ववि २०२३ (यशोदा फार्म & रिसॉर्ट) - वृत्तांत आणि प्रतिक्रिया

Submitted by ववि_संयोजक on 30 July, 2023 - 23:40

कालचा ववि धम्माल झाला. सगळी मरगळ दूर झाली असेलच. आम्हा संयोजकांना तर "याची साठी केला होता अट्टाहास" अशी भावना दाटून आली.

प्रचि गृप फोटो इथे दिलाच आहे. बाकी फोटोंची देवाणघेवाण वैयक्तीकच राहू द्यावी ही विनंती. काही आयडींनी गृप फोटो व्यतिरिक्त वैयक्तीक फोटो पब्लिक फोरमवर टाकू नये असा पर्याय निवडल्यामुळे त्याच्या मताचा आदर म्हणून ही विनंती आहे. बाकी बच्चे कंपनीचा (गृपमधे किंवा स्वतःच्या मुला/मुलीचा), स्वतःचा, निसर्गाचा, खादाडीचा, बॅनरचा असे फोटो यायला हरकत नाही.

vavi 2023.jpg

चला तर मग, येऊद्या तुमचे अनुभव इथे.

Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकूण जमा = ६६६००/-
एकूण खर्च = ६६०८०/-
>>>>>
पुढच्या वेळी लाखात उलाढाल व्हायला हवी Happy

अतुल लिहा, वाट बघतोय..
अजून कोणी वृत्तांतवीर शिल्लक नाही का?

मी गेलो नाही कारण अगदी खरं सांगायचं झालं तर मला वाटलं मायबोलीकर वर्षा विहराला जाणार म्हणजे कायतरी भारी प्रकरण असणार. घनदाट आरण्य आहे तिथे अचानक दोन बस येऊन थांबल्या. त्या बसमधून खांद्यावर धनुष्यबाण बंदुका घेऊन मायबोलीकर उतरले. मायबोलीकरांना बघून जंगलातील प्राणी सैरावैरा इकडे तिकडे पळू लागले. अचानक वातावरणात बदल झाला. काळेकुट्ट ढग दाटून आले, विजा चमकायला लागल्या, धो धो पाऊस सुरू झाला पण मायबोलीकर न घाबरता त्या जंगलात शिरले ते थेट वाघाच्या गुहेजवळ जाऊन थांबले. दुपारी मटण खाऊन झोपलेल्या वाघाला उठवणे म्हणजे साक्षात यमाला उठवने. पण एका मायबोलीकराने वाघाला हाक देऊन बाहेर बोलावले. वाघ चिडत दात ओठ खात बाहेर आला पण त्या शूरवीर मायबोलीकरांनी चार पाच चापट मारून वाघाला पळऊन लावलं नंतर त्याच्याच गुहेत जेवण करून थोडी झोप काढली. नंतर उठल्यावर बाजूला असणाऱ्या हत्तींच्या कळपावर चाल करून गेले तिथे दोन चार हत्तींना गरागरा फिरवला. नंतर बाजूच्या नदीत पोहायला गेले तिथे मगरीना पकडून त्यांच्या पाठीवर बच्चे कंपनीची नदी सफर घडवून आणली. असं काहीसं चित्र माझ्यापुढे उभ होतं म्हणून मी आलो नाही.सगळ्यांचे सोपे wruttant वाचून पुढच्यावेळी मी पण येईन बहुतेक.

बोकलत, मध्येच तुमच्या बोचऱ्या विनोदाचा तडका प्रचंड आवडतो (Sarcastic sense of humor) Lol

>> चार पाच चापट मारून

चपटी म्हणायचे आहे का तुम्हाला? Proud

>> पूलमधे उडी मारताना हवेत असताना खाली पृथ्वी फिरताना तिची गती काय असते, यशोदा फार्म पासून ब्लॅकहोम डब्ल्यू सीएम ३४५ किती प्रकाशवर्षे दूर आहे...

>> Submitted by रघू आचार्य on 2 August, 2023 - 18:20

अगदी अगदी... Rofl असेच काहीसे घडले होते. लिवतो थोड्या वेळाने.

