Submitted by ववि_संयोजक on 30 July, 2023 - 23:40
कालचा ववि धम्माल झाला. सगळी मरगळ दूर झाली असेलच. आम्हा संयोजकांना तर "याची साठी केला होता अट्टाहास" अशी भावना दाटून आली.
प्रचि गृप फोटो इथे दिलाच आहे. बाकी फोटोंची देवाणघेवाण वैयक्तीकच राहू द्यावी ही विनंती. काही आयडींनी गृप फोटो व्यतिरिक्त वैयक्तीक फोटो पब्लिक फोरमवर टाकू नये असा पर्याय निवडल्यामुळे त्याच्या मताचा आदर म्हणून ही विनंती आहे. बाकी बच्चे कंपनीचा (गृपमधे किंवा स्वतःच्या मुला/मुलीचा), स्वतःचा, निसर्गाचा, खादाडीचा, बॅनरचा असे फोटो यायला हरकत नाही.
चला तर मग, येऊद्या तुमचे अनुभव इथे.
शब्दखुणा:
Groups audience:
- Private group -
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अतरंगी, ऋन्मेष
अतरंगी, ऋन्मेष
मस्त लिहिलाय ववि वृत्तांत.
मी कारने येणार आहे. >>
मी पण पुढच्या वेळी नक्की येणारं
अतरंगी, धमाल लिहिले आहे.
अतरंगी, धमाल लिहिले आहे.
पियू
ऋ, सगळेच फोटो फार सुरेख आलेत.
वृ. सवडीने वाचतो.
वृ. सवडीने वाचतो.
फोटो मस्त दिला आहे.
पुढच्या रांगेतले शक्यतो स्कॉलर असतात. मागचे कलाकार हा अनुभव आहे.
मज्जा आली अतरंगी आणि ऋन्मेषचे
मज्जा आली अतरंगी आणि ऋन्मेषचे वृत्तांत वाचून!
ऋन्मेष फोटो अप्रतिम, वृत्तांत
ऋन्मेष फोटो अप्रतिम, वृत्तांत वाचते निवांत, लेकरं rocking एकदम.
जबरदस्त सुंदर जागा दिसते आहे.
जबरदस्त सुंदर जागा दिसते आहे. मस्त फोटो. वृत्तांत वाचायचा आहे अजुन. अंतरंगी यांनी लिहीलेला वाचला. आवडला.
ऋ, वृतांत छान, पुढील भाग लवकर
ऋ, वृतांत छान, पुढील भाग लवकर टाक. आणि तब्येतीची काळजी घे!
परीने कमरेवर हात ठेऊन “पार्टीला आणि ट्रिपला जंक फुड नाही खायचे तर काय खायचे?”: खूप हसले परी स्मार्ट आहे.
वृंतांत वाचायला खुप मजा येते.
वृंतांत वाचायला खुप मजा येते.
अतरंगी छान लिहलाय. “कायप्पा“ आवडले नाव….
वाह वाह ऋन्मेष झकास वृत्तांत
वाह वाह ऋन्मेष झकास वृत्तांत लिहीला आहे. फोटो तर इतके विलक्षण सुंदर आहेत.
मजा येतेय वाचायला ….
मजा येतेय वाचायला ….
ऋ, वृतांत छान, पुढील भाग लवकर टाक. आणि तब्येतीची काळजी घे! !
परीने कमरेवर हात ठेऊन “पार्टीला आणि ट्रिपला जंक फुड नाही खायचे तर काय खायचे?”: खूप हसले Lol परी स्मार्ट आहे.>>>> +१
सर्वांचे धन्यवाद.
सर्वांचे धन्यवाद.
खरा वृत्तांत शिल्लक आहे. तो उद्या सकाळी टाकतो.
पहिल्या भागात माझ्या आजाराचेच रडगाणे जास्त आहे. पण त्याची गरज होतीच. कारण त्याच पार्श्वभूमीवर पुढे जी मजा आली त्याने हा ववि माझ्यासाठी जास्त स्पेशल केला
ड्युआयडीअर झालेली उद्बोधक
ड्युआयडी वर झालेली उद्बोधक चर्चा. कुणीच कसं लिहिलं नाही ?
