इन्स्टा गर्ल परी - रील्स आणि शॉर्ट विडिओ :-)

Submitted by ऋन्मेऽऽष on 1 July, 2023 - 14:42

इन्स्टा गर्ल परी - रील्स आणि शॉर्ट विडिओ Happy

हा लेकीच्या इन्स्टा रील्सना जोडून केलेला युट्यूब व्हिडिओ.
https://www.youtube.com/watch?v=5eAfuoDOpG0

विडिओ आवडला तर तिला ईन्स्टाला फॉलो जरूर करा.
हे लेकीचे इंस्टाग्राम अकाउंट
https://www.instagram.com/paruli_naik/?igshid=MzRlODBiNWFlZA%3D%3D

(याऊपर तिच्या काही इन्स्टा रील्सना युट्युब शॉर्ट व्हिडिओ स्वरूपात अपलोड करायचाही विचार आहे. अजूनही कोणाचे काही सजेशन असल्यास आवडेल. कारण मी या बाबतीत अगदीच कच्चा आहे.)

तर हो, आमची पोरगी वय वर्षे नऊ, इंस्टा रील्स बनवते. ते तिच्यासाठी या वयात चांगले की वाईट यावर सारासार विचार करून अखेर आम्ही तिला परवानगी दिली. स्वतःचे इन्स्टा अकाउंट उघडून दिले. पुढे मागे तिची ईच्छा असल्यास युट्यूब चॅनेलचाही विचार करता येईल.

जेव्हा तिला सुरुवातीला रिल्स आणि शॉर्ट्स बघायची सवय लागली. तेव्हा तिला त्याचे ॲडिक्शन होण्यापासून होण्यापासून आम्ही रोखले. कारण त्यात ती काय बघेल आणि त्यातले काय उचलेल यावर आपला काही कंट्रोल नसतो. डोळ्यांची वाट लागते ते वेगळेच. पण एकदा अशी मोबाईलची सवय लागली की मुले मैदानी खेळ सोडून घरकोंबड्यासारखे मोबाईललाच एका जागी चिकटून बसतात असे पाहण्यात आहे.

पण जेव्हा स्वतः रिल्स बनवायला लागली तेव्हा परवानगी सोबत प्रोत्साहन सुद्धा दिले. कारण इथे तिची क्रिएटिव्हिटी वापरली जाते. बघण्यापेक्षा बनवताना डोळ्यांना त्रास कमी होतो. तसेच एका जागी बसून राहणे होत नाही. सतत काहीतरी वेगळे करायची धडपड राहते. महत्त्वाचे म्हणजे स्वनिर्मितीचा आनंद मिळतो.

आता आम्ही घरी बेडरूम मध्ये रिल्स बनवतो, किचनमध्ये बनवतो, हॉलमध्ये बनवतो, बाल्कनीमध्ये बनवतो..

सोसायटीच्या गार्डनमध्ये बनवतो, पार्किंगमध्ये बनवतो, लिफ्ट मध्ये बनवतो, स्टेअरकेसवर बनवतो..
स्विमिंगपूल मध्ये उड्या मारत बनवतो, गार्डनमधील स्लाईडवर उलटे लटकून बनवतो..

गिरगाव चौपाटीवर बनवतो, मरीन ड्राइव्हवर बनवतो, हँगिंग गार्डनला बनवतो, गेट वे ऑफ इंडियाला बनवतो..
आमच्या हक्काच्या माझगावच्या डोंगरावर बनवतो... जिथे जाऊ तिथे बनवतो.

जाता जाता टॅक्सीत बनवतो, ट्रेनमध्ये बनवतो, अगदी चालताचालता ही बनवतो..

वेगवेगळे कपडे बदलतो, वेगवेगळे पार्टनर बदलतो, वेगवेगळे प्रयोग करतो...
कधी नाचतो, कधी गातो..
कधी अभिनय करतो, तर कधी स्टंट करतो..

इथे क्रिएटिविटी दाखवायला मर्यादा नाही हे नक्की.. आणि आता तर फक्त सुरुवात झाली आहे. तिलाच प्रोत्साहन मिळायला म्हणून हा धागा Happy

जर रिल्स आवडल्या तर केवळ लाईक करून थांबू नका, ईन्स्टाग्रामवर फॉलो जरूर करा Happy
पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे कौतुक करायला विसरू नका Happy

----------------

याउपर धाग्यावर अजून एक मदत चर्चा स्वरूपात झाली तर आवडेल.