पुण्याचे खूप वृत्तांत झाले, मुंबईकरांचे येऊ देत आता
>>>>

वृत्तांतला सचित्र मुंबईकरांनीच बनवले आहे. भले मुंबैकर फोटो जास्त काढतात म्हणून चिडवून झाले असले तरी ते मग असे कामात येतात

माझगावमध्ये घर आहे. घरावर लेख आहे. आई वडील त्या घरात राहतात. माझे शेवटचे मतदान तिथून आहे. आजही माझे नाव तिथल्याच मतदार यादीत आहे. आणि आजही मायबोलीकर मला नवी मुंबईकर म्हणून नाही तर दक्षिण मुंबईकर म्हणून ओळखतात. आणि पुढच्या वेळी मी वविला कविन सोबत माझगावच्या डोंगरापासून येणार आहे.

मस्तच.. सगळ्यांचे वृत्तांत वाचून पुढच्या वेळी यावेसे वाटतेय.
बोकलत सर पण अदृष्य होऊन ववि ला गेलेले दिसतात.

आयर्नमॅन हर्पेनला रिश्पेक्ट म्हणून मी चार आणे लिहीते.

जुने मायबोली गटग आणि वविचे फोटो आता बघते तेव्हा दरवेळी, "अरेच्या! लेक किती छोटं पिल्लू होतं यात" वाली डोळ्यात बदाम प्रतिक्रिया उमटते आणि लग्गेच "श्या! या फोटो इतकं तरी परत बारीक होणं जमेल का कधी?, किमान पोट तरी आत जाईल का?" असा उदासवाणा प्रश्न डोकं वर काढतो आणि त्यावर उपाय माहिती असला तरी आळस दरवेळी वरचढ ठरतो ते अगदी परत असे फोटो बघेपर्यंत तो वरचढच रहातो. तर ते एक असो.

पुणेकर झपाझप वृ लिहीताना मुंबईतून मात्र एकटा ऋन्मेष इथे सिंगल रन काढत राहिलाय याचं मुख्य कारण अर्ध्याहून अधिक मुंबईकरांनी वविला नोंदणी करायची म्हणून आधी पासवर्ड रिसेट केलेत. अर्ध्यांना आयडी आठवतोय पण रोमन आहे की देवनागरी हे आठवत नाही. त्या रीनाने तर फॉर्म भरताना विचारलं "माझा आयडी काय आहे?" Lol
इथून सुरवात असेल तर कसे येतील वृ पटापट Lol

पासवर्ड रिसेट होईल मग नवीन पासवर्ड ते ठेवतील, मग लॉगीन करतील, मग वृ लिहीतील ... लंबी प्रोसेस है Sad
रीनाला तर सगळ्यांनी नवीन आयडीच सुचवलाय "रीला". हिचे रील करण्याचे कसब आणि उत्साह लाजवाब आहे. माझ्या लेकीने घरी आल्या आल्या तिला एक कॅडबरी बक्षीस असं म्हणत बाबाला ऐकवल - " अरे तिने आईलाही रील करायला तयार केलं" Lol आयुष्यात कधी रील करायला मला कोणी तयार करु शकेल असे वाटले नव्हते. मागे विन्याने त्याच्या घरच्या गटगला एका रीलात भाग घ्यायला लावला होता पण ते तस साधं होतं रील.

इथे तिने भयाण वेडं रील करायला लावलं हे सांगत की, " अग नाच नाही आला हरकत नाही, तेच हवय expression द्यायचेच नाहीयेत. (थोडक्यात तू जशी आहेस मख्ख तसच मख्ख रील करायच आहे) कंसातलं वाक्य मनात म्हंटलंय याची खात्री आहे मला. पण ध मा ल आली वेडेपणा करायला. परत उठून असा वेडेपणा करेन का? तर नाही. तेव्हा वेगळा वेडेपणा करेन कदाचित Lol

पण मी बरीच वर्ष आवाज छान नाही म्हणून मोठ्याने गायचं टाळलय, नाचता येत नाही म्हणून पब्लिकली ताल धरायचही टाळलय. पण यंदा माझ्या या कॉंशस होऊन शॅडो होणाऱ्या मनाला तिने हे करायला भाग पाडलं हे महत्वाचे. फार काही बिघडत नाही चुका झाल्या तरी, enjoy करता येणे महत्वाचे. तिच्या ढकलण्यामुळे हे शक्य झाले. त्यासाठी तिला एक झप्पी.

