भारताच्या रेल्वे इतिहासातील सर्वात दुर्दैवी व भीषण अपघात

Submitted by ढंपस टंपू on 3 June, 2023 - 23:49

भारताच्या रेल्वे इतिहासात आजवर अनेक अपघात झाले. पण परवा बालासोर इथे झालेला दुर्दैवी अपघात हा समोरासमोर तीन रेल्वेगाड्यांची टक्कर झाल्याने भारताच्या रेल्वे इतिहासातला अत्यंत भीषण अपघात म्हणावा लागेल. या आधी ६ जानेवारी १९८१ रोजी बिहार मधे बागमती नदीत रेल्वेगाडी घसरून ७०० प्रवाशांचा मृत्यू झाला होता. हा आजवरचा सर्वात भीषण अपघात समजला जातो.

बालासोरच्या दुर्दैवी घटनेत आता पर्यंत २९४ मृत तर ११०० प्रवासी जखमी आहेत. जस जसे मदत कार्य पुढे जाईल तसतसा मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

पण ज्या पद्धतीने तीन ट्रेन्स एकमेकांना धडकल्या ते पाहता यात मानवी चूक आहे का असा प्रश्न पडतो. आतापर्यंत २९५ लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. नदीत पडल्याने मृतांचा आकडा जास्त असणार हे उघड आहे. ती घटनाही लाजिरवाणीच आहे. पण तीन गाड्या एकमेकांवर कशा काय धडकू शकतात ? यात मानवी चूक आहे का ?

रेल्वेमंत्री वैष्णव यांनी आता कवच तंत्रज्ञानामुळे रेल्वे अपघात विसरून जा असे त्यांच्या एका प्रेझेंटेशन मधे सांगितले होते. तरी हा अपघात कसा काय झाला ?

जगभरात भारताच्या रेल्वेगाड्या, इंजिन्स निर्यात करण्याची घोषणा केली होती. या अपघातामुळे आयात करणार्‍या देशांवर परिणाम होईल का ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण समाजात अंध भक्तांची संख्या प्रचंड आहे.
ह्याचा अभ्यास मी अनेक गटातील लोकांशी बोलून घेतो.
महागाई,बेकारी, जंगल राज,भ्रष्ट व्यवस्था ह्याला मोदी जबाबदार च नाहीत.
महागाई अजून वाढली तरी चालेल.
स्वतःची लूट होत आहे,स्वतःला पुढे गुलामी येवू शकते,लोकशाही नष्ट होवू शकते ह्याची जाणीव च भक्तांना नाही.
तेव्हा मला खात्री पटली .
मुघल मूठ भर,ब्रिटिश छ्टकबर पण त्यांनी ही मेंढरं
आरामात हकली .
पुराण न मधील कल्पमिक कथा सोडल्या तर भारतीय जनतेवर कोणी ही येवून आरामात राज्य केले आहे.
आज पण 3% लोक 97% मेंढरं आरामात हाकत आहेत.
मेंढरं च कसायचे गुणगान गातात हा अजब प्रकार भारतात एक एक फुटावर बघायला मिळत आहे

कोणते उडवले ?
मला तर सगळे व्यवस्थित चालू दिसत आहेत .

It's happen in only indis.
योग्य जागेवर योग्य व्यक्ती च नाही.
इतकी बकवास प्रशासकीय व्यवस्था फक्त आणि फक्त भारतात च आहे

https://thewire.in/government/train-crash-dissent-note-by-probe-panel-me...
Alongside a preliminary report that five railway officials submitted on the Balasore triple train tragedy pointing to a faulty signal as a probable cause, one of the five also submitted a ‘dissent note’ which hints at the possibility of record-tampering with a view to covering up the sequence of events leading to the accident.

ह्या अपघातामागे तृणमूल काँग्रेसचा हात आहे असे बीजेपीच्या सुबेंदू अधिकारी यांचे म्हणणे आहे. अपघात ओडिशा मध्ये झाला पण इकडे तृणमूल काँग्रेसचे धाबे दणाणले आहे असेही ते म्हणाले. का? त्याची CBI ने चौकशी करायला पाहिजे.

