Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दोन नवीन देसी मालिका. इथे
दोन नवीन देसी मालिका. इथे कोणी लिहीले आहे का आठवत नाही. पण दोन्ही नवीन आहेत त्यामुळे नसावे.
स्कॅम २००३ (सोनी लिव्ह. अमेरिकेत स्लिंग वर)- महाराष्ट्रातील स्टॅम्प पेपर स्कॅमवर ही सिरीज आहे. स्कॅम-१९९२ वाल्यांचीच आहे त्यामुळे टोन तसाच आहे. टायटल्स च्या वेळचे संगीतही तेच आहे. सुरूवात अगदी बाळबोध वाटते पण लगेच पकड घेते सिरीज. मस्त आहे. बघा. त्या लीड चे काम मस्त आहे. सपोर्टिंग कास्टही जमली आहे. शशांक केतकरचा रोल म्हणजे एकदम सरप्राइज आहे. चांगले काम केले आहे त्याने. इतरही बरेच मराठी कलाकार आहेत.
बम्बई मेरी जान (प्राइम) - नेटाने पाहतोय. सुरूवात अगदी रटाळ होती. पण पुढे वेग पकडेल असे ऐकले आणि तसे वाटत आहे. वस्तुस्थितीशी किती संबंधित आहे माहीत नाही.
जिओ सिनेमा वर "ताली "
जिओ सिनेमा वर "ताली " वेबसिरीज पाहिली खरंतर 20 मिनिटांचे छोटे भाग बनवून वेबसिरीज बनवण्यापेकशा तीन साडे तीन तासाचा पिक्चर बनवला असता तर जास्त परिणामकारक झाला असता.असो वेबसेरीज अतिशय चांगली बनवली आहे सत्यकथेवर बेतलेली आहे.
Transgender ह्या विषयावर हल्ली बऱ्याच सिरीज आणि चित्रपट येत आहेत वाणी चा चंदिगढ करे आशिकी , मेड इन हेवन ची त्रिनेत्रा आणि हल्लीच आलेला नावाझउद्दीन चा हड्डी यातून बऱ्यापैकी लोकांना माहिती मिळतेय की नक्की ट्रान्स चं आयुष्य कसं असतं.
"ताली" मधूनही श्रीगौरी सावंत हिच्या आयुष्यावर बेतलेली व तिने दिलेल्या तृतीयपंथी हक्काची कायद्यात मिळणाऱ्या ओळखीची लढाई दाखवली आहे. सुरुवातच न्यायालयातल्या तृतीयपंथीना कायद्याने स्थान मिळवून देणाऱ्या पिटीशन वरून होते.पुढे काय ते सिरीज मध्ये बघा.सुष्मीताने श्रीगौरी मेहनतीने साकारली आहे अगदी आवाजही थोडा बदलला आहे.बरेच मराठी कलाकार यात आहेत कृतिका देव,किन्नराच्या भूमिकेत सुव्रत जोशी ,नंदू माधव ,हेमांगी कवी सगळ्यांची कामे चांगली झाली आहेत.कृतिका ने लहानपणीची श्रीगौरी म्हणजेच गणेशची घालमेल फार चांगल्या रीतीने उभी केली आहे.तिचा रोलही मोठा आहे. नंदू माधव आणि कृतिकाचे बरेचसे सीन डोळयात पाणी आणतात .वडील आणि मुलगा ज्याची मुलगी बनण्याची इच्छा दोघांच्या तणावाचे कारण बनते ते फार संवेदनशीलतेने चित्रित केले आहे.सिरीज मध्ये एकही अश्लील किंवा आक्षेपार्ह सिन नाही त्यामुळे tv वरही बघू शकता उलट रवी जाधव यांनी फार चांगल्या रीतीने डिरेकशन केले आहे.
श्रीगौरीचा प्रवास व तिचे आई होणे फार सुंदररित्या दाखवले आहे. बरेच प्रसंग हेलावून टाकतात त्यातला एक म्हणजे गणेश च गणपतीच्या दिवसात येणाऱ्या गौरीवरून श्रीगौरी नामकरण ठेवणे तसेच तिची एक स्त्रीच नव्हे तर आई म्हणून जगण्याचा संघर्ष. ही वेबसिरीज बघून transgender एकंदरीतच LGBTQA बद्दलचा समाजाचा दृष्टीकोण बदलायला मदत होईल. वेबसिरीज चांगली आहेच पण विशेष म्हणजे मेकअप चाही उल्लेख करावा लागेल कारण ट्रान्स म्हणजे दाढी आली ,त्याचा जो हिरवट मेकअप केला आहे त्याची कॅन्टीन्यूटी सलग आहे. विशेषतः सुष्मीताचा मेकअप लुकही बराचसा श्रीगौरी सारखा ठेवला आहे.
