काही महिन्यांपूर्वी मी बे एरियातील वारी विषयी एक लेख लिहिला होता. त्याला संमिश्र प्रतिसाद होता. काही जणांचा सूर होता वारी म्हंटल की ती सार्वजनिक ठिकाणी ( मुख्यत्वे रस्त्यांवरून) होते.
अर्थात त्या वेळी ही वारी सर्व नियमाचे पालन करून आणि अतिशय शांतता पूर्ण आणि पवित्र वातावरणात काढल्याने मला तो मुद्दा अत्यंत गौण वाटला किंबहुना उगाच खोड काढल्यासारखंही वाटलं.
पण नंतर काही काळाने गोपाळकाला निमित्ताने उठवणाऱ्या कित्येक मजली दही हंडया, सार्वजनिक गणेशोत्सवा पायी, दांडिया पायी अडविलेले, उखडलेले रस्ते, लाऊड स्पीकर्स मुळे विद्यार्थी, आजारी व्यक्ती ह्यांना होणारा त्रास, (काळ्या?)पैशांची होणारी बेसुमार उधळपट्टी आणि ह्या सर्वांच्या मागे असलेल्या राजकीय शक्ती आणि त्यांचे सत्ता संघर्ष हे बघितलं की मात्र मग मलाही प्रश्न पडला,
उत्सवाचे असे सार्वजनिकत्व असावे किंवा नाही? किंवा उत्सव आपापले स्वतःच्या घरापुरते ठेवावेत की सार्वजनिकरीत्या साजरे करावेत?
पंढरपूर वारी विषयी खोलात जाऊन बघितलं असता, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकोबांनी अनुक्रमे आळंदी आणि देहू येथून पंढरपूरला चालत जायला सुरुवात केली. तुकारामांच्या देहवासानंतर त्यांचे वंशज नारायणबाबा ह्यांनी त्यांच्या पादुका पालखीतून न्यायला सुरुवात केली. १८२० मध्ये हैबतराव ह्या सरदारांनी पालखीतून पादुका नेवून त्याला वारी / दिंडी स्वरूप दिले. त्यानंतर त्याचे आताचे वारीचे विराट स्वरूप दिसते ज्यात कित्येक लाख लोक चालतात.
गणपतीचा उल्लेख वेदकालीन साहित्यातही आढळतो पण गणेश चतुर्थी कधी पासून आणि कुणी पहिल्यांदा साजरी केली ह्याचा उल्लेख मिळत नाही.
परंतु शिवाजी महाराजांच्या काळात गणेश उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करायला सुरुवात केली. नंतर पेशव्यांच्या काळातही ही परंपरा कायम राहिली.
नंतर ब्रिटिश राज आले तेव्हा त्यात खंड पडला. लोकं गणेश चतुर्थी आपापल्या घरी करू लागले.
परंतु लोकांना एकत्र आणण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव (आणि शिवजयंती उत्सव ) सुरु केले.
त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात त्याचे बदलत गेलेले स्वरूप तर सर्वाना परिचित आहेच. कदाचित गावांमध्ये अजूनही त्याचे सार्वजनिक रूप अक्राळ विक्राळ झाले नसावे जेव्हढे शहरात झालेले आढळते.
पूर्वी (वीसेक वर्षांपूर्वी किंवा कित्येक अंशी आजही ) गावांमधून केले जाणारे उत्सव सर्व गावाला एकत्र आणणारे होते किंवा आहेत, सर्वांचा सहभाग असल्यामुळे सहाजिकच ते निरुपद्रवी व आनंददायी होतात.
समजायला लागल्यापासून बघतेय ते बदलत जाणारे दहीहंडीचे स्वरूप, गणेशोत्सवाचे स्वरूप, हळू हळू नवरात्रीच्या देवीच्या जत्रेपासून तिचे दांडिया-डिस्को दांडियात होणारे रूपांतर. २००० च्या दशकापासून (?) नव्याने सुरु झालेल्या हिंदू नवंवर्ष यात्रा, सार्वजनिक संक्रातीचे हळदीकुंकू समारंभ, मंगळा गौर कार्यक्रम ( बहुदा यंदाच हे चालू झाले असावेत).
ह्यात ते जिथपर्यंत सोसायटी, गल्लीत सगळ्यांच्या हातभराने साजरे केले जातात तेव्हा कदाचित सार्वजनिक उत्सव सुरु करण्यामागील उद्देश सफल होत असावा असे वाटते.
पण जेव्हा त्यात (अ) राजकीय शक्ती उतरतात, मग खंडण्या, वर्गण्या, सेलिब्रिट, त्यांच्या लाखोंच्या बिदाग्या, आपले वर्चस्व प्रस्थापित करायला लावलेले ध्वनिक्षेपक, ज्याच्या नावाने उत्सवाची देणगी मागता त्याला बघवणार, ऐकवणार नाहीत अस ओंगळवाणं, हिडीस नृत्य, गायन-वादन, रस्ते बंद केल्यामुळे होणारी गैरसोय ... ही न संपणारी यादी समोर येते.
आणि मग प्रश्न पडतो की उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करावेत का?
म्हणजे मूळ चांगला उद्देश बाजूला सारून त्याचा आपमतलबासाठी वापर करून त्याचे स्वरूप इतके बिभित्स केले जाते की प्रश्न पडावा मुळात हे सुरूच कधी, कोणी आणि कशासाठी केले. त्यामुळे खरा प्रश्न सार्वजनिकरित्या कशाप्रकारे करावेत आणि त्यावर काही निर्बंध घालून त्याचा मूळ उद्देश सफल करता येईल का असा असायला हवा.
तुमचे मत काय आहे जरूर लिहा.
तळटीप- मते कितीही विरोधात किंवा न पटणारी असतील तरी असभ्य भाषा वापरू नये. आणि वैयक्तीक पातळीवर घसरू नये.
तुमचे चार वेगवेगळ्या वेळी
तुमचे चार वेगवेगळ्या वेळी दिलेले प्रतिसाद पाहता तुम्ही नक्की काय बोलत आहात हे तुम्हाला कळले तरी खूप झाले. मागे जाऊन पुन्हा एकदा पहिल्या पासून वाचा.
माझ्या कडे एव्हढा वेळ नाही.
<< तुकाराम महाराजांच्या काळात
<< तुकाराम महाराजांच्या काळात गरबा खेळायला सुरवात झाली. तुकाराम महाराजांच्या घरासमोर मंदिर होतं तिथे महाराज नऊ रात्री कीर्तन करायचे. लोकं टिपऱ्या घेऊनच कीर्तन ऐकायला यायचे. कीर्तन संपलं की गरबा सुरू व्हायचा. त्या काळी गरबा हा नचाचा प्रकार नसून तो एक सेल्फ डिफेन्स चा प्रकार होता. समोरच्याने काठी मारली तर आपण ती आडवायची कशी हे त्यात शिकवलं जायचं. सध्याचा बो स्टाफ (बाणाटी) हा प्रकार गरब्याची पुढची स्टेप. यात काठी मोठी असते. तर हा गरबा खेळून मराठे अधिक ताकदवर होतील याची भीती मुघलांना वाटली म्हणून ते सशस्त्र गरब्यावर चाल करून आले. लोकं पळायला बघत होती पण तुकाराम महाराज तिथे होते ते बोलले घाबरु नका सामना करा. मुघल तलवारी घेऊन वार करणार तोच त्यांच्या तलवारी टिपऱ्यात रूपांतरित झाल्या. मुघल वार करत होते पण तलवारी टिपऱ्या बनत होत्या. हळूहळू मुघलांना पण मजा वाटायला लागली आणि ते पण भक्तिभावाने नाचू लागले. आताच्या काळात टिपऱ्या खेळताना जे दोन गोल तयार होतात ते याच प्रसंगामुळे.
Submitted by बोकलत on 22 October, 2023 - 03:06 >>
----- बोकलतांचा प्रतिसाद नेहेमीच वाचण्यासारखा असतो.
काठी वाचल्यावर पुढे नाठाळ येतील असे वाटले होते. पण सुटले बिचारे.
लोक धुंदीत असतील तर शांतता पण
लोक धुंदीत असतील तर शांतता पण राहते आपोआप
>>>
काहीतरी डेंजर आत्मघपला आहे सर. गंभीर वाटतेय जरा.
श्रीमदबोकलत पुराणाच्या नित्य
श्रीमदबोकलत पुराणाच्या नित्य पठणानंतर अखिल हिंदू सण साजरा कमिटीने नवीन नियमावली बनवली तेव्हा पासून सावधानता म्हणून बचावात्मक आक्रमक गरबा खेळला जाणे आवश्यक मानले गेले.
दिवाळी अजून लांब आहे तरी
दिवाळी अजून लांब आहे तरी दिल्ली ची हवा खूप प्रदूषित झालेली आहे.
फटाके न वाजवता पण हवा प्रदूषित होते वाटत.
दिवाळी अजून लांब आहे तरी
दिवाळी अजून लांब आहे तरी दिल्ली ची हवा खूप प्रदूषित झालेली आहे.
फटाके न वाजवता पण हवा प्रदूषित होते वाटत. >>> सहमत.
