हिरोगिरीचा पिक्चर म्हणजे ज्यात एक हिरो असतो. तो स्टार किंवा सुपरस्टार असतो. तो पिक्चरच्या सुरुवातीला जेव्हा फटा पोस्टर निकला हिरो स्टाईल एक फाडू एन्ट्री घेतो. तेव्हा पब्लिक शिट्टी आणि टाळ्यांनी थेटर डोक्यावर घेते.
जवानमध्ये पिता आणि पुत्र असे दोन हिरो आहेत. दोन्ही शाहरुख आहेत. दोघे मिळून पिक्चर मध्ये जवळपास दहा-बारा एन्ट्री घेतात. आणि प्रत्येक एन्ट्री वेळी.. आय रिपीट.. प्रत्येक आणि एकूण एक एन्ट्रीवेळी पब्लिकच्या शिट्ट्या आणि टाळ्यानी थेटर दणाणून उठते.
माझी नऊ वर्षाची मुलगी जिने जेमतेम पंधरा-वीस चित्रपट थिएटरला पाहिले असतील. ती म्हणाली, पप्पा मी पहिल्यांदाच असा पिक्चर बघतेय जिथे पब्लिक एवढा आरडाओरडा करतेय..
आता तिला काय सांगू, मी सुद्धा माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच हिरोच्या दर नव्या एंट्रीला इतका जल्लोष अनुभवत होतो.
काय ती स्टाईल, काय ती ॲक्शन, काय तो स्वॅग.. येस स्वॅग इज द परफेक्ट वर्ड..
आजवर ही दक्षिण भारतीय हिरोंची मक्तेदारी होती. जी आज शाहरुख ने अक्षरशः मोडून काढली. नक्कीच दिग्दर्शक तिकडचा होता आणि त्याची कमाल यात होतीच. पण तिथली पब्लिक सुद्धा तशीच असते जे हिरोला तसेच डोक्यावर घेते. आपल्याकडे तशी काही पद्धत नसूनही आज मी एका हिंदी पिक्चरला असा माहौल अनुभवत होतो. शाहरूखचे स्टारडम म्हणजे नक्की काय चीज आहे हे मी त्याचा एक कट्टर चाहता असूनही मला नव्याने समजतेय असे होत होते..
पिक्चरमध्ये नयनतारा आहे, विजय सेतुपती आहे, दीपिका आहे, झाल्यास सरप्राईज पेकेज संजूबाबा आहे, शाहरुखच्या टोळीतील मुलींनी देखील मस्त काम केले आहे, दिग्दर्शक नावाजलेला आहे, का ते पिक्चर बघून समजते, बॅकग्राऊंड म्युझिक नुसता राडा घालते, गाणी फार श्रवणीय नसली तरी कोरिओग्राफी प्रेक्षणीय आहे. बोलायला बरेच काही आहे. पण आज शाहरूख पलीकडे काही सुचणे अवघड आहे.
जर पठाणने खरेच हजार कोटी कमावले असतील तर हा दहा हजार कोटी डिझर्व्ह करतो.
पण....
या पिक्चरची पठाणशी तुलना देखील करू नका. म्हणजे हा वेगळ्या धाटणीचा पिक्चर आहे ते सोडा. म्हणजे पठाण हॉलीवुड स्टाईल ऍक्शनपट बनवण्याचा प्रयत्न होता. तर हा दक्षिण भारतीय मसालापट आहे त्यामुळे शैली भिन्न आहेच. पण दोन्हीतील शाहरूखची तुलनाच नाही. पठाणचा शाहरूख यापुढे फार सामान्य भासला. आजवर कधी असा शाहरूख पाहिला नव्हता. कोणी कल्पनाही करू शकत नाही अश्या शाहरूखची..
त्यामुळे जा, उठा, तिकीट बुक करा आणि थिएटरमध्ये जाऊनच बघा. नुसते मोठ्या पडद्यावर बघायला म्हणून नाही तर तो माहौल तुम्ही तिथेच अनुभवू शकता. माझ्या मुलीने देखील टाळ्या वाजवून एन्जॉय केला. घरी आल्यावर आईला तो अनुभव सांगून थकत नव्हती. पिक्चर संपल्यावर म्हणाली की हा पहिला चित्रपट जो मी एकही डुलकी न काढता बघितला कारण दंगाच एवढा चालू होता, झोप यायचा प्रश्नच नव्हता..