अश्या सोशल साईटवर मुलीला अकाउंट तर उघडून दिले आहे. पण सोबत तिच्या सुरक्षिततेची काळजी ही सुद्धा माझी जबाबदारी आहे. मी स्वत: याआधी कधी Instagram काय असते हे बघायला गेलो नव्हतो. त्यामुळे त्यादृष्टीने काय सावधगिरी बाळगायला हवी किंवा तिला काय सूचना देणे गरजेचे आहे, प्रोफाईल सेटिंग कशी ठेवावी अश्या बेसिक गोष्टींपासून जाणून घ्यायच्या प्रयत्नात आहे. कोणाकडे योग्य माहिती असल्यास प्लीज शेअर करा.

फक्त एक विनंती, वादविवाद टाळा. धाग्यावर शंभर प्रतिसाद होण्यापेक्षा तिचे ईन्स्टावर पाचशे फॉलोअर झालेले आवडेल Happy

दोन्ही लिंक्स पुन्हा देतो,

युट्यूब विडिओ - https://www.youtube.com/watch?v=5eAfuoDOpG0
ईन्स्टा अकाऊंट - https://www.instagram.com/paruli_naik/?igshid=MzRlODBiNWFlZA%3D%3D

धन्यवाद,
ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ आशू,
ज्याचा त्याचा ज्याने त्याने योग्य पर्याय शोधून काढावा
>>>>>

+786

हळू हळू लहानपण विसरून १ सेलिब्रिटी वलय येत जाईल...
>>>>>
याबाबत आम्ही लहानपणापासून तिच्याबाबत सजग आहोत. शेजारीपाजारी करणारे कौतुक देखील कधी तिच्या डोक्यात जाऊ नये याची नेहमी काळजी घेतो.
लहानपणी तिच्या रंगरुपामुळे तिला काही फोटोशूट मॉडेलिंग ऑफर यायच्या त्यावरही कधी विचार केला नाही. कारण त्यात तिच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास शून्य होता. नुसते आमची पोरगी बघा कशी या जाहिरातीत, या पोस्टरवर चमकली हे कौतुक कधीच नको होते.
मला तर तिचे प्रचंड कौतुक आहे. ते ही कधी मी तिच्या पर्यंत पोहोचू देत नाही.

असे व्हिडीओ बनवून पोस्ट करण्याचा उद्देश काय असतो साधारणतः मुलांच्या बाबतीत....? कुतुहल म्हणून विचारतेय
तुमची मुलगी चांगला अभिनय करतेय..... speech & drama course साठी enroll karu शकता.

https://www.helenogrady.co.in/ हे पहा

Raëll Padamsee's ACE Productions हे सुद्धा एक आहे.

अभिषेक, हा मूर्खपणा वेळीच थांबवा ही नम्र विनंती. परी अजून छोटी आहे, तुझी attention seeking ची सवय तिला लागू नये. शुभेच्छा.

मुलांच्या डोक्यात हवा जाऊ शकते... त्यांच्यावर परफॉर्मन्स pressure येऊ शकतं हे अगदीच मान्य आहे.
इथे पालकांची जबाबदारी अतिशय महत्वाची आहे.
एक अनुभव सांगावासा वाटतो.
एकदा youtube वर एक छान मराठी सिरीयल बघण्यात आली, आणी एकदम एक ओळखीचा चेहरा दिसला. मी पुढचे पण एपिसोडस बघून खात्री करून घेतली. अतिशय सुंदर अभिनय केला त्याने.

मी सध्या एका क्लास मधे पाचवी ते दहावी चे वर्ग शिकवते. तिथला पाचवीच्या क्लास मधे गणितातला एक अतिशय गोड आणी हुशार विद्यार्थी अगदी लक्षात राहण्यासारखा आहे. सिरीयल मधला मुलगा तोच होता.
मी दुसऱ्या दिवशी त्याला विचारलं, तेव्हा बाकी सगळ्यांना कळलं. तो पर्यंत त्याने सिरीयल मधे काम केलंय हे कुणालाही माहित नव्हतं.

