Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा!
अरे वा!
हो. आता क्राऊनचा काळ आपण बघितलेला असणार आहे, त्यामुळे जास्तच उत्सुक्ता आहे.
मी मधे सोडली सिरीज ती राणी
मी मधे सोडली सिरीज ती राणी बदलली तेव्हा. "राणी बदला की ओ!" असे रावसाहेब म्हणालेले दिसतात
अगदी सध्याच्या काळापर्यंत चित्रण आहे का?
रावसाहेब
रावसाहेब
अरे ऑलिव्हिआ कोलमन आणि
अरे ऑलिव्हिआ कोलमन आणि प्रोफेसर अंब्रिज ह्या राणी असल्यावर नाही आवडल्या असं तोंडातुन निघतच नाही.
विकी असं म्हणतंय
The sixth season is expected to be set between 1997 and 2005 and will depict the premiership of Tony Blair, the death of Diana, Princess of Wales, the early relationship of Prince William and Kate Middleton, and the wedding of Prince Charles and Camilla Parker Bowles.
ओह म्हणजे मेगन मार्कल तेथे
ओह म्हणजे मेगन मार्कल तेथे दिसून आपण क्राउन बघतोय की सूट्स असा प्रश्न पडणार नाही
वाह लंपन, मस्त बातमी दिलीत.
वाह लंपन, मस्त बातमी दिलीत.
हा शेवटचा सीझन म्हणताहेत.
हा शेवटचा सीझन म्हणताहेत. नाहीतर मेगन मार्कलला मेगन मार्कलचं काम करायची संधी होती.
ऑलिव्हिआ कोलमन आणि प्रोफेसर
ऑलिव्हिआ कोलमन आणि प्रोफेसर अंब्रिज >>>>> मला ट्रेलरमध्ये ऑलिव्हिआ कोलमन राणी म्हणून फारशी पटली नव्हती पण मध्ये थॅचरवाल्या सिझनचे काही भाग बघितले आणि ती बरी वाटली !! अंब्रिज जास्त आवडली अर्थात.
नेटफ्लिक्सवर, कालापानी आली
नेटफ्लिक्सवर, कालापानी आली आहे.
चक्क अमेय वाघ आहे यात.
असूर मधे पण होता की… मेन रोल
असूर मधे पण होता की… मेन रोल ऑलमोस्ट
काला पाणी एक भाग पाहिली
काला पाणी एक भाग पाहिली.सर्वानी चांगली कामं केली आहेत.
मोना सिंग चं पात्र बघून हाऊस एमडी ची आठवण आली.अमेय वाघ बेस्ट कामं करतोच.चिमां ला अजून म्हणावा तितका स्कोप मिळालेला नाही.तो गाईड बनलाय माणूस तोपण चांगलं काम करतो.
कथेचा थोडा अंदाज येत असला तरी सॉलिड आहे कथा.
असुर नाही पाहिली. कशावर आहे?
असुर नाही पाहिली. कशावर आहे? ने,प्रा वर तरी दिसली नाही.
असुर जिओ सिनेमा वर आहे.
असुर जिओ सिनेमा वर आहे.
असुर 1 - voot वर पाहिली होती
असुर 1 - voot वर पाहिली होती
असुर -2 जिओ सिनेमा
ह्म्म, दोन्ही नाही.
ह्म्म, दोन्ही नाही.
सुपर पम्प्ड चे पुढचे भाग जसे
सुपर पम्प्ड चे पुढचे भाग जसे बघत जातो तसे ती हाउस ऑफ कार्ड्स च्या वळणावर जाते. ते पॉलिटिक्स, नियमांना पळवाटा शोधत, तर कधी आधी सरळ नियम मोडून नंतर त्यातून मार्ग शोधत या कंपन्या पुढे येतात - तो भाग सगळा बरोबर दाखवला आहे. पण या यशस्वी कंपन्यांना एक "टेक्नॉलॉजी बॅकबोन" असतो - तो या सिरीज अधे फारसा दिसत नाही. एचबीओ वरचया "सिलिकॉन व्हॅली" मधे भर विनोदावर जास्त असला तरी टेक्नॉलॉजीबद्दलचे चित्रण खूप रिअल आहे. इथे त्याचा गैरवापरच जास्त दाखवला आहे.
