वर्षाविहार २०२३: वविनाट्याची पहिली घंटा

Submitted by ववि_संयोजक on 12 June, 2023 - 07:36

लोणावळा खंडाळा
रिसॉर्ट की शेतमळा
कुठं कुठं जायाचं वविला?
बोला कुठं कुठं जायाचं वविला
मैतर जमवून, कल्ला बी करून
घालवूया चला ह्यो कंटाळा
सांगा तुम्ही येताय ना वविला?
अहो सांगा तुम्ही येताय ना वविला...

विजय साळगावकरसाठी २ ऑक्टोबर जितका महत्त्वाचा त्याहून आपल्यासाठी ३० जुलै महत्वाचा.
दोस्तहो, मायबोली वर्षाविहाराची तारीख ठरली ३० जुलै २०२३!

३० जुलैला international friendship day पण आहे. मौका भी है| दस्तूर भी है |
मायबोली मैत्री दिन साजरा करायला आम्ही उत्सुक आहोत. तुम्हीही आहात ना?

यंदाचा वर्षाविहार कुठे?
दवंडी लवकरच.
तोपर्यंत, 'इथेच टाका तंबू!'

VaVi2023Teaser03.jpg

Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

३० जुलैला international friendship day पण आहे.
>>>>
नवीन धाग्याचा विषय सुचवल्याबद्दल धन्यवाद.
मी वविला आलो तर हा धागा 29 च्या मध्यरात्री काढून येईन Happy

जोक्स द अपार्ट,
पुढच्या डिटेल ची वाट बघतोय

सर्वात वर जो उभा आहे तो, मल्लिनाथ आहे काय >>>

एवढी स्टील बॉडी माबोवर अजून कुणाची आहे का?

वा वा.... ववि ची नांदी मस्त.... यायला जमलं नाही तरी वॄत्तांत वाचन हे फार आवडीचं काम आहे माझं.
रच्याकने, मैत्री दिन ऑगस्ट च्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो ना ? मग ३० जुलै ला कसा काय असेल ?

मायबोली स्पर्श म्हणजे

१ कोण्या माबोकराच्या रचना टीशर्टावर छापलेल्या
किंवा
२. माबोकराने केलेले सुलेखन वापरून ते टी शर्टावर छापलेले
किंवा
३. माबोकरांनी तांब्याच्या तारा वापरून बनवलेले पदक गळ्यापाशी लावलेला डिझायनर टी शर्ट
अगदी खरोखरचा स्पर्श Wink

असे काहीतरी असावे

.

ववी ची पूर्ण माहिती कुठे मिळेल?
कसे जाणार, कुठे, खूप लहान मुले असतील तर व्यवस्था कशी वगैरे वगैरे.
आणि येणार किंवा नाही हे कुठे register करायचं

ववि कुठे होणार, किती पर हेड कॉस्ट, रूपरेषा कसे जाणार, रूट काय सगळी माहीती एकाच धाग्यावर असते. बहुधा लवकरच तो धागा संयोजक सुरू करतील. तोवर टीशर्ट्स चा हा धागा पाहिला नसेल तर पाहा आणि आवडले असल्यास ऑर्डरही करा Happy

धन्यवाद योकु
रमा ओम ची सोय होणार असेल तर येण्यासाठी उत्सुक आहे मी.
कारण ते दोघे खूप लहान आहेत त्यांना घेऊन एकटीने बाहेर जाणे is very tough

लहान मुलांची सोय होते वविला..
जा बिंदास तो विचार न करता Happy

मी संयोजक नाही.. पण दहा वर्षांपूर्वी एका वाविचा अनुभव आहे

आधी जाऊन आलेल्यांपैकी कुणी साधारण काय रूपरेषा/स्वरूप असते सांगेल का?
(अधिकृतपणे तपशिलात हे नंतर जाहीर करतीलच पण आधीचे ववि कसे होते थोडक्यात कळले तर अंदाज येईल)

अतुल,

याआधीच्या वविचे वृत्तांत तुम्हाला हितगुज मधे सापडतील. तुम्हाला ते वाचून अंदाज येईलच.

उदाहणादाखल हे काही…

२०१६
https://www.maayboli.com/node/58892

२०१५
https://www.maayboli.com/node/54219

२०१४
https://www.maayboli.com/node/49364

बाकी अजून काही हवे असेल तर ईथेच विचारा.

आतुल, हे २०१६ च्या ववि चे धागे पाहा बरं!
सर्वसाधारणपणे रूपरेषा, आराखडा यात कळेल आणि अश्या प्रकाराने ववि होतो.
संयोजकांपैकी २-३ तरी फोन नंबर्स असतात रिचेबल तर तशी गडबड होत नाही. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट्स कडे मोस्टली सगळी माहीती असते शक्यतो...
तर बरेच प्रश्न उत्तरल्या जावेत या लिंक्स मुळे -
वर्षाविहार २०१६
मायबोली वर्षाविहार २०१६ - बस मार्ग
वर्षाविहार २०१६-वृत्तांत आणि प्रतिक्रिया

वॉव !!!