मुंबईच्या बसमधले हायलाईट्स म्हणजे ढोलकीच्या साथीने रंगलेली गाणी आणि नेहमीची हाहाहिहिहुहुगिरी

रिसॉर्टचे हायलाईट म्हणजे निसर्ग, पूल , रील , रेनडान्स आणि तिथले कजरारे आणि मार डाला वरचे नृत्य

केदार आणि कविताचा नाच, आनंद आणि सौ आनंदला करायला लावलेला प्यार हुवा इकरार हुवा वरचा अभिनय Lol

फोटो हायलाईट -
नीलेश वेदकच्या यारा या ब्रॅंडच्या टीशर्टचे मॉडेलिंग Happy

यो रॉक्सची आठवण काढत काढलेला उडीबाबा फोटो Lol

आणि शेवटचा गृप फोटो

आताही काही गोष्ट आठवून चेहऱ्यावर हसू येतेय. वेडेपणा आठवून हसायला येतेय.

दिवस "व सू ल" झाला और क्या चाहीए बॉस!

कवे, बेस्ट ! Lol

वेडेपणा रील पी.एम.वर पाठवावे ही धमकी ... Proud (कारण फेसबुकवर दिसलेलं नाही कुठे)

हर्पेन यांचे इथले लिखाण वाचून वेगळीच प्रतिमा मनात होती. फोटो भारी आहे.
मळका हरी भाग ३ मधे लीड रोल मधे त्यांना कास्ट करता येईल. काय म्हणता हर्पेन ?

हे कसे काय मिसले होते देव जाणे !

रघु
प्रतिमाभंजनामुळे त्रास तर नाही ना झाला?
आणि मळका तर मळका हरी व्ह्यायला मिळणार असेल तर लीड रोल नसला तरी चालेल. पण ते तेवढं VFX मधे नका करू पिच्चर!

मस्त वृत्तांत सगळ्यांचे... फोटो बघून सॉलिड धमाल।केलेली कळतेय. मी हे सगळं मिस केलं.

बऱ्याच वर्षांनी मायबोली उपक्रम संयोजनात भाग घ्यायला मिळाला. छान वाटलं. वविला येता आलं असतं तर अजून छान वाटलं असतं. नेहमीप्रमाणेच 'कौटुंबिक जबाबदाऱ्या' हे कारण.

हर्पेन Lol
मळका म्हणजे डर्टी हो. Proud
आवडला प्रतिसाद. आपण माबोबाह्य संबंध ठेवायला हरकत नाही. Wink

आपण माबोबाह्य संबंध ठेवायला हरकत नाही.
>>>म्हणजे माबोवर बोलणार नाहीत की काय... Wink

ही किंवा हा माबोकर प्रत्यक्षात कसा असावा असं तुम्हाला वाटतं असा धागा यायला वाव आहे. Happy

हर्पेन Lol

म्हणजे माबोवर बोलणार नाहीत की काय... >>> नाही तसं नाही. माबोवर सुभाषितमाला नेम धरून मारत असल्याने पळापळ होते इतकंच. Proud
हर्पेन Light 1 घ्या.

ही किंवा हा माबोकर प्रत्यक्षात कसा असावा असं तुम्हाला वाटतं असा धागा यायला वाव आहे >>> हंगाशी ! याला कुर्‍हाडीवर पाय देणे म्हणतात. भोआकफ Proud

मैफिल सुरू होती. एक गायक गात होते. तेच तेच आलाप वारंवार घेत होते. समोरचं पब्लिक पार पकून गेलं होतं. तेवढ्यात एका बाजूने प्रेक्षकांतून आवाज आला,
"वाह उस्ताद! क्या बात..."
झालं. गायक महोदयांनी सूरपेटी तिकडे वळवली आणि त्याच्याकडे बघून परत तेच आलाप ओढायला सुरू केले.... की तू तारीफ केलीस ना? आता तूच भोग.... Lol

तसं... मला वृत्तांत लिहायला सांगितला ना... घ्या आता.... भोगा Biggrin Light 1

ववि वृतांत (पूर्वार्ध)

"अगं मायबोली ग्रुपबद्दल मी अधूनमधून सांगत असतो ना? त्यांनी वर्षा विहार अनेक वर्षांनी आयोजित केला आहे यावर्षी. आपण जाऊयात का?" बायकोला मी विचारले.

