बंदिवान मी ह्या संसारी
आशा काळे, निळू फुले, लता अरुण , मोहन कोटिवान, लीला गांधी, माया जाधव.
दिग्दर्शक -अरुण कर्नाटकी
१९८८
आशा काळे(कमल) लहानपणी प्रिया अरुण असते. प्रिया अरुणची सख्खी आई लता अरुण तिची सावत्र आई झाली आहे. बाबा आधी आजोबा वाटू लागले होते . पण प्रिया मोठी होऊन आशा झाल्याने ते नंतर लेव्हल मेकप झाले. आई लहानपणापासून छळते, बालमित्र अचानक काढता पाय घेतो. सावत्र आईला हिला उजवायचं पडलेलं असतं. गरिबीमुळे निळू फुलेशी लग्न होते, तो आईबाबाला पंधराशे रुपये देऊन हे लग्न जमवतो. निफु एक 'गुरू' नावाचा गरीब, कोपिष्ट व मूर्ख भटजी असतो. त्याच्या कानशिलावरल्या नकली-स्टिकर टकलाची सुद्धा वाळवणासारखी पापडं निघत असतात.
मग गावातला एक पाटील टाईप माणूस तिच्यावर वाईट नजर ठेवतो. याची नजर इतकी वाईट आहे की हा सतत डोळे आल्यासारखा दिसत होता. मग हा तिचं जे काही बघत असतो, ते आपल्यालाही बघावं लागतं, हळूहळू आपणही पाटील होतो. नववारी पातळ किती revealing असू शकते हे मला आता कळले. गरीबाची पण 'लस्ट स्टोरी' ;)..!
या सगळ्यात गावात हातात कादंबरी घेऊन नेहरू शर्ट-पायजामा घालून इकडंतिकडं फिरणारा माधव (खर्शीकर) हिला विहिरीतून ओलेती वगैरे बाहेर काढतो, नंतर भरल्या वांग्याची भाजी खायला येतो. लाल डोळ्याचा पाटील म्हणतो माधव आणि कमलचं लफडं हाय. निळू त्यांच्यावर विश्वास ठेवतो व तिची निर्भर्त्सना करतो. ती सवाष्ण म्हणून पाटलाकडं जेवायला जात नाही, तर तो घरी येऊन छेडतो. मग शेजारच्या काकू दोडकं घेऊन येतात. पाटील पुन्हा निफुचे कानं फुंकतात. नंतर काकू जत्रेत 'जाऊन या ' वगैरे सांगायला येते. तिथेही पाटील निफुला कटवून हिला बैलगाडीत घेतो व इकडंतिकडं हात फिरवायला बघतो. दुसऱ्या गावी बालमित्र/एक्स म्हणतो की याची नजर चांगली नाही. घ्या आता..!
बालमित्र जो कोणी आहे ज्याच्यासोबत गातगात ती पाच मिनिटांत मोठी होते , तो मूर्तिमंत 'दगड' आहे. ह्यांच्या लहानपणीच्या गप्पा बघून पुन्हा पाटील निफुला म्हणतो की हिचं चारित्र्य बरं नाही, कधी माधव - कधी एक्स.
निफु म्हणतो, 'तू पातळी सोडली आहेस. आता मी काही तुला पातळं घेऊन देणार नाही '. मग ती म्हणते की 'मी नागवी बसेन, नको तुमची पातळी आपलं पातळं'. अचानक सत्तावीसावं रडकं गाणं सुरू होतं व संपेपर्यंत पातळ फाटते सुद्धा. माधव गुपचूप येऊन नवीन कोरं गुलबक्षी रंगाचं पातळ ठेवून जातो. 'तुझ्या या लाडक्या भावाने गाणं संपायच्या आत पातळ आणलेलं आहे तायडे', टाईप चिठ्ठी सोडून जातो.
पुन्हा निफुला राग येतो (याला दुसरं येतंच काय). ही पोटुशी होते तर निफु संशय घेतो हे लेकरू 'भरल्या वांग्याचं' आहे म्हणून. मग निफु हिला मारायला जातो, शेजारच्या काकू म्हणतात 'हे लेकरू तुझंच आहे, वांग्याचं नाही. पाटील नालायक आहे, ही तर पवित्र 'कमल' आहे'. एका क्षणात तो शहाणा, समजदार होतो व घराची किल्ली मानाने तिला देऊन कुलूप लावतात. ते गाव सोडून निघून जातात. आनंदी 'टिडिंग टिडिंग' वाजून सिनेमा संपतो.
