काही महिन्यांपूर्वी मी बे एरियातील वारी विषयी एक लेख लिहिला होता. त्याला संमिश्र प्रतिसाद होता. काही जणांचा सूर होता वारी म्हंटल की ती सार्वजनिक ठिकाणी ( मुख्यत्वे रस्त्यांवरून) होते.
अर्थात त्या वेळी ही वारी सर्व नियमाचे पालन करून आणि अतिशय शांतता पूर्ण आणि पवित्र वातावरणात काढल्याने मला तो मुद्दा अत्यंत गौण वाटला किंबहुना उगाच खोड काढल्यासारखंही वाटलं.
पण नंतर काही काळाने गोपाळकाला निमित्ताने उठवणाऱ्या कित्येक मजली दही हंडया, सार्वजनिक गणेशोत्सवा पायी, दांडिया पायी अडविलेले, उखडलेले रस्ते, लाऊड स्पीकर्स मुळे विद्यार्थी, आजारी व्यक्ती ह्यांना होणारा त्रास, (काळ्या?)पैशांची होणारी बेसुमार उधळपट्टी आणि ह्या सर्वांच्या मागे असलेल्या राजकीय शक्ती आणि त्यांचे सत्ता संघर्ष हे बघितलं की मात्र मग मलाही प्रश्न पडला,
उत्सवाचे असे सार्वजनिकत्व असावे किंवा नाही? किंवा उत्सव आपापले स्वतःच्या घरापुरते ठेवावेत की सार्वजनिकरीत्या साजरे करावेत?
पंढरपूर वारी विषयी खोलात जाऊन बघितलं असता, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकोबांनी अनुक्रमे आळंदी आणि देहू येथून पंढरपूरला चालत जायला सुरुवात केली. तुकारामांच्या देहवासानंतर त्यांचे वंशज नारायणबाबा ह्यांनी त्यांच्या पादुका पालखीतून न्यायला सुरुवात केली. १८२० मध्ये हैबतराव ह्या सरदारांनी पालखीतून पादुका नेवून त्याला वारी / दिंडी स्वरूप दिले. त्यानंतर त्याचे आताचे वारीचे विराट स्वरूप दिसते ज्यात कित्येक लाख लोक चालतात.
गणपतीचा उल्लेख वेदकालीन साहित्यातही आढळतो पण गणेश चतुर्थी कधी पासून आणि कुणी पहिल्यांदा साजरी केली ह्याचा उल्लेख मिळत नाही.
परंतु शिवाजी महाराजांच्या काळात गणेश उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करायला सुरुवात केली. नंतर पेशव्यांच्या काळातही ही परंपरा कायम राहिली.
नंतर ब्रिटिश राज आले तेव्हा त्यात खंड पडला. लोकं गणेश चतुर्थी आपापल्या घरी करू लागले.
परंतु लोकांना एकत्र आणण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव (आणि शिवजयंती उत्सव ) सुरु केले.
त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात त्याचे बदलत गेलेले स्वरूप तर सर्वाना परिचित आहेच. कदाचित गावांमध्ये अजूनही त्याचे सार्वजनिक रूप अक्राळ विक्राळ झाले नसावे जेव्हढे शहरात झालेले आढळते.
पूर्वी (वीसेक वर्षांपूर्वी किंवा कित्येक अंशी आजही ) गावांमधून केले जाणारे उत्सव सर्व गावाला एकत्र आणणारे होते किंवा आहेत, सर्वांचा सहभाग असल्यामुळे सहाजिकच ते निरुपद्रवी व आनंददायी होतात.
समजायला लागल्यापासून बघतेय ते बदलत जाणारे दहीहंडीचे स्वरूप, गणेशोत्सवाचे स्वरूप, हळू हळू नवरात्रीच्या देवीच्या जत्रेपासून तिचे दांडिया-डिस्को दांडियात होणारे रूपांतर. २००० च्या दशकापासून (?) नव्याने सुरु झालेल्या हिंदू नवंवर्ष यात्रा, सार्वजनिक संक्रातीचे हळदीकुंकू समारंभ, मंगळा गौर कार्यक्रम ( बहुदा यंदाच हे चालू झाले असावेत).