नावाझउद्दीन चा हड्डीही चांगला आहे पण त्यात थोडा रक्तपात असल्यामुळे लहान मुलांसमोर पाहु शकत नाही पण "ताली" पाहायला हरकत नाही.
श्रीगौरी ला जाणून घ्यायचे असल्यास
https://youtu.be/s1t60BjjU2c?si=I0As0c329PlkVlMl
खालील पोस्ट मध्ये काही
खालील पोस्ट मध्ये काही spoiler असू शकतात त्यामुळे सावधान
ताली
चांगली वाटली
सयंत आहे.
कसलेले कलाकार आहेत सगळे.
सुस्मिताने बॉडी लँग्वेज खूप चांगली पकडली आहे.
आवाज , मेकअप त्यामुळे अजून इम्पॅक्ट चांगला.
लहान असतानाचे प्रसंग एका व्यक्तीच्या आयुष्यात खरेखुरे घडलेत हे लक्षात घेतलं आणि imagine केलं तरी किती मोठा संघर्ष ह्याची किंचित जाणीव होते.
कालकुट पाहिली.
पोलिसांसोबत किती सहजपणे लोकं खोटं बोलतात किंवा अर्धवट माहिती देतात हे बघून आश्चर्य वाटलं काहीवेळा.
शेवटाकडे गुंडाळली की काय असे वाटत गेले.
आखरी सच
दिल्लीमधील एकाच कुटुंबातील 11 जणांनी केलेल्या सुसाईड विषयी.
सत्य घटनेतच इतका drama असताना त्यात इतर फोडणी का दिली हेच कळालं नाही.
मुळातच सगळ्या गोष्टी एकसंघ जुळल्या नाहीयेत.
OK OK आहे.
आखरी सच म्हणजे ते house of
आखरी सच म्हणजे ते house of secret डॉक्युमेंटरी बद्दल का? डॉक्युमेंटरी बघितली आहे तीन भागांची नेटफ्लिक्सवर..
ताली बद्दल वरच्या प्रतिसादांना अनुमोदन.
All of us are dead नेटफ्लिक्सवर पाच भाग झाले बघून.. भयंकर भयंकर आहे सीरीज..झोंबींवाली..
आखरी सच आता hotstar वर आलीय.
आखरी सच आता hotstar वर आलीय.
तमन्ना आहे पोलीस अधिकारी
बंबई मेरी जान चालू केली काल.
बंबई मेरी जान चालू केली काल.
आवडते आहे.
मीही बघायला सुरुवात केली आहे
मीही बघायला सुरुवात केली आहे ती. दाऊद ला आता विजय दीनानाथ चौहान सारखा केवळ परिस्थितीमुळे वाईट मार्गाला गेलेला हिरो टाइप बनवतात की काय असे वाटतेय. "मै एक दिन अपनी गाडी मे बैठुंगा" .... नंतर काही वर्षांनी, "हाजी मैने तुझे तभी बोला था की एक दिन मै ....... " वगैरे.
के के मेनन चे काम आवडले.
अच्छा हा आहे का विषय बम्ब ई
अच्छा हा आहे का विषय बम्ब ई मेरी जानचा? बघेन मी पण..
ओके झकासराव थँक्स.
केकेमेनन अफलातून दिसतो आणि
केकेमेनन अफलातून दिसतो आणि काम करतो. त्याच्यासाठीच बघतोय. आणि मुंबई साठी.
दाऊद ला आता विजय दीनानाथ
दाऊद ला आता विजय दीनानाथ चौहान सारखा केवळ परिस्थितीमुळे वाईट मार्गाला गेलेला हिरो टाइप बनवतात की काय असे वाटतेय >>> अगदी तसे नाही दाखवलेले, कारण त्याच्या काही सवयी लहानपणापासून दाखवल्या आहेत. पण एकूण ग्लोरिफिकेशन बरेच आहे. चौथ्या-पाचव्या भागात तर आपण अग्नीपथ पाहात आहोत असे वाटते म्हणजे तो "मै बोला था, ये लडका चिंगारी..." वगैरे सीन ऑल्मोस्ट तसाच आहे.
त्या हबीबा (कृतिका कामरा) चे काम मस्त आहे. के के च्या बायकोचे पण. के के तर भारी आहेच.
नेट फ्लिक्स वर १०० % फिझिकल
नेट फ्लिक्स वर १०० % फिझिकल नावाचा गेम शो टाइप सिरीअल बघितली कोरिआतले १०० बेस्ट फिझिकल लोक्स घेउन त्यांना वेगवेग ळी a
चॅ लेंजेस दिलेली आहेत. थोडा स्क्विड गेम चा भास होतो पण कोणी मरत नाही इथे एलिमिनिणॅट होतात. हरलेल्या लोकांनी स्वतःचाच प्लास्टरचा पुतळा हातोडीने फोडायचा. हे आव्डले. चेलेंजेस तर एकही जमेल अशी शक्यता पण नाही. पण बघायला मजा येते. क्रॉस फिट वाले, जिम जाणारे ह्यांना जास्त मजा येइल बघायला.