#दोनतासकुठंहोताकाकू
खऱ्या व्हिलन काकूच आहेत. त्यांनीच प्रेक्षकांचा लाक्षणिक अर्थाने आणि सिनेमाचा शब्दशः अर्थाने अंत बघितला. दोडकं द्यायला आल्या तेव्हा सांगितले असते तर शॉर्ट फिल्म झाली असती.
इमोशनल आहेच.मी एरवी खूप रडले
इमोशनल आहेच.मी एरवी खूप रडले असते तो बघून.फक्त त्या चोळी फॅक्टर ने जरा विनोदी झाला.
सगळेच.
सगळेच.
'पाटील होणे' हा वाक्प्रचार लिंगनिरपेक्ष आहे...! भूत असो किंवा स्त्रीपुरूष, वाईट नजर ही लिंगनिरपेक्ष असते.
--------------
धागा 'कुठल्या कुठे' नेणाऱ्या सर्वांना धन्यवाद .
सर्व वाचकांचे आभार.
आता ह्या धाग्यावर जुन्या मराठी सिनेमाची पिसं काढू.
तो एक ज्यात अलका कुबल ला
तो एक ज्यात अलका कुबल ला नवरा जवळपास गुहेत धोंडा घालून मारणार असतो.पण तरी ती शेवटी त्याच्या बरोबरच सुखाने घरी जाते.
स्रीधन
त्याळचे नट नट्या इतक्या
त्याकाळचे नट नट्या इतक्या सोज्वळ होत्या की अजूबाजूला चिटपाखरूही नसताना जयश्री गडकर मायग्रेन चा उपाय अरूण सरनाईक च्या कानात सांगतात.
धागा 'कुठल्या कुठे' नेणाऱ्या
धागा 'कुठल्या कुठे' नेणाऱ्या सर्वांना धन्यवाद . <<<<<
रंगल्या गप्पा 'आशा'....!
जबरदस्त धागा आहे हा. कसा काय
जबरदस्त धागा आहे हा. कसा काय मिसला काय माहित? (योग यावे लागतात काही गोष्टींचे). फा, लंपन, श्रद्धा - सगळेच प्रतिसाद तुफान आहेत
'मेड इन हेवन', 'ज्युबिली'ला
'मेड इन हेवन', 'ज्युबिली'ला मागे टाकत 'हा' चित्रपट प्राईमवर ट्रेंडिंग; नाव वाचून व्हाल थक्क!
दंग गं....
'दंग' गं....
विकु
नवीन Submitted by mi_anu on
--
चोळी सीनवर फारच धमाल चालू आहे
चोळी सीनवर फारच धमाल चालू आहे.
अजूबाजूला चिटपाखरूही नसताना जयश्री गडकर मायग्रेन चा उपाय अरूण सरनाईक च्या कानात सांगतात >> हा सीन पाहणाऱ्या समस्त सोज्वळ संस्कारी माबोकरांना, माझ्यासकट, आजवर यात काही वावगं वाटलं नाही
अजूबाजूला चिटपाखरूही नसताना
अजूबाजूला चिटपाखरूही नसताना जयश्री गडकर मायग्रेन चा उपाय अरूण सरनाईक च्या कानात सांगतात >>>
पण तो एकदम नॉर्मल आवाजात 'काय
पण तो एकदम नॉर्मल आवाजात 'काय चोळी का, हो दे की' सांगतो त्याकाळी उघडया ओपन रुफ बैलगाडीत पण असे कपडे जुगाड करता यायचे.अजिबातच ट्रॅफिक नसायचे.
खरं तर तो सीन खूप करूण आहे.त्यांचा मूळ मुद्दा त्या भुताच्या देहाला नंतर चोळी तशीच राहिलेली दाखवणे(म्हणजे व्हॅम्पायर उठून बरेच उद्योग करून येतात आणि मग सकाळी कोणी कॉफीन उघडून पाहिलं की त्यांच्या तोंडाला रक्त असतं तसं.) अर्थात हे लुगड्याचा तुकडा डोक्याला बांधून पण साधता आलं असतं, पण इथे 'भरजरी पितांबर दिला फाडून, द्रोपदीसी बंधू शोभे नारायण' ने गोची केली असती.
अनु
अनु
चला आता भूत बैलगाडीत सोडून
चला आता भूत बैलगाडीत सोडून बंदिवान संसारी परत येऊया
भरपूर अवांतर झालेय.
