भारताच्या रेल्वे इतिहासातील सर्वात दुर्दैवी व भीषण अपघात

Submitted by ढंपस टंपू on 3 June, 2023 - 23:49

भारताच्या रेल्वे इतिहासात आजवर अनेक अपघात झाले. पण परवा बालासोर इथे झालेला दुर्दैवी अपघात हा समोरासमोर तीन रेल्वेगाड्यांची टक्कर झाल्याने भारताच्या रेल्वे इतिहासातला अत्यंत भीषण अपघात म्हणावा लागेल. या आधी ६ जानेवारी १९८१ रोजी बिहार मधे बागमती नदीत रेल्वेगाडी घसरून ७०० प्रवाशांचा मृत्यू झाला होता. हा आजवरचा सर्वात भीषण अपघात समजला जातो.

बालासोरच्या दुर्दैवी घटनेत आता पर्यंत २९४ मृत तर ११०० प्रवासी जखमी आहेत. जस जसे मदत कार्य पुढे जाईल तसतसा मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

पण ज्या पद्धतीने तीन ट्रेन्स एकमेकांना धडकल्या ते पाहता यात मानवी चूक आहे का असा प्रश्न पडतो. आतापर्यंत २९५ लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. नदीत पडल्याने मृतांचा आकडा जास्त असणार हे उघड आहे. ती घटनाही लाजिरवाणीच आहे. पण तीन गाड्या एकमेकांवर कशा काय धडकू शकतात ? यात मानवी चूक आहे का ?

रेल्वेमंत्री वैष्णव यांनी आता कवच तंत्रज्ञानामुळे रेल्वे अपघात विसरून जा असे त्यांच्या एका प्रेझेंटेशन मधे सांगितले होते. तरी हा अपघात कसा काय झाला ?

जगभरात भारताच्या रेल्वेगाड्या, इंजिन्स निर्यात करण्याची घोषणा केली होती. या अपघातामुळे आयात करणार्‍या देशांवर परिणाम होईल का ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आरोपीचे नाव सांगून हिंदू धर्म अधोरेखित करण्याची खवखव मिटल्या शिवाय चैन कशी पडेल ?### लूक, who इज टालकिंग >>>>>>
अब आये लाइन पे !
हिंदू आरोपींची नावे टाकल्या मुळे तुमच्या आणि आमच्यातील फरक नाहीसा होतोय .

लूक, who इज टालकिंग Proud

>>>दांभिकपणा तरी किती करावा. आधी भडक भगवे जुने व्हिडिओ उकरून काढतात. त्यानंतर हा मुस्लिम माणूस आहे असे खोटे फेकतात. मग कुणी फॅक्ट चेक केले की रडणार हेच आणि "तुम्ही आमच्यासारखे आहात" म्हणणार

धाग्याचा विषय नाही , पण शेकडो अब्दुलनी लव जिहाद मध्ये हिंदू मुलींना देशोधडीला लावले हे उघड्या डोळ्यांनी दिसत असताना अब्दुल प्रेमीची थूंक टँक ते मान्य करत नाही , उलट विदा मागण्याचा निर्लज्जपणा करतात.
उत्तम क्वालिटी चा दांभिकपणा तो हाच .....

धाग्याचा विषय नाही, पण प्रत्येक धाग्यावर तेच तेच लिहिण्यासाठी तुमच्या आयडीचा जन्म आहे.
बघा हो अ‍ॅडमिन.

पोलखोल? Lol
आता तुम्ही विषयांतर केलं तर मी भाजप का हाथ बलात्कारियोंके साथची यादी पुन्हा देऊ का? एकट्या ब्रिजभूषणने शेकडो मुलींशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. पण तुमच्या मते तो त्या मुलींचा उद्धार करत होता, नाही का? आणि दुसर्‍याला दांभिक म्हणताय!

अ‍ॅडमिन, खरंच यांच्याकडे बघा. यांच्यामुळे सगळ्यांनाच विषयाला सोडून लिहावं लागतं. हे जिथे तिथे असं संदर्भहीन आणि तथ्यहीन लिहीत असतात. वेगळा धागा काढून लिहा म्हटलं तर तेही करत नाहीत. वर इतरांना काय काय विशेषणं लावत असतात.