( डोन्न टेल मी नथिंग हॅप्पन्द .. आय हर्ड विद माय ओन कान्स ).
गाणी गाण्याच्या टॅलंटचं चीज झालं पाहिजे. त्या दिवशी एक धागा पण आलाय.
ऋन्मेऽऽष - ववि वृत्त्तांत
ऋन्मेऽऽष - ववि वृत्त्तांत २०२३ (भाग दुसरा / अंतिम)
आम्ही मुंबईकर रिसॉर्टला पोहोचलो तेव्हा स्वागताला पुणेकर आधीच पोहोचले होते. जेन्ट्स आणि लेडीज रूम्स वेगवेगळ्या आहेत हे समजले. आता लेकीला सोबत ठेवायचे की बायकांसोबत पाठवायचे हा प्रश्न पडला. पण हा प्रश्न मायबोली आयडी कुंतल आणि कुंतलकन्येने सोडवला. त्या दोघी लगेच मैत्रीणी बनून निघूनही गेल्या. पुढे त्यांच्यात केदार जाधव यांची ओवी सुद्धा सामील झाली. दिवसभरात सारे प्रश्न असेच सुटत गेले. "आता काय?" असा प्रश्न चेहर्यावर दिसला की कोणी ना कोणी सोडवायला पुढे यायचेच. त्यामुळे पुर्ण दिवसभर सर्व वविकर एक कुटुंब असल्यासारखे वाटत होते. मला माझा माणूसघाणा स्वभाव दाखवायला फारशी संधीच देत नव्हते
सकाळच्या नाश्त्याला पोहे, भुर्जीपाव आणि काहीतरी होते. ते विसरलो. बहुधा मिसळ असेल. भुर्जी छान वाटल्याने मी त्यावर ताव मारला. तीन आठवड्याने काहीतरी चमचमीत मसालेदार खात होतो. पण डोक्यात आजाराचा विचार जराही आला नाही. बहुधा आजूबाजूचा माहौल बघता मी सुद्धा आजार विसरून पिकनिक मूडमध्ये पोहोचलो होतो.
नाश्त्यानंतर काही जणांचे फोटो सेशन चालू झाले, तर काही रील्स बनवण्यात बिजी झाले. हल्ली हे एक नवीन फॅड आले आहे. पण चांगले आहे, जो तो आपली आवड जपत होता. माझ्यासोबत पोरे असल्याने ती माझ्याही आधी स्विमिंगपूलला पोहोचली होती. मी आजारामुळे पाण्यात उतरणार नसल्याने काठावरूनच काही फोटो टिपू लागलो. पण पूलवरचे चिंब भिजलेले फोटो शेअर करायचे नाहीत अशी पद्धत आहे आपल्यात त्यामुळे ती मेहनत पाण्यात गेली
लेक पाण्यात उलट सुलट कोलांट्या उड्या मारत होती. तिचे फोटो आणि विडिओ काढायची माझी हौस पुर्ण केली. तो फोटो तिची परवानगी घेऊन टाकत आहे
त्यावेळी मुलाला खेळवायला हर्पेन, श्रेयस, मल्ली वगैरे मायबोलीकर होतेच. वविला एकापेक्षा जास्त मुले आणा आणि त्यांची चिंता न करता बिनधास्त आपला ववि एंजॉय करा हे समजले. कारण असे बरेच काका, मामा, दादा पोरांना खेळवायला तत्पर असतात. पण पुढे त्याची फार गरजही पडली नाही. बारक्या मुलांनीही आपला ग्रूप बनवला आणि त्यात ते रमले.
दुसरीकडे मोठ्यांचे मोठ्या तलावात व्हॉलीबॉल सुरू झाले होते. रील बनवणार्या बायका पाण्यात उतरल्या होत्या. पाण्यातही रील्सच बनवत होत्या.बारकी पोरे अध्येमध्ये लुडबुडत होती. एकूणच माहौल बघून आपण असे सुके काळावर उभे आहोत याची मला लाज वाटू लागली आणि लागलीच मी सुद्धा कपडे बदलून पाण्यात उतरलो. पाण्यात न उतरण्याचा निश्चय जेमतेम अर्धा तास टिकला असावा. पण त्यानंतर पूलमधून सर्वात शेवटी बाहेर पडणार्यांमध्ये एक मी सुद्धा होतो.
