सतीचं वाण घेतलेल्या बंदिवान सासुरवाशिणीच्या माहेरची माणसं

Submitted by अस्मिता. on 25 August, 2023 - 16:41

बंदिवान मी ह्या संसारी
आशा काळे, निळू फुले, लता अरुण , मोहन कोटिवान, लीला गांधी, माया जाधव.
दिग्दर्शक -अरुण कर्नाटकी
१९८८

आशा काळे(कमल) लहानपणी प्रिया अरुण असते. प्रिया अरुणची सख्खी आई लता अरुण तिची सावत्र आई झाली आहे. बाबा आधी आजोबा वाटू लागले होते . पण प्रिया मोठी होऊन आशा झाल्याने ते नंतर लेव्हल मेकप झाले. आई लहानपणापासून छळते, बालमित्र अचानक काढता पाय घेतो. सावत्र आईला हिला उजवायचं पडलेलं असतं. गरिबीमुळे निळू फुलेशी लग्न होते, तो आईबाबाला पंधराशे रुपये देऊन हे लग्न जमवतो. निफु एक 'गुरू' नावाचा गरीब, कोपिष्ट व मूर्ख भटजी असतो. त्याच्या कानशिलावरल्या नकली-स्टिकर टकलाची सुद्धा वाळवणासारखी पापडं निघत असतात.

मग गावातला एक पाटील टाईप माणूस तिच्यावर वाईट नजर ठेवतो. याची नजर इतकी वाईट आहे की हा सतत डोळे आल्यासारखा दिसत होता. मग हा तिचं जे काही बघत असतो, ते आपल्यालाही बघावं लागतं, हळूहळू आपणही पाटील होतो. नववारी पातळ किती revealing असू शकते हे मला आता कळले. गरीबाची पण 'लस्ट स्टोरी' ;)..!

या सगळ्यात गावात हातात कादंबरी घेऊन नेहरू शर्ट-पायजामा घालून इकडंतिकडं फिरणारा माधव (खर्शीकर) हिला विहिरीतून ओलेती वगैरे बाहेर काढतो, नंतर भरल्या वांग्याची भाजी खायला येतो. लाल डोळ्याचा पाटील म्हणतो माधव आणि कमलचं लफडं हाय. निळू त्यांच्यावर विश्वास ठेवतो व तिची निर्भर्त्सना करतो. ती सवाष्ण म्हणून पाटलाकडं जेवायला जात नाही, तर तो घरी येऊन छेडतो. मग शेजारच्या काकू दोडकं घेऊन येतात. पाटील पुन्हा निफुचे कानं फुंकतात. नंतर काकू जत्रेत 'जाऊन या ' वगैरे सांगायला येते. तिथेही पाटील निफुला कटवून हिला बैलगाडीत घेतो व इकडंतिकडं हात फिरवायला बघतो. दुसऱ्या गावी बालमित्र/एक्स म्हणतो की याची नजर चांगली नाही. घ्या आता..!
बालमित्र जो कोणी आहे ज्याच्यासोबत गातगात ती पाच मिनिटांत मोठी होते , तो मूर्तिमंत 'दगड' आहे. ह्यांच्या लहानपणीच्या गप्पा बघून पुन्हा पाटील निफुला म्हणतो की हिचं चारित्र्य बरं नाही, कधी माधव - कधी एक्स.

निफु म्हणतो, 'तू पातळी सोडली आहेस. आता मी काही तुला पातळं घेऊन देणार नाही Wink '. मग ती म्हणते की 'मी नागवी बसेन, नको तुमची पातळी आपलं पातळं'. अचानक सत्तावीसावं रडकं गाणं सुरू होतं व संपेपर्यंत पातळ फाटते सुद्धा. माधव गुपचूप येऊन नवीन कोरं गुलबक्षी रंगाचं पातळ ठेवून जातो. 'तुझ्या या लाडक्या भावाने गाणं संपायच्या आत पातळ आणलेलं आहे तायडे', टाईप चिठ्ठी सोडून जातो.

पुन्हा निफुला राग येतो (याला दुसरं येतंच काय). ही पोटुशी होते तर निफु संशय घेतो हे लेकरू 'भरल्या वांग्याचं' आहे म्हणून. मग निफु हिला मारायला जातो, शेजारच्या काकू म्हणतात 'हे लेकरू तुझंच आहे, वांग्याचं नाही. पाटील नालायक आहे, ही तर पवित्र 'कमल' आहे'. एका क्षणात तो शहाणा, समजदार होतो व घराची किल्ली मानाने तिला देऊन कुलूप लावतात. ते गाव सोडून निघून जातात. आनंदी 'टिडिंग टिडिंग' वाजून सिनेमा संपतो.