@ मी अमी
असे व्हिडीओ बनवून पोस्ट करण्याचा उद्देश काय असतो साधारणतः मुलांच्या बाबतीत....?
>>>>>

पोस्ट करण्याचा उद्देश कोणीतरी बघावे आणि कौतुक करावे असाच असेल.
इथे माबोवर किंवा कुठेही सोमिवर कथा कविता प्रकाशित करताना लेखकाचा उद्देश हाच असावा.

जेव्हा या आधी तिला पोस्ट करायची परवानगी नव्हती तेव्हाही काहीबाही बनवून आम्हाला घरच्या घरी दाखवायची. कोणीतरी ते बघून appreciate करने सुद्धा तितकेच गरजेचे असावे. आणि हे नैसर्गिक असावे..

ड्रामा लिंक बद्दल धन्यवाद. चेक करतो. तिला याची आवड आहे आणि तिला जमते हे मला फार आधीच जाणवलेले. साधारण चार पाच वर्षांची असतानाही तिला मराठी नाटकांच्या एका क्लासला पाठवलेले. पण त्यांनी शिकवले तर काहीच नाही. नुसते हस्तकलेच्या Activity च चालायच्या. आणि नंतर तिथे साधारण गटबाजी दिसली म्हणून सहा महिन्यांनी सोडले. याउपर डान्स क्लास आणि गायनक्लास (तिलाच हुक्की आली म्हणून) करून झाले. पण तसेच dedication नसल्याने तिने ते सोडले. स्पोर्टमध्ये गती वाटली म्हणून मार्शल आर्ट, खो खो, हॉकी ट्राय करून झाले. पण सगळीकडेच धरसोड झाली.

तरी आता हे रिल्स मधून तिचे मन भरले की तिला encourage करून अश्याच एखाद्या क्लासला पाठवायचा विचार तर आहे. जेणेकरून काहीतरी ठोस करेल आयुष्यात. त्यामुळे आपण दिलेल्या पर्यायांबद्दल धन्यवाद. आज न उद्या कामी येतील.

शर्मिला हा किस्सा शेअर केलात त्याबद्दल धन्यवाद. विचार करण्यासारखा आहे. डाऊन टू अर्थ राहणे जिथे मोठ्यांना जमत नाही तिथे लहान मुलांची विशेष काळजी घेणे गरजेचे.. हा किती महत्त्वाचा गुण आहे हे त्यांच्या मनावर बिंबवणे गरजेचे..

शरदजी प्रामाणिक प्रतिसादाबद्दल आभार. पण आता तिला परवानगी दिली आहे तर असे इतर कुणाला रूचले नाही म्हणून लगेच थांबवणे तिच्यावर अन्यायकारक ठरेल. तरी नियंत्रण ठेवायचा प्रयत्न करेन.

बाकी तिची माझी तुलना नको. एक थोडेफार लिखाण सोडलं तर मी टॅलेंटच्या नावावर झिरो आहे. त्यामुळे मला माझे दुकान चालवायला काहीतरी उडपटांग करावे लागते. तिला याची गरज पडू नये Happy

पाहिले विडियो .. मस्त आहेत.. माझं Instagram account नाही त्यामुळे तिला फॉलो करता येणार नाही.. नाहीतर केलं असतं.
हावभाव मस्त जमलेत लेकीला...
भविष्यात जर तिचा इंटरेस्ट टिकला तर अभिनय शिकायला हरकत नाही...

रुपाली पाटील धन्यवाद
हो, अभिनय किंवा त्या क्षेत्रातले काहीही केले तर आवडेलच Happy

इथल्या चर्चेने इथले प्रतिसाद थांबले तरी ज्या माबोकरांनी फॉलो केले, लाईक केले त्या सर्वांचे इथेच आभार मानतो Happy

ऑफिस कलीगमध्येही या लिंक्स शेअर केले असल्याने काही फॉलोअर्स तिथून आले. मुलगी या सर्वात खुश आहे आता.

यातून पुढे काही चांगली दिशा, चांगला मार्ग मिळाल्यास इथेच अपडेट देईन. सर्वांचे मनापासून धन्यवाद Happy

Pages