हिरोगिरीचा पिक्चर म्हणजे ज्यात एक हिरो असतो. तो स्टार किंवा सुपरस्टार असतो. तो पिक्चरच्या सुरुवातीला जेव्हा फटा पोस्टर निकला हिरो स्टाईल एक फाडू एन्ट्री घेतो. तेव्हा पब्लिक शिट्टी आणि टाळ्यांनी थेटर डोक्यावर घेते.
जवानमध्ये पिता आणि पुत्र असे दोन हिरो आहेत. दोन्ही शाहरुख आहेत. दोघे मिळून पिक्चर मध्ये जवळपास दहा-बारा एन्ट्री घेतात. आणि प्रत्येक एन्ट्री वेळी.. आय रिपीट.. प्रत्येक आणि एकूण एक एन्ट्रीवेळी पब्लिकच्या शिट्ट्या आणि टाळ्यानी थेटर दणाणून उठते.
माझी नऊ वर्षाची मुलगी जिने जेमतेम पंधरा-वीस चित्रपट थिएटरला पाहिले असतील. ती म्हणाली, पप्पा मी पहिल्यांदाच असा पिक्चर बघतेय जिथे पब्लिक एवढा आरडाओरडा करतेय..
आता तिला काय सांगू, मी सुद्धा माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच हिरोच्या दर नव्या एंट्रीला इतका जल्लोष अनुभवत होतो.
काय ती स्टाईल, काय ती ॲक्शन, काय तो स्वॅग.. येस स्वॅग इज द परफेक्ट वर्ड..
आजवर ही दक्षिण भारतीय हिरोंची मक्तेदारी होती. जी आज शाहरुख ने अक्षरशः मोडून काढली. नक्कीच दिग्दर्शक तिकडचा होता आणि त्याची कमाल यात होतीच. पण तिथली पब्लिक सुद्धा तशीच असते जे हिरोला तसेच डोक्यावर घेते. आपल्याकडे तशी काही पद्धत नसूनही आज मी एका हिंदी पिक्चरला असा माहौल अनुभवत होतो. शाहरूखचे स्टारडम म्हणजे नक्की काय चीज आहे हे मी त्याचा एक कट्टर चाहता असूनही मला नव्याने समजतेय असे होत होते..
पिक्चरमध्ये नयनतारा आहे, विजय सेतुपती आहे, दीपिका आहे, झाल्यास सरप्राईज पेकेज संजूबाबा आहे, शाहरुखच्या टोळीतील मुलींनी देखील मस्त काम केले आहे, दिग्दर्शक नावाजलेला आहे, का ते पिक्चर बघून समजते, बॅकग्राऊंड म्युझिक नुसता राडा घालते, गाणी फार श्रवणीय नसली तरी कोरिओग्राफी प्रेक्षणीय आहे. बोलायला बरेच काही आहे. पण आज शाहरूख पलीकडे काही सुचणे अवघड आहे.
जर पठाणने खरेच हजार कोटी कमावले असतील तर हा दहा हजार कोटी डिझर्व्ह करतो.
पण....
या पिक्चरची पठाणशी तुलना देखील करू नका. म्हणजे हा वेगळ्या धाटणीचा पिक्चर आहे ते सोडा. म्हणजे पठाण हॉलीवुड स्टाईल ऍक्शनपट बनवण्याचा प्रयत्न होता. तर हा दक्षिण भारतीय मसालापट आहे त्यामुळे शैली भिन्न आहेच. पण दोन्हीतील शाहरूखची तुलनाच नाही. पठाणचा शाहरूख यापुढे फार सामान्य भासला. आजवर कधी असा शाहरूख पाहिला नव्हता. कोणी कल्पनाही करू शकत नाही अश्या शाहरूखची..
त्यामुळे जा, उठा, तिकीट बुक करा आणि थिएटरमध्ये जाऊनच बघा. नुसते मोठ्या पडद्यावर बघायला म्हणून नाही तर तो माहौल तुम्ही तिथेच अनुभवू शकता. माझ्या मुलीने देखील टाळ्या वाजवून एन्जॉय केला. घरी आल्यावर आईला तो अनुभव सांगून थकत नव्हती. पिक्चर संपल्यावर म्हणाली की हा पहिला चित्रपट जो मी एकही डुलकी न काढता बघितला कारण दंगाच एवढा चालू होता, झोप यायचा प्रश्नच नव्हता..
