हिरोगिरीचा पिक्चर म्हणजे ज्यात एक हिरो असतो. तो स्टार किंवा सुपरस्टार असतो. तो पिक्चरच्या सुरुवातीला जेव्हा फटा पोस्टर निकला हिरो स्टाईल एक फाडू एन्ट्री घेतो. तेव्हा पब्लिक शिट्टी आणि टाळ्यांनी थेटर डोक्यावर घेते.
जवानमध्ये पिता आणि पुत्र असे दोन हिरो आहेत. दोन्ही शाहरुख आहेत. दोघे मिळून पिक्चर मध्ये जवळपास दहा-बारा एन्ट्री घेतात. आणि प्रत्येक एन्ट्री वेळी.. आय रिपीट.. प्रत्येक आणि एकूण एक एन्ट्रीवेळी पब्लिकच्या शिट्ट्या आणि टाळ्यानी थेटर दणाणून उठते.
माझी नऊ वर्षाची मुलगी जिने जेमतेम पंधरा-वीस चित्रपट थिएटरला पाहिले असतील. ती म्हणाली, पप्पा मी पहिल्यांदाच असा पिक्चर बघतेय जिथे पब्लिक एवढा आरडाओरडा करतेय..
आता तिला काय सांगू, मी सुद्धा माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच हिरोच्या दर नव्या एंट्रीला इतका जल्लोष अनुभवत होतो.
काय ती स्टाईल, काय ती ॲक्शन, काय तो स्वॅग.. येस स्वॅग इज द परफेक्ट वर्ड..
आजवर ही दक्षिण भारतीय हिरोंची मक्तेदारी होती. जी आज शाहरुख ने अक्षरशः मोडून काढली. नक्कीच दिग्दर्शक तिकडचा होता आणि त्याची कमाल यात होतीच. पण तिथली पब्लिक सुद्धा तशीच असते जे हिरोला तसेच डोक्यावर घेते. आपल्याकडे तशी काही पद्धत नसूनही आज मी एका हिंदी पिक्चरला असा माहौल अनुभवत होतो. शाहरूखचे स्टारडम म्हणजे नक्की काय चीज आहे हे मी त्याचा एक कट्टर चाहता असूनही मला नव्याने समजतेय असे होत होते..
पिक्चरमध्ये नयनतारा आहे, विजय सेतुपती आहे, दीपिका आहे, झाल्यास सरप्राईज पेकेज संजूबाबा आहे, शाहरुखच्या टोळीतील मुलींनी देखील मस्त काम केले आहे, दिग्दर्शक नावाजलेला आहे, का ते पिक्चर बघून समजते, बॅकग्राऊंड म्युझिक नुसता राडा घालते, गाणी फार श्रवणीय नसली तरी कोरिओग्राफी प्रेक्षणीय आहे. बोलायला बरेच काही आहे. पण आज शाहरूख पलीकडे काही सुचणे अवघड आहे.
जर पठाणने खरेच हजार कोटी कमावले असतील तर हा दहा हजार कोटी डिझर्व्ह करतो.
पण....
या पिक्चरची पठाणशी तुलना देखील करू नका. म्हणजे हा वेगळ्या धाटणीचा पिक्चर आहे ते सोडा. म्हणजे पठाण हॉलीवुड स्टाईल ऍक्शनपट बनवण्याचा प्रयत्न होता. तर हा दक्षिण भारतीय मसालापट आहे त्यामुळे शैली भिन्न आहेच. पण दोन्हीतील शाहरूखची तुलनाच नाही. पठाणचा शाहरूख यापुढे फार सामान्य भासला. आजवर कधी असा शाहरूख पाहिला नव्हता. कोणी कल्पनाही करू शकत नाही अश्या शाहरूखची..