अ‍ॅडमिन, खरंच यांच्याकडे बघा. यांच्यामुळे सगळ्यांनाच विषयाला सोडून लिहावं लागतं. हे जिथे तिथे असं संदर्भहीन आणि तथ्यहीन लिहीत असतात. वेगळा धागा काढून लिहा म्हटलं तर तेही करत नाहीत. वर इतरांना काय काय विशेषणं लावत असतात. >>>>>>>>
काय काय विशेषण लावत असतात ?
भरत साहेब सारख्या माबो वरील कुप्रसिद्ध फेमिनिस्ट ला त्यांच्या कर्माची वारंवार आठवण करून द्यावी लागते .
धाग्यांचा विषय काहीही असो पण हे साहेब संघीं बायकांच्या सेक्शुअल फ्रस्ट्रेशन चा parameter मोजत असतात ...Screenshot_20230503_130421_Chrome.jpg

लोल. ही पण तुमची नेहमीची टेप झाली आहे. स्वतः अडचणीत आलात की वाजवता.
या माझ्या कमेंटबद्दल तुम्ही अ‍ॅडमिनकडे तक्रार केली होती ना? मग जिथे तिथे ती चिकटवून काय होणार? जोडीला वैद्यबाईंच्या त्या ट्वीटचा पण स्क्रीनशॉट द्या. तुम्हांला आणखी एक प्रश्न - तुम्ही भाजी घ्यायला गेलात तर भाज्या बघता की भाजीवालीची चेहरेपट्टी, मेकप, हेअर स्टाइल?

तुम्ही आणखी एक करा. महिला पहिलवानांच्या धाग्यांवरचे तुमचे प्रतिसाद प्रतिसाद तुमच्या घरातील महिलांना वाचायला द्या. हवं तर हे मी लिहिलेत म्हणून सांगू नका.
असो. तुमच्यावर आज भरपूर वेळ वाया घालवला. तेच तेच सगळ्या धाग्यांवर लिहायला मला आवडत नाही आणि तेवढा वेळही नाही.

म्हणूनच तोंडाच्या वाफा करू नये !
वागण्यात , बोलण्यात आचरणात फरक असला की तुमच्यासारखे उघडे पडतात असो Happy

हा विकृत माणूस त्या इंजेक्शन वाल्या विकृत व्यक्ती पेक्षा वेगळा नाही. स्त्रियांवरील अत्याचार उगाळून आनंद मिळत असतो

मीरा रोड चा हिंदू लव्ह झिगाड वाचला की नाही?? करवत वापरलं , पण त्याचं नाव आफताब नाही ना.

साधे उत्तम दर्जा रेल्वे स्थानक स्वतंत्र भारतात निर्माण झाले नाही.
मग बाकीच्या सर्व थापे बाजी सोडून ध्या.
कोणतीच उत्तम दर्जा ची संरक्षण यंत्रणा रेल्वे कडे नाही
ना स्किल्ड वर्कर रेल्वे कडे आहेत.
ना रेल्वे बोर्ड आणि रेल्वे खाते ह्यांच्या कडे पुढील 100 वर्षाचा विचार करून कोणती योजना आहे.
यूपी,बिहार मधून महाराष्ट्र,दक्षिण भारत, दिल्ली,गुजरात इकडे नवीन गाड्या चालू कारणे इतकेच ह्यांचे कार्य.
व्हिक्टोरिया टर्मिनस ( सीएसटी) १८९७ ला ब्रिटिश सरकार नी बांधले आहे.
आज पण ते गर्दी सहन करण्यास पुर्ण सक्षम आहे मुंबई मधील ,नवी मुंबई मधील आधुनिक काळात बांधलेल्या रेल्वे स्टेशन पेक्षा खुप सरस आहे.
प्रचंड आकार,चारी बाजूने मोकळी हवा.देखणी इमारत,प्रचंड मोठी पार्किंग स्पेस .
काहीच उणीव काढू शकत नाही.
बाकी सर्व स्टेशन वर.
ना प्लॅटफॉर्म च योग्य आकार,ना योग्य size, कोंदाड वातावरण, बाहेर पडले की अरुंद रस्ते, ना पंखे ना,स्वच्छता गृह.
भंगार दर्जा.
भारताला का स्वतंत्र हवं होते ते आज पण मला कळत नाही.
प्रशासन ,सरकार ह्यांचं दर्जा आपल्याला राखता च आला नाही.
आणि हे आपल्याला जमणार नाही ह्याची जाणीव पण लोकांना होती

ना प्लॅटफॉर्म च योग्य आकार,ना योग्य size, कोंदाड वातावरण, बाहेर पडले की अरुंद रस्ते, ना पंखे ना,स्वच्छता गृह.
भंगार दर्जा.
भारताला का स्वतंत्र हवं होते ते आज पण मला कळत नाही.
प्रशासन ,सरकार ह्यांचं दर्जा आपल्याला राखता च आला नाही.
>>>>>>>>>>>
णिषेध !!!!!!
या हलाखीस फक्त भाजपच जबाबदार आहे .....