ह्यात ते जिथपर्यंत सोसायटी, गल्लीत सगळ्यांच्या हातभराने साजरे केले जातात तेव्हा कदाचित सार्वजनिक उत्सव सुरु करण्यामागील उद्देश सफल होत असावा असे वाटते.
पण जेव्हा त्यात (अ) राजकीय शक्ती उतरतात, मग खंडण्या, वर्गण्या, सेलिब्रिट, त्यांच्या लाखोंच्या बिदाग्या, आपले वर्चस्व प्रस्थापित करायला लावलेले ध्वनिक्षेपक, ज्याच्या नावाने उत्सवाची देणगी मागता त्याला बघवणार, ऐकवणार नाहीत अस ओंगळवाणं, हिडीस नृत्य, गायन-वादन, रस्ते बंद केल्यामुळे होणारी गैरसोय ... ही न संपणारी यादी समोर येते.
आणि मग प्रश्न पडतो की उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करावेत का?
म्हणजे मूळ चांगला उद्देश बाजूला सारून त्याचा आपमतलबासाठी वापर करून त्याचे स्वरूप इतके बिभित्स केले जाते की प्रश्न पडावा मुळात हे सुरूच कधी, कोणी आणि कशासाठी केले. त्यामुळे खरा प्रश्न सार्वजनिकरित्या कशाप्रकारे करावेत आणि त्यावर काही निर्बंध घालून त्याचा मूळ उद्देश सफल करता येईल का असा असायला हवा.
तुमचे मत काय आहे जरूर लिहा.
तळटीप- मते कितीही विरोधात किंवा न पटणारी असतील तरी असभ्य भाषा वापरू नये. आणि वैयक्तीक पातळीवर घसरू नये.
दोन झेब्रे आणि दोन हत्तींची
दोन झेब्रे आणि दोन हत्तींची मारामारी झाली. त्यात झेब्र्यांनी हत्तींना चोपून काढले आणि पुन्हा जंगलात दिसलात तर तंगडी मोडू असे सांगितले. घाबरलेले हत्ती जमिनीत एक बिळ खोदून त्यात राहू लागले. त्यांच्यावर चित्रपट निघाला त्याचे नाव सांगा.
Why he came and how they went
Why he came and how they went back >>> उत्तर आहे ब्लँकेट
पण इथे इतकी ब्लँकेटची चर्चा का चालू आहे? ब्लँकेट मध्ये घालून फटाके फोडायचेत का? की ब्लँकेट पांघरून फटाके फोडायचेत??
पण असला असंबद्ध प्रश्न
पण असला असंबद्ध प्रश्न "असंबद्ध गप्पा" या धाग्यावर विचारण्याचीही हिंमत झाली नाही.
मग हा धागा (कितव्यांदातरी) वाचला आणि इथे काहीपण लिहायला/विचारायला हरकत नाही असे वाटले. म्हणुन इथे विचारतो. << हे भारी होत...हाहा
गणपतीत फटाके आणि दिवाळीत डीजे
गणपतीत फटाके आणि दिवाळीत डीजे आणि लेसर लावून हा प्रश्नच मिटेल!
गणपतीत फटाके आणि दिवाळीत डीजे
गणपतीत फटाके आणि दिवाळीत डीजे आणि लेसर लावून हा प्रश्नच मिटेल >> सहमत, प्रत्येक हिंदूला त्याच्या मर्जीप्रमाणे उस्तव साजरा करण्याचा हक्क मिळायलाच हवा.
वर जाऊन पडलेत त्या आदरणिय सरांना सुद्धा हे पटले होते.
Why he came and how they went
Why he came and how they went back? >>> to get her/together
(No subject)
छान कोडं मानव. We-they-she
छान कोडं मानव. We-they-she भाषेतले असल्यामुळे सोडवता आले नाही.
पूर्णतः फटाके ,dj, डॉल्बी
पूर्णतः फटाके ,dj, डॉल्बी ,लेसर लाईट वर देश भर बंदी हा एकमेव मार्ग आहे ह्या समस्येवर बाकी जी काही वांझोटी चर्चा चालली आहे त्या मधून काही निष्पन्न होणार नाही.
उलट जे फटाके वाजवत नाहीत ते पण फटाके वाजवायला सुरुवात करतील.
असे फक्त हिंदू नाच टार्गेट केले तर.