पण पिक्चर नुसते शाहरूखचे स्टारडमच नाही दाखवत, तर तो हसवतो, रडवतो, इमोशनल करतो, पुन्हा खुश करतो, एक सामान्य माणूस म्हणून आपला जीव सुखावतो. कारण त्यातला हिरो आणि त्याची हिरोगिरी जरी लार्जर than लाईफ दाखवली असली तरी त्यातील समस्या खऱ्याखुऱ्या आहेत.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या, ऑक्सिजन अभावी सरकारी हॉस्पिटलमध्ये मुलांचा मृत्यू, भ्रष्टाचाराने पोखरलेली सिस्टीम ज्यातून सुरक्षायंत्रणा सुद्धा वाचली नाही. या सर्वात कुठलीही आतिशयोक्ती नाहीये. त्यामुळे ते प्रसंग भिडतात आणि आपल्याला चित्रपटाशी जोडतात.
दुर्दैव असे आहे की या सिस्टीम विरुद्ध लढून कोणी जिंकताना दाखवायचे असेल तर लॉजिक गहाण ठेऊन लार्जर than लाईफ दाखवण्याला पर्याय नाही. पण हा चार घटकांचा खोटा अनुभव देखील आपल्याला आनंद देतो हे तितकेच खरे आहे.
शाहरूखचे महिलांच्या जेलमध्ये जेलर असणे, सिस्टम विरुद्ध लढायला तेथील महिलांची टोळी बनवणे, त्याचे तिथल्या महिलांशी असलेले बॉण्डिंग आणि इमोशनल लव्हेबल प्रसंग जे शाहरूखलाच शोभावेत याचीही रेलचेल आहेच. त्यामुळे शाहरूखचे चाहते यातून सर्व प्रकारचा आनंद घेऊन बाहेर पडणार हे नक्की. एंटरटेनमेंटचा निकष लावता पिक्चरला नाव कुठे ठेवावे हा प्रश्न पडतो.
तरी हा कौतुक सोहळा आवरते घेत जाता जाता एवढेच सांगेन,
यू कॅन लव्ह शाहरूख
यू कॅन हेट शाहरूख
बट यू कॅन नॉट इग्नोर शाहरूख...
त्यामुळे त्याच्या चित्रपटाची नेहमी उलट सुलट चर्चा होतेच.
यात कोण त्याच्या बंडल चित्रपटाचे मुद्दाम कौतुक करते किंवा कोण त्याच्या चांगल्या चित्रपटावर मुद्दाम टिका करते हे समजेनासे होते.
तरी अशा गैरसमजातून कोणी चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघायचे टाळले तर त्यांच्याबद्दल वाईट वाटेल..
आणि म्हणूनच रात्रीचे तीन साडेतीन वाजता पोटतिडकीने हे लिहून काढले. कारण आपल्याला आलेला चांगला अनुभव लोकांशी शेअर करावा हाच नेहमी माझा परीक्षण लिहायचा हेतू असतो. धन्यवाद
ता.क. - My First Movie date with daughter... या अनुभवामुळे कायम लक्षात राहील.. लव्ह यू शाहरूख .. बदाम बदाम बदाम !
Anirudh Ravichander ह्यांचे
Anirudh Ravichander ह्यांचे "टक टक" म्युझिक एकदम बकवास!
हे लेखातले सेम परीक्षण सकाळी
हे लेखातले सेम परीक्षण सकाळी एका सिनेमाच्या फेसबूक ग्रूप वर टाकले.
तिथे एव्हाना ५२ प्रतिसाद आणि १८० लाईक्स झाले आहेत. त्यातले ५९ बदाम लाईक आहेत. लोकं शाहरूखच्या प्रचंड प्रेमात आहेत. मायबोलीवरचे शाहरूख चाहते मात्र मूठभर ट्रोलरना घाबरत आहेत.