त्यामुळे जा, उठा, तिकीट बुक करा आणि थिएटरमध्ये जाऊनच बघा. नुसते मोठ्या पडद्यावर बघायला म्हणून नाही तर तो माहौल तुम्ही तिथेच अनुभवू शकता. माझ्या मुलीने देखील टाळ्या वाजवून एन्जॉय केला. घरी आल्यावर आईला तो अनुभव सांगून थकत नव्हती. पिक्चर संपल्यावर म्हणाली की हा पहिला चित्रपट जो मी एकही डुलकी न काढता बघितला कारण दंगाच एवढा चालू होता, झोप यायचा प्रश्नच नव्हता..
पण पिक्चर नुसते शाहरूखचे स्टारडमच नाही दाखवत, तर तो हसवतो, रडवतो, इमोशनल करतो, पुन्हा खुश करतो, एक सामान्य माणूस म्हणून आपला जीव सुखावतो. कारण त्यातला हिरो आणि त्याची हिरोगिरी जरी लार्जर than लाईफ दाखवली असली तरी त्यातील समस्या खऱ्याखुऱ्या आहेत.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या, ऑक्सिजन अभावी सरकारी हॉस्पिटलमध्ये मुलांचा मृत्यू, भ्रष्टाचाराने पोखरलेली सिस्टीम ज्यातून सुरक्षायंत्रणा सुद्धा वाचली नाही. या सर्वात कुठलीही आतिशयोक्ती नाहीये. त्यामुळे ते प्रसंग भिडतात आणि आपल्याला चित्रपटाशी जोडतात.
दुर्दैव असे आहे की या सिस्टीम विरुद्ध लढून कोणी जिंकताना दाखवायचे असेल तर लॉजिक गहाण ठेऊन लार्जर than लाईफ दाखवण्याला पर्याय नाही. पण हा चार घटकांचा खोटा अनुभव देखील आपल्याला आनंद देतो हे तितकेच खरे आहे.
शाहरूखचे महिलांच्या जेलमध्ये जेलर असणे, सिस्टम विरुद्ध लढायला तेथील महिलांची टोळी बनवणे, त्याचे तिथल्या महिलांशी असलेले बॉण्डिंग आणि इमोशनल लव्हेबल प्रसंग जे शाहरूखलाच शोभावेत याचीही रेलचेल आहेच. त्यामुळे शाहरूखचे चाहते यातून सर्व प्रकारचा आनंद घेऊन बाहेर पडणार हे नक्की. एंटरटेनमेंटचा निकष लावता पिक्चरला नाव कुठे ठेवावे हा प्रश्न पडतो.
तरी हा कौतुक सोहळा आवरते घेत जाता जाता एवढेच सांगेन,
यू कॅन लव्ह शाहरूख
यू कॅन हेट शाहरूख
बट यू कॅन नॉट इग्नोर शाहरूख...
त्यामुळे त्याच्या चित्रपटाची नेहमी उलट सुलट चर्चा होतेच.
यात कोण त्याच्या बंडल चित्रपटाचे मुद्दाम कौतुक करते किंवा कोण त्याच्या चांगल्या चित्रपटावर मुद्दाम टिका करते हे समजेनासे होते.
तरी अशा गैरसमजातून कोणी चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघायचे टाळले तर त्यांच्याबद्दल वाईट वाटेल..
आणि म्हणूनच रात्रीचे तीन साडेतीन वाजता पोटतिडकीने हे लिहून काढले. कारण आपल्याला आलेला चांगला अनुभव लोकांशी शेअर करावा हाच नेहमी माझा परीक्षण लिहायचा हेतू असतो. धन्यवाद
ता.क. - My First Movie date with daughter... या अनुभवामुळे कायम लक्षात राहील.. लव्ह यू शाहरूख .. बदाम बदाम बदाम !
ओटिटिवर कधी येणारे?
ओटिटिवर कधी येणारे?
जाते आणि ओरडुन येते थेटरात.
जाते आणि ओरडुन येते थेटरात. Proud
>>>>
मस्त हाऊसफुल शो बघून जा.
आम्ही सोमवारी रात्री शेवटचा शो ला गेलेलो. त्यामुळे मस्त अवली प्रेक्षक होते.
@ मृणाली, ओटीटी काय लगेच.. परवा लग्न झाले आणि आज बाळाचा बारसा कधी आहे विचारत आहात..