पण पिक्चर नुसते शाहरूखचे स्टारडमच नाही दाखवत, तर तो हसवतो, रडवतो, इमोशनल करतो, पुन्हा खुश करतो, एक सामान्य माणूस म्हणून आपला जीव सुखावतो. कारण त्यातला हिरो आणि त्याची हिरोगिरी जरी लार्जर than लाईफ दाखवली असली तरी त्यातील समस्या खऱ्याखुऱ्या आहेत.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या, ऑक्सिजन अभावी सरकारी हॉस्पिटलमध्ये मुलांचा मृत्यू, भ्रष्टाचाराने पोखरलेली सिस्टीम ज्यातून सुरक्षायंत्रणा सुद्धा वाचली नाही. या सर्वात कुठलीही आतिशयोक्ती नाहीये. त्यामुळे ते प्रसंग भिडतात आणि आपल्याला चित्रपटाशी जोडतात.
दुर्दैव असे आहे की या सिस्टीम विरुद्ध लढून कोणी जिंकताना दाखवायचे असेल तर लॉजिक गहाण ठेऊन लार्जर than लाईफ दाखवण्याला पर्याय नाही. पण हा चार घटकांचा खोटा अनुभव देखील आपल्याला आनंद देतो हे तितकेच खरे आहे.
शाहरूखचे महिलांच्या जेलमध्ये जेलर असणे, सिस्टम विरुद्ध लढायला तेथील महिलांची टोळी बनवणे, त्याचे तिथल्या महिलांशी असलेले बॉण्डिंग आणि इमोशनल लव्हेबल प्रसंग जे शाहरूखलाच शोभावेत याचीही रेलचेल आहेच. त्यामुळे शाहरूखचे चाहते यातून सर्व प्रकारचा आनंद घेऊन बाहेर पडणार हे नक्की. एंटरटेनमेंटचा निकष लावता पिक्चरला नाव कुठे ठेवावे हा प्रश्न पडतो.
तरी हा कौतुक सोहळा आवरते घेत जाता जाता एवढेच सांगेन,
यू कॅन लव्ह शाहरूख
यू कॅन हेट शाहरूख
बट यू कॅन नॉट इग्नोर शाहरूख...
त्यामुळे त्याच्या चित्रपटाची नेहमी उलट सुलट चर्चा होतेच.
यात कोण त्याच्या बंडल चित्रपटाचे मुद्दाम कौतुक करते किंवा कोण त्याच्या चांगल्या चित्रपटावर मुद्दाम टिका करते हे समजेनासे होते.
तरी अशा गैरसमजातून कोणी चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघायचे टाळले तर त्यांच्याबद्दल वाईट वाटेल..
आणि म्हणूनच रात्रीचे तीन साडेतीन वाजता पोटतिडकीने हे लिहून काढले. कारण आपल्याला आलेला चांगला अनुभव लोकांशी शेअर करावा हाच नेहमी माझा परीक्षण लिहायचा हेतू असतो. धन्यवाद
ता.क. - My First Movie date with daughter... या अनुभवामुळे कायम लक्षात राहील.. लव्ह यू शाहरूख .. बदाम बदाम बदाम !
छान. तुम्हाला आवडलाय.
छान. तुम्हाला खूप आवडलाय सिनेमा. ओटीटी वर आल्यानंतर पाहीन.
मी त्या दुसऱ्या धाग्यावरही
मी त्या दुसऱ्या धाग्यावरही लिहिलंय तेच इथे लिहिते - जवान पिक्चर पठाण पेक्षा जास्त आवडला. SRK is spectacular. दुसरा शब्दच नाही. हा पिक्चर भन्नाट आहे, फास्ट आहे.
