किनारा..

Submitted by मन्या ऽ on 14 December, 2020 - 13:28
 beach, poetry, समुद्रकिनारा, कविता

किनारा

सागराची लाट वाऱ्यासम होऊनी बेभान
धुंडाळते जणु एक किनारा

असे चहुबाजुंनी वेढलेली
नानाविध किनाऱ्यांनी
परि धुंडाळते ती जणु
तो एक किनारा

थांबायचे क्षणभरच
विसाव्यासाठी;
स्पर्श होताच
त्या किनाऱ्याचा अलवार

मग वेगी परतायचे
मागे ओल्या पाऊली
दुर्दैव तिचे ते कुणा सांगावे
उमटत नाही पाऊलखुणा
अन्
उरत नाहीत पुरावे त्यांच्या
त्या क्षणमात्र भेटीचे..

-दिप्ती भगत
(01 Aug 2020)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मन्या ऽ
Some people hear the voice of God in the rushing wind, a burning bush, or a flowing stream.

Back to top