काही महिन्यांपूर्वी मी बे एरियातील वारी विषयी एक लेख लिहिला होता. त्याला संमिश्र प्रतिसाद होता. काही जणांचा सूर होता वारी म्हंटल की ती सार्वजनिक ठिकाणी ( मुख्यत्वे रस्त्यांवरून) होते.
अर्थात त्या वेळी ही वारी सर्व नियमाचे पालन करून आणि अतिशय शांतता पूर्ण आणि पवित्र वातावरणात काढल्याने मला तो मुद्दा अत्यंत गौण वाटला किंबहुना उगाच खोड काढल्यासारखंही वाटलं.
पण नंतर काही काळाने गोपाळकाला निमित्ताने उठवणाऱ्या कित्येक मजली दही हंडया, सार्वजनिक गणेशोत्सवा पायी, दांडिया पायी अडविलेले, उखडलेले रस्ते, लाऊड स्पीकर्स मुळे विद्यार्थी, आजारी व्यक्ती ह्यांना होणारा त्रास, (काळ्या?)पैशांची होणारी बेसुमार उधळपट्टी आणि ह्या सर्वांच्या मागे असलेल्या राजकीय शक्ती आणि त्यांचे सत्ता संघर्ष हे बघितलं की मात्र मग मलाही प्रश्न पडला,
उत्सवाचे असे सार्वजनिकत्व असावे किंवा नाही? किंवा उत्सव आपापले स्वतःच्या घरापुरते ठेवावेत की सार्वजनिकरीत्या साजरे करावेत?
पंढरपूर वारी विषयी खोलात जाऊन बघितलं असता, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकोबांनी अनुक्रमे आळंदी आणि देहू येथून पंढरपूरला चालत जायला सुरुवात केली. तुकारामांच्या देहवासानंतर त्यांचे वंशज नारायणबाबा ह्यांनी त्यांच्या पादुका पालखीतून न्यायला सुरुवात केली. १८२० मध्ये हैबतराव ह्या सरदारांनी पालखीतून पादुका नेवून त्याला वारी / दिंडी स्वरूप दिले. त्यानंतर त्याचे आताचे वारीचे विराट स्वरूप दिसते ज्यात कित्येक लाख लोक चालतात.
गणपतीचा उल्लेख वेदकालीन साहित्यातही आढळतो पण गणेश चतुर्थी कधी पासून आणि कुणी पहिल्यांदा साजरी केली ह्याचा उल्लेख मिळत नाही.
परंतु शिवाजी महाराजांच्या काळात गणेश उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करायला सुरुवात केली. नंतर पेशव्यांच्या काळातही ही परंपरा कायम राहिली.
नंतर ब्रिटिश राज आले तेव्हा त्यात खंड पडला. लोकं गणेश चतुर्थी आपापल्या घरी करू लागले.
परंतु लोकांना एकत्र आणण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव (आणि शिवजयंती उत्सव ) सुरु केले.
त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात त्याचे बदलत गेलेले स्वरूप तर सर्वाना परिचित आहेच. कदाचित गावांमध्ये अजूनही त्याचे सार्वजनिक रूप अक्राळ विक्राळ झाले नसावे जेव्हढे शहरात झालेले आढळते.
पूर्वी (वीसेक वर्षांपूर्वी किंवा कित्येक अंशी आजही ) गावांमधून केले जाणारे उत्सव सर्व गावाला एकत्र आणणारे होते किंवा आहेत, सर्वांचा सहभाग असल्यामुळे सहाजिकच ते निरुपद्रवी व आनंददायी होतात.
समजायला लागल्यापासून बघतेय ते बदलत जाणारे दहीहंडीचे स्वरूप, गणेशोत्सवाचे स्वरूप, हळू हळू नवरात्रीच्या देवीच्या जत्रेपासून तिचे दांडिया-डिस्को दांडियात होणारे रूपांतर. २००० च्या दशकापासून (?) नव्याने सुरु झालेल्या हिंदू नवंवर्ष यात्रा, सार्वजनिक संक्रातीचे हळदीकुंकू समारंभ, मंगळा गौर कार्यक्रम ( बहुदा यंदाच हे चालू झाले असावेत).