१. शुक्रवार. जवळच मशीद.
२. आरक्षण.
३. राहुल गांधी परदेशात गेला किंवा जाऊन परत आला की भारतात काही ना काही होतं.
४. तृणमूल.

एकाच सुशान्त सिंग राजपूतला चार पाच वेगवेगळ्या लोकांनी मारलं. सीबीआय अजूनही शोधतेच आहे. त्यात या केसची भर.

भारत हा गरीब ,विकसनशील देश आहे.लोकशाही अजून पण परिपक्व नाही.लोक शिक्षित,(degrya म्हणजे शिक्षित पना नाही)नाहीत.
लोक च अडाणी तर लोक प्रतिनिधी अडणीच असणार सरळ आहे.
भारतात प्रचंड लोकसंख्या आहे,इंटर्नल migration उत्तरे कडून दक्षिण ,पश्चिम भारता कडे अती प्रचंड आहे.
वाहतुकीचे साधन फक्त रेल्वे.
अडाणी राजकारणी railway mantri झाला की पहिले काम हेच करतो उत्तरेतून दक्षिण किंवा पश्चिम भारतात जाण्यासाठी नवीन गाड्या चालू करतो, .
अडाणी जनता खुश.
दोन ट्रेन मध्ये दोन पाच दहा मिनिटाच्या पेक्षा कमी अंतर आहे इतक्या रेल्वे उत्तरेतून बाकी भारतात धावतात.
अपघात तर होणारच च.
जगातील अती उत्कृष्ट यंत्रणा जरी भारतात आणली तरी अपघात होणारच.
१(अती आधुनिक यंत्रणा वापरण्यास भारतीय लायकीचे नाहीत.
२) इतके ट्रॅफिक झाले आहे की त्या वर कोणतीच यंत्रणा उपयोगी पडणार नाही.

ह्या रेल्वे अपघात ला केंद्र सरकार बिलकुल जबाबदार नाही.
भारताची स्थिती च अशी आहे की ब्रह्मदेव जरी भारताचा पंतप्रधान झाले तरी अपघात नाही टाळू शकणार.
आर्थिक,राजकीय,शैशानिक सर्व बाबतीत भारत खूप मागास आहे
देशात आर्थिक विषमता अती प्रचंड आहे.
फक्त ह्या प्रकरणाचा राजकीय वापर सरकार नी करू नये.
हा घात आहे हे वाक्य च सांगते ह्याचा राजकीय वापर होणार
आणि त्याला मात्र माझा विरोध आहे

अडाणी राजकारणी railway mantri झाला की पहिले काम हेच करतो उत्तरेतून दक्षिण किंवा पश्चिम भारतात जाण्यासाठी नवीन गाड्या चालू करतो, .>>>>>>> आधी नीट माहिती घ्या, मग बोला. अडाणी तुमचे लल्लनवा आहेत.

खरे कारण पुढे येईल.

प्रतेक वर्षी बजेट वेळी पाच पन्नास नवीन ट्रेन रेल्वे चालू करत च असतात.
आणि जनता खुश होत असते.
Raiway लाईन मात्र दो पदरी ची चार पदरी मात्र करत नाहीत.
त्या मुळे भयंकर ट्रॅफिक वाढले आहे.
नवीन railway लाईन टाकण्याची railway ची आर्थिक कुवत नाही.
मध्ये कोणी तरी idea दिली होती उत्तम होती ती .
ज्या राज्यांना ट्रेन हवी आहे त्यांनी स्वतःच्या राज्यातील नवीन railway line चा खर्च उचलायचा.
राज्यांना हवी असेल train तर खर्च करा .

खूप लोकांना कामाला लावणारा अडाणी कसा असेल? >>>>>>>>
त्यांना अदानी मध्ये नोकरी भेटली असती तर अदानी हा अडाणी नसता !