हा रोल रजनीचा हातखंडा रोल आहे. त्याच्याच साठी लिहिला असावा असा. आणि तो शाहरुखने त्याच्या स्टाईलमध्ये पण जबरदस्त केला आहे. तो कुठेही कमी पडत नाही. खूप खूप दिवसांनी शाहरुखला स्वतःचा सूर सापडल्यासारखा वाटला. खूप दिवसांनी शाहरुख खूप जास्त आवडला.
रमड +७८६
रमड +७८६
जे रजनी करतो ते तोच करू शकतो असे वाटायचे कारण त्यासाठी गरजेची तशीच क्रेझ आहे त्याची...
आज ते शाहरूखने केले आणि हलवून सोडले याचे जास्त कौतुक वाटतं आहे.
@ सामो,
@ सामो,
लोकांनी ओटीटीची वाट न बघता थिएटरला एन्जॉय करावे असे मला वाटते. अमेरिकेतली पब्लिक असा दंगा घालते की शहाण्या बाळासारखी वागते याची कल्पना नाही. पण तिथे तसाच माहोल नसेल तर गाणपतीची सुट्टी टाका आणि या भारतात
बाकी मला पिक्चर खूप च्या सुद्धा पलीकडे आवडलाय...
फायनली आमच्या शाहरूखने त्याची खरी ताकद दाखवली असे अभिमानाने उर भरून आलाय
चांगले लिहिलंय परिक्षण..
चांगले लिहिलंय परिक्षण..
मी पण ओटिटिवर बघणार कारण आमच्या इकडे थिएटरमध्ये तमिळ मधे लागला आहे..
ह्यात परीक्षण कमी आणि शाहरुख
ह्यात परीक्षण कमी आणि शाहरुख ची आरती जास्त ओवळली आहे. परिक्षण हे चित्रपटाचे असते आणि ते करताना अगदी त्रयस्थपणे करणे अपेक्षित आहे.
अर्थात ही अपेक्षा शाहरुखच्या चाहत्याकडून करणे अपेक्षित नाही म्हणा
मला आता शाहरुख सोडून बाकीचं
मला आता शाहरुख वगळून बाकीचं वाचायची सवय लागली आहे इथं
पठाण पेक्षा दहा पट भारी आहे..
पठाण पेक्षा दहा पट भारी आहे... शोले पेक्षा हजार पट ... गदर टू पेक्षा लाख ...
या चित्रपटाची लेव्हल दंगल आहे...
ह्यात परीक्षण कमी आणि शाहरुख
ह्यात परीक्षण कमी आणि शाहरुख ची आरती जास्त ओवळली आहे.
>>>
हे शीर्षकातच क्लिअर केले आहे.
पिक्चर बघून आल्यावर फक्त आणि फक्त शाहरूख डोक्यात घोळत राहतो.
तरी इतरांचेही कौतुकास्पद उल्लेख केले आहेतच.
पण हे सर्व देखील सोडा. मुळात हे रूढार्थाने परीक्षण नाहीच आहे. ते मी कधीच लिहीत नाही. ती माझी पात्रताही नाही. मला चित्रपटाची तितकी समजही नाही...
पण मी पब्लिक आहे बॉस.. पिक्चर आवडला दिलसे तर ते बेझिझक सांगणार. ते कुठल्या परिक्षणाच्या निकषात बसते की नाही हा लोड न घेता लिहीणार..
काल रात्री मी जो भन्नाट अनुभव घेतला तो फक्त मला लोकांपर्यंत पोहोचवायचा होता. जास्तीत जास्त लोकांनी हा अनुभव घ्यावा आणि या आनंदाला मुकू नये इतकीच इच्छा.
अरे काय चाललंय ?
अरे काय चाललंय ?
माय बोली चे दैनिक संध्यानंद करताय का शाहरुख ची आरती ओवाळून ?
<< ह्यात परीक्षण कमी आणि
<< ह्यात परीक्षण कमी आणि शाहरुख ची आरती जास्त ओवळली आहे.
>>>
हे शीर्षकातच क्लिअर केले आहे.
पिक्चर बघून आल्यावर फक्त आणि फक्त शाहरूख डोक्यात घोळत राहतो.