ह्यात ते जिथपर्यंत सोसायटी, गल्लीत सगळ्यांच्या हातभराने साजरे केले जातात तेव्हा कदाचित सार्वजनिक उत्सव सुरु करण्यामागील उद्देश सफल होत असावा असे वाटते.
पण जेव्हा त्यात (अ) राजकीय शक्ती उतरतात, मग खंडण्या, वर्गण्या, सेलिब्रिट, त्यांच्या लाखोंच्या बिदाग्या, आपले वर्चस्व प्रस्थापित करायला लावलेले ध्वनिक्षेपक, ज्याच्या नावाने उत्सवाची देणगी मागता त्याला बघवणार, ऐकवणार नाहीत अस ओंगळवाणं, हिडीस नृत्य, गायन-वादन, रस्ते बंद केल्यामुळे होणारी गैरसोय ... ही न संपणारी यादी समोर येते.
आणि मग प्रश्न पडतो की उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करावेत का?
म्हणजे मूळ चांगला उद्देश बाजूला सारून त्याचा आपमतलबासाठी वापर करून त्याचे स्वरूप इतके बिभित्स केले जाते की प्रश्न पडावा मुळात हे सुरूच कधी, कोणी आणि कशासाठी केले. त्यामुळे खरा प्रश्न सार्वजनिकरित्या कशाप्रकारे करावेत आणि त्यावर काही निर्बंध घालून त्याचा मूळ उद्देश सफल करता येईल का असा असायला हवा.
तुमचे मत काय आहे जरूर लिहा.
तळटीप- मते कितीही विरोधात किंवा न पटणारी असतील तरी असभ्य भाषा वापरू नये. आणि वैयक्तीक पातळीवर घसरू नये.
गणपती उत्सव हा जास्त करून
गणपती उत्सव हा जास्त करून मराठी लोक साजरा करतात.
पुणे , मुबई सारख्या cosmopolitan शहरात त्या मुळे मराठी लोकांची उपस्थिती ठळक प्रमाणात जाणवते.
त्या मुळे हिंदू असले तरी अनेकांच्या पोटात पोट शुळ उठतो.
भारताची प्रिंट आणि electronic मीडिया ही गुजराती मारवाडी लोकांच्या हातात आहे.
त्या मुळे कमीत कमी एक तरी बातमी रोज गणपती उत्सव कसा त्रास दायक झाला आहे ह्या वर असते.
नवरात्री मध्ये पण same तीच स्थिती असते पण तेव्हा मीडिया अनेक गोष्टी कडे दुर्लक्ष करते.
कारण गरभा हा प्रकार गुजराती आहे
त्या मुळे
टीका बिलकुल करत नाहीत.
असे मला वाटत.
अभ्यास करूया .
माझे मत योग्य आहे की अयोग्य.
कुठे प्रॉपर्टी मिळणार आहे .
कुठे प्रॉपर्टी मिळणार आहे .
हमरी तुमरी वर येवून.
ना येथील सुधारणा वादी विचार ऐकून लोक सुधारणार आहेत.
राजकीय पक्ष नालायक आहेत प्रत्येकाला माहीत आहे.
कट्टर समर्थक फक्त अडाणी आणि स्वार्थी लोक असतात
कुठे प्रॉपर्टी मिळणार आहे .
कुठे प्रॉपर्टी मिळणार आहे .
हमरी तुमरी वर येवून.
ना येथील सुधारणा वादी विचार ऐकून लोक सुधारणार आहेत.
राजकीय पक्ष नालायक आहेत प्रत्येकाला माहीत आहे.