ये आदमी क्युं फेकता है इतना
ये आदमी क्युं फेकता है इतना लंबा लंबा
हे क्काय आज सकाळी सकाळीच खंबा ?
उलट जे फटाके वाजवत नाहीत ते
उलट जे फटाके वाजवत नाहीत ते पण फटाके वाजवायला सुरुवात करतील.
असे फक्त हिंदू नाच टार्गेट केले तर.
>>>>>>
हो, ही मानसिकता असते बरेच लोकांची..
अमुक तमुक पिक्चर बघू नका सांगितला की हट्टाने बघणार..
हिंदू नाच हे टार्गेट होते?
हिंदू नाच हे टार्गेट होते? मला वाटलं फटाके आणि लेसर होते टार्गेट .
(No subject)
शेर ऐकवल्यावर वाहव्वा, सुभान
शेर ऐकवल्यावर वाहव्वा, सुभान अल्लाह, माशा अल्लाह काहीच नाही ?
मायबोलीकरांची अरसिकता वृद्धींगत होत चालली आहे.
असे फक्त हिंदू नाच टार्गेट
असे फक्त हिंदू नाच टार्गेट केले तर. >> हिंदू नाच = लावणी, लेझिम, नागीन डान्स
मुस्लीम नाच = मुजरा, अरेबिक डान्स
कम्युनिस्ट नाच = बेली डान्स
ख्रिस्ती नाच = रॉक एन रोल, पॉप,जॅझ, बॉल डान्स, ब्रेक डान्स इत्यादी
दाक्षिणात्य नाच = कथ्थक, कथ्थकली, भरत नाट्यम,कुचिपुडी, मणिपुरी , मोहिनी अट्टम इत्यादी
शीख नाच = भांगडा
गुजराती नाच = गरबो
एकदा आमच्या हॉस्टेलच्या
एकदा आमच्या हॉस्टेलच्या पोरांनी सराला हॉस्टेलला बोलावलं होतं. चांगलं जेवण मिळणार म्हणून तो पण खुशीने गेला. आल्यावर त्याला एका खोलीत नेला लाईट बंद करून त्याच्या अंगावर ब्लँकेट टाकला आणि जी काय दे धबधब दे धबाधब सुरू केली विचारू नका. ब्लँकेट काढेपर्यंत सगळी फरार. त्याच्या कपाळावर एक व्रण कायमचा राहिलाय
फटाके उत्पादन करणार हाच
फटाके उत्पादन करणार हाच स्टॅलिन मुख्यमंत्री असणारे राज्य आहे.
एक नंबर च हिंदू द्वेष करणारा आहे.
राजस्थान, दिल्ली,ओडिशा इत्यादी राज्यांनी फटक्या न वर पूर्ण बंदी टाकली होती तेव्हा स्टॅलिन ती बंदी उठवावी म्हणून अश्रू ढाळत होता.
दुट्टपी लोक आहेत.
एकीकडे हिंदू वर टीका करायची फटाके वाजवतात म्हणून आणि दुसरी कडे बंदी टाकली की रडगाणे चालू करायचे.
कोर्टात जायचे
जोसेफ स्टॅलिन पण तसलाच होता
जोसेफ स्टॅलिन पण तसलाच होता
पोलंड वर हिटलर ने आक्रमण केले म्हणून निषेध केला आणि नंतर हळूच स्वतःच आक्रमण केले
खरंच दुटप्पी लोक आहेत हे
सर मी तुमच्या बाजूने आहे, तुम्ही लढा
तुमचे जे काही अल्प कपडे असतील ते मी सांभाळेन
या धाग्यावरचे हेमंत यांचे
या धाग्यावरचे हेमंत यांचे सर्व प्रतिसाद मला आवडले. संवादात त्यांनी सर्वांना निरुत्तर केले आहे.