हे शिट्ट्या वगैरे खरंच देतायत
हे शिट्ट्या वगैरे खरंच देतायत का तिकडे ?!! मला जोक वाटला होता तो.
कुठे देतात शिट्ट्या?
कुठे देतात शिट्ट्या?
जोकच असेल..
आमच्याकडे पब्लिक तोंडानेच वाजवत होते.
लेट नाईट शो त्यामुळे फुलं धमाल क्राऊड होता
शिट्ट्या तोंडानेच वाजवायाच्या
शिट्ट्या तोंडानेच वाजवायाच्या असतात , सर!
काही सिनेमांत पाहिले होते
काही सिनेमांत पाहिले होते नरबळी देताना वाद्यांचा कलकलाट करतात , जेणेकरून बळी जाणाऱ्याला पुढील त्रास जाणवत नसावा !
असेच काहीसे जवान बघताना होते .
आपला बळी जाणार आहे म्हणून आजूबाजूला शिट्ट्या चा दणदणाट चालू असतो .
त्यात ती बकवास स्टोरी , शारुक चे वय बापाचेच रोल करण्याचे आहे , पण यांनी पोर्गा पण शारुक् दाखवलाय.
आजच्या पिढीची चॉईस बिघडत चाललीय हे निश्चित .....
मायबोलीवरचे शाहरूख चाहते
मायबोलीवरचे शाहरूख चाहते मात्र मूठभर ट्रोलरना घाबरत आहेत.>> मायबोलीवरचे मुठभर शाहरुख चाहते मात्र ट्रोलरना घाबरत आहेत...
असे म्हणायचे आहे का सर तुम्हाला?
आजच्या पिढीची चॉईस बिघडत
आजच्या पिढीची चॉईस बिघडत चाललीय हे निश्चित
>>>
गेल्या तीन पिढ्या या एकाच माणसाच्या चाहत्या आहेत
सर, तुम्ही ती साजिरा ने
सर, तुम्ही ती साजिरा ने दिलेली क्लिप बघितली का? प्लीज त्या बद्दल पण लिहा.
बाकी पिक्चर चांगला आहे असे माझे मित्र आणि नातेवाईक सांगताहेत. गर्दी ओसरली की पुन्हा जाईन.
तुम्ही ती साजिरा ने दिलेली
तुम्ही ती साजिरा ने दिलेली क्लिप बघितली का?
>>>
घरी पोहोचल्यावर बघतो. इथे रस्त्यावर ट्राफिक खूप आहे. प्रत्येक थेटर बाहेर नुसती गर्दी ओसंडून वाहतेय
मला काही ते अनिरुद्ध प्रसिद्ध
मला काही ते अनिरुद्ध प्रसिद्ध म्युझिक खास जाणवलं नाही.पण लोक खूप स्तुती करतायत सगळीकडे.
आजच्या पिढीची चॉईस बिघडत
आजच्या पिढीची चॉईस बिघडत चाललीय हे निश्चित .....
>>>
शाखा बद्दल बोला पण पिढी वर नही घसरनेका.... आधीच्या पिढ्यांचे दिव्य सिनेमे कमी नाहीयेत.
शाहरूखचे स्टारडम म्हणजे नक्की
शाहरूखचे स्टारडम म्हणजे नक्की काय चीज आहे हे मी त्याचा एक कट्टर चाहता असूनही मला नव्याने समजतेय असे होत होते.. >>>
येस स्वॅग इज द परफेक्ट वर्ड..>>> +११११११
सबकुछ शाहरुख आहे हा सिनेमा !
साजिर्याने दिलेल्या लिन्क
साजिर्याने दिलेल्या लिन्क मधल्या तो सिद्धान्त कोण आहे ? शारुख त्याला मुला सारखा म्हणतोय तो ?
ऋन्मेष का त्याचा एवढा द्वेष
ऋन्मेष का त्याचा एवढा द्वेष करतो हे मला कधी कळलेले नाही
>>
एसारके स्वतःला ऋन्मेषचा आल्टरइगो समजतो. त्यामुळे हा चिडून एसारकेला सगळीकडे बदनाम करत सुटलाय.