विजय वर्मा ची कालकूट पाहिली..
विजय वर्मा ची कालकूट पाहिली.. नवाजुद्दीन, मग पं. त्रिपाठी, आता हा जीव ओतून काम करतात. किरकोळ शरीर यष्टी साधारण लूक असलेला आधी आळशी पळपुटा मग जांबाझ झालेला पोलिस इन्स्पेक्टर चांगला चितारला आहे.
अॅसिड विक्टिम वाली चांगली अभिनेत्री आहे पण तिला फारसे डायलॉग नाहीत. चेहरा अजून विद्रुप दाखवायला हवा होता, त्या बाजूचे केस जळालेले वगैरे.. हिचा डोळा केस जस्सेच्या तस्से शाबूत दाखवलेत. नॅचरली अॅसीड हल्ल्यातून गेलेली वाटत नाही..
स्पॉईलरः
शेवटाला काय च्या काय अचाट केलय..सळई आर पार गेलेली असताना पाण्यात रक्त स्त्राव झाला असताना हीरो वाचतो. अगदी काहीही..
अॅसीड हल्ला ची शिक्षा काही वर्ष पण ते लपवायला तो गुन्हेगार किती पोलीसांना किड्या सारखा मारताना दाखवलाय. आणि तो स्त्रियां विरुद्ध चळवळ करणारा क्रांतिकारक असा दाखवलाय, त्याला अक्षरश: गुंड करून टाकलाय.
बंबई मेरी जां नावाचा अजय
बंबई मेरी जां नावाचा अजय देवगण, मग नंतर पार्ट२ इम्रान हाश्मी का काहितरी चित्रपट मागे येऊन गेला ना?
तश्याच धर्तीवर असावा म्हणुन पाहिला नाही. क्रिमिनल ग्लोरिफिकेशन आवडत नाही. त्यांना मेलेले पहायला आवडते जसे डर, बाजिगर, रईस मधे शाखा मेला तर मजा आली संजू जेल मधे गेला .. मजा आली.
आशु ह्यांच्या कालकुट spoiler
आशु ह्यांच्या कालकुट spoiler ला तंतोतंत plus 1
तेव्हा वाटते का अशी माती करताय रे.
ती heroin खूप अशा रोल्स मध्ये आहे.
मसान मध्येही होती असे आठवते.
ती फार तरुण दिसते वयाच्या मानाने असेही केव्हातरी नेट वर वाचले आहे.
त्याचा सिनियर एकाच वेळी चिडका आणि सपोर्टिंग
दाखवला आहे. एका पॉलिटिकल माणसासोबत बोलताना तो विजय वर्मा ला मांडीवर हात ठेवून हळूच खुणावतो आणि situation handle करतो तेव्हा भारीच वाटते.
अनुभवाचा फायदा त्याच्या. त्यांचे डायलॉग छान आहेत.
रिटायर होणार असतो तो हवालदार खूप काहीतरी माहिती / रजिस्टर वाचून नेमकी माहिती काढून देतो त्यावेळचा त्याच्या चेहऱ्यावर आनंद असतो किती.
असे छोटे छोटे प्रसंग फार छान.
अटॅक ऑन टायटन शेवटून दुसरा
अटॅक ऑन टायटन शेवटून दुसरा एपिसोड आला तो पाहिला. आवडला.
बंबई मेरी जां तीन एपिसोड
बंबई मेरी जां तीन एपिसोड पर्यंत तरी मला दाऊद बद्द्ल जराही कणव वाटली नाही. परिस्थिती नाही तर चॉईसच अजुन तरी दिसतोय. बघू पुढे.
केके, नसिफा आणि हबिबा यांची कामे आवडली. त्याची बायको तर फारच आवडली.
All of us are dead- १२
All of us are dead- १२ एपिसोड्स संपले बघून... झोंबींपट आहे साथ मे साथ इमोशनल ड्रामा आणि स्टोरी पण आहे.
चांगली आहे सीरीज.. थ्रीलींग एकदम.
अमा, 100 परसेन्ट फिजिकल शो
अमा, 100 परसेन्ट फिजिकल शो बघायला चालू केला.फारच सॉलिड आहे.मुख्य म्हणजे सर्वांची बॉडी भारीच आहे.
पुढच्या जन्मी मी पण बनवणार आहे अशी.