ब्लँकेट बॅन साठी माझे " हो" आहे. कशावर आणायचा आहे हा बॅन? ( फटाके, लेझर, डि जे का एखादा बेरंग करणारा चित्रपट )
लेझर बीमच्या विरोधात ग्राहक
लेझर बीमच्या विरोधात ग्राहक पंचायतीची मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका
ण, कार्यक्रम आणि मिरवणुकीत होणारे ध्वनिप्रदूषण आणि घातक लेझर बीमच्या विरोधात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. यासंदर्भात राज्य शासन जोपर्यंत नियमावली विकसित करत नाही आणि त्याची संपूर्ण राज्यात अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत सार्वजनिक ठिकाणी धोकादायक लेझर बीम विक्री आणि वापरावर पूर्ण बंदी आणावी, अशी मागणी या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
धार्मिक सण साजरे करणयासाठी कायद्याचे उल्लंघन करण्याची परवानी कोणत्याही धर्माने दिलेली नाही. राजकीय मिरवणुका आणि धार्मिक उत्सव साजरे करत असताना ध्वनिप्रदूषण नियमांचे पालन होत नाही. ध्वनिक्षेपकाचा वापर हा कोणत्याही धर्माचा आवश्यक भाग नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. ही याचिका केवळ कोणत्याही विशिष्ट धर्म किंवा सणाबाबत नाही तर सर्व प्रकारच्या ध्वनिप्रदूषणाबाबत आहे, असे अॅड. सत्या मुळे यांनी सांगितले.
नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात डीजे आणि लेझर बीममुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला. ध्वनिप्रदूषण नियंत्रण नियमानुसार आवाजाची पातळी निर्धारित करण्यात आली आहे. मात्र पुण्यासारख्या विविध जिल्ह्यात अधिसूचनेद्वारे डीजेसाठी मुदत मध्यरात्रीपर्यंत वाढविण्यात आली होती, अशी अधिसूचना बेकायदा आहे. जिल्हाधिकाऱ्यांना तसे कोणतेही अधिकार नाहीत. राज्य सरकारलाही तसे अधिकार अधिनस्त अधिकाऱ्यांना सोपविण्याचा अधिकार नाही. पोलीस आणि अन्य विभागांनी आवाजाच्या पातळीचे उल्लंघन होऊ नये, यासाठी यंत्रणा केली असेल. मात्र, त्याची अंमलबाजवणी करणे आणि योग्य ती कारवाई करण्यास राजकीय नेत्यांकडून पाठबळ दिले जात नाही. त्यामुळे ध्वनिप्रदूषण वाढत आहे. बार, पब आणि रेस्टारंटमध्ये होणाऱ्या ध्वनिप्रदूषणबाबातही ही याचिका आहे, असे या याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
कोलकत्ता उच्च न्यायालानेही
कोलकत्ता उच्च न्यायालानेही फटाक्या वर पूर्ण बंदी टाकली होती.
सर्वोच्च न्यायालय नी उठवली.
.
मग आवाजाचे नको फक्त colour चे चालतील हे भलतच पिल्लु पण सोडून दिले मग लोकांनी.
अंशतः बंदी आपल्या देशात यशस्वी होत नाही हा इतिहास आहे.
प्लास्टिक थैल्या वापरायला बंदी.
इतक्याच जाडी च्या थैल्या वापरायला बंदी ian उत्पादन वर बंदी नाही.
फटाके वाजवय ला बंदी पण उत्पादन ला बंदी नाही.
असले विचित्र प्रकार सुरू झाले.
स्थिती मध्ये काही फरक पडला नाही.
आता मध्ये न्यूज मध्येच वाचले फटाक्या न च्या आवाज विषयी नियम आहे पण लेसर light विषयी काहीच कायदा नाही म्हणून कारवाई करता येत नाही.
किती हास्यास्पद युक्तिवाद आहे हा.
भारतात काय प्रतेक देशात. उत्पादन घ्यायचे असेल तर लायसेन्स लागते, .
लायसेन्स देताना काही नियम घातले जातात.
लेसर light वाल्यांनी लायसेन्स घेतलेच नसेल तर .
कशाला हवा नवीन कायदा जुन्या कायद्या नुसार बेकायदेशीर उत्पादन म्हणून सरकार अत्यंत कडक कारवाई करू शकते
भरत ह्यांच्या ह्या पोस्ट शी
भरत ह्यांच्या ह्या पोस्ट शी पूर्ण सहमत आहे.
आवाज प्रदूषण.
घरातील सर्व उपकरण, पब्स,हॉटेल,सार्वजनिक कार्यक्रमातील वाद्य, फटाके, पार्ट्या, सर्व ठिकाणी .
आवाज प्रदूषणाचा नियम लागू झाला पाहिजे.