#दोनतासकुठंहोताकाकू
खऱ्या व्हिलन काकूच आहेत. त्यांनीच प्रेक्षकांचा लाक्षणिक अर्थाने आणि सिनेमाचा शब्दशः अर्थाने अंत बघितला. दोडकं द्यायला आल्या तेव्हा सांगितले असते तर शॉर्ट फिल्म झाली असती.

©अस्मिता

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती म्हणते - बिंक्यू. >>> Lol

कोरियोग्राफी बघा. गाण्यातल्या प्रत्येक शद्बाच अर्थ समजावून सांगितला आहे. >>> Lol पूर्ण गाणे पाहिल्याचे आठवत नाही पण यावरून अंदाज आला - असे नाच पूर्वी खूप असत. जे वाक्य आहे ते "अ‍ॅक्ट" करून दाखवायचे. त्याचा अतिरेक झाला की टोटल कॉमेडी होते. ९०ज मधे ते आधी गाणी रचून त्याभोवती पिक्चर तयार करणारे "लाल दुपट्टा मलमल का" वगैरे होते त्यात असे नाच असत. म्हणजे एकाच ओळीत रोना व हसना शब्द आले की त्यातल्या रोना ला रडण्याची व हसना ला हसण्याची अ‍ॅक्शन - असले प्रकार.

एकंदरीत या ताई 'हम करेसो कायदा' कॅटेगरीत मोडतात - प्रेम एकतर्फी, दुसऱ्याच्या मुलाचा सांभाळ एकतर्फी, त्याग एकतर्फी. एकल मातृत्वाचा फारसा प्रसार झाला नव्हता त्याकाळी...नाहीतर तेही 'करून दाखवले' असते. >>> Lol एक टोटल ह्यूमन उत्क्रांतीपासून आपण वाचलो म्हणजे Happy

'ह्या' शब्दाचे स्पेलिंग yhya केले आहे त्यांनी. मी आशा काळे नाव देऊन सर्च केला होता सिनेमा. (आशा, होऊ कशी उतराई?) >>> Lol हे जबरी आहे.

फक्त आशाताई केले त्या कंसात तर यमकही जुळेल Happy बाय द वे त्यात अंगाईमधल्या स्टेज गाण्यात डबल आशा आहे ना? नायिका व गायिका दोन्ही?

लोक हो, आशा काळे बाईंना सात्विक कामांतून फॉर अ चेन्ज कधीतरी ग्लॅमरस नाचाचा रोल मिळाला तर कौतुक करा की.

ग्लॅमरस नाचाचा रोल >>> हो काळेबाईंच्या मानाने ग्लॅमरस आहे खरा. साडीही आवडली मला त्या गाण्यातली. पण मीरा आणि ग्लॅमर हे कॉम्बिनेशन फारच आऊट ऑफ द बॉक्स नाही वाटत?

>>>>मीरा आणि ग्लॅमर हे कॉम्बिनेशन फारच आऊट ऑफ द बॉक्स नाही वाटत?
Happy होय!
मला आवडतात आशा काळे दिसायला.

भरत Lol
बिंक्यू, स्टेज तुटेल, धुंदीत मस्तीत, विनोद खन्ना >>>> Lol
सतीश दुभाषी यांचा असा वापर करून घेतला, अरे देवा. Lol

माझेमन Lol
फ्रॉईडलाही कॉम्प्लेक्स आला असता ही केस सॉल्व करताना.>>> Lol

यांना नाचाचं अंग अजिबात नव्हतं फारच कडक वावरायच्या, जड वावर होता. यांना हलवण्यापेक्षा रडवणं सोपं होतं.

बाळाला बाळ चाललं असतं तर अनाथ आश्रमातून आणायचं असतं नं. तेवढ्यासाठी लग्न करून नऊ महिने विगोंना वेडं राहू दिलं. नक्की वेडं कोण आहे हा प्रश्न पडलाय आता.

एक टोटल ह्यूमन उत्क्रांतीपासून आपण वाचलो म्हणजे>>>> Lol अमिबाला शक्य आहे ते आशा काळेंना का नाही.

कोरियोग्राफी बघा. गाण्यातल्या प्रत्येक शद्बाच अर्थ समजावून सांगितला आहे.>> काय अफलातून कोरियोग्राफी आहे!!
तुझी - समोरच्या दिशेने बोट
माझी - स्वतः कडे बोट
प्रीत - प्रेम केल्याची ऍक्शन
कधी जुळली नाही - ठेंगा सदृश ऍक्शन
प्रेक्षकांत कोणी मूकबधीर असतील त्यांच्यासाठी नाचता नाचता साइन लँग्वेज मधून लिरिक्स म्हणून दाखवली आहेत. Inclusion and diversity म्हणतात ती हीच!

