स्पायवेअर

सावधान! मोबाईल दुरुस्त करून आणल्यानंतर...

Submitted by अतुल. on 25 July, 2023 - 06:37

आता कायप्पा वर एक व्हिडिओ पाहिला. त्याची खातरजमा करूनच हे लिहीत आहे. मोबाईलवर काही एप्स ही ट्रॅकींगसाठी बनवलेली असतात. जसे की एखादया कंपनीला त्यांचे सेल्स एक्झिक्युटिव्ह कुठे कुठे फिरत आहेत हे ट्रॅक करता यावे, लहान मुलांच्या हाती मोबाईल असेल तर त्यांची फसवणूक होऊ नये म्हणून पालकांना मुलांच्या मोबाईलच्या ऍक्टिव्हिटीज ट्रॅक करता याव्यात इत्यादी उपयोग केवळ उदाहरणादाखल म्हणून सांगता येतील. म्हणजे अशी ऍप्स लेजिटीमेट आहेत. स्पायवेअर म्हणता येणार नाही. कारण ते इन्स्टॉल करताना यूजरच्या बऱ्याच परवानग्या वगैरे विचारल्या जातात आणि युजर्सना सेटिंग्जमध्ये जाऊन सुद्धा बरेच ऍक्सेस द्यावे लागतात.

Subscribe to RSS - स्पायवेअर