काइल चॅण्डलर मात्र जबरी आहे. वूल्फ ऑफ वॉल स्ट्रीट मधेही तो आवडला होता. इथे मोठ्या रोल मधे एकदम चपखल आहे. आरियाना हफिंग्टनच्या फक्त एक दोन मुलाखती ऐकल्या/बघितल्या आहेत. त्यामुळे उमा थर्मनने किती परफेक्ट केला आहे माहीत नाही. उच्चार बहुधा बरोबर आहेत. जेसिका हेक्ट (फ्रेण्डस मधली सुझन आणि ब्रेबॅ मधली ग्रेचेन) आहे आणि रिचर्ड शिफ (वेस्ट विंग मधला टोबी) सुद्धा आहेत. हँक अझेरियाला टिम कूक च्या सिरीयस रोल मधे बघताना ऑड वाटते
नाईट एजंट काल संपली. आता
नाईट एजंट काल संपली. आता काहीतरी नवीन शोधते.
सुनिधी- असूर मस्ट वॉच आहे..
सुनिधी- असूर मस्ट वॉच आहे..
@ सुनिधी, भारतात दोन्ही app
@ सुनिधी, भारतात दोन्ही app वर सबस्क्रिपशन विकत न घेता फक्त लॉगिन केले तरी दोन्ही असुर सिजन फ्री आहे.
शोधते. धन्यवाद कल्की,च्रप्स,
शोधते. धन्यवाद कल्की,च्रप्स, झकासराव.
काला पानी चालू केली. पण पकड
काला पानी चालू केली. पण पकड घेईना. फार संथ चालू आहे.
प्राईमवर वाईल्डर्नेस बघतेय.
प्राईमवर वाईल्डर्नेस बघतेय. आवडली आहे.
काला पानी पूर्ण केली
काला पानी पूर्ण केली.स्पॉयलर्स देत नाही.
कथा फार जास्त आशावादी नोट वर संपलेली नाही.बहुतेक पुढच्या सिझन ची लोकांनी वाट बघावी म्हणून असेल.
मला तर अजिबात आवडली नाही
मला तर काला पाणी अजिबात आवडली नाही म्हणून डायरेक्ट शेवटचा एपिसोड लाऊन संपवली !
करोना आपल्या लक्षात असताना यांनी एखाद्या संसर्गजन्य रोगावर सिरियल काढायचे मोठे धाडसच केले आहे .
पण मराठी कलाकारांची उपस्थिती लक्षणीय आहे .
मला त्यात पानिपत मूव्ही काढून धारातीर्थी पडलेला आशुतोष गोवारीकर दिस्ल्याचा भास झाला !
आहे का त्यात तो ?
पण शेवटी नामावलीत नाव दिसले नाही !
त्या सिरियल चा संथपणा पहाता सिरियलचे दिग्दर्शन लपून छपून आशुतोषनेच केले असण्याचा दाट संशय येतोय .....
मला आवडली.पण प्रत्येक भाग
मला आवडली.पण प्रत्येक भाग संपल्यावर जे 'जगाचं काहीही होणार नाही, संपलं सगळं' फिलिंग वाढत जात होतं ते आवडलं नाही.
Survival dramas are supposed to offer a light of hope in the end.
गोवारीकर कास्ट मध्ये आहेत.डायरेक्शन मध्ये आहे की नाही कळलं नाही, वाचलं नाही.मोना सिंग ला वाया घालवल्याचं प्रचंड दुःख झालं.
वाईल्डर्नेस >>> काल पाहीली,
वाईल्डर्नेस >>> काल पाहीली, उगाच वेळ वाया गेला अस झालं.
बॉडीज बघायला चालू केली आहे.
बॉडीज बघायला चालू केली आहे. सायफाय मर्डर मिस्ट्री आहे. चार वेगवेगळ्या काळात एकाच वेळी गोष्ट घडतेय आणि ब्रिटिश शो आहे. लय भारी आहे. सो फार एकदम खिळवून ठेवलंय.
नेफ्लिवर The Fall of the
नेफ्लिवर The Fall of the House of Usher पाहिली. जबरदस्त .डिस्टर्बिंग आहे एकदम. हॉरर वाटली तरी सुपरनॅचरलच्या पलिकडे बरेच काही गूढ अर्थ लागतात. एडगर अॅलन पो च्या काही शॉर्ट स्टोरीज पूर्वी वाचल्या होत्या. फार इन्ट्रिगिंग, पॉवरफुल स्टोरीटेलिंग असतं, तसेच इथेही आहे.
बरोबर मै. मी गेल्या विकांताला
बरोबर मै. मी गेल्या विकांताला संपवली मालिका. इथे टाकलं होतं पण काळाच्या आणि पोस्टींच्या ओघात मागे गेलेली दिसतेय पोस्ट
र्म्द हो तुझी पोस्ट वाचली
र्म्द हो तुझी पोस्ट वाचली होती मी. आहे ना मागच्या पानावर. जास्त लोक बघत नाहीयेत वाटते ही.
Pages