Bjp जबाबदार नाही.पण आंब्याच्या झाडाला आंबेच येतील ना.
कोणताही पक्ष सत्तेत असला तरी त्या पक्षात ह्याच खाणीतील कोळसा असणार आहे.आज पर्यंत इतकी सरकार विविध पक्षांची आली कोणी पण सांगावे त्यांना काही फरक जाणवला का?

आता bjp सत्तेत नसती काँग्रेस असती तर अपघात झालाच असता.
यंत्रणा योग्य दर्जा च्या नसल्या मुळे अपघात झाला आहे.
Bjp काय काँग्रेस काय प्रशासकीय दर्जा एक च.
फक्त काँग्रेस नी हा घातपात आहे असा संशय घेतला नसता.
ज्यांना तांत्रिक ज्ञान आहे अशाच लोकांना अपघाताची चोकशी करायला सांगितले असते.
CBI ज्यांना बिलकुल तांत्रिक ज्ञान नाही.
त्या सीबीआय ला तपास करण्यास बिलकुल सांगितले नसते.
हा दोन्ही पक्षात फरक आहे.
सीबीआय काय ढेकळे तपास करणार.इतके पण ह्यांना समजत नाही.
अडाणी (अडाणी चे भाऊ ) कुठले

अहो ते सगळ्या विषयातले एक नंबर एक्स्पर्ट आहेत. सीबीआय नाव ऐकले की ते आपले ज्ञानकण विखुरणार.
सीबीआय ने काय कमिटी स्थापन केली आहे, कोण लोक नेमले आहेत, त्यात कोणी रेल्वे सिस्टिमचे तज्ञ आहेत की नाहीत असे किरकोळ प्रश्न त्यांना सुचत नाहीत. सीबीआय म्हणजे मर्डर वाले, ह्यावरून ते मत ठोकायला मोकळे आहेत.

ते आंदोलन करणारे wrestlers पण रेल्वेमध्ये नोकरी करतात. ही एक नवीनच माहिती अलीकडे पुढे आली.
(हे वाक्य म्हशीच्या मालकाचे नाव धर्मा मांडवकर आहे ही एक नवीनच माहिती पुढे आली या धर्तीवर वाचावे. )
With a workforce of 1.3 million people, Indian Railways is one of the world's largest employers. ही washington DC शहराच्या दुपटीहून अधिक लोकसंख्या झाली. किंवा भारतीय आर्मीच्या headcount इतकी संख्या आहे. आर्मीची प्रत्येक देशाला गरज असते. पण रेल्वेत इतक्या लाखो कर्मचाऱ्यांची नेमकी काय गरज आहे? स्पोर्ट्सवाल्याना नोकरी रेल्वेत कशासाठी देतात? स्पोर्ट्स academy त देणं समजू शकतं. मुळात इतके लोक कशाला लागतात? रेल्वेचा सगळ्यात जास्त बजेट पोर्शन हा पगार आणि घसघशीत जुनी पेन्शने देण्यात खर्च होतो. (इन्फ्रा बिल्डअप , equipment, capital layout साठी नाही.)
अर्थात यामागे काहितरी टिपिकल डावा विचार असणार की सरकारी नोकरी ही employer ला गरज आहे म्हणून केलेलं hiring नसतं तर जन्मसिद्ध हक्क म्हणून सरकारी तिजोरीतून नोकरी दिली जाते.
किंवा मग भारतीय रेल्वे अजिबात bloated नाही , इतकं hiring लागतंच- याचं काहीतरी explanation द्या.

ओहोहो. आंदोलक पहिलवानांचा संबंध अपघाताशी जोडायचा पाहायचं राहिलं होतं. तेही झालं.
१. शुक्रवार मशीद
२ आरक्षण
३ राहुलचा परदेश दौरा
४ ममता
५ पहिलवान.
सीबीआय् ला तपासायला बरेच अँगल्स आहेत.

