ववि २०२३ (यशोदा फार्म & रिसॉर्ट) - वृत्तांत आणि प्रतिक्रिया

Submitted by ववि_संयोजक on 30 July, 2023 - 23:40

कालचा ववि धम्माल झाला. सगळी मरगळ दूर झाली असेलच. आम्हा संयोजकांना तर "याची साठी केला होता अट्टाहास" अशी भावना दाटून आली.

प्रचि गृप फोटो इथे दिलाच आहे. बाकी फोटोंची देवाणघेवाण वैयक्तीकच राहू द्यावी ही विनंती. काही आयडींनी गृप फोटो व्यतिरिक्त वैयक्तीक फोटो पब्लिक फोरमवर टाकू नये असा पर्याय निवडल्यामुळे त्याच्या मताचा आदर म्हणून ही विनंती आहे. बाकी बच्चे कंपनीचा (गृपमधे किंवा स्वतःच्या मुला/मुलीचा), स्वतःचा, निसर्गाचा, खादाडीचा, बॅनरचा असे फोटो यायला हरकत नाही.

vavi 2023.jpg

चला तर मग, येऊद्या तुमचे अनुभव इथे.

Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>> टी शर्टचे जमा झालेले पैसे मैत्री संस्थेला दिलेत हे प्रेरणादायी काम आहे.
+१
खूप छान. माबो चे यश सदैव वृद्धिंगत होवो.

टी शर्टचे जमा झालेले पैसे मैत्री संस्थेला दिलेत हे प्रेरणादायी काम आहे.
टी शर्टला कुणी फायनान्स केलेले मग ? त्यांना सा.दं.>> प्रत्येक टीशर्टच्या किमतीमधील ५०/- रुपये रक्कम देणगी म्हणून दिली जाते. टीशर्ट धाग्यावर याबद्दल लिहीले आहे. त्यानुसार टीशर्ट विक्रीतून जमा झालेली देणगी आपण मैत्रीला दिली आहे.

In that case I would be happy to participate in the Spring. +१२३

नावच ववि आहे त्यामुळे वर्षा ऋतु मध्येच असावा. पण पुढाकार घेणारे असतील तर जाउयात कि Happy

Pages