली होती - असे धागाकर्ते कधी लिहितायत ह्याची वाट बघत आहे.
https://www.indiatoday.in
https://www.indiatoday.in/india/story/death-heart-attacks-garba-gujarat-...
मस्त ना?
जोपर्यंत देशातील सर्व जयंत्या
जोपर्यंत देशातील सर्व जयंत्या,सर्व धर्मीय लोकांचे सार्वजनिक सण, सर्व धर्मीय लोकांची प्रार्थना स्थळ ह्यांच्यावर असणारे लाऊड speaker.
कोणत्या ही कारणाने निघालेल्या मिरवणुका,निषेध मोर्चे, बंद, जाहीर सभा हे सर्व बंद होत नाही .
तो वपर्यंत कोणालाच हक्क नाही .
गणपती उत्सव,आणि दुर्गा उत्सव ह्या वर बोलण्याचा >> हे लॉजिक असेल तर इतरधर्मिय वर्षातून किती दिवस रस्ता अडवतात तेव्हढेच तुम्ही पण अडवा, जयंतीच्या बाबतीत एक विचारायचेय. शिवजयंती तुम्ही करत नाही का ? करत असाल तर ती हिंदू म्हणून करता कि कसे ?
यावरून निष्कर्ष निघतो की
यावरून निष्कर्ष निघतो की गणपती आणि दुर्गोत्सव हे " इतर सर्व धर्मातील सार्वजनिक सण, लाऊड स्पीकर आणि कोणत्या ही कारणाने निघणाऱ्या मिरवणुका,निषेध मोर्चे, बंद, जाहीर सभा " बंद करण्यास सुरू झालेले आहेत. लोक त्यासाठी कर्कश्य डिजेसोबत कानाचे पडदे फाडुन घेणे, हृदय विकाराच्या झटक्याने मरणे, लेजर मुळे अंधत्व ओढवून घेणे असे बलिदान द्यायलाही मागे पुढे पहात नाही. या न्यायिक लढ्यात अशा रीतीने दुर्दैवाने प्राण गमवणाऱ्यांना हुतात्मा घोषित करण्यात यावे. त्यांच्या कुटुंबियांना मोबदला आणि सरकारी नोकरी देण्यात यावी. दुर्दैवाने कानाचे पडदे फाटलेल्या, पूर्ण - आंशिक अंधत्व आलेल्यांचा २६ जानेवारीला सत्कार करून शौर्य पुरस्कार देण्यात यावा आणि सरकारी नोकरी देण्यात यावी.
विरोध करणाऱ्यांना सिरीयात पाठवण्यास मोडीत निघालेल्या बसेस राखून ठेवाव्यात. त्यांच्या घरावर बुलडोझर चालवण्या ऐवजी त्यांची घरे वर नमुद केलेल्यांना / त्यांच्या कुटुंबियांना देण्यात यावीत.
पटत असेल तर या पोस्टला लाईक करा, नसेल तर मायबोली सोडून सीरियाबोली साईटवर जा.
उद्या युद्धात मदतीसाठी स्पीकर
गावाकडे म्हण असते. "पादर्याला निमित्त पावट्याचे"
उद्या युद्धात मदतीसाठी स्पीकर वरून आवाहन केले कि हे लगेच त्या दिवशी लठठपंचमी साजरी करायला मोकळे.
जोपर्यंत तुम्ही युद्धात मदतीसाठी स्पीकर बंद करत नाही तोपर्यंत आम्ही आणखी एक सण साजरा करणार.
संडेनवमी, शनिअमावस्या, सोमावती नंगुपंगुलिका, बुधअष्टमी, डीजेरिका चतुर्थी, लुंगी महोत्सव अशा सणांची यादी प्रतिक्षेत आहे.
शेजार्यांनी बारसे केले म्हणून आज कर्णकर्कश्शवती काकतालिका डीजे लावून साजरी करणार.
असू ध्या हो.
असू ध्या हो.
भासमय जगात लोकांना गुंतवून ठेवण्यासाठी पूर्ण जग धडपडत आहे.