सर्व अ - हिंदू आपल्या वाहनातून धूर काढत रोजच्या रोज उत्सव साजरा करतात. म्लेंच्छांच्या उद्योगातल्या धुराड्यातून प्रदूषणाचे मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. यवनांच्या घरातले सांडपाणी नदीत जाते.
मग बिचार्या हिंदूंनी आठ दिवस फटाके फोडले तर बिघडले कुठे ?
सर्व हिंदूंनी सरांच्या घरात फटाके फोडा. सर नाही म्हणणे शक्यच नाही.
फटाके न वाजवता पण हवा
फटाके न वाजवता पण हवा प्रदूषित होते वाटत.>>> आता प्रदुषित झालीच आहे तर पुर्ण गॅस चेंबर बनवूनच टाकूयात...उगाच त्रागा करत मरणारे धर्मद्वेष्टे आहेत लेकाचे... धर्मासाठी कसे निमुटपणे शिर तळहातावर घेऊन जगावे याची गती असण्यासाठी पुर्वजन्मी पुण्यात्मा असावे लागते...त्यांना प्रदूषण थांबवायचे असल्यास पृथ्वीवरील यच्चयावत प्रदुषण थांबवावे आणि मगच धर्मद्वेष करुन आमच्या धर्मकार्यासाठी होणाऱ्या प्रदूषणावर भाष्य करावे, तेव्हाच त्यांना तो नैतिक अधिकार राहील.
- इति.....
आम्ही मित्र लहानपणी शाळेत
आम्ही मित्र लहानपणी शाळेत ओझोन थर, ध्रुवीय बर्फ, पर्यावरण शिकलो होतो त्यामुळे फटाके बार वाजवताना प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यायचो. बार आम्ही शेणात लावायचो जेणेकरून धूर शेणात विरून जावा. एकदा मंदिराजवळ लावला तर ते शेण मंदिराच्या भिंतीवर उडालं आम्ही लावणारे पळून गेलो आणि बघे होते ते तावडीत सापडले. त्यांना भिंती साफ करायला लावल्या.
बार आम्ही शेणात लावायचो
बार आम्ही शेणात लावायचो जेणेकरून धूर शेणात विरून जावा.>>> @बोकलत, गाईच्या शेणात बार लावला असता, कार्बन मोनॉक्साईड आणि सल्फर डायॉक्साईड सारख्या हानिकारक प्रदूषकांचे रुपांतर ऑक्सिजन मधे होते हे तुम्हाला तुमच्या शाळेत शिकवले नव्हते?
पुन्हा सर जुन्या टेप वर आले.
पुन्हा सर जुन्या टेप वर आले. त्यांच्या मते सगळ्या प्रदूषण करणाऱ्या गोष्टी एकाच तागडीत तोलायच्या. बस, ट्रेन ह्या गरजेच्या वस्तू नाहीत असे मागे म्हणलेच आहेत.
प्रदूषण फाटक्या मुळे होवू
प्रदूषण फाटक्या मुळे होवू किंवा बस च्या धुरा मुळे .
हवा ही दूषित होतेच.
आणि लोकांच्या आरोग्य आणि पर्यावरण ह्यांना गंभीर धोका पोचवतेच.
प्रदूषण कशा मुळे होत आहे त्या वरून योग्य की अयोग्य असा भेदभाव करता येणार नाही.
जे असा भेदभाव करतात ते ढोंगी आहेत.
दुतोंडी लोक.
दुतोंडी लोक.
1) होळीत पाणी वापरले की पाण्याची नासाडी .
मात्र क्रिकेट ग्राउंड वर हजारो लिटर पाणी वापरले जाते ती मात्र पाण्याची नासाडी नसते.
२) गणेश मूर्ती पाण्यात विसर्जित करतात त्या मुळे पाणी दूषित होते पण.
शहर,महानगर,कारखाने, हौसिंग सोसायट्या ह्यांचे सांडपाणी काहीच प्रक्रिया न करता नदीत सोडल्यावर मात्र पाणी दूषित होत नाही.
३) युद्धात हजारो टन स्फोटक वापरतात अनेक घातक घटक हवेत मिसळतात.
त्या मुळे वातावरण प्रदूषित होत नाही तशी चर्चा अन कुठे दिसणार नाही
मात्र इंच भर फटाक्या मुळे मात्र वायू प्रदूषण होते.
४) लग्न समारंभात ,बाकी समारंभात, विजेचा खूप वापर केला जातो.
तो वीज वापराचा दुरुपयोग नसतो.
एक माणूस घरात असतो आणि घरातील सर्व लाईट ,एसी चालु असतात त्या मुळे विजेचा दुरुपयोग होत नाही.
मात्र दिवाळी मध्ये रोषणाई केली की मात्र विजेचा दुरुपयोग होतो.
प्रदूषणाच्या नावाने खडे
प्रदूषणाच्या नावाने खडे फोडणारे लोक
झुकझुक आगीनगाडी धुरांच्या रेषा हवेत काढी
याची मात्र कौतुकाने आठवण काढतात.
सर्वसामान्यांचे आयुष्य वेठीस
सर्वसामान्यांचे आयुष्य वेठीस धरणाऱ्या डीजे आणि लेझर विरोधात ठोस भूमिका घेत कॅटलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांनी नुकतीच जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र समाज माध्यमातून त्यांना जीवे मारणे, काळे फासणे, नग्न धिंड काढणे अशा धमक्या आल्या.
https://policenama.com/pune-news-catalyst-foundation-chairman-sunil-mane-threatened-for-his-anti-laser-and-dj-stance/
हल्ली महापुरुषांची जयंती साजरी करताना तसेच सण उत्सवांमध्ये डीजे आणि लेझर लावण्याची पद्धत मोठ्या प्रमाणावर सुरु झाली आहे. मात्र यामुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागतो. नुकताच पार पडलेल्या गणेशोत्सवात याचे दुष्परीणाम दिसून आले. डीजेमुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागाला. काहींना कायमचे बहिरेपण आले. तर लेझर मुळे अनेकांची दृष्टी गेली. यामुळे डीजे आणि लेझरवर बंदी घालावी.
सरांना दसरा मेळाव्याला शिवाजी
सरांना दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क वर कसे बोलावले नाही याचं आश्चर्य वाटतं, भरपूर मनोरंजन करतील
मात्र दिवाळी मध्ये रोषणाई
मात्र दिवाळी मध्ये रोषणाई केली की मात्र विजेचा दुरुपयोग होतो.>> वाह सर.
येऊ द्या अजून...
आयुचाप .
आयुचाप .
जावू ध्या नाव पण लीहाता येत नाही इतके विचित्र नाव आहे आयडी च.
इथे मनोरंजन चा कार्यक्रम नाही.
प्रदूषण हे प्रदूषण च असते.
त्या मध्ये आपल्या सोयी नुसार भेदभाव करता येत नाही..
ह्याची उदाहरणे दिली आहेत.
तुम्ही फक्त दिवाळी,आणि हिंदू सणात ह्या मध्ये च अडकून पडला आहात.
मर्यादित हेतू फक्त तुम्हा लोकांचा आहे.
फक्त हिंदू सण ना विरोध करायचा .
बाकी प्रदूषण वैगेरे गेले तेल लावत .
तुम्हाला काही देणे घेणे नाही.
हल्ली महापुरुषांची जयंती
हल्ली महापुरुषांची जयंती साजरी करताना तसेच सण उत्सवांमध्ये डीजे आणि लेझर लावण्याची पद्धत मोठ्या प्रमाणावर सुरु झाली आहे. मात्र यामुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागतो. नुकताच पार पडलेल्या गणेशोत्सवात याचे दुष्परीणाम दिसून आले. डीजेमुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागाला. काहींना कायमचे बहिरेपण आले. तर लेझर मुळे अनेकांची दृष्टी गेली. यामुळे डीजे आणि लेझरवर बंदी घालावी.
ही भूमिका अगदी योग्य आहे .समतोल भूमिका आहे ह्याला कोण विरोध करेल.
पण सोयीनुसार भूमिका बदलणारे सरड्या सारखे रंग बदलत असतात.
त्यांचा विरोध बिलकुल प्रामाणिक नसतो.
त्या मुळे लोक विरोध करतात अशा लोकांना
बाकी प्रदूषण वैगेरे गेले तेल
बाकी प्रदूषण वैगेरे गेले तेल लावत .>>> तेलामुळे काही प्रदूषण होत असल्याची शक्यता वगैरे??
यामुळे डीजे आणि लेझरवर बंदी
यामुळे डीजे आणि लेझरवर बंदी घालावी. >>>आँ ???
LTP(Common sense) has crossed
LTP(Common sense) has crossed Supertrend (10, 3)
आँ ???>>>
आँ ???>>>
पण सोयीनुसार भूमिका बदलणारे सरड्या सारखे रंग बदलत असतात.
सरांनी इतकं स्पष्टपणे लिहिलंय स्वतः बद्दल तरी तुम्ही असं करता राव
डीजे आणि लेझरवर बंदी घालावी.