गौरी पण घोवाचे इतके कौतुक करत
गौरी पण घोवाचे इतके कौतुक करत नसेल जितके ईथे होते
असे ही म्हणता येईल !अनजाने
असे ही म्हणता येईल !
अनजाने शादी में अब्दुला दीवाना !
अनजाने शादी में कश्याला??
अनजाने शादी में कश्याला??
आवडता कलाकार आहे तो माझा..
प्रत्येकाचे आवडते कलाकार असतात आणि ते त्यांचे कौतुक करतात.. खेळाडूंचे सुध्दा लोकांना कौतुक असते.. अगदी राजकीय नेत्यांचे सुद्धा कौतुक इथे चालते.. मग शाहरूखचे चाहते त्याचे कौतुक करत असतील तर हरकत काय
माझ्यामते कोणाचे कौतुक करताना कुठल्या मर्यादा पाळू नयेत. आणि कोणावर टीका करताना मर्यादा सोडू नये..
बाई दवे,
गौरी कश्याला शाहरूखचे कौतुक करेल?
घर की मुर्गी दाल बराबर..
माझ्या बायकोला देखील माझे तितके कौतुक नाही जितके शेजारच्या पाजाराच्या बायकांना आहे..
सर तुम्ही टेनिस खेळता काहो?
सर तुम्ही टेनिस खेळता काहो? नसाल तर खेळा. काय बॅॅकहँँड रिटर्न करता आहात!
नाही खेळत टेनिस
नाही खेळत टेनिस
वयात येताना बघायला तेवढे आवडायचे
लेहर खान चा इंटरव्यूhttps:/
लेहर खान चा इंटरव्यू
https://www.rediff.com/movies/report/lehar-khan-i-forgot-my-steps-while-...
>>>>>>
>>>>>>वयात येताना बघायला तेवढे आवडायचे Happy
तुम्ही वयात आलात का? अजुन तर लहान मुलासारखेच हट्टी वागता, आपलं तेच खरं करता, ....
हलके घ्या
एवढी छान compliment हलक्यात
एवढी छान compliment हलक्यात का घेऊ सामो
ऋन्मेऽऽष शाहरुख चे फार मोठे
ऋन्मेऽऽष शाहरुख चे फार मोठे चाहते आहेत, मान्य... त्यांना जवान अतिशय आवडला आहे हे पण मान्य तरीही एकंदरीत प्रतिसाद आणि वावर अतिशय बालिश वाटतो आहे.
>>>>>>>>>>एवढी छान compliment
>>>>>>>>>>एवढी छान compliment हलक्यात का घेऊ सामो Happy
साधा माणूस यांनी nostalgic
साधा माणूस यांनी nostalgic केले..
माझी एक X गर्लफ्रेंड माझ्या केसात हात फिरवून म्हणायची किती बालिश आहेस रे तू..
माझे केस वाढवायचे कारण सुद्धा हेच होते.
असो,
शाहरुखवर बोलूया
(No subject)
<< अनजाने शादी में कश्याला??
<< अनजाने शादी में कश्याला??
आवडता कलाकार आहे तो माझा..
प्रत्येकाचे आवडते कलाकार असतात आणि ते त्यांचे कौतुक करतात.. खेळाडूंचे सुध्दा लोकांना कौतुक असते.. अगदी राजकीय नेत्यांचे सुद्धा कौतुक इथे चालते.. मग शाहरूखचे चाहते त्याचे कौतुक करत असतील तर हरकत काय Happy >>
-------- ऋन्मेऽऽष तुम्ही केवळ वस्तूस्थिती मांडत आहात , काहींना ते कौतुक वाटत असेल तर त्यात शाहरुखचा काही दोष नाही, कोट्यावधी भारतीयांचा आवडता कलाकार/ नायक आहे.
<< ऋन्मेऽऽष शाहरुख चे फार
<< ऋन्मेऽऽष शाहरुख चे फार मोठे चाहते आहेत, मान्य... त्यांना जवान अतिशय आवडला आहे हे पण मान्य तरीही एकंदरीत प्रतिसाद आणि वावर अतिशय बालिश वाटतो आहे.