(((त्याकाळचे नट नट्या इतक्या
(((त्याकाळचे नट नट्या इतक्या सोज्वळ होत्या की अजूबाजूला चिटपाखरूही नसताना जयश्री गडकर मायग्रेन चा उपाय अरूण सरनाईक च्या कानात सांगतात.)))
काय आहे उपाय ?
तो सिन जाउन पाहिला.
तो सिन जाउन पाहिला.
चित्रपट पाहिलेला नाहीये बहुतेक.
अनु , ते अरुण सरनाईक ह्यांचे नॉर्मल आवाजात बोलणे हे प्रेक्षकाना संत्रे सोलून दिलेले दिसतेय.
आता प्रतिसाद लिहिताना लक्षात आलं.
अरुण सरनाईक आणि जयश्री गडकर ह्यांचे खूप एकत्र चित्रपट आहेत.
अजूबाजूला चिटपाखरूही नसताना
अजूबाजूला चिटपाखरूही नसताना जयश्री गडकर मायग्रेनचा उपाय अरूण सरनाईकच्या कानात सांगतात >>
तेवढा च सीन पाहिला, अरुण
तेवढा च सीन पाहिला, अरुण सरनाईक भूत असतात का खरंच? पूर्ण सिनेमा बघावा का?
इथे तर धमाल सुरुये
किल्ली, पूर्ण पिक्चर भूत नाही
किल्ली, पूर्ण पिक्चर भूत नाही गं
प्यार का साया किंवा गुड्डू नाहीये तो.
अजूबाजूला चिटपाखरूही नसताना
अजूबाजूला चिटपाखरूही नसताना जयश्री गडकर मायग्रेनचा उपाय अरूण सरनाईकच्या कानात सांगतात<<<<<
त्यांनी मराठी गाणी खूप ऐकली होती.
'काय तुझ्या मनात, सांग माझ्या कानात..' ही ओळ त्यांना नेमकी आठवली.
Btw भाऊसाहेबांनी नुसते लावणीचे कार्यक्रम बघण्यात व्यर्थ वेळ दवडला. कधीतरी टुरिंग टॉकीजमध्ये जाऊन 'काय हो चमत्कार' सिनेमा पाहिला असता तर कमळीला बैलगाडीत लिफ्ट दिल्यावर त्यांचेही डोके दुखू शकले असते.
सिनेमाच्या शेवटी कमळी, गुरू गाव सोडून जातात, पण मग भाऊसाहेबांचे काय? सिनेमाभर त्यांनी कमळीला वश करायचे एवढे प्रयत्न केले.. बहुधा 'भाऊसाहेब रिटर्न्स' या नावाने 'बंदिवान....'चा सिक्वल प्लॅंड असणार आधी. नंतर कमळीच पन्नाशीची, गुरू सत्तरीचा आणि भाऊसाहेब सहस्रचंद्रदर्शनाच्या वयाचे दिसू लागल्याने बेत बारगळला असावा.
लोल
लोल
पण खरेच ....
निळू फुले ला काय ते कृत्रिम, रबरी टक्कल! इतका लो बजेट सिनेमा होता? की टक्कल करायलाही पैसे नसावेत?
किती खराब दिसते ते!
आणि आशा काळे पंचावन्न काय पासष्ट किलोची दिसते...अविनाश खर्शीकर ३५ किलो चा!
भाउसाहेब मात्र अगदीच डेंजर दिसतात... !!
अजूबाजूला चिटपाखरूही नसताना
अजूबाजूला चिटपाखरूही नसताना जयश्री गडकर मायग्रेन चा उपाय अरूण सरनाईक च्या कानात सांगतात >> बाकीची भुते असतील बाजुला. आपल्याला दिसत नसतिल
धमाल सुरू आहे इथे.
धमाल सुरू आहे इथे.
किमान जोर लावुन कमाल पिसे काढली आहेत.
अनेक प्रतिसादही त्याच तोडीचे आहे.
कोणालाच तो सीन इमोशनल कसा
कोणालाच तो सीन इमोशनल कसा नाही वाटला? तो बोलतो सगळं वैर संपल तेव्हाच हुशार प्रेक्षक ओळखतात हा भूत आहे. मग झाडाच्या सावल्या बैलगाडीवर पडतात तेव्हा वाटतं त्या काळोखात तो गायब होईल. शेवटी म्हातारा जाम डेरींगबाज दाखवलाय. भुतानी आणलं माहीत असून पण बघायला जातो. पण त्याकाळी लोकं रडली असतील. मला या काळात पण रडायला आलं जरा.