कट्टर समर्थक फक्त अडाणी आणि स्वार्थी लोक असतात
सर्व प्रॉपर्टी अडानी मित्तल
सर्व प्रॉपर्टी अडानी मित्तल मोदी गिळतात
Right
Right
कारण ते कोणतीच तत्व पाळत
कारण ते कोणतीच तत्व पाळत नाहीत.
नैतिक,अनैतिक,धार्मिक, धर्मा विरुद्ध, पाप ,पुण्य .
देश ,विदेश,देश प्रेम, .
असल्या फालतू गोष्टी ना जास्त किंमत देत नाहीत.
15 ऑगस्ट हा स्वतंत्र दिवस पण पैसे मिळवण्या साठी किती उपयोगाचा आहे इतकाच ते विचार करतात.
आपण मात्र स्वतंत्र दीन म्हणून भावनिक होवून चारशे पाचशे रुपये खर्च करतो
<< कुठे प्रॉपर्टी मिळणार आहे
<< कुठे प्रॉपर्टी मिळणार आहे .
हमरी तुमरी वर येवून.
ना येथील सुधारणा वादी विचार ऐकून लोक सुधारणार आहेत.
राजकीय पक्ष नालायक आहेत प्रत्येकाला माहीत आहे.
कट्टर समर्थक फक्त अडाणी आणि स्वार्थी लोक असतात
Submitted by Hemant 333 on 15 October, 2023 - 11:28 >>>
------- सुधारणावादी विचार कशाला म्हणायचे हाच प्रश्न आहे. एकाचा सुधारणावादी विचार दुसर्याला त्याच्या धार्मिक हक्कांवर गदा आणणारा वाटतो. मग काय सर्व तथाकथित ढोंगी सुधारणावाद्यांना अफ्रिकेत धाडायचे.
आफ्रिका सुधारली तर प्रगत
आफ्रिका सुधारली तर प्रगत देशांवर संक्रांत येईल.
त्यांची खनिज संपत्ती लुटता येणार नाही.
त्या मुळे सुधारणा वादी लोकांना आफ्रिकेत पाढवले तर.
अमेरीका भारतावर हल्ला पण करेल
सर तुम्ही आधी थोडं शुद्ध
सर तुम्ही आधी थोडं शुद्ध लिहायला शिका, भावना अस्सल असल्या म्हणजे कसेही लिहून चालतं हे पहिले डोक्यातून काढा
आपल्या आधी काही विद्वान होऊन गेले आहेत त्यांनी भाषेचे काही नियम बनवले आहेत, मान्य आहे ते तुमच्याइतके प्रगल्भ नसतील पण त्यांनी आता बनवलेले नियम पाळा नाहीतर इतके अजून मोठे व्हा की लोकं तुम्ही बनवलेले नियम पाळतील. तोवर तुमची इच्छा असो वा नसो भाषेचे नियम पाळत जा, मेंदूला थोडीशी चालना दिलीत तर शक्य होईल तुम्हाला
पुणेकर लोकांसारखे बोलू नका.
पुणेकर लोकांसारखे बोलू नका.
भाषा ही फक्त संवाद चे माध्यम आहे.
मी काय भावना व्यक्त करत आहे ते समोरच्या व्यक्ती ला समजणे महत्वाचे आहे.
व्याकरण शुद्ध भाषा इथे तरी महत्वाची नाही
मग इतकं शुद्ध तरी कशाला
मग इतकं शुद्ध तरी कशाला लिहिता
असेही काहीही बरळत असता तर मग चर्फतडकसल्सबाक असलकाहित ळीईट्स जा लोक गजयील समजून
तुमचे मत आहे है तुमच्या पुरते
तुमचे मत आहे है तुमच्या पुरते आहे.
माझ्या पोस्ट मध्ये खूप अर्थ असतो.
बाकी लोकांना ते पटत असतात
त्यांची बौद्धिक कुवत त्या दर्जा ची आहे.
