लेखन उपक्रम ३ - बालहट्ट - मामी

Submitted by मामी on 26 September, 2023 - 23:00

शाळेची सहल जाणार म्हणून तो खूप आनंदी होता. त्याने कधी नव्हे ते आदल्या रात्रीच सगळी तयारी करून ठेवली होती. परंतु सकाळी सूर्याचा पहिला किरण जमिनीवर पडताच...

त्याच्या डोळ्यांमधील चिपवर शाळेकडून आलेला 'सहल कॅन्सल'चा संदेश त्याला मिळाला. त्याची ही पहिली ओव्हरनाईट ट्रिप होती. ती पण दुसर्‍या एक्झोप्लॅनेटवर - डॅगोनवर - पण त्या ग्रहाच्या सौरमंडलात सौरवादळ होण्याची शक्यता ०.०००००००००००००००००००००१ ने वाढल्याने शाळेने सहल कॅन्सल केली होती.

रडूनरडून गोंधळ घातला त्यानं. आज'च' शाळेतून'च' सहलीला जायचयं'च'!

निरुपायानं आई त्याला जवळच्या ट्रॅव्हल कंपनीत घेऊन गेली. त्यांच्याकडचा दोन दिवसांच्या ट्रिपचा एक 'प्रिमियम टाईमट्रॅव्हल' प्लॅन निवडून त्याला आदल्या रात्रीपासून ते दुसर्‍या दिवसापर्यंत डॅगॉनवरच्या त्याच्या शाळेच्या सहलीसाठी आल्टरनेट रिअ‍ॅलिटीत पाठवून दिलं.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users