तरी इतरांचेही कौतुकास्पद उल्लेख केले आहेतच.
पण हे सर्व देखील सोडा. मुळात हे रूढार्थाने परीक्षण नाहीच आहे. ते मी कधीच लिहीत नाही. ती माझी पात्रताही नाही. मला चित्रपटाची तितकी समजही नाही...
पण मी पब्लिक आहे बॉस.. पिक्चर आवडला दिलसे तर ते बेझिझक सांगणार. ते कुठल्या परिक्षणाच्या निकषात बसते की नाही हा लोड न घेता लिहीणार..
काल रात्री मी जो भन्नाट अनुभव घेतला तो फक्त मला लोकांपर्यंत पोहोचवायचा होता. जास्तीत जास्त लोकांनी हा अनुभव घ्यावा आणि या आनंदाला मुकू नये इतकीच इच्छा. >>
------- छान अनुभव लिहीला आहे. मी चित्रपट बघितला नाही, पण नक्की बघेन. एका चहात्याची प्रतिक्रिया फार बोलकी होती "Goosebumps explode on my skin... "
Goosebumps explode on my skin
Goosebumps explode on my skin...
>>>
Actually!!
आणि ही फिलिंग सुरुवातीच्या वीस पंचवीस मिनिटातच येते की आज आपला शाहरूख फाडून खाणार आहे बॉस.. आणि त्या गुदगुल्या होतच राहतात शरीरभर की कधी बाहेर जाऊन मी हा अनुभव इतरांना सांगतोय.. माझेही अगदी असेच झाले काल
पण मी पब्लिक आहे बॉस.. पिक्चर
पण मी पब्लिक आहे बॉस.. पिक्चर आवडला दिलसे तर ते बेझिझक सांगणार. ते कुठल्या परिक्षणाच्या निकषात बसते की नाही हा लोड न घेता लिहीणार..
>>> एकदम रॉयल.. THALAIWAA STYLE
या धाग्यावर वेळ
या धाग्यावर वेळ घालवण्यापेक्षा 'बंदिवान मी या ...' धाग्यामध्ये जास्त पोटेन्शियल आहे।
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=aAs0YS6RUfQ
एसारके स्वॅग. अँड ही रिस्पेक्ट्स एवरीवन.
मला आता शाहरुख वगळून बाकीचं
मला आता शाहरुख वगळून बाकीचं वाचायची सवय लागली आहे इथं
नवीन Submitted by mrunali.samad on 12 September, 2023 - 09:01
म्हणजे तुम्ही टायटल वाचून थेट कॉमेन्ट सेक्शनला आल्या असणार
म्हणजे तुम्ही टायटल वाचून थेट
म्हणजे तुम्ही टायटल वाचून थेट कॉमेन्ट सेक्शनला आल्या असणार
>>>>>
तिथेही नव्वद टक्के पोस्ट शाहरूखचया.. थोडक्यात शाहरूख पासून सुटका नाहीच
इथे मला हजार शिव्या घाला शाहरूख शाहरूख करतो म्हणून पण पिक्चर बघा लोकहो.. फुलला ऑन धमाल आहे..
इथे मला हजार शिव्या घाला
इथे मला हजार शिव्या घाला शाहरूख शाहरूख करतो म्हणून पण पिक्चर बघा लोकहो.. फुलला ऑन धमाल आहे..>>>>>फुकट तिकीट वाटतोय का शारुख
इथे मला हजार शिव्या घाला
इथे मला हजार शिव्या घाला शाहरूख शाहरूख करतो म्हणून पण पिक्चर बघा लोकहो.. फुलला ऑन धमाल आहे..
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 12 September, 2023
जरूर सर, आपली आज्ञा शिरसावंद्य , कृपा करून सगळ्या माबोकरांसाठी तिकीट स्पॉन्सर करा सर,
आपल्या लाडक्या सारुक साठी किंचितशी झळ नक्कीच सोसू शकाल तुम्ही
साजिराने दिलेली लिन्क पाहिली
साजिराने दिलेली लिन्क पाहिली. जाम हुषार आहे शाहरुख. बरोबर तिथल्या पब्लिक ला आवडेल तेच बोलून खूष करून टाकलंय.