डीजे आणि लेझरवर बंदी घालावी. >> आता फटाक्याविषयी पण आपले अनमोल मत मांडावे म्हणजे चर्चा थांबवता येईल.
सुसंगती सदा घडो.
सुसंगती सदा घडो.
निवडक पुल प्रमाणे निवडक सर
लाभ घ्यावा.
DJ हा प्रकार भयंकर आहे त्या वर बंधन हवं, अशी काही बंधन घालून ustav खूप जोरात साजरे करता येतील.
तरुण पिढी नी सहभागी व्हावे म्हणून dj हा प्रकार आला.
दुसऱ्या कोणत्या तरी मार्गाने तरुण पिढी चा सहभाग वाढवता येईल.
पण ustav साजरे च करू नका हे मत अयोग्य.
माणूस हा समाज प्रिय प्राणी आहे ह्याचा विसर पडून देवू नका.
Submitted by Hemant 333 on 15 September, 2023 - 19:00
विकृत पना जो आलेला आहे त्याचे मूळ कारण राजकीय पक्षांचा ह्या क्षेत्रात प्रवेश.
जिथे चार माणसं जमा होतात तिथे हे राजकीय पक्ष पोचतात.
धार्मिक कार्यक्रमाचा पण राजकीय अड्डा बनवून ठेवला आहे..
त्या मुळेच ह्या विकृती अशा उस्तावत शिरल्या आहेत
Submitted by Hemant 333 on 16 September, 2023 - 11:14
1)Dj नको.
२)मिरवणूक शिस्तीत नियोजन बद्ध असावी.
३) मंडप रस्ता aadvnsre नसावेत .जिथे पर्यायी मार्ग नाही तिथे.
४) speaker च आवाज कमी असावा.
५) कृत्रिम तलावात विसर्जन करावे आणि मुर्त्या मातीच्याच हव्यात.
म्हणजे तीच माती विसर्जन नंतर झाडांना देता येते.
ह्या सर्व गोष्टी सर्वांना पटतात.
संयमित शब्दात कोणी ही पटवले तर मला नाही वाटत कोणी विरोध करेल.
मग माशी शिंकते कुठे.
१) आक्रमक पने गणेश ustav वर टीका करणे.
२) सुधारणा विषयी मत व्यक्त करताना चुकीच्या ,गरज नसलेल्या कॉमेंट करणे .
३) मिरवणुकीत आवाज मोजण्याचे यंत्र घेवून फिरणे (NGO)
हे असले प्रकार होतात मग हिंदू हिंदू म्हणून आपल्यावर अन्याय होत आहे असे समजतो आणि आक्रमक होतो.
मग तो कोणाचं काहीच ऐकून घेण्याच्या स्थिती मध्ये नसतो.
आपलं काय चुकतंय ह्याचा सर्वांनी च विचार केला पाहिजे.
Submitted by Hemant 333 on 19 September, 2023 - 19:59
भारतीय मीडिया आणि भारतीय विचारवंत ह्यान ची कोणतीच लिंक कोणत्याच विषयात विषयात दामलू जी देवू नका.
भारतीय विचारवंत आणि भारतीय मीडिया बदनाम आहे.
त्यांचा स्वार्थ बघूनच व्यक्त होतात.
निःपक्ष विचारवंत भारतात जन्म च घेवु शकत नाही.
आणि जगातील सर्वात बकवास मीडिया म्हणून भारतीय मीडिया एक नंबर ल आहे.
पेशव्यांनी काय केले सोडून ध्या.
आता ची जी स्थिती आहे त्या वर बोला
ह्या विषयात जागतिक विचारवंत काय म्हणतात ह्याची काही माहिती असेल तर पोस्ट करा..भारतीय विचारवंत ची नको
Submitted by Hemant 333 on 19 September, 2023 - 22:39
छत्रपती सोडले तर भारतातील एका पण व्यक्ती ला महापुरुष म्हणून मी तरी स्वीकारत नाही.
मला सर्व च बोगस वाटतात.
भारतीय मीडिया मध्ये एक पण दर्जा राखून नाही
छत्रपती च का?
तर त्यांनी त्यांनी समता,बंधुभाव फक्त लोकांस सांगितला नाही तर अमलात आणला.
सर्व धर्म समभाव,आस्तिक ,नास्तिक ह्यांच्या वर अमल केला .
अमलात आणला त्याचे बरे वाईट परिणाम त्यांनी अनुभवले.
आणि बाकी.
हजारो पुस्तक लीहळी, बुध्दी चे तारे तोडले पण त्या विचाराची अमलबजानी दुसऱ्याच्या डोक्यावर टाकली.
स्वतः विचार व्यक्त करण्या शिवाय बाकी काही काडी च काम केले नाही
आसाराम बापू आणि आदर्श विचारवंत ह्यांच्या मध्ये काहीच फरक नाही
Submitted by Hemant 333 on 19 September, 2023 - 23:02
राज ठाकरे योग्य बोलत आहेत.
ते शुद्ध मनाने योग्य ते बोलत आहेत .
पण पुरोगामी विचाराची आताची नाटकी लोक मनात द्वेष ठेवून विरोध करत असतात.
त्यांच्या मनात दुष्ट हेतू असतो.
म्हणून त्यांनी कोणी राज ठाकरे सांगत आहेत ते पण सांगायचं प्रयत्न करू नये.
उलट परिणाम होईल
Submitted by Hemant 333 on 1 October, 2023 - 20:1
आकडेवारी सांगाल का?
गणपती विसर्जन मध्ये वाजणाऱ्या वाद्य न मुळे .
इतकी लोक मेली,इतकी बहिरी झाली, .
ही आकडेवारी विरोध करणाऱ्या पुरोगामी कडे नाही.
आणि असेल तरी ते देणार नाहीत.
कारण सर्वच मंडळ बेजबाबदार वागत नाहीत .
काही मोजकेच वागतात.
समाज सुधारणा हा बिलकुल हेतू नसणारे फक्त हिंदू धर्माच्या सणाना विरोध करणे इतकाच हेतू असणारे आकडे वारी देवूच शकत नाहीत
Submitted by Hemant 333 on 1 October, 2023 - 20:41
विमान, रेल्वे, गाड्या ह्यांच्या आवाज नी त्रास होत नाही का?
विविध रासायनिक कंपन्या ,शहर आणि महानगर.
हे वायू प्रधूषण पासून पाणी प्रदूषण पण करतात .
त्यांचा त्रास होत नाही का?
देशात एक पण शहर किंवा महानगर नको.
विमान,रेल्वे , मोटर गाड्या बंद करा अशा का मागण्या होत नाहीत
एकदम शांत वातावरण निर्माण होईल जेव्हा शहर , महानगर नष्ट केली जातील.
रेल्वे,विमान ही सेवा बंद केली जाईल.
,रासायनिक कंपन्यांना tale लावले जातील.
किती भयंकर विमानाचा आणि रेल्वे च्या हॉर्न चा आवाज येतो.
त्या पेक्षा dj परवडला
Submitted by Hemant 333 on 1 October, 2023 - 21:16
काही गरजेच्या नाहीत करोड वर्ष ह्या सेवा नव्हत्या तरी लोक मस्त जगत् होती.
आता दोनशे वर्ष झालीत फक्त ह्या सेवा आहेत.
पृथ्वी चा विनाश .
महानगर,नगर,आधुनिक यंत्रणा .
ह्या मुळेच होत आहे .
सर्वांना माहीत आहे .
पृथ्वी सजीवांना जगण्यास कशामुळे निकृष्ट होत आहे.
तुम्ही फक्त dj वर च अडून आहात
Submitted by Hemant 333 on 1 October, 2023 - 21:35
विमानाचा आवाज १२० ते १४० decible इतका असतो.
त्या मानाने dj च आवाज खूप च कमी असतो
Submitted by Hemant 333 on 1 October, 2023 - 21:45
मग गणपती उस्ताव मध्ये सर्व पुरोगामी लोकांना सरकार नी जायचं खर्च देवून आफ्रिकेच्या वाळवंटात पाठवून द्यावे.
असे पण हे अल्प संख्यांक आहेत.
व्यवहारी दृष्टी नी परवडेल.
आणि त्यांना अशांतता नको असेल तर तिकडेच राहावे..यायचे असेल तर स्व खर्चाने यावे
Submitted by Hemant 333 on 1 October, 2023 - 22:1
कॉम्प्युटर आणि सेल फोन. Wink
हे सर्व नकारा.
Dj गणपती उस्तावं मध्ये वाजत नव्हता तो पर्यंत मागे जा.
आणि त्या नंतर चे सर्व नाकरा.
कडवा विरोध करा आम्ही पण तुमच्या मागे आहे .
फक्त स्वार्थ साठी एकच गोष्टी ला विरोध नको,द्वेष व्यक्त करण्यासाठी तर बिलकुल नको
Submitted by Hemant 333 on 1 October, 2023 - 22:2
ल्वे आणि विमान गरजेच्या सार्वजनिक सेवा नाहित असे वाटणाऱ्या माणसालाच असल्या पोरकट स्किमा सुचणार
ऑफर स्वीकारा आफ्रिका वाळवंट.