नवीन Submitted by Sadha manus on 14 September, 2023 - 08:17 >>
------- त्यांचे प्रतिसाद खूप mature / wise आणि त्याहीपेक्षा त्यात खिलाडू वृत्ती दिसते.
उदय धन्यवाद
उदय धन्यवाद
सर्वांच्या वैयक्तिक मताचा आणि आवडी निवडीचा आदर आहे..
पण शाहरूख आज भारतातला सर्वाधिक लोकप्रिय कलाकार आहे हे सत्य कोणी नाकारू शकत नाही
आणि हो, जवान मध्ये त्याने
आणि हो, जवान मध्ये त्याने राडा घातला आहे.
सर्वांनी मुलांना नक्की दाखवा. आवडेल त्यांना.. त्यांची मते आणि आवडी निवडी देखील पूर्व ग्रह दूषित नसतात.
Jawan box office collection
Jawan box office collection day 8: Shah Rukh Khan-starrer steamrolls over Gadar 2’s chances of beating Pathaan, eyes Rs 700 crore worldwide!!!
chances of beating Pathaan
chances of beating Pathaan
>>>
थोडक्यात,
शाहरूख को एक ही आदमी हरा सकता है..
खुद शाहरूख !!
मला शंका आहे शाहरुख आणि
मला शंका आहे शाहरुख आणि रजनीकांत खरंच माणूस आहे कि एलियन आहेत ... या वयात देखील किती यंग दिसतात ...
उत्साह अफाट आहे या माणसांचा..
उत्साह अफाट आहे या माणसांचा..
जवान बघून आता एक खात्री पटली की शाहरूख हिरो म्हणून अजून दहा पंधरा वर्षे तरी बघायला मिळणार
त्याला अमिताभसारखे दुसरी इनिंग सुरू करायची गरज नाही.. तो रजनी होणार
Is Jawan on Amazon Prime?
Is Jawan on Amazon Prime? Amazon Prime's current catalog does not include 'Jawan.' However, the film may eventually release on the platform as video-on-demand in the coming months.fantasy movies on Amazon Prime's official website. Viewers who are looking for something similar can Watch the original show 'Dororo.'
हे गुगल वर सापडलं. ह्याचा अर्थ kay? jawan silimar to dororo?
ह्याचा अर्थ kay?
ह्याचा अर्थ kay?
>>>ह्याचा सिम्पल अर्थ- prime चे अल्गो अजूनही गंडलेले आहे...
तो रजनी होणार
तो रजनी होणार
>>> टक्कल पडणार?
टक्कल पडे शाहरूख के और मेरे
टक्कल पडे शाहरूख के और मेरे दुश्मनो को..
रजनी होणार म्हणजे मुख्य आणि तरुण नायकाच्या भुमिकेत अखेरपर्यंत काम करत राहणार.
असो,
असो,
आता गणपती येतोय
तेव्हा थिएटरात जवान तूफान चालणार आहे.
त्यामुळे मायबोलीवर गणपती स्पर्धा उपक्रम धाग्यांमध्ये जवान हरवता कामा नये..
जे जे पिक्चर बघून येतील त्यांनी ईथे पोस्ट करायला विसरू नये
शुभरात्री
जवान चे मीडिया पार्टनर
जवान चे मीडिया पार्टनर नेटफ्लिक्स आहेत त्यामुळे नेटफ्लिक्स वर येण्याची शक्यता प्राईम पेक्षा जास्त.
नेटफ्लेक्स वर आला तर बरे होईल
नेटफ्लेक्स वर आला तर बरे होईल मला थेट बघता येईल.
प्राईम वर आला तर बायकोला मस्का मारून टीव्हीवर कास्ट करावा लागतो.
जवान पाहिला आज. सौदी इंडियन
जवान पाहिला आज. सौदी इंडियन स्टाईल मसालापट आहे.
म्हाताऱ्या शारुकचा स्वॅग भारी आहे. सोबतीला डॅशिंग बीजीएम.
Pages