ईतरांचे पूल फोटो तर टाकू शकत नाही. पण माझा पोरासोबत नील यांनी जो सुंदर फोटो टिपला तो जरूर शेअर करतो.
थोड्यावेळाने रेन डान्स सुरू झाला. डीजेवर गाणी वाजू लागली. त्यामुळे पूलमधील रील्स बनवणारी निम्मी जनता तिथे पळाली. आणि तिथे रील्स बनवू लागली. लहान मुले रेन डान्सच्या साचलेल्या तळ्यात धावत येऊन घसरून लोळू लागली. त्यांचे आलटून पालटून स्विमिंग पूल ते रेन डान्स बागडणे चालू होते.
या सगळ्यात कोणालाच वेळेचा पत्ता नव्हता. काही थंडीने कुडकुडू लागली, तर काहींना भूक लागली, तर काहींची मने भरली तेव्हा एकेक करत सारे निघाले. पण सगळ्यात छोटा वयोगट मात्र बाहेर पडायचे नावच घेत नव्हता. शेवटी छोट्या पूलमध्ये मी, रीया आणि पियू आपापल्या शूर सरदारांसोबत किल्ला लढवत होतो. ते आता दुकान बंद करायची वेळ झाली आहे असे सांगितल्यावरच बाहेर पडले.
दुपारी जेवणात ज्याची भिती
दुपारी जेवणात ज्याची भिती होती ते झाले नाही. मला शाकाहारी खायची वेळ आली नाही. तर छान चिकन भाकरी मिळाली. अन्यथा मायबोलीकरांच्या वविला नॉनवेजचे वावडे का म्हणून मी धागा काढायच्या तयारीत होतो. माबोकरांच्या सुदैवाने माझी ती संधी हुकली. पण जेवण मात्र छान होते. त्यात नाश्ताही धरा. कुठला पदार्थ ताटात घेतला आणि आवडला नाही म्हणून शिल्लक राहीला असे झाले नाही.
दुपारी जेवल्यावर थोडा झोका, थोड्या गप्पाटप्पांचा आनंद घेतला. त्यावेळी मायबोलीचे मिलिंद सोमण आयर्नमॅन हर्पेन यांच्यासोबत फोटो काढण्याची संधी मिळाली.
मुलांनीही त्यांना असा आदर दिला.
काही मुलांमध्ये भूतदया जागृत झाली आणि ते पापड खाऊ घालून मांजरींचे पोट भरू लागले.
थोड्याच वेळात सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाले. दोन टीम बनवल्या गेल्या.
खखोदेजा (खरे खोटे देव जाणे) विरुद्ध भोआकफ (भोगा आपल्या कर्माची फळे)
बरोब्बर!, मी भोआकफ मध्येच होतो. पहिला राऊंड रॅपिड फायर होता. त्यात रॅपिड काय होते कळले नाही. पण मायबोलीवरचा सर्वात जुना आयडी, सर्वात नवा आयडी कोणत्या टीममध्ये आहे अश्या बिनकामाच्या गोष्टींना गुण बहाल करताना सर्वात जास्त आयडी कोणाचे आहे या कौशल्याला दुर्लक्षिले गेले याचा ईथे णिषेध नोंदवितो.
त्यानंतर कुछ कुछ होता है चित्रपटातील हा खेळ खेळला गेला, नाव आठवत नव्हते म्हणून गूगल केले.
Dumb charades also popularly known as “Dumsharaz”, has been played by almost all Indians who have had a little spare time and had got nothing to do.
फक्त यात चित्रपटांच्या नावांऐवजी म्हणी ओळखायच्या होत्या. सगळ्या अवघड म्हणी आमच्या वाट्याला आल्या म्हणून आम्ही "हार के भी जीतता है वो बाजीगर केहलाता है" म्हणत हरणेच पसंद केले. आणि त्यानंतरच्या एकमेकांना चॉकलेट भरवा, उखाणे घ्या खेळात उपस्थितांची मने जिंकली.
ईथे हा सगळा गोंधळ चालू असताना लहान मुले काय करत होती कल्पना नव्हती. पण जे काही करत असतील त्यात खुशच असतील कारण कोणी आम्हाला पिडायला आले नाही.