नव नवीन गेम्स, बाजारात येत आहे .
Technology वर त्या साठी abjo रुपये खर्च केले जात आहेत.
आपण हे सर्व काहीच भांडवल न टाकता अनुभवत असू तर वाईट काय आहे.
लोक धुंदीत असतील तर शांतता पण राहते आपोआप
सार्वजनिक संडासात बाँब फोडले
सार्वजनिक संडासात बाँब फोडले म्हणून पण एखादा उस्तव करायचा. हाकानाका !
चिडचिड करून काही फायदा नाही
चिडचिड करून काही फायदा नाही.फक्त स्वतःला च त्रास होईल.
मी प्रश्न पहिले पान विचारले होते.
समाज माध्यमावर प्रतेक व्यक्ती सण साजरे होताना जे आवाज प्रदूषण होते त्याचा विरोध करत असतो.
100 कॉमेंट ह्या विषयात असतील तर मोजकेच दहा वीस जन विरोध करत नाहीत .
तरी सण मात्र दिवसेंदिवस दणक्यात च साजरे होतात.
कोण असतात ही लोक जी सहभागी होतात.
प्रतेक वर्षी सार्वजनिक उत्सव साजरा करणारे वाढत च चालले आहेत.
गर्दी वाढत च चालली.
म्हणजे लोकांचा सहभाग वाढत च चालला आहे.
भारतात फक्त शिव जयंती च साजरी होत नाही.
अनेक लोकांच्या जयंत्या साजऱ्या होतात..त्याचे प्रमाण पण वाढत च चालले आहे..कोण कुठले नेते,समजा सुधारक,कुठले पुरातन राजे ,महाराजे ह्यांची संख्या वाढत च चालली आहे.
प्रतेक समाजाचा ,जातीचा एक महापुरुष असतो त्यांच्या वेगळ्या जयंत्या असतात.
सर्व ठिकाणी आवाज प्रदूषण होतेच.
ट्रॅफिक जॅम होतेच.
त्या मुळे प्रदूषण होतेच
31 ल तर धिंगाणा असतो.
सार्वजनिक ठिकाणी खुले आम् दारू पिली जाते.
लोकांची सुरक्षा धोक्यात येते.
हा 31 तर सर्वात ओंगळ पने भारतात साजरा होतो.
लय उदाहरणे आहेत.
( पहिले व्हिडिओ सेंटर मध्ये तसले सिनेमा दाखवत सर्व सभ्य पणाचा मुखवटा घेतलेले च तिथे गुपचूप येवून सिनेमा बघताना सर्रास पोलिस ना मिळायचे)
ओ चिडचिड तुमचीच होतेय ओ.
ओ चिडचिड तुमचीच होतेय ओ.
शिवजयंती यासाठीच विचारले की तुम्हाला इतर महापुरूष मान्य नाहीत. फक्त छत्रपती शिवाजी महाराज मान्य आहेत. म्हणून तुम्ही शिवजयंती साजरी करणार. आणि इतर महापुरूषांची जयंती साजरी केली कि तुम्ही हिंदू होणार.
का ? ते हिंदू नाहीत का ?
मग हिंदूंच्या सणांची + जयंत्यांची + पुण्यतिथ्यांची संख्या काढा. एकूण किती दिवस रस्ते बंद राहतात ते बघा.
लग्न, बारसे, मुंज हे हिंदू असतात कि अन्य कुणी परग्रहावरून आलेले.
मेंदू धुवून पुसून साफ करून घ्या.
इतका वेळ धार्मिक द्वेष दिसत होता. आता जातीय द्वेषावर उतरला आहात.
किमान दोन महीने हिंदूंचे सण, बारसे, मुंज चालू असतील. म्हणून तुम्ही पुन्हा आमच्या सणांचा विरोध का करता म्हणून भोकाड पसरणार.
यात इतर धर्मिय अजून आलेच नाहीत.
भारतात ख्रिश्चनांचा नाताळ हा सण असतो. ३१ डिसेंबर हा सगळेच जण साजरा करतात. तो बंद झाला तर काहीही फरक पडत नाही.