हिंदू ची अलर्जी आहे ना
आम्ही सर्व वर्गणी काढून खर्च करू
Submitted by Hemant 333 on 1 October, 2023 - 22:24
डीजे हा हिंदूंचा एकविसाव्या शतकातल्या नवा देव आहे.
बदल होतात हा निसर्ग नियम आहे.
बदल मग सर्व च गोष्टी मध्ये होतात.
सनई जावून आता डॉल्बी आला हे पण नैसर्गिक आहे जसे बैलगाडी जावून मोटर गाड्या आल्या.
आधुनिक आरोग्य सुविधा आल्या त्या बरोबर ..फालतू लाईफ स्टाईल पण आली
तरुण पनी च लोक विविध रोगाचे बळी पडू लागले.
हे सर्व नको असेल तर .
काळ माग फिरवा .
हाच उपाय आहे.
बाकी सर्व वायू, पाणी,हवा प्रदूषण चालते पण गणेश उस्त्वत मध्ये वाजणारा डॉल्बी चालत नाही.
हा विरोधाभास आहे ना.
विरोध प्रामाणिक असेल तर सर्व च गोष्टी ल असायला हवा
Submitted by Hemant 333 on 1 October, 2023 - 22:5
ह्या विषयावर कोणत्या ही प्लॅटफॉर्म वर झालेली चर्चा बघितली तर लक्षात येईल गणपती ustavat डॉल्बी किंवा dj नको असेच 99.99% लोकांची मत असतात.
पण तरी सुध्धा Dj डॉल्बी असतोच.
कोण आणतात Dj/डॉल्बी.
1 % लोक.
मिरवणुकीत लाखो लोक सहभागी असतात dj/डॉल्बी असून पण.
कोण असतात मग ही लोक.
खरे लोक दो तोंडी असतात.
सार्वजनिक platforms वर जाऊन बसले मोठे समाज सुधारक बनतात पण स्वतःच्या घरच्या कार्यक्रमात मात्र dj/डॉल्बी आणतात.
( मावूली च dj वर्जन ह्यांच्या घरच्या पूजेला अशी अवस्था असते)
Dj/डॉल्बी चा आवाज कायद्यात बसतो का ..
तर त्याचे उत्तर आहे नाही.
ह्याच्या वर पोलिस ना कारवाई करण्याचा अधिकार आहे का?
तर आहे.
तसे कायदे आहेत का?
तर आहेत.
मग गणपती ustav चालू होण्या अगोदर शहरातील तमाम dj/ डॉल्बी पोलिस जप्त का करत नाहीत
म्हणजे आतून खूप लोकांचा dj/ डॉल्बी ला पाठिंबा असतो.
सरकार ९९.९९% लोकांच्या भावना दुखवण्याचा अव्यवहारी निर्णय कसा घेईल.1% dj/डॉल्बी प्रेमी लोकांसाठी.
पण सरकार तसा निर्णय घेते ..
म्हणजे दिसते तसे नाही.
Submitted by Hemant 333 on 2 October, 2023 - 14:19
Car मध्ये असलेली sound सिस्टीम किती decible चा आवाज करते.
नक्कीच कायद्याच्या पलीकडे तो आवाज असतो.
पण लोक आवडीने मोठा आवाज,bass असणारी सिस्टीम च पसंत करतात.
पहिले घरात होणे थिएटर लावणे ही फॅशन होती..
किती तरी मोठा आवाज त्या मुळे घरात निर्माण होत असे.
बाजूची लोक हैराण.
पार्टी मध्ये काय अवस्था असते.
आणि हे सर्व शोक पाळणारे च गणपती ustavatil dj/डॉल्बी ला समाज माध्यमावर कॉमेंट मध्ये विरोध करत असतात.
प्रत्येकाने अपल्या कार ची sound system बघावी,आपल्या घरातील music system बघावी.
किती कायद्यात बसते ती.
म्हणजे कळेल आपण पण सोयी नुसार व्यक्त होतो ते
Submitted by Hemant 333 on 2 October, 2023 - 14:26
समतोल पना नाही .
काही आयडी फक्त कोठून कोठून बातम्या शोधून फक्त गणपती ustav ची निगेटिव्ह बाजू च दाखवत असतात.
Agenda चालवल्या सारखे.
पूर्ण महाराष्ट्रात गणेश ustavat positive गोष्टी पण घडतं असतात.
पण त्या बातम्या ह्यांना वर्ज.
ठराविक हेतू नी,ठराविक विचाराने, ,द्वेषाने लोकांची बुध्दी चालत नाही.
इथे काही आयडी ना एक पण चांगली गोष्ट ह्या गणपती ustavat दिसली नाही.
आहे ना आश्चर्य.
ह्यांचे एकच गुऱ्हाळ.
कोण मेले,किती बहिरे झले,कसे दारू पितात,कसे नाचतात .
बस शोधून शोधून फक्त ह्याच्याच लिंक द्यायच्या.
निःपक्ष पना नी विचार व्यक्त करा .निःपक्ष हेतू ठेवा .
समाज नक्की सुधारेल.
हेतू,द्वेष मनात ठेवून वागल तर .
Dj पेक्षा पण भयंकर वाद्य ठरवून वाजवली जातील.
आणि त्या मध्ये ते दोषी नसतील.
मस्करी चा विषय नाही.
गणपती ustav चालू झाला की टीका चालू होते.
1) स्पीकर चा आवाज.
२) पत्ते खेळणे गणेश जी सामोरं
३) मिरवणुकीत dj/ डॉल्बी.
४) जल प्रदूषण.
५) रस्तावर मंडप.
किती तरी वर्ष त्याच काळात टीका होते.
काही बदल झाला .
उलट दिवसेंदिवस .
वरील सर्व गोष्टी वाढत गेल्या.
का असे झले असेल?
कोणी विचार केला का?
१) सभ्य,सुशिक्षित,हुशार जी लोक स्वतःला समजतात ती सामाजिक कार्यात स्वतः कधीच भाग घेत नाहीत.
फक्त घरात बसून शहाणपण शिकवत असतात त्यांची पोर गणपती मंडळात असतात बापाला फाट्यावर मारतात.
२) सरकार ,राजकीय पक्ष ही संधी समजतात आणि आर्थिक,नैतिक,कायदेशीर सर्व ताकत ustav प्रिय लोकांच्या मागे उभी करतात.
३) घरात बसून विरोध करणारे त्या मुळे लपंगे ठरतात ते कधीच स्वतः समाज सुधारणा करण्यासाठी पिच वर नसतात.
हे सरकार आणि राजकीय पक्ष ह्यांना चांगले माहित आहे.
४) गणपती ustav दणक्यात म्हणजे हिंदू धर्म दणक्यात..
असा विचार सामान्य लोक करतात..
आणि तेच मतदार असतात.
५), कोण विचारतो मग घर कोंबडी असणाऱ्या विचार विचारवंतांना.
ते स्वतः कुठेच सहभागी नसतात.
सर्व अपेक्षा सरकार कडून,संघर्ष करणे ह्यांना जमत नाही .त्यांचे धाडस च होत नाही.
भौतिक सुखात व्यस्त असतात
Submitted by Hemant 333 on 3 October, 2023 - 13:09
रघु आचार्य.
तुम्हाला माझा पॉइंट अजून तुमच्या लक्षात आला नाही.
ज्यांना वाटत की गणेश ustav विकृत रूप घेत आहे.आणि समाज माध्यमावर तरी ही लोक ९९% आहेत.
मग ही लोक ज्यांना तळमळ आहे ती लोक .
गणेश ustav ची जी सार्वजनिक मंडळ असतात त्या कमिटी मध्ये का जात नाहीत.?
कमिटी च कार्यक्रमाची रूपरेषा ठरवत असतात.
फक्त हवेत गोळीबार करणाऱ्या लोकांना कोणी गंभीर पने घेत नाही
हा जगाचा नियम आहे.
आणि हे सुधारणावादी लोकांना वाटत समाज सुधारक दुसऱ्याच्या घरात जन्मावा आमच्या नाही.
कातडी बचाव ही लोक असतात.
Ustav पुढे लागून करणारे स्वतः त्या मध्ये सहभागी असतात.
त्याचे बरे वाईट परिणाम सोसायची त्यांची तयारी असते.
हा फरक आहे ना.
Submitted by Hemant 333 on 3 October, 2023 - 13:24
मत योग्य आहेत की अयोग्य ह्या वर व्यक्त व्हा.
मी विविध प्रकारे ही समस्या मांडली त्या मुळे वेगवेगळा विचार दिसला.
मी एकच आहे
Submitted by Hemant 333 on 3 October, 2023 - 13:35
एक ग्रुप टोकाची विरोधी मत व्यक्त करत होता.
एक ग्रुप टोकाची गणपती ustav samarthan करणारी मत व्यक्त करत होता.
सर्च समस्या, आणि गरज .
अशी समतोल मत कोणीच व्यक्त करत नव्हता..सर्व आपल्या भूमिकेवर ठाम होते.
समस्या आहे पण सोडवायची कशी.
ह्याचे उत्तर कोणी देत नव्हते.
समस्या सरकार नी सोडवावी अशी अपेक्षा.