गवळण म्हणताना डेर्‍यात ताक घुसळलंय.

<यांना नाचाचं अंग अजिबात नव्हतं फारच कडक वावरायच्या> गोमू संगतीनं आठवलं. त्यात अचानक यांचा नाच चांगला वाटू लागेल. Lol
या गाण्याबद्दल आधी चर्चा झाली आहे. पण ती दुसर्‍या अँगलने.

प्रेक्षकांत कोणी मूकबधीर असतील त्यांच्यासाठी नाचता नाचता साइन लँग्वेज मधून लिरिक्स म्हणून दाखवली आहेत. Inclusion and diversity म्हणतात ती हीच!
>>>>> Lol Lol

नाही, वर अस्मिता ने तेवढ्यासाठी लग्न करून नऊ महिने विगोंना वेडं राहू दिलं. असं लिहिलं आहे..म्हणून...

वेडा म्हणजे सपशेल नाही, 'धुंदीत -मस्तीत' जायला अक्षम. बायको-नयनतारा वेडी, विगो हा 'शुभमंगल सावधान' सिनेमातल्या चहात बुडवलेल्या बिस्किटासारखा, मग दुभाषींना 'विकी डोनर' करून आशा काळेंनी इप्सित साध्य केलं आहे. त्यामुळे वेडं कोण तर प्रेक्षक हेच उत्तर बरोबर आहे. आता मला सिनेमा न बघताही उद्धार करता यायला लागला आहे. Yey....

शाल व श्रीफळासाठी धन्यवाद. असं वारंवार झाल्यावर लोक कुठं नारळ शोधत फिरणार म्हणून मी माझ्या कुत्र्याचं नावच 'नारळ' ठेवलं आहे. Proud

गोमु संगतीनं ह्या गाण्यात लाकडाच्या ओंडक्यांचा नाच आहे, भरत. Lol
अशा शब्दशः कडक नृत्यांना 'यथा काष्ठं च काष्ठं च' नृत्य प्रकार म्हणता येईल.

मग दुभाषींना 'विकी डोनर' करून आशा काळेंनी इप्सित साध्य केलं आहे >>> डोनर++ असे म्हणावे लागेल Happy

हा एखादा कलात्मक (म्हणजे पुण्यात लागायच्या आधी टोरांटो मधे पारितोषिक मिळवणारा) पिक्चर असता तर "दुभाषी" हे इथे प्रतीक आहे वगैरे तारीफोंके फूल आपल्याला बनवले असते समीक्षकांनी.

अशा शब्दशः कडक नृत्यांना 'यथा काष्ठं च काष्ठं च' नृत्य प्रकार म्हणता येईल. >>> Lol

अशा शब्दशः कडक नृत्यांना 'यथा काष्ठं च काष्ठं च' नृत्य प्रकार म्हणता येईल.<<<<<<
'....आणि काशीनाथ घाणेकर' सिनेमातल्या 'एकदम कडक!' या डायलॉगचा खरा अर्थ आता कळला.

अरे तिकडे यूट्यूबवर आशा काळेला "नॅशनल क्रश" करायला निघाले आहेत लोक कॉमेण्ट्स मधे आणि आपल्याला साधीभोळी आशाकाळे कळली नाही.

या गाण्यात चांगले चार खांब तेथे असून तिला त्यांचा सहारा घेण्यापासून वंचित ठेवले आहे. विगो एखाद्या कार्यक्रमात काही लोक व्हॉलंटियर म्हणून मिरवतात तसे ते छातीवर काय लावून का बसला आहे? ती त्या पहिल्या रांगेतील मोकळी खुर्ची काही दर्शवते का? मला सारखे वाटत होते गाणे सुरू असताना मधे कोणीतरी बडी हस्ती तेथे येउन बसणार. पण चेकॉव्ह्ज गन सारखे काही झाले नाही. तेव्हा आधी आशा काळे तेथे बसली होती व अचानक उठून इम्प्रॉम्प्टू नृत्य केले असावे असे समजून घेतले.