दुबईत जवानचं स्क्रीनिंग होतं
दुबईत जवानचं स्क्रीनिंग होतं तेव्हां माझ्या पुतणीकडे त्याच्या संपूर्ण युनिटचं काम होतं. काम झाल्यावर मुंबईला जायच्या आधी तो हॉटेलवर आला तेव्हां २० मिनिटे तिच्याशी बोलला. अगदी एखादा सामान्य माणूस बोलतो तसाच. कौतुक केलं, तसंच सूचनाही केल्या. पुढच्या आयुष्यासाठी मार्गदर्शन केलं. तिचा अजून विश्वास बसत नाहीये कि हे घडलंय..
पुढच्या आयुष्यासाठी
पुढच्या आयुष्यासाठी मार्गदर्शन केलं. तिचा अजून विश्वास बसत नाहीये कि हे घडलंय..
<<<<
Awww , so nice of him !
साजिरा यांनी शेअर केलेला
साजिरा यांनी शेअर केलेला व्हिडिओ पाहिला.. कसला कमाल माणूस आहे यार.. जगात जिथे जाईल तिथे करोडो लोकांची मने जिंकून त्यांना खिळवून ठेवायची ताकद आहे. कमालीचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व.. लव्ह आणि रिस्पेक्ट !!
एसारके स्वतःला ऋन्मेषचा
एसारके स्वतःला ऋन्मेषचा आल्टरइगो समजतो.
>>>
मला या वाक्याचा काही एक अर्थ कळला नाही.. पण शाहरुख सोबत एकाच वाक्यात नाव येणे यातच कमालीचा आनंद आहे
चला उठा सकाळ झाली
चला उठा सकाळ झाली
आज कोण जाणार आहे पिक्चर बघायला...
कंगना रणावत, अक्षय कुमार
कंगना रणावत, अक्षय कुमार यांच्या प्रतिक्रिया बोलक्या आहेत. शाहरुख वर स्तुती सुमनांचा वर्षाव करण्यासाठी जणू स्पर्धा लागलेली आहे.
https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/k...
या सर्व प्रतिक्रियांना शाहरुख तेव्हढ्याच नम्र पणे उत्तरे देतो यातच त्याच्यातला मोठेपणा दिसून येतो. खर्या अर्थाने INDIAN आहे.
जवान तुफान आवडला. बर्याच
जवान तुफान आवडला. बर्याच दिवसांनी भन्नाट काही तरी पहायला मिळाले. अॅटलीने एकदम वेगवान ठेवला आहे चित्रपट. बर्याच गोष्टी असतानासुद्धा एकसंध ठेवला आहे. गाणी ठीक आहेत पण बॅकग्राऊंड म्युझीक जरा लाऊड वाटले तरी अॅक्शन सीन्स ना समर्पक वाटते. शारूख ची मुलींची टीम, विजय आणि नयनतारा मस्त आहेतच वर लहान मुलगी पण भारी आहे. शारूख तर एक नंबर. लव्ह स्टोरींच्यामध्ये इतका चार्मिंग वाटणारा शारूख अॅक्शन करतना सुद्धा तितकाच मस्त दिसतो. पठाण मध्ये उगीचच त्याला ग्रंपी दाखवलेला वाटला. पण इथे तो त्याच्या मिस्कील शैलीत खेळकरपणे अॅक्शन मध्ये पण भारी पंचेस मारतो. अॅटली आपल्या हिरोला अजून मस्त कसे दाखवता येईल असा विचार करत असताना शारूख ने त्याला पूर्ण साथ दिलेली आहे.
पठाणमध्ये भाई आणि शारूख म्हणतात तेच खरे. इतके ग्लॅमर आणि स्टारडम आताचा कोणत्याही हिरोत पहायला मिळत नाहीत !
त्या डायरेक्टरच्या इतर
त्या डायरेक्टरच्या इतर सिनेमाच्या सीन्स ची सर-मिसळ म्हणजे 'जवान' नावीन्य हेच कि इथे ते एकत्रित शाखा वर चित्रित होत आहेत. त्यामुळे काय एवढं डोक्यावर घेत आहे पब्लिक या मुव्हीला कोणास ठाऊक ??