मुस्लीम लोक मुहर्रमला रस्त्यावर येतात. ईदला रस्त्यावर मिरवणुका नसतात.
मग तुम्हाला प्रॉब्लेम कुणापासून आहे ?
तुम्हाला अमूक तमूक मान्य नाही म्हणून बाकिच्यांनी टाळ्या वाजवायच्या का ? कोण लागून गेलात तुम्ही ?
तुम्हाला इतर महापुरूष मान्य नाहीत कारण ते तुमच्या जातीचे नाहीत. तुम्ही त्यांना स्विकारणार नाही आणि म्हणणार कि प्रत्येक जातीचे महापुरूष आहेत. तुम्हाला इतरांचे महापुरूष स्विकारायला कुणी बंदी केली ? मग ते जातीत बंद नाहीत होणार. प्रत्येक महापुरूष जातीत बंद आहे हे भंपक विधान आहे. खरे तर जातीच्या बाहेरच्यांनी नाकारले याचे ते समर्थन आहे.
<< तरी सण मात्र दिवसेंदिवस
<< तरी सण मात्र दिवसेंदिवस दणक्यात च साजरे होतात. >>
----- किती % लोक असे दणक्यांत सण साजरे करतात?
९७ % लोक शांतताप्रिय आहेत, सहनशिल आहेत, ते ३ % लोकांनी केलेला अन्याय (कशाला वाद घालायचा? ) निमूटपणे सहन करतात.
लोक धुंदीत असतील तर शांतता पण
लोक धुंदीत असतील तर शांतता पण राहते आपोआप>>> तरीच आजवर मी कधीही दोन बेवड्यांना हाणामारी करताना पाहिले नाही.
धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना
धुंदी यांना, आणि धुंदी त्यांना
तुकाराम महाराजांच्या काळात
तुकाराम महाराजांच्या काळात गरबा खेळायला सुरवात झाली. तुकाराम महाराजांच्या घरासमोर मंदिर होतं तिथे महाराज नऊ रात्री कीर्तन करायचे. लोकं टिपऱ्या घेऊनच कीर्तन ऐकायला यायचे. कीर्तन संपलं की गरबा सुरू व्हायचा. त्या काळी गरबा हा नचाचा प्रकार नसून तो एक सेल्फ डिफेन्स चा प्रकार होता. समोरच्याने काठी मारली तर आपण ती आडवायची कशी हे त्यात शिकवलं जायचं. सध्याचा बो स्टाफ (बाणाटी) हा प्रकार गरब्याची पुढची स्टेप. यात काठी मोठी असते. तर हा गरबा खेळून मराठे अधिक ताकदवर होतील याची भीती मुघलांना वाटली म्हणून ते सशस्त्र गरब्यावर चाल करून आले. लोकं पळायला बघत होती पण तुकाराम महाराज तिथे होते ते बोलले घाबरु नका सामना करा. मुघल तलवारी घेऊन वार करणार तोच त्यांच्या तलवारी टिपऱ्यात रूपांतरित झाल्या. मुघल वार करत होते पण तलवारी टिपऱ्या बनत होत्या. हळूहळू मुघलांना पण मजा वाटायला लागली आणि ते पण भक्तिभावाने नाचू लागले. आताच्या काळात टिपऱ्या खेळताना जे दोन गोल तयार होतात ते याच प्रसंगामुळे.
चंमतग म्हणजे सुरूवातीलाच
चंमतग म्हणजे सुरूवातीलाच सर्वांचे सण, जयंत्या बंद करा म्हटले त्या वेळी हे वेगळ्याच तारेत होते. आता त्यांनी ही लाईन स्वतःची म्हणून राग आळवायला सुरूवात केली आहे. त्याहून गंमत म्हणजे मी म्हणतोय कि सगळेच बंद करा पण तुम्हीच करत नाही असा भेसूर सूर लावलाय.