पूर्ण गाण्यात ती विगोकडे एकटक बघत असते. बाजूला बसलेल्या त्या बाईला (तीच नयनतारा असावी. होपफुली 'जवान' मधली नयनतारा वेगळी. अर्थात दोन्ही नयनतारा व शाहरूख यांच्या वयात असलेला फरक सारखाच आहे.) अजिबात लक्षात येत नाही? असला अ‍ॅक्वायर्ड मठ्ठपणा बहुतेक गाण्यांत दिसतोच.

त्या बाकीच्या बायका उत्तरेतील जत्रेतून आल्यासारख्या हे स्वस्ति यांचे निरीक्षण परफेक्ट आहे. मला त्या "हाय शरमाऊ किस किस को बताउ" या मेरा गाँव मेरा देश मधल्या गाण्यातून आल्यासारख्या वाटल्या.

बाकी पहिल्या रांगेतले यात इंटरेस्ट असलेले लोक सोडले तर बाकी इतका वेळ पेशंटली बसले याला टोटल रिस्पेक्ट. आपल्या पिक्चर्स मधे अगदी दारू चकन्याचा इफेक्ट झटक्यात उतरवेल अशा रडक्या गाण्यांना सुद्धा तन्मयतेने ऐकणारे पब्लिक असते अशा सीन्स मधे.

अरे तिकडे यूट्यूबवर आशा काळेला "नॅशनल क्रश" करायला निघाले आहेत लोक कॉमेण्ट्स मधे आणि आपल्याला साधीभोळी आशाकाळे कळली नाही.<<<<<< Lol
म्हणजे रश्मीकाच्या आधी आशा काळेंनी तो मान पटकावला होता?

तीच नयनतारा असावी.<<<<
बरोबर! त्याच त्या बनवाबनवी फेम लीलाबाई काळभोर.

आपल्याला साधीभोळी आशाकाळे कळली नाही.
>>> Lol अज्ञानात सुख असते ते असं. पण रश्मिका आणि आकात निवडायचं असेल तर मी डोळे मिटून आकांना निवडेन. अशा वेळी 'मराठी बाणा' आठवतो .

फा, धमाल पोस्ट. फार हसले. Lol
चेकाव्हज् गनसाठी हे द्राविडी प्राणायाम करण्यापेक्षा आपणच हेमिंग्वेच्या बोटीत बसावं. नयनतारा - लीलाबाई काळभोर यांना मोतीबिंदू झाल्याने 'बनवाबनवी' करता येते ही एक आयरनी झाली. त्यांचं बनवाबनवीतलं काम खूपच आवडलं होतं. एकदम प्रेमळ काकू टाईप होत्या.

म्हणजे रश्मीकाच्या आधी आशा काळेंनी तो मान पटकावला होता? >>>
पण रश्मिका आणि आकात निवडायचं असेल तर मी डोळे मिटून आकांना निवडेन. >>> Happy Happy

आता ती रिकामी खुर्ची इज बगिंग मी. जर आशा काळे आधी तेथे बसली असेल, तर मग हे सगळे स्टेजवर कोणाचा परफॉर्मन्स बघायला आले होते? ती व्यक्ती दातओठ खात त्यावेळेस विंगेत दाखवायला हवी होती. हे "खुर्ची - एक न नाट्य" समजावून घ्यायला पिक्चरच बघावा लागेल असे दिसते. नाहीतर एका मुग्ध अभिनेत्रीबद्दल असत्य बोलल्याचा पश्चात्ताप न होता आकाशातल्या बापाच्या घरी रुजू न होणारे पातक करताना मला खंत किंवा खेद का वाटली नाही याचा विचार मोक्षदिनाच्या दिवशी करावा लागेल.

<<आता ती रिकामी खुर्ची इज बगिंग मी. जर आशा काळे आधी तेथे बसली असेल, तर मग हे सगळे स्टेजवर कोणाचा परफॉर्मन्स बघायला आले होते?>>

मी पाहिलाय हा पिक्चर, दुरदर्शन दिवसात दाखवला जायचा अधुन मधुन. त्यातल्या दोन तीनच गोष्टी लक्षात राहिल्या. पहिली म्हणजे तुझ्या प्रश्नाचं उत्तर: आशा काळे चा लहान भाऊ (हा बिचारा आजन्म फजिती होणारा लहान भाऊ ह्याच रोल मध्ये असायचा) काॅलेज च्या स्नेहसंमेलनात सेक्रेटरी असतो, त्याने ऑर्गनाइझ केलेला नाचाचा कार्यक्रम बघायला ही सगळी मंडळी सहकुटुंब आणि इष्ट मित्रांसह म्हणजे विगो आणि यंग लीलाताई काळभोर यांच्या सह तिथे उपस्थित असतात. पण कुणीतरी ह्याची फजिती करण्यासाठी ओरिजनल कलाकारांना प्रोग्राम रद्द करण्यात आला आहे असं कळवत. त्यामुळे ऐनवेळी भावाची फजिती टाळण्यासाठी आशा काळे (नृत्याच्या) मैदानात उतरतात त्या मागच्या मुली बहुतेक त्याच्या काॅलेज मधल्या मैत्रीणी आहेत. आधी अजीबात प्रॅक्टिस नसल्याने हे इतपतच नृत्य शक्य आहे त्या दृष्टीने हे फार रिऍलिस्टिक दिग्दर्शन आहे‌ खरंतर!