तरी घरी आल्यावर परीशी गप्पा मारल्या तेव्हा थोडेफार समजले ते असे,
ती, ओवी (केदार जाधव) आणि विहान (अतरंगी) ही पोरं लेडीज रूममध्ये जाऊन गप्पाटप्पा मारत बसले. परी आणि विहान यांचे बॉटल फ्लिप चॅलेंज खेळून झाले. त्यानंतर पोरांनी मोबाईल बघायचा प्रयत्न केला पण नेट नव्हते. हे एक फार उत्तम झाले. त्यानंतर आमच्या बॅगेत सुक्या खाऊचा स्टॉक भरला होता. परी तो घेऊन आली आणि मुलांनी त्याचा फडशा पाडला. नंतर मुले स्विमिंग पूलकडे गेली. तिथे दिया(कुंतल) त्यांना सामील झाली. आणि सारी मुले स्विमिंग पूलमधील पार्टीशन वॉल वर चालायचा खेळ करू लागले. तो झाल्यावर थोडा थाळीफेकचा खेळ रंगला. फूलपाखरांच्या मागे पळून झाले. पुन्हा मांजरीची गचांडी धरली. या सगळ्यात ज्युनिअर ऋन्मेषचे चिखलात पडून झाले. पण मला कार्यक्रमाच्या मध्ये डिस्टर्ब करायला नको म्हणून परीनेच त्याला कुठल्यातरी नळाखाली नेऊन धुतले.
मध्येच काही बायका सांस्कृतिक कार्यक्रमातून ऊठून बाहेर आल्या. तेव्हा तिला वाटले की कार्यक्रम संपला यांचा.. पण त्यांनी खचाखच फोटो काढले आणि पुन्हा आत गेल्या.
अरे हो, सुरुवातीचा अर्धा तास सर्व पोरांना चित्रे रंगवायचा टास्क दिला होता. त्यावर परीने घरी आल्यावर तक्रार केली. "लहान आहे का मी? पिकनिकला कोण चित्र रंगवते का?"
तिचेही खरेच आहे म्हणा. घरी जेव्हा अभ्यासाला बस म्हणून सांगितले जाते तेव्हा तो टाळायला म्हणून चित्रे रंगवायची सवय आहे तिला. त्यासाठी पिकनिकचा वेळ खर्च करणे तिच्या जिवावरच आले असावे. (संयोजक नोंद घ्या )
ईथे आत सांस्कृतिक खेळ
ईथे आत सांस्कृतिक खेळ संपल्यावर ओळख परेड सुरू झाली. प्रत्येकाने आपले नाव गाव फळ फूल सांगून मायबोली कारकिर्द आणि वविचे अनुभव यावर चार शब्द बोलावेत अशी अपेक्षा होती. मला चारशे शब्द बोलायची संधी आणि वेळ दिलात याबद्दल मी संयोजकांसह सर्वच श्रोत्यांचे आभार मानतो. पण त्याचवेळी आपण माबोवर ज्यांच्याशी फुटकळ वाद घालत बसतो ती प्रत्यक्षात किती दिग्गज लोकं असतात हे देखील एकेकाबद्दल ऐकून समजले
कार्यक्रम संपले आणि गरमागरम चहा भज्या आल्या. त्यावेळेस त्या वातावरणात त्यापेक्षा जास्त चवदार पदार्थ कुठला वाटला नसता.
परीला एखादी डान्स रील बनवायची होती. किंबहुना माझी स्वताची देखील अशी ईच्छा होती की पहिल्यांदा लेकीसोबत आलो आहे तर या वविची एक आठवण आपल्याकडे रील स्वरुपात सुद्धा राहावी. पण दिवसभरात तिला नेटवर्क साथ देत नव्हते. संध्याकाळी निघताना मात्र योग जुळून आला आणि तिने दियासोबत स्विमिंगपूलच्या काठी एक छान रील बनवली. एकमेकांना कधी न भेटलेले दोन मायबोलीकर वविला भेटतात आणि त्यांच्या मुली एकत्र येत झटपट एखादा डान्स बसवून रील बनवतात हे फक्त ईथेच बघायला मिळते
हे सर्व होईस्तोवर निघायची वेळ झाली. निघण्याआधीच्या ग्रूप फोटोची वेळ झाली. तोच टाकून माझाही वृत्तांत आवरता घेतो.