पण त्या लोकांची स्वतः त्या क्षेत्रात उतरून समस्या सोडवण्याची इच्छा च नाही.
हे स्पष्ट जाणवत होते
म्हणून मला विविध भूमिका घ्याव्या लागल्या
Submitted by Hemant 333 on 3 October, 2023 - 13:43
समाजाला योग्य मार्गावर न्यायचे आहे ना ?
मग ग्राउंड वर सहभाग हवा
Submitted by Hemant 333 on 3 October, 2023 - 13:48
सिग्नल्स वर ट्रॅफिक पोलिस किंवा कॅमेरा नसेल तर आयुष्यात कधीच वाहतूक नियम न मोडणारे पण नियम मोडतात.
चोरी हे खूप मोठे पाप असे समजणारे.
सूनसान रस्तावर दोन हजाराची नोट दिसली तर सरळ खिश्यात टाकतात.
मानवी स्वभाव असा आहे
वाईट गुण प्रतेक व्यक्ती मध्ये असतात.
ते नष्ट करायचे असतील तर स्वतः ग्राउंड लेव्हल येवून ते सुधारणा करण्याचे काम करावे लागते
Submitted by Hemant 333 on 3 October, 2023 - 13:55
म्हणजे हे सर्व फटाके अजून पण बाजारात उपलब्ध आहेत.
कोर्टाने आदेश देवून ,हंगामी जन आंदोलन करून काडी चा फरक पडला नाही.
ही फटाके वाजणारी लोक उगवतात कोठून .
समाज माध्यमावर तर मोठे ज्ञान देत असतात.
१५ aug २६ जानेवारी ल देशप्रेमाच उत् येतो.
पाकिस्तान भारत मॅच वेळेस तर देशिरेम उतू जाते.
इतके देशप्रेमी लोक असून पण.
भ्रष्ट कारभार,बँकांचे कर्ज बुडवणारे,देशाच्या कायद्याचे तीन तेरा वाजवणारे.
प्रतेक पावलावर देशाशी प्रतारणा करणारे भेटतात.
मग हे देशप्रेमी कुठे जातात
Submitted by Hemant 333 on 4 October, 2023 - 07:4
माझा मुलगा मोठा आहे मी माध्यम वयीन आहे.
दिवाळी मध्ये फटाके माझ्या घरात तरी वाजवणारे कोणी नाही.
आता मी फटाके कसे वाईट ह्या वर भाषण देवू शकतो.
पण उद्या ग्रँड child आले तर .
मला नाही वाटत आज चे माझे विचार मी कायम राखू शकेन.
मोठे नाही पण
टिकल्या किंवा लहान फटाके नक्कीच घरात आणले जातील.
कोण शेजारी तक्रार करायला आला तर माझ्या विचाराशी पूर्ण u turn घेबून मी फटाक्यांचे समर्थन करेन.
सर्वांन बाबत हेच होते.
म्हणून फटाके उत्पादन बंद होत नाही ना घेणारे कमी होत.
थोडी रिॲलिटी पण समजून घेतली पाहिजे.
मार्केट मध्ये ह्या गोष्टी उपलब्ध च नसतील तर लोक खरेदी करूच शकत नाहीत.
पण मार्केट मध्ये आवाजाचे फटाके मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात.
दारू खराब जाहिराती.
बाजारात मुबलक प्रमाणात दारू उपलब्ध आहे .
तंबाखू खराब .
बाजारात मुबलक प्रमाणात तंबाखू आहे.
प्लास्टिक पिशव्या पर्यावरणास हानिकारक.
बाजारात मुबलक प्रमाणात plastic पिशव्या उपलब्ध आहेत.
इथे असणारे सर्व आयडी plastic bag ज्या पर्यावरणास अत्यंत हानिकारक आहेत त्या बॅग रोज वापरतात
Submitted by Hemant 333 on 4 October, 2023 - 12:56
टवाळ नाही.
सोयी नुसार मत व्यक्त करणारे म्हणा.
किंवा फक्त मत व्यक्त करणारे पण आचरण न करणारे.
व्यक्ती नी स्वतःचेच आचरण बदलेले तर बदल सहज होवून जातो.
पण जितके सदाचारी समाज माध्यमावर असतात त्यांनी आचरण पण बदलले असते तर. त्याचा परिणाम स्पष्ट जाणवला असता .
इतकी सदाचारी लोकांची संख्या आहे.
हा माझा पॉइंट आहे
Submitted by Hemant 333 on 4 October, 2023 - 13:24
थले आयडी बरोबर उलटे आचरण करतात.
सरांच्या लॉजिक ने प्रत्यक्षात दारूचा प्रसार कोण
असे मी कुठेच लीहले नाही.
समाज माध्यम असे लीहले आहे.
मायबोली ची कक्षा मर्यादित आहे .
इथे सर्व प्रामाणिक लोक आहेत,समजदार आहेत,.
उगाच काही ही संबंध जोडू नका
Submitted by Hemant 333 on 4 October, 2023 - 13:48
हेमन्त३३३ हे कुणाहाही अद्वातद्वा बोलत नाहीत. प्रत्येक वेळी लॉजीकल मुद्दा मांडतात. क्वचितच रिग्रेसिव्ह विचारसरणी असते पण दोष कुणात नसतो. त्यामुळे इथे लोकांना त्यांचे लेग पुलिंग करायला आवडते. मी त्यांची पंखा आहे. Happy
नवीन Submitted by सामो on 4 October, 2023 - 17:38
>>>>
+७८६
Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2023 - 17:43
मी काय lihale आहे.त्या वर प्रतिक्रिया काय आहेत .
माझे मत आणि त्या वर प्रतिक्रिया काही संबंध नाही..
दारुड्या माणसाने दारू वाईट आहे हा सल्ला देणे चुकीचंच आहे.
स्वतः मन मुराद प्लास्टिक चा वापर करून.
प्लास्टिक कसं वाईट आहे .
हे चूकच आहे.
मानव ह्यांना माझे हे मत कळले आहे तरी उगाचच विरुद्ध बोलायचे म्हणून.
Co २ चे उदाहरण त्यांनी दिले आहे.
Submitted by Hemant 333 on 5 October, 2023 - 12:39
देशात अनेक कायदे आहेत.
१) गुन्हेगार निवडणुकीत उभा राहू शकत नाहीत.
निवडणुकीत सर्वात जास्त गुन्हेगार च उभे असतात.
२) जातीय,भाषिक ,धार्मिक द्वेष पसरवणे गुन्हा आहे.
राजकीय नेते खुले आम् द्वेष पसरवत असतात.
३) आवाज प्रदूषणाचे कायदे आहेत.
सर्रास आवाज प्रदूषण होत असते.
४) पाणी प्रदूषणाचे कायदे आहेत.
सर्रास नद्या, समुद्र मध्ये केमिकल युक्त पाणी सोडले जाते.
यमुना गटार गंगा झाली आहे
कडक कायदे कागदावर आहेत.
अनंत कायदे आहेत,सरकार पण आहे ,सर्व यंत्रणा पण आहे.
तरी ज्या भागात लोक स्वतः सुधारित आहेत तिथे च चांगले वातावरण आहे .ज्या भागात लोक स्वतचं सुधारित नाहीत तिथे स्थिती गंभीर आहे.
कायदा,यंत्रणा मात्र सर्व भागात अस्तित्वात आहे.
ह्याचा अर्थ विचार करून लावा.
उथळ प्रतिक्रिया देवू नका
त्या मुळे आचार्य जी.
लोकशाही,कायदे,पोलिस, system .
ह्यांच्या मुळे काही बदल घडत नाही.
लोक स्वतः सुधारणारे असावे लागतात.
Submitted by Hemant 333 on 5 October, 2023 - 13:27
माझे मत अजून सोप करून सांगतो.
Dj/डॉल्बी चा आवाज खूप मोठा असतो
त्रास दायक असतो.
स्वतः आपण आणि आपले कुटुंब नी ह्या डॉल्बी,/dj पासून दूर राहावे
आपले पाच कुटुंबाशी तरी चांगले संबंध असतात .त्यांना पण आवाज प्रदूषणाचे महत्व सांगा .
ही साखळी बनली तर च बदल होईल.
कायदे,सरकार काही करणार नाहीत.
मतचे राजकारण असते.
हेच माझे मतं आहे.
शेजारी एका कुटुंबाशी नीट संबंध नसतात आणि मोबाईल वर विश्व बंधुता विषयी लिहून काही बदल घडत नसतो.
Submitted by Hemant 333 on 5 October, 2023 - 13:36
येण्यासारखे आहे..... तुमच्या मता प्रमाणे या सर्वांवर कायदेशीर कडक बंधनांची अंमलबजावणी न करता वैयक्तिक वैचारिक प्रबोधनाने हा विषय निकालत काढायला हवा
कायदेशीर कडक कारवाई हा प्रकार योग्य आहे पण भारतात इतकी प्रबळ,निःपक्ष शासकीय यंत्रणा नाही .हे सत्य स्वीकार करणे सत्य स्थिती शी योग्य आहे.