ह्या पिक्चर चा ऍंग्री यंग मॅन सतीश दुभाषी आहे. ते लिटररी संतापलेल्या अवस्थेत आशा काळे ला बघायला येतात आणि आपल्या लग्नासंबंधीच्या अटी सांगतात. तो मघाचा फजिती वाला लहान भाऊ चिडुन विचारतो 'तुम्हाला बायको हवी आहे की मोलकरीण?" तर हे उत्तर देतात दोघी एकाच वेळी घरात आणण्याइतकी माझी आर्थिक परिस्थिती नाही त्यामुळे एकीलाच दोघींचीही कामे करावी लागतील!" ‌इतकी जबरदस्त पुर्वतयारी त्यांनी करून दिल्यामुळे आशा काळे त्यांच्या होम पीचवर जातात, म्हणजे लंपन ह्यांनी वर्णन केलंय तसं पाचवारीतुन नौवारीत जाऊन पदर तोंडांत कोंबुन रडणे.

माझ्या आठवणीप्रमाणे ह्या पिक्चर मध्ये विक्रम गोखले नुसतेच आहेत. म्हणजे आजकाल सिरियल्स किंवा कौटुंबिक पिक्चर्स मध्ये पाच पन्नास लोक कोरम पुर्ण करण्यासाठी नुसतेच मुख्य पात्रांच्या मागे उभे असतात तसेच विक्रम गोखले ह्या चित्रपटात बर्याच ठिकाणी आहेत.

Biggrin
फारएंड , म्हणजे तुझा कयास बरोबर आहे..
जर आशा काळे आधी तेथे बसली असेल, तर मग हे सगळे स्टेजवर कोणाचा परफॉर्मन्स बघायला आले होते?

ती रिकामी खुर्ची आशा काळेचीच !!!
Happy
#बंदिवान मी हो अंगाईत

पण रश्मिका आणि आकात निवडायचं असेल तर मी डोळे मिटून आकांना निवडेन.<<<<<
बरोबर आहे! आकांना निवडायचं तर डोळे मिटूनच निवडावं लागणार.
#नॅशनलक्रशअर्थातक्याहुस्नहैमेरेआका

फारएन्ड, आमेन!

अस्मिता, मी लिहिताना वि गो बद्दल विचार केला नव्हता. सतीश दुभाषीला वापरून घेतलं असंच डोक्यात आलेलं. पण हे फारच ग्राफिक वाटेल म्हणून मनातच एडिट केलं. मी विकी डोनरच्या कित्येक पिढ्या आधीचा प्रेक्षक आहे आणि या काळात यायला अजून अवकाश आहे.

तो नाच कॉलेजच्या कार्यक्रमातला असतो, हे आठवत होतं. पर्णीका यांनी डिटेल्स लिहिल्यावर आठवलं. त्या भावाला विग असतो का? त्या कलाकाराचं नाव लक्षात राहत नाही. चेहरा जयंत सावरकरांसारखा वाटतो, पण ते नाहीत.

क्लायमॅक्सला भूत होऊन बाळ देण्याचा सीन उषा किरणच्या अशाच एका आईच्या महन्मंगल स्तोत्र आणि अंगाई भोवती फिरणार्‍या चित्रपटावरून इन्स्पायर्ड असेल. त्यात ती स्वतःच्याच बाळाला भूत होऊन अंगाई गाते. चित्रपटाचं नाव आणि गाणं आठवताहेत का कोणाला? गुगल करण्यात ती मजा नाही.

त्या नाचातली मधली एक स्टेप थेट शाळेच्या गॅदरिंगमध्ये शोभावी अशी आहे. हे कॉलेजचं गॅदरिंग, त्यामुळे चालून जावी. ही आपल्याकडे बघत काय काय बोलते आहे आणि आपली राधिका शेजारीच बसली आहे हे लक्षात येऊन विक्रम गोखलेचं ब्लड प्रेशर वाढल्याचं स्पष्ट कळतंय.

Pages