९७ % लोक शांतताप्रिय आहेत,
९७ % लोक शांतताप्रिय आहेत, सहनशिल आहेत, ते ३ % लोकांनी केलेला अन्याय (कशाला वाद घालायचा? ) निमूटपणे सहन करतात.
>>>>
जर हे फक्त डीजे बाबत असेल की ३ टक्के नाचणारे आणि ९७ टक्के लोकांना त्रास तर ओके..
पण दिवाळीत फक्त ३ टक्के कुटुंबात फटाके वाजवत नाहीत. बरेच जण वाजवतात. दिवाळीत फटाके न वाजवणारे देखील बरेच जण एखादा आपला दुसरा आवडीचा सण दणक्यात साजरा करतात.
ज्या घरात एकही सण दणक्यात म्हणजे कुठलेही प्रदूषण न करता साजरा करतात अशी कुटुंब फार कमी असतील. किती टक्के नाही लिहीत, परत त्यावरून वाद नको. पण काही नाही तर देवाची हार फुले निर्माल्य समुद्र नदीच्या पाण्यात टाकणारे सुद्धा बरेच असतात. आणि कित्येकांना बदलायचे देखील नसते कारण हे त्यांच्या देव धर्माशी निगडीत असते..
फोटोशॉप साठी पेंटीयम, सेलेरॉन
..
लोक सहभागी असतात म्हणून तर
लोक सहभागी असतात म्हणून तर सणांचे उत्सव झाले ना?
लोकांनी सहभाग घेतला नसता तर हे शक्य झाले असते का?
हा वयानुसार लोकांना आवाज,गर्दी, ह्याचा त्रास होतो कारण शरीर कमजोर झालेले असते.
गरबा हवा की नको असा प्रश्न फक्त तरुण मुलाना विचारला तर.
तर बहुसंख्य मुल गरबा हवाच असे उत्तर देतील .
तेच हा प्रश्न वयस्कर लोकांना विचारला तर तर नको असे उत्तर देतील.
वयाचा पण ह्या विषया शी संबंध आहे
भारतीय लोकं उत्सव प्रेमीच
भारतीय लोकं उत्सव प्रेमीच आहेत.
फक्त काही लोकं त्याला ओंगळवाणे स्वरूप देत आहेत ते बहुतांश लोकांना नको आहे.
पण ते नको म्हणून पूर्णच बंद व्हायला देखील त्यांना नकोय.
तुम्हाला सण बंद करायचेत कि
तुम्हाला सण बंद करायचेत कि चालू ठेवायचे आहेत ?
बंद करायचे असतील तर अमका करतो म्हणून आम्हाला करू द्या हे आधी बंद करा.
मागची पाने वाचा. फटाक्यांचे समर्थन पण करत होता, स्पीकरचे पण.
हे घ्या फटाक्यांचे परिणाम
https://www.esakal.com/desh/firecrackers-are-being-burst-in-delhi-despit...
इथे लोक पूर्वीपासून म्हणत आहेत कि सार्वजनिक उत्सव करा पण त्यातला हिडीसपणा थांबवा.का थांबवायचा याची कारणे आणि संदर्भ दिले आहेत. ते फाट्यावर मारून सर्वांना वेड्यात काढलं. तुम्हाला साथ द्यायला दुसरे म्हणजे पहिले सर आले. मग तुम्हाला चेव चढला.
परिस्थिती विरोधात गेल्यवर लगेच यू टर्न मारला. अशाने या धाग्याचा दुसरा भाग लवकरच काढावा लागेल.
म्हणून तुम्ही शिवजयंती साजरी
म्हणून तुम्ही शिवजयंती साजरी करणार. आणि इतर महापुरूषांची जयंती साजरी केली कि तुम्ही हिंदू होणार.
का ? ते हिंदू नाहीत का ?
मी सर्व च जयंत्या,पुण्या तिथी विषयी बोलत आहे ज्या सार्वजनिक रित्या साजऱ्या होतात.
त्या मध्ये शिव जयंती पण आली.
सर्वसमावेशक बोलत आहे.
तुम्ही भलत्याच वळणावर जात आहात
Pages