मी आणि एकाध्टा राजकीय प्रभाव असणाऱ्या व्यक्ती नी एकाच तीव्रतेचा गुन्हा केला तरी .
आम्हा दोघांवर वेगवेगळी कारवाई होईल.
मला सर्व कलम लावून तुरुंगात टाकले जाईल आणि राजकीय प्रभाव असणाऱ्या व्यक्ती वर गुन्हा दाखल झाला तरी काहीच कारवाई होणार नाही.
अशी आपल्या देशात कायद्याच्या राज्याची अवस्था आहे.
गणपती ustav मंडळातील कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते पण असतात.
तेच राजकीय पक्षांचे मोर्चे,प्रदर्शन ,प्रचार ह्या मध्ये सहभागी असतात.
संख्या कमी असली तरी राजकीय पक्षांचे उपयोगी पडणारी लोक असतात .
त्यांच्या वर कायदेशीर कारवाई होत च नाही .
कायदे मोडले तरी .
म्हणून तर इतका विरोध करून पण ustav साजरे त्यांच्या स्टाइल नीच होतात.
Submitted by Hemant 333 on 5 October, 2023 - 15:39
Covid काळात सार्वजनिक उत्सव बंद च होते.
कोणी विरोध केला नाही.
कारण उचित कारण होते.
पण कोणतेच उचित कारण लोकांना पटेल असे नसेल तर जबरदस्ती नी कायद्याचा जोरावर उत्सव बंद करण्याचा प्रयत्न केला तर मात्र तीव्र विरोध होईल..
धार्मिक द्वेषाचे वळण त्याला दिले जाईल .
V
Submitted by Hemant 333 on 6 October, 2023 - 09:2
आपण मुळात जावू या ना .
म्हणजे उत्तर मिळेल.
सार्वजनिक उत्सव साजरे कोण करत,सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ.
कोण असतात ह्या मध्ये.
एक बॉस असतो तो राजकीय पक्षाशी संबंधित असतो किंवा नेतृत्व गुण असणारा प्रभावी तरुण असतो.
आणि त्याच्या जोडीला.थोड्या फार त्याच स्वभावाची मुल असतात.
अगदी उच्च शिक्षित किंवा उच्च नोकरी करणारे नसतात.पण होतकरू असतात, .
भाईगिरी ची कशी craze असते आणि त्या मागे तरुण पळत असतात तेव्हा त्यांच्या मनात ज्या भावना असतात त्या.
( मला नक्की शब्दात सांगता येत नाही)
अशा स्वभावाची ती तरुण मंडळी असतात.
. पण भक्त वैगेरे नसतात..
पण समाजात actively वावरत असतात.
कोणत्या ही राजकीय पक्षांना अशीच तरुण पोर हवी असतात.
सार्वजनिक उत्सव ला सर्वात जास्त निधी राजकीय लोक च देतात.
परत आरती ला उपस्थित राहतात.
विसर्जन वेळी किंवा बाकी वेळी हजर असतात.
त्या मुळे ह्या कार्यकर्त्यांना मोठेपणा वाटतो.
राजकीय आर्थिक मदत परत कायदेशीर संरक्षण सर्व दिले जाते.
ह्या उत्सव मुळे नवीन कार्यकर्ते मिळतात.
तेच प्रचार करतात,बूथ सांभाळतात,मोर्चात असतात.
वेळ पडली तर हिंसा पण करतात.
कोणी dr .इंजिनियर, पुस्तकातील किडा इथे नसतो.
.
जो पर्यंत funding थांबत नाही तो पर्यंत बदल होत नाही.
जो पर्यंत राजकारणात चांगली लोक उतरत नाहीत ,उच्च शिक्षित,विचारी लोक कार्यकर्ते होत नाहीत तो पर्यंत .
बदल होत नाही.
मिळणार भरपूर फंड आणि राजकीय संरक्षण,
हे जो पर्यंत चालू आहे तो पर्यंत हे असेच चालत राहणार.
सरकार सरकार,कायदे कायदे .
ह्या सर्वांचे मालक राज्यकर्ते च असतात.
हे विसरू नका.
कोर्ट नी दिलेले निर्णय पण हे फिरवतात..
Submitted by Hemant 333 on 6 October, 2023 - 13:0
सरकार किंवा कायद्याने ह्या वर मार्ग नाही.
आता बाकी मार्गाचा विचार करा
Submitted by Hemant 333 on 6 October, 2023 - 13:39
ते पण सांगतो.
1) फटाक्यांवर पूर्ण बंदी टाकण्यास सुप्रीम कोर्ट नी असहमती दर्शवली आहे.
कारण.
फटाके फक्त दिवाळीत वाजत नाहीत.
आणि आर्थिक विषय पण आहेच.
२) मशिदी वरचे भोंगे.
सरकार बंद करत नाही.
कारण ते बंद केले तर .
देवळातील लाऊड स्पीकर पण बंद करावे लागतील.
क्रिकेट मॅच,विविध सर्जनिक स्पर्धा इत्यादी सर्व ठिकाणी ते नियम लागू होतील
३) धार्मिक उत्सव साजरा करण्यास राज्य घटणा गुन्हा मानत नाही
म्हणजे त्या वर बंदी येवू शकत नाही.
राहिले dj/डॉल्बी, रस्ता आडवणे इत्यादी.
पण हे फक्त गणेश उत्सवात होत नाही.
लग्न पासून नवरात्री पर्यंत.
शिव जयंती पासून महापरी निर्वाण दिना पर्यंत सर्व वेळेस होते.
ब्लँकेट बंदी कोणीच स्वीकारणार नाही
आणी कोणी टाकणार पण नाही
Submitted by Hemant 333 on 6 October, 2023 - 14:19
ज्यांना वाटते कायद्याने हे सर्व बंद होईल .
ज्यांना वाटत सरकार हे बंद करेल त्यांच्या साठी.
अवांतर आहे तरी खपवून घ्या.
.. घाई घाई मध्ये स्वतंत्र होण्याची इच्छा असल्या मुळे भारतात अनेक कायदे न्याय देण्यास च सक्षम नाहीत.
१) जमिनी विषयी कायदे इतके किचकट आणि मूर्ख पणाचे आहेत की तुम्ही मालक असाल तर कोणी पण सोम्या गोम्या ता वर हक्क सांगू शकतो.
२) आपली प्रशासन व्यवस्था.
२१ व्यं वर्षी डिग्री आणि त्याच्या पुढच्या वर्षी आयएएस,आयपीएस .
पुस्तकातील किडे होतात .
एक रुपयाचे ह्यांना समाजाचे ज्ञान नसते.
आणि ते प्रशासन चालवतात.
आयएएस,आयपीएस सारख्या पदासाठी दहा वीस वर्ष ग्राउंड वर समाजकार्य करण्याचे ज्ञान असेलच पाहिजे.
२२) कॉन्स्टेबल,सैनिक, तलाठी दहावी बारावी पास.
ना कोणाला कायद्याची माहिती,ना कोणाला आधुनिक शस्त्र ची माहिती.
ना कोणाला महसूल कायद्यांची माहिती.
३, )१८, वर्ष वय झले की मतदान करू शकतो.
ज्याला रेल्वे चा पास काढता येत नाही ॲप वर तो देशाचे राज्य करते निवडतो.
४) २१ वर्ष वयाचा कोणी पण निवडणुकीला उभा राहू शकतो.
आहे ना हास्यास्पद.
५) स्त्रिया न विषयी कडक कायदे आहेत अत्याचार थांबले नाहीत मात्र गैर वापर मात्र वाढला.
कारण ज्यांना खरेच गरज आहे त्यांना त्या कायद्याचा उपयोग झीरो असतो.
६) कमजोर वर्ग वरील अत्याचार. विषयी कायदे .
अत्याचार होत च असतात पण गैर वापर मात्र वाढला.
ह्या सर्व गोष्टी मुळे कोर्ट कायदे च रद्द करते..
.कायदे राबविणारी सक्षम यंत्रणा भारतात अस्तित्वात च नाही..
जुनाट कायदे,असक्षम प्रशासन यंत्रणा,आणि अडाणी राज्य करते, वेगळ्याच विश्वात असणारी जनता...
असा विचित्र योग भारतात जुळून आलेला आहे
बापाने कायदेशीर मार्गाने मागितलेला न्याय चा निकाल पणतू च्या काळात लागतो
अट्टल गुन्हेगार जामीन वर सुटतात.
आणि किरकोळ गुन्हे करणारे दोन महिने पण त्यांच्या गुन्ह्याला शिक्षा होवू शकत नाही ते २०,२० वर्ष तुरुंगात असतात
Submitted by Hemant 333 on 6 October, 2023 - 14:56
लोकांनी सार्वजनिक उत्सवात हजेरी च न लावणे हा उपाय आहे लोकांकडे.
लोक च सहभागी झाले नाहीत तर मला नाही वाटत .
राजकारणी लोक ह्या उत्सव कडे लक्ष देतील.
सोपा उपाय आहे
लालबाग च राजा विषयी अनेक गोष्टी मीडिया मध्ये येतात.
तरी लोक गर्दी करतात.
अंबानी तिथे जातात, स्टार जातात.