अगदी एनफिल्ड ह्या गाडीचा पण आवाज डोक्यात जातो.
पण सर्व कायदेशीर परवानगी घेवून एनफिल्ड ही गाडी तयार होते.
कोणत्या नियमात सरकार त्यांना परवानगी देत असेल हा खरेच संशोधनाचा विषय आहे
कुंपणच फितूर आहे .ह्याचे हे सर्व परिचित उदाहरण
ब्रेक डान्स पैसे भरून शिकलो
ब्रेक डान्स पैसे भरून शिकलो आहे त्यामुळे त्यावर बंदी नको माय लॉर्ड!
हिंदू नाच करताना उजवा पाय डाव्यांच्या मागून काढताना आणि हात पाठीमागून पुढे आणताना जर शरीर लॉक झाले तर या भीतीने शिकलो नाही.
तरी सोप्या ख्रिस्ती नाचावर बंदी नको.
ही भूमिका दुटप्पी वाटल्यास दत्त भुवन नाश्ता केंद्रात मुक्ता बर्वेची फेवरिट पोह्याची डिश चारायला तयारी आहे.
अंशतः सूट बिलकुल नको.
अंशतः सूट बिलकुल नको.
बंदी म्हणजे बंदी.
मग dj तुमच्या घरात वाजत असु ध्या किंवा रस्तावर.
फटाके बाबतीत पण तशीच बंदी .
लेसर light वर पण तशीच बंदी.
विषयच संपवून टाकला पाहिजे.
भिजत घोंगडे ठेवायची घान सवय भारतीय लोकांना आहे.
373 कलम पण भिजत घोंगडे होते. मोदी नी ते भिजलेले घोंगड च फेकून दिले.
तसा च एकदा काश्मीर च विषय सोडवला म्हणजे झाले
आत्मब्लॅंकेट
आत्मब्लॅंकेट
आत्मप्लॅंचेट
आत्मपॅंाम्फ्रेट
पटकथा रेडी आहेत. होतकरू निर्माते पुढे येतील काय..
तसा च एकदा काश्मीर च विषय
तसा च एकदा काश्मीर च विषय सोडवला म्हणजे झाले
>>>
एक्झॅटक्टली. छोटे लोग. चिल्लर डीजे नि लेझर घेऊन बसलेत. खरा प्राॅब्लेम जागतिक आहे. यांच्या नादी लागण्यात अर्थ नाही.
भिजत घोंगडे ठेवायची घान सवय
भिजत घोंगडे ठेवायची घान सवय भारतीय लोकांना आहे.>>>
ब्लॅंकेट वरून डायरेक्ट घोंगडीत.
ब्लॅंकेट बॅन केले तरी चालेल पण घोंगडी बॅन नाही झाली पाहिजे.
मायबोलीने सरकार स्थापन करावे.
मायबोलीने सरकार स्थापन करावे. न्यायसंस्था चालवायला घ्यावी. राष्ट्रपतींना सर्वाधिकार द्यावेत.जगभरात पसरलेल्या मायबोलीने जगातील सर्व सरकारे ताब्यात घ्यावीत. अमेरिकेतील मायबोलीकरांनी युनो वर कब्जा करावा. सर्व जगाचे एकच एक जागतिक सरकार बनवावे. त्याला समास (सक्रीय मायबोलीकरांचे सरकार) म्हणता येईल. संपूर्ण जगाचा एकच एक अध्यक्ष बनवावा.
त्यासाठी योग्य व्यक्ती उपलब्ध आहे.
एव्हढे केले कि ब्लॅन्केट बॅन आलाच समजा.
पूर्वी असे ब्लॅन्केट बॅन करणाऱ्यांना हाक मारताना जी लावत. तेच हे बॅनर्जी लोक. बॅनर्जी समिती नेमली कि वाटेल ते बॅन!
३७३ चे कोणते घोंगडे मोदींनी
३७३ चे कोणते घोंगडे मोदींनी फेकले? टेलेप्राॅम्पटर पण फेकू शकत नाहीत ते तर (‘फेकतात’ असं काही लोक म्हणतात, पण खोटंय ते )
घोंगडी म्हणजे नवरा. जो घों
घोंगडी म्हणजे नवरा. जो घों आणि गडी दोन्ही असतो तो.
Pages