पण अरे हो, वृत्तांताच्या पहिल्या भागात जे मी माझ्या तब्येतीचे रडगाणे गायले होते ते या भागात आले नाही. येणे शक्यही नव्हते. कारण जे मला सकाळी वाटत होते की जोशमध्ये येऊन मी काही कमी जास्त बागडलो तर दिवस अखेरीस मी कुठेतरी चक्कर येऊन तरी पडणार किंवा मला स्ट्रेचरवरून तरी घरी न्यावे लागणार. तसे काही झाले नाही. उलट शेवटच्या फोटोतही माझ्यातला वविउत्साह तितकाच कायम होता, किंबहुना वाढला होता. आदल्या रात्री मी बिलकुल झोपलो नव्हतो, पण संध्याकाळी परतताना बसमध्येही झोप म्हणून जरा आली नाही. सर्वात जास्त आनंद मला या गोष्टीचा झाला की पोरांनी फार धमाल केली. जरी घरी आल्यावर मी औपचारीकता म्हणून त्यांना विचारले की पुढच्या वर्षीही या पिकनिकला जायचे का तरी त्यांचे "हो" हे उत्तर मला आधीच ठाऊक होते. किंबहुना मी तर जास्तीत जास्त मायबोलीकरांनी पुढच्या वविला आपल्या पोराबाळांसह यावे असेच सुचवेन. झाल्यास त्यांच्यासाठीही काही धमाल खेळ ठेवता येतील. तर भेटूया नक्की पुढच्या वविला असे म्हणून आता खरेच थांबतो
धन्यवाद,
ऋन्मेऽऽष
झक्कास लिहिले आहेस. दोन्ही वृ
झक्कास लिहिले आहेस. दोन्ही वृ भागातले फोटो मस्त
आपण माबोवर ज्यांच्याशी फुटकळ
आपण माबोवर ज्यांच्याशी फुटकळ वाद घालत बसतो ती प्रत्यक्षात किती दिग्गज लोकं असतात हे देखील एकेकाबद्दल ऐकून समजले >>>>>
देर आये दुरुस्त आये….
पुढच्या वेळी वाद घालताना लक्शात ठेव.
हो, ते लक्षात ठेऊनच वाद घालेन
हो, ते लक्षात ठेऊनच वाद घालेन
ऋन्मेऽऽष छान धावता
ऋन्मेऽऽष छान धावता वविवृत्तांत आणि सामुदायिक छायाचित्र.
छान वृत्तांत
छान वृत्तांत
मस्त वृत्तांत...!
मस्त वृत्तांत...!
अतरंगी यांनी लिहिलेलं वाचून
अतरंगी यांनी लिहिलेलं वाचून माझी पण वविला यायची ईच्छा मेली. ववी म्हणजे पावसापण्यात भटकणं असतं असा माझा समज होता.
हा तर मी काय सांगत होतो....
हा तर मी काय सांगत होतो....
अनेक वर्षे जेव्हा ववि होत होता त्यावेळी मला जमले नव्हते.
आणि जेव्हा मला जमणे शक्य होऊ शकले असे असते त्यावेळेपासून ववि झालाच नव्हता.
अशी हुलकावणी देणारी अनेक वर्षे गेल्यावर अखेरीस ह्या वर्षी ववि होतोय म्हटल्यावर ही संधी न साधणे शक्यच नव्हते.
वविच्या ह्या सोहळ्यात मी पुण्याहून सामील झालो होतो.
निघायची वेळ पाहून मी मनात म्हटले सकाळी इतक्या लवकर कोण निघत राव. लक्षात आले की सध्या धावणे अजीबात सुरु नसल्याने साडेपाच-सहा हे लगेच्च 'इतक्या लवकर' झालं आहे.
पण पुणेकर मंडळींनी पुर्वनियोजित वेळ पाळणे निघण्याच्या पहिल्या थांब्यापासून जे सुरु केले ते वाटेतल्या सगळ्याथांब्यांसकट रिसोर्ट गाठेपर्यंत राखले. त्यामुळे 'वाट बघून दमलो', 'कोणाला तरी बस मागे पळवले' वगैरे वगैरे हमखास लिहू शकता येणार्या ओळी कमी झाल्या. खरोखर कोणीच उशीरा आले नाही. सगळी मजा घालवली.