हा सिनेमा प्राईम वर 'सुटेबल
हा सिनेमा प्राईम वर 'सुटेबल फॉर ऑल एज ग्रुप' म्हणून लिस्ट केलाय.
देवा.. मी इमॅजिन पण करु शकत नाही माझ्या मुलाने हा सिनेमा बघितलेला. (एकतर त्याला सिनेमा बघताना इतके प्रश्न पडतात )
बादवे आता मलाही अल्गोरिदम म्हणून प्राईम काय काय सजेस्ट करेल याची भीती वाटतेय.
कधीतरी टुरिंग टॉकीजमध्ये जाऊन
कधीतरी टुरिंग टॉकीजमध्ये जाऊन 'काय हो चमत्कार' सिनेमा पाहिला असता तर कमळीला बैलगाडीत लिफ्ट दिल्यावर त्यांचेही डोके दुखू शकले असते. >>>
नंतर कमळीच पन्नाशीची, गुरू सत्तरीचा आणि भाऊसाहेब सहस्रचंद्रदर्शनाच्या वयाचे दिसू लागल्याने बेत बारगळला असावा. >>> हो. रिटर्न ऑफ ज्वेल थीफ सारखे साहस यांनी केलेले दिसत नाही
'काय तुझ्या मनात, सांग माझ्या कानात..' ही ओळ त्यांना नेमकी आठवली. >>> हो ते एक अगदी जुने "रानात सांग कानात आपुले नाते" पूर्वी लागायचे. आता विकूंनी लावलेल्या शोधामुळे बरीच गाणी नव्याने चेक करायला हवीत. रानात जे काय सांगायचे ते कानात कशाला सांगायला हवे. अरण्यरूदन जर कोणाला ऐकू जात नसेल तर असल्या किरकोळ गप्पा कोणाला कळणार आहेत.
की टक्कल करायलाही पैसे नसावेत? >>> हे भारी आहे. खरे म्हणजे तो भिक्षुक आहे हे संवादांत येते ते बास आहे की. मुळात टक्कल असायची गरज नाही. अनलेस तो त्याच वेळेस कोठे आर्य चाणक्य वगैरे रोल करत असेल आणि एकच मेक अप दोन्हीकडे खपेल असा वापरायचा असेल. मला खात्री आहे की भाऊसाहेबांचा हातखंडा रोल न देता भिक्षुकाचा दिला म्हणून तो सतत वैतागलेला दिसतो या पिक्चर मधे. पुढेमागे "द मेकिंग ऑफ बंदिवान..." आले की कळेल.
भाऊसाहेबांचा हातखंडा रोल न
भाऊसाहेबांचा हातखंडा रोल न देता भिक्षुकाचा दिला म्हणून तो सतत वैतागलेला दिसतो ....
करेक्ट, फा !!!
हर हर महादेव मध्येही शरद
हर हर महादेव मध्येही शरद केळकर शिवाजीचा आपला हक्काचा रोल सुबोध ला दिला म्हणून असाच वैतागलेला दिसतो.
नवीन प्रतिसाद.
सर्व नवीन प्रतिसाद.
फा, अगदी. मूर्ख माणसाचा रोल अजिबात शोभत नाही निळू फुलेंना. त्यांची कुतरओढ स्पष्ट दिसते. कोटिवानना डोळ्यांच्या खाचा होवूनही नीचपणे छेडता येत नाही, खर्शीकरला नीट फ्लर्ट करता येत नाही, बालमित्र तर 'माय नेम इज केशव आणि आय ॲम नॉट चिकन' खेळतो. ही बाई तर सारखं गळे काढते, हिच्याशी नीट संवादही साधता येत नाही. पंधराशे रुपये खर्च होऊन हे नशिबी आले. वर ह्यांना भटजी केल्याने 'केस दाबून, हुंदक्यांचा मार' झाले आहे अक्षरशः . घराला कुलूप घातल्यावर 'या मूर्खपणातून सुटका झाली ' टाईपचं खरं समाधान ह्यांच्या चेहऱ्यावर दिसतं.
मुळात आशा काळेशी फ्लार्ट
मुळात म्हणजे आशा काळेशी फ्लार्ट करावे लागत असल्याने सर्वचजण वैतगलेले असावेत!
ते वेगवेगळ्या रीतीने गोंधळलेले आहेत ...
Pages