अपघातस्थळाजवळचं प्रार्थनास्थळ इस्कॉन टेंपल होतं आणि इस्कॉनवालेच मशीद मशीद म्हणून बोंबलत होते. amazing Krishna Consciousness

काही तरीच.
भ्रष्ट अधिकारी, भ्रष्ट प्रशासन हे पण रेल्वे च .
हे जितका भ्रष्टचार करत असतील तितका पैसा पगारावर पण खर्च होत नसेल.
लोकांना योग्य पगाराची नोकरी उपलब्ध करून देणे ही सरकार ची जबाबदारी आहे.
ती जबाबदारी च नको असेल तर सरकार तरी कशाला हवं .
लोक जंगलात राहतील आदिम काळात राहत होते तसे .

किती करोड चे विमान आहे पंतप्रधान व्यक्ती चे.
त्यांच्या संरक्षण वर देशाचा किती पैसा खर्च होतो.
ते पण जाहीर करा.
भारतात सरकार चालवणाऱ्या आमदार,खासदार वर च खूप मोठा सरकारी महसूल खर्च होतो.
भ्रष्ट प्रशासन न मुळे खूप मोठा सरकारी महसूल हडप केला जातो.
त्या वर मात्र हे सरकार समर्थक एक शब्द बोलत नाहीत.
समाजवाद आणि भांडवल वाद हे विचार एकत्रित
राबवायचे असतात.
नाकाने कांदे सोलायचे असतील तर एक रुपया पण भ्रष्टचार सरकारी यंत्रणा कडून होणार नाही ह्याची हमी द्यावी.
Cm, असू किंवा pm office madhyech बसा .
दौरा करायचा असेल तर स्वतःच्या पगारातून करा .
मग एसटी नी प्रवास करा किंवा railway madhye general डब्यात

लोकांना योग्य पगाराची नोकरी उपलब्ध करून देणे ही सरकार ची जबाबदारी आहे.//

हे झेपत नाहीये. लोकांना पैसे देणं ही सरकारची जबाबदारी आहे इतपत ठीक आहे. करोना काळात ट्रम्पने पैसे वाटले होते आणी मोदींनी धान्य रेशन दिलं होतं. आता AI च्या काळात नोकऱ्या अजून कमी होणार मग त्यावेळी पैसे नक्कीच द्यावे. पण नोकऱ्या कशाला द्यायच्या जर गरज नसेल तर? त्यापेक्षा ठराविक रक्कम महिन्याला बँकेत जमा करावी. एका गरज नसलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यावर जितका पैसा खर्च होतो त्यात १०० लोकांना डीबीटी देता येईल.

त्या पेक्षा रेल्वे कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी ताकत,बुध्दी खर्च करा .
त्यांच्या कडून काम करून घ्या.
फायदाच होईल.
8000 कोटी चे मोदी साठी विमान आहे देशाच्या पैशातून घेतले आहे.
10 करोड रुपयांची त्यांची गाडी आहे.
बाकी रोजचा दैनंदिन खर्च पण करोडो मध्ये आहे .
एका व्यक्ती वर देशाचा इतका पैसा बरबाद होत आहे.
त्याचा हिशोब नाही मागणार का

WHITEHAT तुमचा प्रश्न रास्त आहे. मी पाहिला विचार केला की आपण भारत आणि USA तुलना करू. पण उलटेच आहे. US मध्ये भारतापेक्षा पुष्कळ जास्त रेल लाईन किमी. आहे. भारतात ६८००० किमी रेल मार्ग आहे. US मध्ये २२०००० किमी रेल मार्ग आहे. आणि तिथे खाजगी रेल मध्ये फक्त दोन लाख भर लोकच कामाला आहेत. काहीतरी मॅच होत नाही.
(अर्थात ह्या धाग्याशी संबंध नाही.)

नवीन संसद भवन विनाकारण बांधले हे माझे ही मत आहे. हॉटेल अशोका किंवा आयटीसी सारख्या कंपन्यांना त्यांचा हॉटेल मध्ये दोन सभागृहे बांधायला सांगायची आणि ती भाड्याने घ्यायची.

निव्वळ एकमेकांची उनिदूनी काढायला आणि ते पण वर्षात कसेबसे पन्नास दिवस, वीस हजार कोटी म्हंजे निव्वळ बाष्कळ अनावश्यक आहे.

मात्र त्याच वेळेस, यांत्रिकीकरण अत्यंत कमी असल्याने अतिशय फालतू काम जे सहज AUTOMET करता येईल अशा कामांना आपल्याकडे दोन चार कामगार विनाकारण आहेत रेल्वेत.
त्यामुळे पगार आणि निवृत्तीवेतन यावर प्रचंड खर्च होतो आणि सुरक्षा प्रणाली, जिथे खर्च केला पाहिजे, तिथे तो करता येत नाही.

Pages