मी माझ्या स्टॉप वर पोचलो तेव्हा योकु त्याच्या लेकाला घेऊन आधीच हजर होता. मागोमाग अतरंगी सकुसप आलाच. त्याचे येणे माझ्याकरता अगदी महत्वाचे होते. संयोजक म्हणून नव्हे तो तर योकु आलाच होता. पण माझा आणि योकुचाही माबो टी शर्ट त्याच्याकडे होता. मला खात्री होती की तो टी शर्ट आणेलच पण योकुला नव्हती त्यामुळे त्याने लगेच्च विचारले तू आलास ठीक आहे पण टी-शर्ट आणलेस का अर्थातच लगेच हो म्हणून सांगीतले तर तो अतरंगी कसा! त्याने साभिनय, अर्रे आणायचे म्हणून वर काढून ठेवले आणि नेमके विसरलो बघ असे सांगीतले. मला खरे वाटले यात नवल नाही पण योकुलाही ते खरे वाटले. त्यामुळे याठिकाणी अभिनयाचा सर्वोच्च पुरस्कार त्याला देण्यात यावा म्हणून मी शिफारस करत आहे. (टंकताना शिफारसचा तीन वेळा शिफार्स झाला. काव्यगत न्याय म्हणतात तो हाच काय) तितक्यात लगेचच गाडी आल्याने अतरंगीला जास्त वेळ अभिनय करता आला नाही.
शून्य शून्य एक आणि पियु (तिच्या पिया आणि पिल्लू सकट) आधीच गाडीत बसून आले होते. त्यांची भेट गाडीतच झाली. सगळ्यांना दादा म्हणणारी लहान मुलगी रिया तिच्या लेकाला घेऊन आली आणि एकदम वय झालं आपलं अशी भावना मनात दाटली. आदल्या रात्री म्हणजे केवळ काहीच तास आधी भारतात मुंबईत उतरलेला केदार पुण्यात पोचून सहकुटुंब वेळेवर हजर झाला ह्या गोष्टीचे कौतुक करण्याकरता माझ्याकडे शब्दच नाहीत. मल्ली आला गाडीत चढला (गाडीलाही) काहीच कळले नाही.
सगळे आल्यानंतर थोडा वेळ गप्पा झाल्या आणि मग कोणीतरी गाडीत गाणी-गिणी लावा की अशी लापि वाजवली गेली. ज्यावर सोडलेले इग्नोरास्त्र भारी पडले असे आता सिद्ध झाले आहे.
मग अर्थातच गाण्याच्या भेंड्या ज्याला मराठीत हल्ली अंताक्षरी म्हणतात ते खेळायचे ठरले.
तर त्या दरम्यान नेहेमीप्रमाणे सगळेजण छानपैकी तालासुरात गाणी गात असताना खरे तर सांगण्यासारखे काही घडले नसते पण अचानक विशेष उल्लेख करण्या जोगी बाब घडली आणि ती म्हणजे अनंत काळापर्यंत शांत बसलेल्या अतरंगीने गाणे म्हणणे. आयुष्यात एकदातरी त्याच्या तोंडून गाणे हे ऐकायलाच हवे.
अशा प्रकारे सुखैनैव मार्गक्रमणा करत कर्जतला रिसोर्टवर पोचलो तर मुंबईकर यायचे होते. स्वतंत्ररित्या सहकुटुंब आलेले कुंतल आणि अतुल हे देखील मुंबईकरांच्या आधीच पोचले.
एकदम सगळ्याची घाई नको म्हणून उपस्थित जाणत्या संयोजकांनी सुचवल्या प्रमाणे पुणेकरांनी न्याहारीला सुरुवात केली. न्याहारीच्या वेळी पाव अंडाभुर्जी मिसळ पोहे चहा कॉफी असा मेनु असलेला अनलिमिटेड बुफे होता. आमचे खाणे आटपतच होते की मग मुंबईकरांचे आगमन झाले.
