सावधान! मोबाईल दुरुस्त करून आणल्यानंतर...

Submitted by अतुल. on 25 July, 2023 - 06:37

आता कायप्पा वर एक व्हिडिओ पाहिला. त्याची खातरजमा करूनच हे लिहीत आहे. मोबाईलवर काही एप्स ही ट्रॅकींगसाठी बनवलेली असतात. जसे की एखादया कंपनीला त्यांचे सेल्स एक्झिक्युटिव्ह कुठे कुठे फिरत आहेत हे ट्रॅक करता यावे, लहान मुलांच्या हाती मोबाईल असेल तर त्यांची फसवणूक होऊ नये म्हणून पालकांना मुलांच्या मोबाईलच्या ऍक्टिव्हिटीज ट्रॅक करता याव्यात इत्यादी उपयोग केवळ उदाहरणादाखल म्हणून सांगता येतील. म्हणजे अशी ऍप्स लेजिटीमेट आहेत. स्पायवेअर म्हणता येणार नाही. कारण ते इन्स्टॉल करताना यूजरच्या बऱ्याच परवानग्या वगैरे विचारल्या जातात आणि युजर्सना सेटिंग्जमध्ये जाऊन सुद्धा बरेच ऍक्सेस द्यावे लागतात. थोडक्यात, युजर्सना नकळत असे ऍप इन्स्टॉल होऊ शकत नाही.

पण याचा दुरुपयोग सुध्दा होऊ शकतो हे आता पाहिलेल्या व्हिडीओ वरून लक्षात आले. मोबाईल दुरुस्त करणाऱ्या एका भामट्याने असे एक ऍप एका मुलीच्या फोनमध्ये इन्स्टॉल करून ठेवले. आणि नंतर ती मुलगी फोनवर जे जे काही करते ते सगळे याला कळत होते. त्यावरून तो तिला ब्लॅकमेल करत होता.

दुरुस्त करण्यासाठी सोयीचे जावे म्हणून अनेकदा फोनवरचा महत्वाचा डेटा बॅकअप घेऊन आपण आपला फोन अनलॉक करून दुरुस्तीसाठी देतो. पण तेंव्हा हि एक शक्यता विचारात घेतली जात नाही. आणि दुरुस्त केल्यानंतर असे काही ऍप इन्स्टॉल करून जर त्याने फोन आपल्याला परत दिला असेल तर मग आपल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज ट्रॅक होतात आणि त्या व्यक्तीकडे जातात! फोटो, लोकेशन, मेसेजेस सर्व काही.

काय काळजी घ्यायला हवी?
हा काही व्हायरस किंवा स्पायवेअर नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. थँक्स टू गुगल की त्यांनी असे अशी काही प्रॉव्हिजन ठेवलेली नाही. त्यामुळे फोन दुरुस्त करून आणला की सेटिंग्ज मध्ये जाऊन ऍप्स कोणती इन्स्टॉल केली आहेत त्यावर एक नजर टाका. तिथे show hidden apps किंवा show system apps असे पर्याय असतील तर त्यातले ऍप्स सुद्धा पाहायला विसरू नका त्यामध्ये कोणतेही संशयास्पद/अनोळखी ऍप दिसले (जे तुम्ही कधीच इन्स्टॉल केलेलं नाही असे) कि ते अनइन्स्टॉल करा. किंवा जर काही कळले नाही तर एखाद्या टेक्निकल व्यक्तीला (तो फोम दुरुस्त करणारा सोडून) विचारा.

काळजी घ्या!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे प्रकरण आणि असा एक विडिओ तीन वर्षांपूर्वी पाहिला होता.
विश्वसनीय रिपेरिंगवाले कुठे मिळणार? शहरात असे जे असतात ते फोन बघून एस्टिमेट देण्याचेही २००-४०० रुपये घेतात.

आमच्या ग्रुपवर पण असा व्हिडीओ कोविडच्या आधी आला होता.
बरेचदा मोबाईलचा प्रॉब्लेम झाल्यावर युट्यूबवर आधी सोल्युशन पाहिलं तर फायदा होतो.
एकदा पावसाचे थेंब पडल्याने मोबाईलचा डिस्प्ले नीट येत नव्हता. तांदळाच्या डब्यात दोन दिवस ठेवल्यावर व्यवस्थित चालायला लागला. Lol
जुगाड Proud

चांगला धागा.
फर्जी सीरीज मधे दाखवल्या प्रमाणे whatsapp हॅक केलय का बघण्यासाठी- सेटींग मधे जाऊन लिंक्ड डीवाईस (जर कुठले डिवाईस लिंक असले तर ते दिसते) मधे बघावे. असेल तर ते अनलिंक करावे.

युट्यूबवर आधी सोल्युशन पाहिलं तर फायदा होतो पण भाराभर विडिओ उपसावे लागतात, वीस सेकंद जाहिराती_लाइक_शेअर_सबस्क्राइब_नंतर दोन वाक्ये हाती लागतात.

खूप जुना अनुभव आहे.
खूप लोकांचा विश्वास पण बसणार नाही .पण सत्य आहे.
जेव्हा इंटरनेट २रुपये प्रतिदिन आणि ७ रुपये प्रतिदिन असे होते.
आता नीट आठवत पण नाही पण ७ रुपये प्रतिदिन हे अनलिमिटेड होते.

एअरटेल नी मला फ्री मध्ये दिले होते का?
ते पण नाही माहीत.
तीन वर्ष तरी मी फुकट वापरले असेल.एकदा तर मी customer care नंबर ल कॉल करून पण सांगितले तुम्ही मला फ्री मध्ये इंटरनेट देत आहात..त्या नंतर पण एक वर्ष फ्री च चालू होते.
. माझ्याकडे नोकिया च full screen touch mobile होता.
१०००० चा असावा .
त्याला फक्त पुढचा कॅमेरा होता सेल्फी कॅमेरा नव्हता पण पॉइंट समोर दिसत होता.
तेव्हा सर्व च नवं नवं होते.
काही पण ॲप download कर ,काही ही बटन न दाब असले प्रयोग असायचे.
आणि मी काय download केले माहीत नाही .
पण सेल्फी कॅमेरा त्या मोबाईल चा चालू झाला.
कंपनी नी ती सुविधा दिलीच नव्हती.
थोडक्यात सॉफ्टवेअर काय करू शकतात त्याची ती झलक होती

@ हेमंत,
जेव्हा मोबाईलमध्ये फ्रंट कॅमेरा नसायचा तेव्हा मी मोबाईल उलटा पकडून सेल्फी काढायचो. तेव्हा सेल्फी हे नावही प्रचलित नव्हते.
थोडक्यात ईच्च्छा तिथे मार्ग्ग