ज्या राज्यांना ट्रेन हवी आहे त्यांनी स्वतःच्या राज्यातील नवीन railway line चा खर्च उचलायचा.
राज्यांना हवी असेल train तर खर्च करा . >>>>>>>>>>>>>
जो काही अपघात झालाय त्याचे खरे कारण येईलच पण आपल्या इथे सामान्य लोकांच्या जीवाची किंमत मातीमोल आहे हे नक्की !
वंदे मातरम् ट्रेन ची संख्या वाढवण्यापेक्षा लाखो कोटी लागू द्या पण रेल्वे प्रवास सुरक्षित झालाच पाहिजे .
एकीकडे वंदे मातरम् सारख्या सुसज्य ट्रेन्स तर दुसरीकडे गुरे कोंबवी तशी माणसे भरलेल्या जनरल च्या बोगी हा विरोधाभास लाजिरवाणा आहे .
ट्रिलियन अर्थव्यवस्था कडे प्रवास करताना भारताला फक्त महामार्ग विकसित करून चालणार नाही , रेल्वेचे जाळे पण सुरक्षित करावे लागेल .
सरकार कडे पैसे नाहीत म्हणावे तर इतक्या दिवस क्रूड तेल स्वस्त असताना वाढीव दराने इंधन भारतात विकून जमा केलेला पैसा कुठंय ?
जी एस टी ची लाखोंची उड्डाणे कोठे गेली ?
# पुछता हैं आम आदमी .

115 कोटी ची एक वंदे भारत, ती।पण निम्म्या वेगात धावणार कारण रुळांची मर्यादा. आता निम्म्या डब्यांची चालवणार कारण अजून महाग आहे. दीड डझन वंदे भारत घेतल्या आहेत आणि अजून येतील कारण मोदींनी मनावर घेतलंय. तेच पैसे जर इतर गोष्टींकडे वळवले असते तर ....वंदे भारत चालवायची होती तर बुलेट ट्रेन कशासाठी हा प्रश्न आहेच

आता मुद्द्यावर आले. डिझाईनचा मुद्दा ज्याच्यासाठी आणला होता, ते यासाठीच.
इंजिनियरिंग डिझाईन मधे सुरक्षिततेला महत्व दिले जाते. ज्या वेळी नवीन यंत्रणा जी देशात पहिल्यांदा वापरली जातेय, तिच्या बाबतीत संपूर्ण स्वयंचलित हवी कि नको याचा निर्णय घ्यावा लागतो. त्यासाठी क्रायटेरिया असतो.

रेल्वे सारख्या फिल्ड मधे नक्कीच असेल. इथे प्रवाशांचा जीव संपूर्णपणे स्वयंचलित इलेक्ट्रॉनिक यंत्रणेच्या हातात द्यायचा कि नाही याचा निर्णय घेणारा तितकाच निश्चिंत असावा लागतो. १९९० पासून टक्कर टाळण्याचे तंत्र विकसित होत आहे. इस्त्रोचा सहभाग तेव्हांपासून आहे. पण त्यावर पूर्णपणे विसंबून राहण्याचे धाडस या पूर्वी यासाठीच झाले नसेल. इंतरलॉकिंग सिस्टीम मधे छोटीशी चूक आणि असा अपघात हे धडकी भरवणारे काम आहे.

मला माहिती नाही जीपीएस लावल्यावर ट्रेन्स एकाच ट्रॅकवर आहेत कि समांतर ट्रॅक वर आहेत हे या यंत्रणेला कसे कळत असेल. समांतर ट्रॅक मधे धावणार्‍या ट्रेन्सना एकाच ट्रॅकवर समजून एखाद्या ट्रेनला जरा अलिकडच्या ट्रॅकवर जायला सांगितले गेले, त्या ट्रॅकवर असलेल्या मालगाडीतली जीपीएस यंत्रणा बंद असेल, खराब असेल, बसवलेली नसेल तर ? बंद स्थितीतल्या ट्रेनमधला जीपीएस चालू असेल का ?

अशा नव्याने डेव्हलप झालेल्या यंत्रणांच्या टेस्ट्स कशा घ्यायच्या याची मार्गदर्शक तत्वे उपलब्ध नसताना हे जोखमीचे काम असते. टेस्ट सेट अप यंत्रणेपेक्षा महाग असतो. पण म्हणून टेस्ट्स न करता ट्रायल अ‍ॅण्ड एरर बेसिस वर प्रवाशांचा जीव टांगणीला लावता येत नाही.