मुंबईकर उशीरा आले ते आले आणि बहुतेकजण बराच वेळ आपापसातच रममाण होते. पण तरीही प्रत्यक्ष भेटीतला 'आनंद' आणि त्याची मैत्री पाहणे हा अनुभव काही औरच.
काही मुंबईकरांशी थोडे हाय-हेल्लो करून झाल्यावर कपडे बदलून पूलमधे उतरलो. कित्येक दिवसांनी खरेतर वर्षांनी असे ट्रेनिंग करायचे नसताना नुसता दंगा करायला म्हणून पूलमधे उतरलो त्यामुळे कळेच ना नक्की काय करावे. एक दोन हात मारले की पूलचा समोरचा काठ येई. मग चक्क बेबी पूलमधे मुलांसोबत खेळत बसलो. नंतर मग मुंबईकरही पाण्यात उतरल्यावर थ्रो बॉल च्या मॅचेस खेळलो. त्या दरम्यान खराखुरा पाऊसपण येत जात होता. खूप मज्जा आली. ( खरेतर हे वाक्य लिहून त्याला काट मारायची होती; पण कशी मारतात हे माहीत नसल्यामुळे आता मी लिहिले आहे त्याला काट मारली आहे असे समजा.) म्हणजे पावसात खेळायला मज्जा येतच होती पण आमची टीम दोन्ही वेळा हारली आणी हरायला कोणाला आवडते त्यामुळे त्या वाक्यावर काट आहे.
थोडावेळ इतरांचे रेनडान्स आणि (आता अतरंगी ने जगप्रसिद्ध केलेले) कजरारे नृत्य ई. बघून झाल्यावर मी पण शिंगे मोडून दोन डाव म्हणतात तसे दोन डाव्या पायांवर पावसातले कोळीनृत्य केले. सुदैवाने अतरंगीने बघीतले नसावे (त्याचे सुदैव) नाहीतर तो अजून शुद्धीवर आला नसता. (असे आता वाटते आहे) असो.
बराच वेळ पाण्यात खेळून झाल्यामुळे भूक लागली होती भराभर (गरम पाण्याची) आंघोळ करून भूक कितीही अनावर झाली असली तरी कुठल्याही प्रकारचा युरेका सीन क्रियेट न करता जेवण घरात गेलो. दुपारच्या जेवणात सामिष निरामिष दोन्ही प्रकारचे पदार्थ होते. भरपेट जेवण करून झाल्यावर झोपाळ्यावर झुलत असताना डोळ्यावर झापड येतच होती तर संयोजकांनी आता सांस्कृतिक कार्यक्रम होतील असे जाहीर केले. ववि ला यायची खूप हौस ना तुला मग भो आ क फ असे मनात म्हणत असताना एक संयोजकांनी दिलेली एक चिठ्ठी उचलली आणि बघतो तर काय त्यावर लिहिले होते भोआकफ. माझी झोपच उडाली ना राव. तुमच्या मनात काय थापा मारतोय खखोदेजा असा विचार आला असेल म्हणून सांगतो अगदी देवाशपथ सांगतो, काहीजणांच्या चिठ्ठ्यांवर अगदीं तेच लिहिले होते. दोन गटात विभागणी करण्याकरता ह्या भोआकफ आणि खखोदेजा ह्या दोन लघुरूपांचा वापर करण्यात आला होता. धमाल आली खेळायला. (हे ही वाक्य खरेतर लिहून त्यावर काट मारायची होती; पण कशी मारतात हे माहीत नसल्यामुळे आता मी लिहिले आहे त्यावर काट मारली आहे असे समजा. ) अर्थातच आमची टीम हरली.
सोबत आलेल्या नवरा बायकोनी एकमेकांना कॅडबरी भरवण्याच्या आणि उखाणे घेण्याच्या नंतर सांस्कृतीक कार्यक्रमाची सांगता झाली. ह्या दरम्यान छोटे कंपनीला व्यग्र ठेवण्याकरता योजलेल्या कल्पक उपक्रमामुळे सांस्कृतिक कार्यक्रम कोणाही लहान मुलाचा त्रास न होता पार पडला.
