चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-१ - पूल ( Bridge)

Submitted by संयोजक on 18 September, 2023 - 22:24

हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू .

आजचा विषय - पूल ( Bridge)

रस्त्यामध्ये येणारे विविध प्रकारचे अ़डथळे पार करण्याकरिता लागणारी वास्तू म्हणजेच पूल होय. हे अडथळे नद्या, नाले, ओढे, दऱ्या खिंडी, खोलगट भाग, तलाव, सरोवरे, खाड्या, समुद्राचे भाग, आडवे जाणारे रहदारीचे रस्ते ,लोहमार्ग असे कोणत्याही प्रकारचे असू शकतात. तुम्हीही आजपर्यंत देश विदेशात अनेक पूलांवरून प्रवास केला असेल...काही काही पूलांवरचा प्रवास तर आज आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झाला आहे...
मग अश्या काही देश ,विदेश, गावातील पूलांची छायाचित्र तुमच्याकडे असतील तर चला झब्बू खेळूयात ...

खेळाचे नियम व अटी -

१. प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत जवळचा रेल्वेवरचा ब्रीज. खालून जाणारी मालगाडी पण दिसते आहे.
IMG_20220611_095238 (1).jpg

मी ऑलरेडी टाकून झालाय असा शोभा घालवलेला फोटो >>> अहो सर्वसामान्य लोक उभे राहील्याने शोभा जाते, आयर्नमॅन उभे राहील्याने नव्हे Happy

हा तो आपला तो पूल स्वित्झर्लँडमधील Saanen Station बाहेरचा. इथेच तो हा (नेमकं नाव विसरलो!) एकदा म्हटला होता..... "पलट, पलट!"
तेवढ्यात त्या शेजारच्या रनवेवर विमान लँड होताना फोटो काढता आला.

IMG_0039.jpg

मंदार, खरंतर पुण्याचा आहेस हे पुरेसे आहे Wink
पण
यामाहा आर एक्स १०० वरुन खारदुंग ला वर जाऊन येणारा आणि सर्वसामान्य ! कभी नही Happy

धन्यवाद रघु

भाऊ कदम >> रघू आचार्य Lol
हर्पेन Happy

इथे नॉर्वेत Steinsdalsfossen नावाचा एक धबधबा आहे त्याच्या मागे चालत जाता येते. तिथून खालच्या गावाचा आणि पूलाचा काढलेला फोटो:

IMG_E8022.JPG

व्वा!

हिमालय आणी खारदुंगलाचा विषय निघालाय तर - हा एक लेहला जाताना लागलेला लोखंडी पूल:

IMG_8566.JPG

कॅनडातून Thousand Islands मधे बोटीतून फिरताना हा पूल दिसतो. तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं होतं की उजवीकडील बेट अमेरिकेत आहे आणी डावीकडील कॅनडामधे. त्या दोन बेटांना जोडणारा हा जगातला सगळ्यात लहान आंतरराष्ट्रीय पूल आहे (shortest international bridge in the world)
पण विकीपिडीयावर लिहील्यानुसार ही एक popular but incorrect tale आहे.

IMG_2015.jpg

अजून एक जरा वेगळ्या प्रकारचा पूल आहे. इथे नॉर्वेत Vøringsfossen नावाचा धबधबा आहे. तिनही बाजूंनी उंच डोंगर, त्यात मधे खोल दरी/घळ आणि त्यातून तो धबधबा वहातो. त्यातल्या दोन डोंगरांना जोडणारा पूल अलीकडेच २-३ वर्षांपूर्वी बांधलाय त्यावर पायी जाता येतं. जागा अफाट आहे पण मी पूलावरुन किंवा बाजूने वगैरे काढलेल्या फोटोंवरुन नक्की काय प्रकार आहे ते कळत नाही. त्यासाठी वर लिंक दिलीय त्यात वरुन घेतलेले फोटो आहेत.
पूलावर मध्यभागी उभं राहून खाली दरी + धबधबा बघणे आणि त्याचा आवाज ऐकणे हा खरोखर एक अद्वितीय अनुभव आहे Happy

मंदार , तू फोटोंसोबत माहीती पुरवणारे जे दुवे देत आहेस ते एक अत्यंत छान, जगात भारी काम करतोयस.
हा प्रतिसाद खास धन्यवाद देण्याकरता.
मनापासून धन्यवाद

धन्यवाद हर्पेन! लकडी पूल, झेड ब्रीज या व्यतिरिक्त आपण इतरही अनेक पूल पार केले आहेत हे मलाही यानिमित्ताने नवीनच कळलं Happy

हा अजून एक Krka National Park, Croatia मधला:

IMG_E1414.JPG

छान स्पॉट आहे...
आपल्याकडे अश्या जागा शांत मिळणे अवघड

मंदार, हर्पेन
एकसोएक भारी फोटो
अगदी नेत्रसुखद....
@ हर्पेन
वरळी सी लिंकवरून हाफ मॅरेथॉन वाले पण धावतात....मी धावलोय
.....आणि त्या पुलावर सेल्फी काढायला प्रचंड गर्दी होते

हो मंदार मलाही ते बरेच पूल ओलांडल्याचे जाणवले.

वरळी सी लिंकवरून हाफ मॅरेथॉन वाले पण धावतात....मी धावलोय हो हो ऋतुराज. हाफची सुरुवातच तिकडून होते.

आता त्याचा उल्लेख झालाय तर अजून एक फोटो टाकतो
IMG_20230115_071821 (1).jpg

खालच्या फोटोत पूलाच्या मागे डोंगरावरुन खाली निमुळता होत गेलेला बर्फ म्हणजे Briksdal glacier (हिमनग)
'One of the most accessible glacier' अशी याची ख्याती आहे. कार/बसने गेल्यावर शेवटचा ट्रेल पायी करावा लागतो त्याला साधारण पाऊण तास लागतो. हा पूल ओलांडून थोडं पुढे गेलं की हिमनगाच्या अगदी समोर जाता येतं. तिथे अगदी समोर उभं राहून प्रचंड हिमनग आणि त्यातून नुकतंच वितळलेलं फेसाळतं पाणी खाली तळ्यात कोसळताना पहाणे हे शब्दात सांगण्यासारखी गोष्ट नाही. फोटोवरुन साधी जागा वाटत असली तरी अगदी अद्भुत वाटतं तिथे गेल्यावर. नॉर्वेतला मोस्ट पॉप्युलर fjord आणि UNESCO World Heritage Site असलेला Geiranger Fjord इथून फार दूर नाही.

IMG_6703.JPG

खरंच दुर्मिळ फोटो हर्पेन! नुसता पादचारी मार्गच नाही तर पूलसुद्धा रिकामा दिसतोय.

हा एक असाच नॉर्वेच्या दर्‍याखोर्‍यांतून भटकताना काढलेला पूलाचा फोटो. (आता रिकाम्या पूलांचे फोटो संपत आले Happy )

IMG_7928.JPG

माझ्याही कडचे सहजसाध्य फोटो संपत आलेत.

हा कोकणातल्या खेडच्या ग्रामदेवतेच्या मंदीरामागे असलेल्या सुसरी नदी वरचा पूल
पावसाळ्यात ह्या नदीचे पाणी पार पुलाला भिडते

DSC06747_0.JPG

Pages