बुलेट ट्रेन वर पैसे उधळण्याऐवजी सुरक्षिततेवर खर्च करणे हा प्राधान्यक्रम असायला हवा.
या यंत्रणेच्या देखभालीसाठी पुरेसा निधी उपलब्ध नव्हता असे वाचनात आले म्हणून पुन्हा ही पोस्ट.

सर्व बरोबर आहे safety फ्युचर वापरायचे झाले तर अनेक अटी पण असतात.
त्या सर्व अटी पाळणे आपल्याला शक्य होईल का?
एक मला जे वाटते ते सांगतो.
१) दोन पटरी मध्ये किती अंतर असावे.
२) दोन ट्रेन मध्ये किती अंतर असावे.
३) पटरी ची रचना आणि दर्जा.
४) आधुनिक यंत्रणा नीट चालावी म्हणून योग्य दर्जा चे इंटरनेट .
५) आधुनिक यंत्रणेची देखभाल करण्यास सक्षम मनुष्य बळ.

मुंबई मध्ये ज्या नवीन लोकल गाड्या जर्मनी मधून आल्या आहेत.
त्या जेव्हा नवीन होत्या तेव्हा त्या गाडी मध्ये बिलकुल गरम व्हायचे नाही.
कारण उत्तम दर्जा च्या पंख्या बरोबर आतील गरम हवा बाहेर टाकण्याची powerfull यंत्रणा त्या डब्यात होती.
सहा महिने ,वर्षात च ती आतून गरम हवा बाहेर फेकणारी यंत्रणा बंद पडली.
काय कारण असावीत.
त्या व्यवस्थेचं तांत्रिक ज्ञान असणारा स्टाफ च railway कडे नसावा.
किंवा हलगर्जी पना.

रघु आचर्य आणि हेमंत सर यांच्या वरील पोस्टशी पूर्ण सहमत. ओडीशातली सिस्टीम कुणी दिली होती? बहुतेक देशी असावी.
विशेषतः
अशा नव्याने डेव्हलप झालेल्या यंत्रणांच्या टेस्ट्स कशा घ्यायच्या याची मार्गदर्शक तत्वे उपलब्ध नसताना हे जोखमीचे काम असते. टेस्ट सेट अप यंत्रणेपेक्षा महाग असतो. पण म्हणून टेस्ट्स न करता ट्रायल अ‍ॅण्ड एरर बेसिस वर प्रवाशांचा जीव टांगणीला लावता येत नाही.>> हे फार महत्वाचे आहे.
आपल्याला १५० वर्षांचा अनुभव असताना देखील आपण काय शिकलो?
RDSO काय करते आहे?

अगदी साध्या यंत्रणा पण आपल्या कडे नीट चालत नाहीत.
यात्रा हे नवीन ॲप raikway नी काढले आहे.
त्या अगोदर m indicator हे ॲप होते.
ह्या दोन्ही ॲप वर ट्रेन चे लाईव्ह location दाखवले जाते.
पण ते लाईव्ह लोकेशन ७०,:ते ८० टक्के साफ चुकीचे असते.
साधी आधुनिक यंत्रणा आहे त्याची ही अवस्था आहे

झूम कार ला आपण आपली गाडी भाड्याने देण्यासाठी लावली की ती गाडी कोणी कुठे घेवून गेलंय हे आपण घरी बसल्या ट्रेस करू शकतो .
अशा पाच दहा कोटींचे भांडवल असलेल्या कंपन्या जी पी एस तंत्रज्ञान वापरतात.
पुण्यासारख्या महानगरात उबेर , ओला चे ड्राइव्हर जी पी एस वापरुन ट्रॅफिक वाले रस्ते टाळून आपल्याला योग्य त्या ठिकाणी वेळेवर पोहोचवतात.
मोठ्या दिमाखात गगन का काय ते विकसित केलं होते , काय झाले त्याच ?
नाही चालत तर जी पी एस वापरत का नाही ही लोकं ?
काय चाललय कोणास ठाऊक ?

जीपीएस वापरून कार कुठे आहे हे पाहणं आणि जीपीएस किंवा तत्सम यंत्रणेचा वापर करून सांधे बदलणे, सिग्नल या यंत्रणा अ‍ॅटोमॅटिक करणं यात फरक आहे.

Pages