मला त्याच्या स्क्रीन बाहेरच्या विटी आणि स्मार्ट प्रेझेन्स मुळेच आवडतो शाहरुख.
ऋन्मेष का त्याचा एवढा द्वेष करतो हे मला कधी कळलेले नाही
जाऊन तर या
जाऊन तर या
मलाच उलट खुश होऊन शंभरेक रुपये द्याल..
मला त्याच्या स्क्रीन
मला त्याच्या स्क्रीन बाहेरच्या विटी आणि स्मार्ट प्रेझेन्स मुळेच आवडतो शाहरुख..
>>>
मलाही...
त्यामुळेच त्याचे पिक्चर चालाताहेता की नाही याने काही फरक पडत नाही.. नव्हता...
पण जवान मध्ये त्याने एक लोहार की म्हणत सगळा हिशोब बराबर करून टाकलाय..
मलाही ती लिंक बघायची आहे.. ऑफिसमध्ये असल्याने आवाज न करता चेक केली.. घरून बघेन.. आणि त्याचाही रिव्ह्यू देईन
सर, बघाच तुम्ही. एकदम कडक.
सर, बघाच तुम्ही. एकदम कडक.
तरीही आय हेट शा खा.
आय हेट शा खा.
आय हेट शा खा.
आता जातो जवान बघायला आणि आल्यावर रिपोर्ट देईन.
जेवढे हेट घेऊन जाल तितके
जेवढे हेट घेऊन जाल तितके प्रेम घेऊन परत याल
ज्या माणसाने तीन पिढ्यांना प्रेम करायला शिकवले त्याचा राग कोणी कसे करू शकते..
कधी कधी (खरं तर बरेचदा) मला
कधी कधी (खरं तर बरेचदा) मला सिग्नलला काचेवर सतत इरिटेटिंग टकटक करुन लक्ष वेधून घेणाऱ्यांची आठवण येते.
इरिटेट होत , पण सांगता येत
इरिटेट होत , पण सांगता येत नाही !
आणि त्या गुदगुल्या होतच
आणि त्या गुदगुल्या होतच राहतात शरीरभर की कधी बाहेर जाऊन मी हा अनुभव इतरांना सांगतोय..>> सांभाळा स्वतःला. चांगली लक्षणं वाटत नाही ही. वाटल्यास डॉक्टर कडे जाऊन या.
ज्या माणसाने तीन पिढ्यांना
ज्या माणसाने तीन पिढ्यांना प्रेम करायला शिकवले >>, त्याच्या आधीच्या पिढ्या अडाणी होत्या का? मग हे साहेब भूतलावर कसे अवतरले?
आधी सांगतो की I hate शा
आधी सांगतो की I hate शा खा
मी सिनेमा अर्धाच सोडून परत आलो. मी थिएटर वर जरा लवकर पोचलो तेथे तोबा गर्दी. एका बाजूला "बिल्लू दरबार " नावाचे सलून होते. तिथे साफ चकोटा केला तर जवान चे तिकेट फुक्कट मिळत होते. फक्त पहिल्या वीस जणाना . तिथेही तोबा गर्दी! जरा पुढे गेलो तर वीस रुपयात डोक्याला फडके बांधून देत होते. सर्व तिकीट धारकांना २०० रुपयांचा चहा फक्त वीस रुपयात देत होते.
डोर कीपर प्रत्येकाला शिट्या देत होते. मला गाव देवीच्या जत्रेची आठवण आली. सगळे शिट्या फुंंकत होते.
आत हो हल्ला चालला होता. जणू कोणी पिक्चर बघायला आलेच नव्हते. सारखा "जय शाखा" असा जयघोष चालला होता. अशा माहोल मध्ये मी काय पिक्चर बघणार?
पुन्हा यायचा वायसा करून मध्यंतरा नंतर परतलो,
सर, मला सांगा ही गर्दी केव्हा हटणार? काही अंदाज?
Pages