१९९९ म्हणजे जवळपास स्थापनेपासून मी माबोवर आहे. सुरवातीला अनेक वर्षे फार सक्रिय नव्हतो किंबहूना वाचनमात्रच होतो. पण मागच्या काही वर्षांत इथे बऱ्याच माबोकरांशी संवादाची देवाणघेवाण झाली. त्यामुळे यावर्षी वर्षा विहारला यायचे माझे तरी नक्कीच होते. पण बरेचजण सहकुटुंब येणार हे पाहून मलाही बायको आणि मुलाला सोबत घेऊन वविला जावेसे वाटू लागले. पण तिला हे विचारेपर्यंत तिच्या अन्य एका मैत्रिणग्रुपची पावसाळी सहल नेमकी त्याच रविवारी ठरली होती. त्यामुळे ती येऊ शकणार नाही हे जवळपास नक्कीच झाले. मग मुलाकडे मोर्चा वळवला. म्हटले, "तू येतोस का सोबत? तिथे अजूनही मुले असतील. तू एन्जॉय करशील" (हे विचारेपर्यंत मी माझा टीशर्ट बुक केला होता. हा जर नाही म्हटला तरी एकटेच जायची मानसिक तयारी होती)

"येईन पण एका अटीवर", चिरंजीव म्हणाले, "आपली गाडी घेऊन जायचे असेल तरच येणार. या सुट्टीत आपण दूर कुठे गाडीने एकदाही गेलेलो नाही. आणि उद्यापासून माझे कॉलेज सुरू होतेय. मला आपल्या गाडीने दूर कुठेतरी जाऊन यायचे आहे" मग पर्यायच नव्हता. मला वास्तविक बसने यायची खूप इच्छा होती. गाणी, संवाद, दंगा असतो, मजा असते हे मला माहिती होते. म्हणून मी त्याला विविध प्रकारे "टूर बसप्रवास महात्म्य" सांगायचा प्रयत्न केला. पण एक ना दोन. अखेर माझे आणि मुलाचे आपल्या गाडीने यायचे नक्की झाले.

बुकिंग चा अनुभव:
कविन आणि इतर मंडळींच्या शिस्तबद्ध संयोजनाचा अगदी सुरवातीपासूनच सुखद आश्चर्यकारक अनुभव येत होता. वरती एका वृतांतात (हर्पेन यांनी?) लिहिल्याप्रमाणे मलाही संयोजन म्हणजे "टीशर्ट बुकींगचची तारीख ही ही आहे" असे जाहीर करून, ज्यांनी ज्यांनी बुक केलेत त्यांना त्या तारखेनंतर त्यांच्या त्यांच्या ऑर्डरप्रमाणे टीशर्ट पाठवले कि झाले Lol असे काहीसे सुरवातीला वाटले होते. पण ते अशा पाट्याटाकू छापाचे संयोजन नव्हते. व्यक्तिगत मला व इतरांना संयोजकांनी संपर्क साधून टीशर्ट त्याच साईजचा आहे का, कुठे मिळेल, कसा कलेक्ट करता येईल वगैरे वगैरे अगदी व्यक्तिगत पातळीवर मदत केली ते खूप भावले. पेमेंट केल्यानंतर सुद्धा पेमेंट मिळाले असे पोचपावती मेसेज येत होते. (नाहीतर आम्हाला सवय आहे. विशेषतः पूर्वीच्या काळी गुगल पे असते तर? पेमेंट करून घाबरत घाबरत आम्ही विचारले असते, "अहो पेमेंट केले आहे. मिळाले का?" मग समोरून रुक्ष उत्तर येणार "गुगल पे ने पेमेंट केल्यावर सक्सेस मेसेज तुम्हाला दिला नाही का? मग?" Proud आमच्या शाळेचे/कॉलेजातले त्याकाळातले संयोजन असते तर यापेक्षा जोरदार उत्तर. "गुगल पे ने सांगितले ना? मग तुला अजून काय आम्ही वेगळी हलगी वाजवून सांगायचे का रे?" Lol इत्यादी) ववि बुकींग सुद्धा असाच सुखद अनुभव होता. त्यात जे सारे तपशील विचारले गेले होते (इथपर्यंत कि फोटो पब्लिश करण्यासाठी विविध प्रकारच्या परवानगीचे चार पर्याय होते!) ते सारे खरेच वाखाणण्याजोगे होते. संयोजनामागे किती सारी मेहनत, अनुभव इत्यादी आहे हे लक्षात येत होते.

तोवर इकडे वविला जाणाऱ्यांचा व्हाट्सप ग्रुप सुद्धा तयार झाला होता. तिथे धमाल सुरु होती. काय न्यायचे काय नाही तसेच इतर अनेक सूचना, चर्चा वगैरे तिथे सतत सुरु होती. त्यानुसार मुलाच्या आणि माझ्या साहित्याची एक ब्याग बांधून आदल्या दिवशी रात्री आम्ही तयार झालो. तिथे नऊला पोहोचायचे तर सहाला तरी घरून निघावेच लागेल असे गुगलबाबाने सांगितले.