बंबई मेरी जान - यट अनदर दाउद
बंबई मेरी जान - यट अनदर दाउद शो. पण यात दाउद बरोबर त्याच्या पिताश्रींवर (इब्राहिम कासकर) जास्त फोकस आहे. करीम लाला, हाजी मस्तान, वरदराजन इ. ना बिच्चारं दाखवलं आहे. सगळ्यांची नांवं बदलली आहेत. का कुणास ठाउक. मन्या सुर्वे, बन्या; शबीर कासकर, सादिक इ. दाउदला मोठा करणारा पुलिस ऑफिसर रिबेरो होता बहुतेक, जाणकारांनी प्रकाश टाकावा...
“चूना” बघायला सुरुवात केलेली
“चूना” बघायला सुरुवात केलेली आहे. कोण, कुठे चूना लावणार अजुन स्पष्ट झालेलं नाहि. सीरीज पुढे पकड घेइल या आशेवर.. नेफिवर आहे…
आखरी सच पाहिली.कथा आणि शेवट
आखरी सच पाहिली.कथा आणि शेवट अर्थातच माहीत होता.पण खूप उदास वाटत राहिलं.तमन्ना ला उगीच शोपिस म्हणून घेतलंय.अर्थात अभिनय चांगला आहे पण मूळ कथेला तिची गरज नव्हती.
दिल्ली पोलीस एकमेकांशी कामाची चर्चा करताना इतकं इंग्लिश बोलतात असं मला वाटत नाही.कोणी दिल्ली पोलिसांना पाहिलं असेल तर खुलासा करा.
शेवटाला काय च्या काय अचाट
शेवटाला काय च्या काय अचाट केलय..सळई आर पार गेलेली असताना पाण्यात रक्त स्त्राव झाला असताना हीरो वाचतो
>>> गूगल करा.. असे भरपूर किस्से आहेत.. हा घ्या एक -
https://mumbaimirror.indiatimes.com/news/india/man-survives-for-4-hrs-wi...?
सिनियर लेव्हल वर चालते
सिनियर लेव्हल वर चालते इंग्लिश.. Upsc करून आलेले लोक असतात.. हिंदी कम्फरटेबल नसतात कधी कधी..
ओह ओके.
ओह ओके.
तो हिरो(ड्रीम गर्ल मधला नुसरत चा भाऊ) फार सॉलिड अभिनेता आहे.एका क्षणात अभिनय बदलून क्रिपी दिसू शकतो.
ड्रीम गर्ल मधील नुसरत चा भाऊ
ड्रीम गर्ल मधील नुसरत चा भाऊ अभिषेक बॅनर्जी.
पाताल लोक मधील हतौडा त्यागी, स्त्री आणि भेडिया मधील जना,
तू बियर है - tvf पिचर्स मधील भाटी ...
2006 पासून काम करतोय- आता सक्सेस मिळालाय...
हो हो बरोबर तोच.एक मेनीकिन
हो हो बरोबर तोच.एक मेनीकिन वाली कथा होती नेटफ्लिक्स वर त्यात पण होता.नाव गुगल करायला आळस केला.चिनी कम नावाचा अमिताभ तब्बू चा पिक्चर होता त्यातला कोलगेट पण हाच होता का?(हे मी गुगल करायला हवे) नाही तो वेगळा माणूस आहे.
मुख्य म्हणजे सर्वांची बॉडी
मुख्य म्हणजे सर्वांची बॉडी भारीच आहे.
पुढच्या जन्मी मी पण बनवणार आहे अशी>>> लॉल अनू
नेफ्लिवर डीअर चाईल्ड बघतेय.
नेफ्लिवर डीअर चाईल्ड बघतेय. अजून तरी ओके वाटतेय. भलतीच संथ आहे पण.
अशा थीम वर (गुढ, क्रिपी मुलं वगैरे) बरंच काही बघितल्याने देजावू फिलिंग येतंय. तरी लिमिटेड सिरिज असल्याने बघत आहे.
एक मेनीकिन वाली कथा होती
एक मेनीकिन वाली कथा होती नेटफ्लिक्स वर त्यात पण होता.नाव गुगल करायला आळस केला >>> हो मी पाहिली आहे. तोच होता. त्यात अगदी गरीब बिचारा टाइप रोल होता व त्याच्या पाताल लोक व मिर्झापूर ("कंपाउण्डर" - मुन्ना चा जिगरी दोस्त) च्या रोल्स च्या मानाने अगदी वेगळा.
गूढ क्रिपी मुलं वरून आठवलं
गूढ क्रिपी मुलं वरून आठवलं.नेटफ्लिक्स वर टिन अँड टिना नावाचा हॉरर चित्रपट आहे, ट्रेलर बघून माझी अजून बघायची हिंमत झालेली नाहीये.
Pages