तुमची नाही त्या दर्जा ची बौद्धिक कुवत.
त्या मध्ये माजा दोष नाही
इतकी जबरदस्त बौद्धिक कुवत
इतकी जबरदस्त बौद्धिक कुवत असलेल्या व्यक्तीला आपल्या देशाचा स्वातंत्र्यदिन हा शब्द नीट लिहिता येत नसेल तर त्याला तो जिथे कुठं असेल त्या चौकात ओणवा उभा करून चिंचेच्या फोकाने त्याचा पार्श्वभाग सडकून काढला पाहिजे
दोन दिवस बसायचे वांदे झाले पाहिजेत
थोडं नशापाणी कमी करत जा सर म्हणजे स्वतःबद्दल असल्या अवास्तव कल्पना होणार नाहीत
नाना पाटेकर कसा स्वतःचीच आरशात आरती करतो तसं करत असाल ना सर?
भरत असतील किंवा भ्रमर असतील
भरत असतील किंवा भ्रमर असतील,किंवा पुरोगामी असतील .
किंवा रघु आचार्य असतील .सर्वांची नाव घेणे शक्य नाही.
ह्यांना भारतातील सर्व क्षेत्रातील स्थिती विषयी पुर्ण ज्ञान आहे.
ते तुम्हाला बिलकुल नाही.
मतभेद असले तरी ह्या सर्व id ना च मी सन्मान च करतो.
तुम्ही मात्र वेगळ्याच दुनियेत असता
तुम्ही मात्र वेगळ्याच दुनियेत
तुम्ही मात्र वेगळ्याच दुनियेत असता >> सर, जस्ट एक कुतूहल म्हणून, हे तुम्ही स्वतःला म्हणताय का मला?
एक जेंंटल रीमाइंडर. धाग्याच
एक जेंंटल रीमाइंडर. धाग्याच विषय आहे,
"सण सार्वजनिक साजरे करावेत किंवा नाही?"
भारतातील सर्व क्षेत्रातील
भारतातील सर्व क्षेत्रातील स्थिती विषयी पुर्ण ज्ञान आहे.>>> नाही. इथली मतं वाचून असे मत बनवू नये. स्वातंत्र्यानंतर भारतात अनेक विद्वान होऊन गेले. त्यांनी सुद्धा असा दावा केलेला नाही.
अद्ययावत माहिती असणे म्हणजे संपूर्ण ज्ञान नव्हे. इथे माझ्या कडे माहिती सुद्धा मर्यादित असते.
एक जेंंटल रीमाइंडर. धाग्याच
एक जेंंटल रीमाइंडर. धाग्याच विषय आहे, >> चा.
गेल्या चार दिवसांपासून अशा रिमाईंडरची मायबोली वाट बघत होती.
आभार! पण काही उपयोग होईल असंं
आभार! पण काही उपयोग होईल असंं वाटत नाहीये.
एक जेंंटल रीमाइंडर. धाग्याच
एक जेंंटल रीमाइंडर. धाग्याच विषय आहे, >> या धाग्या खाली आलेले प्रतिसाद पहाता धागा कर्त्याने मुळ कंटेट एडीट करून त्याजागी इतर कुठल्याही सामाजिक-राजकीय विषयाचा कंटेट टाकला तरी किमान ५% प्रतिसाद त्या विषयाला चपखल बसतील तर आणखी इतर १५%-२०% प्रतिक्रिया त्या विषयाच्या कनेक्टेड तर नक्कीच रहातील....असा हा धागा आहे.
इतकी जबरदस्त बौद्धिक कुवत
इतकी जबरदस्त बौद्धिक कुवत असलेल्या व्यक्तीला आपल्या देशाचा स्वातंत्र्यदिन हा शब्द नीट लिहिता येत नसेल तर त्याला तो जिथे कुठं असेल त्या चौकात ओणवा उभा करून चिंचेच्या फोकाने त्याचा पार्श्वभाग सडकून काढला पाहिजे
दोन दिवस बसायचे वांदे झाले पाहिजेत >>> आशुचॅम्प, अगदी हेच मनात आले होते. पण वेळेअभावी दुर्लक्ष झाले आणि तुम्ही नेमके तेच लिहीले.