का जात असतील.
एकाला ग्राहक हवे असतात दुसऱ्या ल फॅन.
भक्ती म्हणून कोणी जात नसेल.
भक्ती म्हणून फक्त सामान्य जनता च जाते आणि त्या जनतेकडून च फायदा असतो म्हणून बाकी स्टार जातात.
लोक च अशा ठिकाणी गेली नाहीत तर आपोआप सर्व साखळी तुटू शकते
Submitted by Hemant 333 on 6 October, 2023 - 15:1
एक नाथ पै म्हणून होते
>>>
असेना
शिंदे कोण आहेत..
एक नाथ की एकनाथ?
मुख्यमंत्री आहेत तर नाव चुकीचे लिहू नका इतकीच अपेक्षा Happy
की शुद्धलेखनाच्या चुका फक्त हेमंत यांच्याच काढायच्या आहेत का? Happy
Submitted by ऋन्मेऽऽष on 6 October, 2023 - 15:30
चांगल्या मार्गाने उत्सव साजरे होतात त्याचे फायदे मी सांगितलेलं योग्य च आहेत.
चुकीच्या मार्गाने उत्सव साजरे होत असतील तर .
त्या मध्ये सहभागी होवू नका हा मार्ग पण योग्य च आहे
Submitted by Hemant 333 on 6 October, 2023 - 15:34
सर्व अती हुशार वकिलांनी सर्व कौशल्य पणाला लावले पण ठाकरे ची सेना खरी की शिंदे ची हाच निकाल नाही लागला.
आमदार अपात्र होण्याचा निर्णय कायद्यातील सर्व रस्ते वापरून पण अजून होत नाही.
विधानसभेचा कार्यकाळ संपायची वेळ आली .
काय परिपूर्ण कायदे आहेत आपले त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा तर जगात एक नंबर.
२०३० पर्यंत तरी शिंदे गटाचे आमदार पात्र की अपात्र हे समजले तरी खूप झाले.
हे रघु आचार्य साठी.
उदाहरण .
Submitted by Hemant 333 on 6 October, 2023 - 17:53
एका वाक्यात .
कायदे आणि सरकार उत्सव बंद करू शकणार नाहीत.
इतकेच आहे.
काही समजत नाहीत म्हणून बाकी उदाहरणे द्यावी लागतात
Submitted by Hemant 333 on 6 October, 2023 - 18:12
"त्यांना कुणीतरी पंतप्रधान च केलं पाहिजे"
" ह्यांना कोणी तरी निती आयोग वर घ्या"
समजा मला कोणी तरी पंतप्रधान बनवले किंवा निती आयोग चा अध्यक्ष बनवले तर मी त्या " कोणी तरी च ऐकेन ना"
ते माझे पाहिले कर्तव्य च असेल, ती माझी नैतिक जबाबदारी असेल.
आणि मजबुरी तर असेल च असेल.
Submitted by Hemant 333 on 6 October, 2023 - 21:07
सार्वजनिक उत्सव.
ह्या मध्ये काय काय येते.
1), सण.( अर्थात च सर्व धर्मीय लोकांचे).
२) लग्न समारंभ ( हल्ली लग्न उत्सव सारखेच च असतात),.
३) सर्व प्रकारच्या जयंत्या , पुण्यतिथी.
४) ३१ फर्स्ट चा उत्सव.
५) सर्व जत्रा,यात्रा,उरूस..
६) धार्मिक यात्रा .( मक्का मदिना,पंढरपूर, )
इत्यादी ,इत्यादी.
ज्या इव्हेंट मध्ये ५० लोकांच्या वर माणसं एकत्र येतात त्यांना उत्सव च म्हणता येईल.
Submitted by Hemant 333 on 7 October, 2023 - 15:28
दाबोळकर ना प्रश्न जेव्हा लोक करत तुम्ही हिंदू न च्याच अंध श्रद्धा न वर का टीका करत असता?
तेव्हा त्यांचे ठरलेले उत्तर.
भारतात हिंदू बहुसंख्य आहेत म्हणून अंध श्रध्दा न ची प्रकरण पण हिंदू न चीच जास्त आहे .
बस इतकाच फरक आहे आणि सर्व धर्मीय अंध shradha न विरोध करतो.
पण कोणाला ती .००१ टक्के विरोध पण कधीच दिसला नाही.
आवाज प्रदूषण करणारे उत्सव म्हणजे पूर्ण भारतात दोन च बर का?
एक गणेश उत्सव आणि दुसरा नवरात्र.
बाकी देशात कोणताच उत्सव आवाज प्रदूषण करत नाही.
कोणताच उत्सव धांगड धिंगा करत नाही.
रस्ता aadvat नाही.(रस्त्यावर नमाज विषयी कोण धर्मांध बोलला)
फटाके फक्त आणि फक्त दिवाळी मध्ये च वाजवले जातात.
बाकी कधीच भारतात फटाके वाजवले जात नाहीत.
Dj/डॉल्बी, लेसर फक्त आणि फक्त गणेश उत्सव त च वापरले जातात बाकी कधीच नाही.
हिंदू हेच देशात आवाज प्रदूषण करत आहेत.
बाकी सर्व धर्मीय बिलकुल आवाज प्रदूषण करत नाहीत.
हे समजून घ्या.
Submitted by Hemant 333 on 9 October, 2023 - 13:34
ब्लँकेट बंदी केंद्र सरकार नी.
फटाके, लेसर,dj, डॉल्बी ह्या वर टाकली तर ..अल्प संख्यंक च रस्त्यावर येतील..
आणि पुरोगामी समाज माध्यमावर...आणि काही कोर्टात
Submitted by Hemant 333 on 9 October, 2023 - 13:45
उदय.
कधी भविष्यात ब्लँकेट ban टाकला तर.
फटाके , लेसर..चे निर्माते कोण आहेत,वितरक कोण आहेत.
कोणत्या लोकांची पोट ह्या वर भरत आहेत.
ह्याचे आकडे येतील आणि आता विरोध करणारे ban कसा अन्यायकारक आहे ह्या वर ज्ञान देतील.
क्षणात u टर्न घेतील
Submitted by Hemant 333 on 9 October, 2023 - 14:02
ब्लँकेट ban का टाकत नसेल सरकार.
१) medical क्षेत्रात लेसर ची गरज आहे.
बस इतकेच कारण मला दिसत आहे.
. बेकारी वाढेल, रोजगाराच्या संधी कमी होतील.
सार्वजनिक हिताला असंख्य गोष्टी कारणीभूत आहेत.
त्या वर प्रश्न उभे राहतील.
ही भीती सरकार ल असावी.
म्हणून ब्लँकेट ban नाही.
हितसंबंध हा अदृश्य घटक खूप पॉवर फुल रित्या सरकार वर दबाव टाकत असतो.
गौ हत्या बंदी वर ब्लँकेट ban नाही.
Beef वर ब्लँकेट ban नाही.
Ban असता तर भारत मोठा निर्यात दार ह्या क्षेत्रात झालाच नसता.
1.5 मिलियन मेट्रिक टन beef भारत एक्सपोर्ट करतो.
आहे ना जोक
Submitted by Hemant 333 on 9 October, 2023 - 14:58
तुम्ही कुठे ही जमीन खरेदी करू शकत नाही पण आम्ही मात्र कुठे ही जमीन खरेदी करू शकतो.
आम्ही कोणत्या ही धर्मावर ,त्यांच्या श्रद्धा स्थानावर गल्लीच्छ भाषेत टीका करू शकतो पण तुम्ही तशी टीका करू शकत नाही ते कृत्य गुन्हा आहे..
आम्ही dj/डॉल्बी,फटाके वाजवून आवाज प्रदूषण करू शकतो तो गुन्हा नाही हक्क आहे ..पण तुम्ही तसे करू शकत नाही तो गुन्हा आहे.
आम्ही work hours मध्ये देवाची प्रार्थना करू शकतो पण तुम्ही तसे करू शकत नाही ते धर्म निरपेक्ष देशात चालत नाही.
मोठी लिस्ट आहे
Submitted by Hemant 333 on 9 October, 2023 - 21:3
मतितार्थ लक्षात घ्या आणि त्या वर बोला.
पूर्णतः बंदी तुम्हाला मान्य आहे का?
की फक्त दिवाळी,गणेश उत्सव,दुर्गा उत्सव ह्या मध्येच फक्त बंदी हवी आहे
एकदा काय ती भूमिका स्पष्ट करा
Submitted by Hemant 333 on 10 October, 2023 - 12:39
लक्षात आले का सर्वांच्या .
ह्या लोकांस फक्त आणि फक्त हिंदू सण मध्ये वाजणाऱ्या dj विषयी च आक्षेप आहे.
दिवाळी मध्ये वाजणाऱ्या फटाक्यांना च आक्षेप आहे.
ह्या सर्व गोष्टी न वर पूर्ण बंदी हवी का,,?
असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर ही सर्व टाळत आहेत.
म्हणजे ही सर्व मंडळी ठराविक हेतू नी प्रेरित आहेत.
हिंदू विरोधी आहेत
त्यांना आवाज प्रदूषण शी काही देणेघेणे नाही.