त्यामुळे काय एवढं डोक्यावर
त्यामुळे काय एवढं डोक्यावर घेत आहे पब्लिक या मुव्हीला कोणास ठाऊक ??
>>>हा महत्वाचा प्रश्न आहे... लोकांनी गदर, पुष्पा, कगफ, दबंग, शोले, मुकद्दर का सिकंदर, हम , वॉर सारखे चित्रपट का डोक्यावर घेतले तर याचे उत्तर मिळेल... लार्गर ज्ञान लाईफ हिरो...
जवान मध्ये तेच आहे... आणि स्क्रिप्ट देखील चांगली आहे...
पुरा नटनां गणना प्रसंगे,
पुरा नटनां गणना प्रसंगे,
कनिष्ठिकाधिष्ठति शाहरुख:
अद्यापि तद्तुल्य नटेर्भावादि,
अनामिका सार्थवती बभूव।
जुन्या संस्कृत वाड़मयात देखील शाहरुख खानाचा उल्लेख मिळतो. करंगळीच्या शेजारच्या बोटाला अनामिका म्हणतात. ते का? कुणीतरी चांगल्या नटांची गिनती करायला बसला. तेव्हा करंगळीवर शाहरुख खान बसला. त्यानंतर त्याच्या तोडीचा कोणी मिळाला नाही म्हणून नंतरच्या बोटाचे नाव "अनामिका" असे पडले.
डिस्क्लेमर --- आय हेट शाखा.
वाह केशवकूल .. सुभान अल्लाह !
वाह केशवकूल .. सुभान अल्लाह !!
त्यामुळे काय एवढं डोक्यावर
त्यामुळे काय एवढं डोक्यावर घेत आहे पब्लिक या मुव्हीला कोणास ठाऊक ??
>>>>
उत्तर शीर्षकात च दिले आहे...
..
..
फक्त आणि फक्त
जरा अजीर्ण होईल इतकं कौतुक
जरा अजीर्ण होईल इतकं कौतुक लिहिलंय पण २ शाहरुख, त्यातला एक मोठ्या वयाचा व लहान्याने ‘रब ने बना दी’ सारखे चाळे केलेले नसावेत असं वाटतंय त्यामुळे सिनेमा पहाणार कारण शाहरुखने नक्कीच चांगलं काम केलं असणार. साऊथचे बटबटीत प्रकार मला कधी आवडतात व कधी नाही पण शाहरुखमुळे कदाचीत ते बघण्यासारखे असु शकतील.
‘रब ने‘ हा त्याचा मी पाहिलेला शेवटचा सिनेमा. अर्थात त्या आधीचे पण थोडेच पाहिलेत म्हणा. हा अर्धा आवडला तरी मला चालेल
जरा अजीर्ण होईल इतकं कौतुक
जरा अजीर्ण होईल इतकं कौतुक लिहिलंय पण
>>>
कौतुकाला पर्याय नव्हता सुनिधी. तुम्ही पुढच्या पण वर कायम राहा..
असा शाहरूख आजवर कोणी पाहिला नव्हता.
शाहरूख सोडा बॉलीवूड हिरोमध्ये कोणी असा आजवर दिसला नव्हता. आणि यासाठी जे गरजेचे आहे ते शाहरूख सोडून कोणी जवळपास सुद्धा जाऊ शकत नाही म्हणून कौतुक करणे भागच होते.
माझे सोडा, मी कट्टर चाहताच आहे. पण थिएटरमध्ये सतत टाळ्या शिट्ट्या वाजवणारे लोकं फक्त आणि फक्त चित्रपट प्रेमीच होते. माझी मुलगी ओरडत होती. एन्जॉय करत होती. शेवटी हिरोचा विजय झाल्यावर तिने टाळ्या वाजवल्या. हे सारे उत्स्फूर्त येते. असा पिक्चर चुकवू नका कोणी...
जाते आणि ओरडुन येते थेटरात.
जाते आणि ओरडुन येते थेटरात.
Pages