मग सगळे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडल्यावर सरते शेवटी ओळख परेडचा कार्यक्रम झाला. प्रत्येकाने आपापली आयडी, खरे नाव, प्रत्यक्ष आयुष्यात काय करतो, ववित सामील होऊन कसे वाटले वगैरे सांगीतले आणि अर्थात ज्यामुळे आपली ओळख झाली आणि एकत्र जमलो त्या व्यासपीठाबद्दलची मायबोलीबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली.
पावसाळी हवेत गरमागरम चहासोबत कुरकुरीत कांदाभजी असल्यामुळे, दुसरी प्लेट, 'नको नको म्हणताना गेली माझ्या पोटात ना , असे झाले अगदी.
ववि दरम्यान, काहींना आधी भेटलो होतो त्यामुळे त्यांना परत भेटून आनंद झाला. काहींना पहिल्यांदाच भेटलो तरी जुनी ओळख असल्यासारखे भेटलो तर काहींना मात्र पहिल्यांदाच भेटताना जसे वाटते अगदी त्याप्रमाणेच जुजबी भेटलो.
रिसॉर्ट छान आहे. आदरातिथ्य, तत्पर सेवा, व्यवस्थित राखलेली बाग आणि रेनडान्स स्विमिंग पूल पाथवेज ई. आऊटडोअर एरिया, स्वच्छ प्रशस्त खोल्या, चविष्ट जेवण सगळे काही छान होते. ह्याची निवड आणि अत्यंत उत्तम अशा बाकी सर्व गोष्टींच्या आयोजन-व्यवस्थेबद्दल संयोजकांचे आभार. कितीही आवडी-प्रेमाचा भाग असला तरी इतक्या लोकांना एकत्र आणल्यानंतर त्यांच्या अपेक्षेला पुरे पडेल अशी व्यवस्था करणे हे तेच करू जाणोत. त्यांच्या करता एजोटाझापा.
हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यो है ही बात सतावत असताना पुणेकरांनी मुंबईकरांचा निरोप घेतला आणि पुण्याकडे मार्गस्थ जाहलो.
तर सांगत होतो की तिकडून निघून यावे लागले ही गोष्ट सोडली तर,
वविला जशी धमाल होते असे ऐकून होतो अगदी तशीच ती झाली.
हुश्श!
"माझी पण " म्हणजे अजून कोणाची
"माझी पण " म्हणजे अजून कोणाची इच्छा मेली?
मला तर लई वाईट वाटतंय न आल्याचं. वृ वाचून तर अजूनच .
मस्त लिहिलंय वृतांत .फोटो झकास.
मला तर लई वाईट वाटतंय न
मला तर लई वाईट वाटतंय न आल्याचं. वृ वाचून तर अजूनच .>>>> मलापण.
हर्पेन, मस्त वृतांत.
हर्पेन, मस्त वृतांत.
मला तर लई वाईट वाटतंय न
मला तर लई वाईट वाटतंय न आल्याचं. वृ वाचून तर अजूनच .>>>>>> +१११११ मलापण…
ममो मला ओळखल्याबद्दल धन्यवाद
ममो मला ओळखल्याबद्दल धन्यवाद. एकदा प्रत्यक्षही भेटूया.
हर्पेन, परी रून्मेशला सांभाळत होती यात आलं की सगळं Wink अमितव होय रे लक्षातच आलं नाही.
ऋन्मेष, छान लिहिलायस रे वृत्तांत. रिसॉर्ट्चे फोटो ही छान! आणि तू ज्यांच्याशी वाद घालतोस ते दिग्गज कोण म्हणे.
हर्पेन मजा आली वाचताना (यावर
हर्पेन मजा आली वाचताना (यावर काट कशी मारायची माहिती नाही. पण बिघडत काही नाही कारण काट मारायची नाहीच आहे )
आपल्या गप्पा नाही झाल्या याचे वाईट वाटले (कोणाची चूक यात? असं विचारशील त्या आधीच कान पकडते स्वतःचे मागच्यावेळीही भेटलास तेव्हा नचिच्या कार्यक्रमात मी टेबल सांभाळत होते म्हणून गप्पा नव्हत्या झाल्या. आता गप्पाष्टकासाठी म्हणून भेटू )
सर्वांचे वृत्तांत धमाल आहेत
सर्वांचे वृत्तांत धमाल आहेत.फोटो पण.
Pages