ना लेसर लाईट विषयी ह्यांना आक्षेप आहे
Submitted by Hemant 333 on 10 October, 2023 - 13:5
Dj/डॉल्बी. फटाके , लेसर लाईट ह्यांना देशात पूर्णतः बंदी हवी का?.ह्या प्रश्नांवर फक्त हो किंवा नाही इतकेच उत्तर द्यायचे आहे.
पण
Dj/ डॉल्बी, फटाके, लेसर लाईट ह्या वर बोंब मारणारे
एका शब्दात पण उत्तर देत नाहीत.
समजून जा हे सर्व ढोंगी आहेत..
माझा तर पूर्ण बंदी ला पूर्ण पाठिंबा आहे
Submitted by Hemant 333 on 10 October, 2023 - 14:50
हुश्श!
तुमचे लाख लाख आभार सर.
तुमच्या या प्रतिसादावर चर्चा संपली असं जाहीर केलं जावं.
( नाहीतर उद्या तुम्ही उलट म्हणाल)
Submitted by भरत. on 10 October, 2023 - 14:56
हुश करण्या पेक्षा हो म्हणा.
किती ढोंग करणार
Submitted by Hemant 333 on 10 October, 2023 - 14:5
पूर्णतः फटाके ,dj, डॉल्बी ,लेसर लाईट वर देश भर बंदी हा एकमेव मार्ग आहे ह्या समस्येवर बाकी जी काही वांझोटी चर्चा चालली आहे त्या मधून काही निष्पन्न होणार नाही.
उलट जे फटाके वाजवत नाहीत ते पण फटाके वाजवायला सुरुवात करतील.
असे फक्त हिंदू नाच टार्गेट केले तर.
Submitted by Hemant 333 on 11 October, 2023 - 08:23
फटाके उत्पादन करणार हाच स्टॅलिन मुख्यमंत्री असणारे राज्य आहे.
एक नंबर च हिंदू द्वेष करणारा आहे.
राजस्थान, दिल्ली,ओडिशा इत्यादी राज्यांनी फटक्या न वर पूर्ण बंदी टाकली होती तेव्हा स्टॅलिन ती बंदी उठवावी म्हणून अश्रू ढाळत होता.
दुट्टपी लोक आहेत.
एकीकडे हिंदू वर टीका करायची फटाके वाजवतात म्हणून आणि दुसरी कडे बंदी टाकली की रडगाणे चालू करायचे.
कोर्टात जायचे
Submitted by Hemant 333 on 11 October, 2023 - 09:59
कोलकत्ता उच्च न्यायालानेही फटाक्या वर पूर्ण बंदी टाकली होती.
सर्वोच्च न्यायालय नी उठवली.
.
मग आवाजाचे नको फक्त colour चे चालतील हे भलतच पिल्लु पण सोडून दिले मग लोकांनी.
अंशतः बंदी आपल्या देशात यशस्वी होत नाही हा इतिहास आहे.
प्लास्टिक थैल्या वापरायला बंदी.
इतक्याच जाडी च्या थैल्या वापरायला बंदी ian उत्पादन वर बंदी नाही.
फटाके वाजवय ला बंदी पण उत्पादन ला बंदी नाही.
असले विचित्र प्रकार सुरू झाले.
स्थिती मध्ये काही फरक पडला नाही.
आता मध्ये न्यूज मध्येच वाचले फटाक्या न च्या आवाज विषयी नियम आहे पण लेसर light विषयी काहीच कायदा नाही म्हणून कारवाई करता येत नाही.
किती हास्यास्पद युक्तिवाद आहे हा.
भारतात काय प्रतेक देशात. उत्पादन घ्यायचे असेल तर लायसेन्स लागते, .
लायसेन्स देताना काही नियम घातले जातात.
लेसर light वाल्यांनी लायसेन्स घेतलेच नसेल तर .
कशाला हवा नवीन कायदा जुन्या कायद्या नुसार बेकायदेशीर उत्पादन म्हणून सरकार अत्यंत कडक कारवाई करू शकते
Submitted by Hemant 333 on 11 October, 2023 - 12:40
गणपती उत्सव हा जास्त करून मराठी लोक साजरा करतात.
पुणे , मुबई सारख्या cosmopolitan शहरात त्या मुळे मराठी लोकांची उपस्थिती ठळक प्रमाणात जाणवते.
त्या मुळे हिंदू असले तरी अनेकांच्या पोटात पोट शुळ उठतो.
भारताची प्रिंट आणि electronic मीडिया ही गुजराती मारवाडी लोकांच्या हातात आहे.
त्या मुळे कमीत कमी एक तरी बातमी रोज गणपती उत्सव कसा त्रास दायक झाला आहे ह्या वर असते.
नवरात्री मध्ये पण same तीच स्थिती असते पण तेव्हा मीडिया अनेक गोष्टी कडे दुर्लक्ष करते.
कारण गरभा हा प्रकार गुजराती आहे
त्या मुळे
टीका बिलकुल करत नाहीत.
असे मला वाटत.
अभ्यास करूया .
माझे मत योग्य आहे की अयोग्य.
Submitted by Hemant 333 on 15 October, 2023 - 20:55
आफ्रिका सुधारली तर प्रगत देशांवर संक्रांत येईल.
त्यांची खनिज संपत्ती लुटता येणार नाही.
त्या मुळे सुधारणा वादी लोकांना आफ्रिकेत पाढवले तर.
अमेरीका भारतावर हल्ला पण करेल
Submitted by Hemant 333 on 17 October, 2023 - 12:11
तुमचे मत आहे है तुमच्या पुरते आहे.
माझ्या पोस्ट मध्ये खूप अर्थ असतो.
बाकी लोकांना ते पटत असतात
त्यांची बौद्धिक कुवत त्या दर्जा ची आहे.
तुमची नाही त्या दर्जा ची बौद्धिक कुवत.
त्या मध्ये माजा दोष नाही
Submitted by Hemant 333 on 17 October, 2023 - 14:22
जोपर्यंत देशातील सर्व जयंत्या,सर्व धर्मीय लोकांचे सार्वजनिक सण, सर्व धर्मीय लोकांची प्रार्थना स्थळ ह्यांच्यावर असणारे लाऊड speaker.
कोणत्या ही कारणाने निघालेल्या मिरवणुका,निषेध मोर्चे, बंद, जाहीर सभा हे सर्व बंद होत नाही .
तो वपर्यंत कोणालाच हक्क नाही .
गणपती उत्सव,आणि दुर्गा उत्सव ह्या वर बोलण्याचा
Submitted by Hemant 333 on 21 October, 2023 - 22:08
लोक सहभागी असतात म्हणून तर सणांचे उत्सव झाले ना?
लोकांनी सहभाग घेतला नसता तर हे शक्य झाले असते का?
हा वयानुसार लोकांना आवाज,गर्दी, ह्याचा त्रास होतो कारण शरीर कमजोर झालेले असते.
गरबा हवा की नको असा प्रश्न फक्त तरुण मुलाना विचारला तर.
तर बहुसंख्य मुल गरबा हवाच असे उत्तर देतील .
तेच हा प्रश्न वयस्कर लोकांना विचारला तर तर नको असे उत्तर देतील.
वयाचा पण ह्या विषया शी संबंध आहे
Submitted by Hemant 333 on 22 October, 2023 - 13:58
बंदी च घालायची असेल तर सरसकट
बंदी च घालायची असेल तर सरसकट देशभर फटाक्या पूर्ण बंदी असावी.
(वितरण,उत्पादन,साठवणूक,,इम्पोर्ट, आणि वापर )
असे मत मी अगोदर च मांडले आहे
(No subject)
एवढा संयम राखून सर्व काही
एवढा संयम राखून सर्व काही पुन्हा नजरे खालुन घालत केलेल्या संकलनाच्या धिरोदत्त कामगिरी करिता आचार्यना मानाचा मुजरा
माझ्यावर चर्चा झालीच पाहिजे
अरे आता त्यात माझ्या पोस्ट कोट कश्याला त्यात??
माझ्यावर जिथे तिथे चर्चा झालीच पाहिजे असा काही नियम आहे का?
आचार्य दंडवत स्वीकारा
आचार्य दंडवत स्वीकारा
तुमच्या पेशन्स ची दाद द्यावी तितकी कमी आहे
सरांचे मौलिक विचार एकत्र करून तुम्ही थोर समाजसेवा केली आहे
आज ईथे बेछूट गोळीबारात खालील
आज ईथे बेछूट गोळीबारात खालील वाकप्रचार गंभीर जख्मी झाल्याचे ऐकिवात आले -
दुनिया गोल है
सुबह का भुला अगर श्याम को लौटे ....
काला अक्षर .... बराबर
..... की पूछ टेढ़ी की टेढ़ी
मान न मान मैं तेरा मेहमान
आणि काही असेच छोटे मोठे किरकोळ दुखापत ग्रस्त आहेत त्यांचीही यादी लवकरच सूत्रांकडून उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
________७८०
आता पुढील ६वा प्रतिसाद नक्कीच कट्टर शाखा प्रेमी देणार
Pages