ववि दिन:
परीक्षेच्या दिवशी सुद्धा उठला नसेल इतक्या लवकर. पण त्या दिवशी मात्र राजवीर पहाटे उठून साडेपाचलाच अंघोळ वगैरे करून तयार झाला होता Lol अर्थातच मी देखील तितकाच उत्साही होतो. मागच्या दीड दोन दशकातल्या ववि विषयी ज्या त्या वेळी खूप वाचले होते. आणि हा पहिलाच ववि Happy लोकेशन सेट करून आम्ही "गणपतीबाप्पा मोरया" करून गाडी सुरु केली. किती सुंदर सकाळ होती ती. मधल्या एका पंपावर पेट्रोलची टाकी फुल्ल, विंडशिल्ड वॉटर टाकी फुल, हे फुल्ल, ते फुल्ल करून मग सुसाट निघालो. आता थेट रिसॉर्टलाच थांबायचे. "चलो यशोदा! चलो यशोदा!! चलो यशोदा!!! शेकडोंच्या संख्येने उपस्थित रहा" अशी काहीही निरर्थक बडबड करत मी त्याच्याकडे पाहिले. आणि आमचा प्रवास सुरु झाला. हे आमचे नेहमीचेच. मी आणि तो असताना गाडीत काहीही मस्ती सुरु असते. कधी कोणत्या एक्टरची मिमिक्री कर, कधी कोणत्या सिनेमातला डायलॉग समोरच्या वाहनवाल्याला उद्देशून बोल, तर कधी कार घाटातून वगैरे वर न्यायची असेल तर बैलगाडी चालवताना बैलाला जसे हाकारे घालतात तसे कारला उद्देशून बडबड कर असे काहीही सुरु असते. तो प्रवास सुद्धा याला अपवाद नव्हता.

"पप्पा, जीपीएस आणि गुगल नव्हते तेंव्हा तुम्ही कसे जात होतात? आता कसे आपण यशोदा चे लोकेशन टाकले. जीपीएस आपल्याला सांगत आहे. तेंव्हा काय होते?"
"आता जसे जीपीएस आहे तसे तेंव्हा आय एन एस होते"
"म्हणजे?"
"इंडियन नेव्हिगेशन सिस्टीम"
"ते आणि काय होते?"
"ते असे होते", मी सांगू लागलो,"एखाद्या गजबजलेल्या चौकात रस्त्याकडेच्या कोणत्याही एका पानपट्टीच्या किंवा किराणामालाच्या दुकानासमोर गाडी उभी करायची आणि होर्न वाजवून किंवा हाक मारून कुणालातरी बोलवायचे. मग ते गाडीजवळ येतात. म्हणजे येतातच. यावेच लागते त्यांना. आय एन एस आहेच तशी. मग ते गाडीजवळ येऊन पानाचा तोबरा असेल तर त्याची काळजी घेऊन, कारच्या खिडकीवर एक हात टेकून खाली वाकून खिडकीतून आपल्याला विचारतात, कुठं जॉयचं?"
"मग त्यांना यशोदा रिसॉर्ट चा रस्ता विचारायचा?"
"ए हे... च्याक्क्क...." किती बावळट आहे हा मुलगा असे भाव आणून मी बोललो, "त्यांना कर्जतला कसे जायचे ते विचारायचे"
"हां... मग ते सगळा रस्ता सांगणार?"
"नाही! तसे नाही. कर्जतला कसे जायचे विचारल्यावर ते म्हणणार... कर्जत? मग हिकडं कुठं आला? लांब मागं राहिलं कर्जत. आता आसं करा...." सुरु Lol
"मग ते यू टर्न घ्यायला सांगणार?"
"नाही तसेही नाही. ते सांगत असताना दुसरे कोणी त्यांच्यामागून येणार आणि आपल्याला म्हणणार 'अवो कर्जत पुढे आहे, जावा जावा सरळ जावा...' असे सांगून त्या आधीच्या माणसाला म्हणणार 'येड्या मागं कुठं जायला सांगयलास तू त्यांना? चिक्कार लांब कर्जत अजून इथनं पुढं" Biggrin

अशी मस्करी करत करत आम्ही एकदाचे रिसॉर्टवर पोहोचलो Happy

function at() { [native code] }उल एकच नंबर वृत्तांत.
लिहा पटपट. वाट बघतोय.

Pages