चालला. धाग्याला वरची हवा
चालला. धाग्याला वरची हवा लागली आहे. भारतात १४० कोटी लोक आहेत. चिंचेची झाडे कमी पडतील. इथून निघावे हेच बरंं. घरी जाऊन "स्वातंत्र्यदिन" शब्द लिहायची प्रक्टिस करावी.
ह्या असल्या कॉमेंट दुर्लक्षित
ह्या असल्या कॉमेंट दुर्लक्षित करणे सर्वात उत्तम.
ह्या दोन चार कॉमेंट वरून एकच
ह्या दोन चार कॉमेंट वरून एकच व्यक्ती चे अनेक duplicates आयडी आहेत है सहज सिद्ध होईल.
पाठच्या सर्व कॉमेंट चा अभ्यास केला पाहिजे
आपण मात्र स्वतंत्र दीन म्हणून
आपण मात्र स्वतंत्र दीन म्हणून भावनिक होवून चारशे पाचशे रुपये खर्च करतो>>
या वाक्यात मला तरी चुकीचे असे काही वाटत नाही आहे....एकतर आपण सर्व स्वतंत्र आहोत आणि सामान्य जनतेपेक्षा दीन या देशात आणखी कोणी आहे?, किंबहूना आपल्या दीनपणाचे मूळ कारणच भावनिक होण्यात दडलेले आहे.
दीन!!
दीन!!
ह्या दोन चार कॉमेंट वरून एकच
ह्या दोन चार कॉमेंट वरून एकच व्यक्ती चे अनेक duplicates आयडी आहेत है सहज सिद्ध होईल. >>> जरूर सिद्ध करा सर
एकजरी ड्युआयडी शोधून काढू शकलात ना तर माबोवरच तुमचा शाल आणि श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करीन आणि लकडीपुलाच्या मधोमध उभा राहून तुमचा मुका घेईन
आज आमच्या कंपनीत इंडक्षन होतं
आज आमच्या कंपनीत इंडक्षन होतं. प्रत्येक डिपार्टमेंट मधला एक एक जण जात होता आणि नवीन जॉईन झालेली पोरं आहेत त्यांना त्यांचं डिपार्टमेंट काय करत याची थोडक्यात माहिती देत होता. आमच्या डिपार्टमेंट मधला जो इंडक्षन देणार होता तो नेमका सुट्टीवर गेला आणि माझ्यावर पाळी आली. बॉस एक तास आधी बोलला तू जा. माझी हवा टाईट झाली.शाळेत असताना आपण कधी गॅदरिंग मध्ये वैगरे भाग घेतला नाही त्यामुळे 20 30 जनांसमोर बोलायचं म्हणजे घशाला कोरड पडणारा काम. तरीपण डेअरिंग करून गेलो पण एव्हढे लोकं बघून उसन अवसान गळून पडलं. मग मी त्यांच्यातच जाऊन बसलो. ते नवीन होते त्यामुळे मला ओळखायचा प्रश्न न्हवता. थोड्या वेळाने मीच ट्रेनर अजून कसा आला नाही याचे पाढे गिरवायला सुरुवात केली. माझ्या मागे सगळे तेच बोलायला लागले. मग मी त्यांना बोललो जाऊ दे ट्रेनर आता येणार नाही वाटतं. माझ्या मागच्या कंपनीत थोडाफार शिकलोय ते तुम्हाला सांगतो. अशा प्रकारे मी माझी सुटका केली. बॉस पण खुश अने नवीन पोरं पण खुश.
बोकलत
बोकलत
बोकलत rofl
बोकलत rofl
Pages