आई कुठे काय करते!-२

Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00

आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वीणाची चेहरेपटृटी प्रिया राजवंश सारखी आहे.
तिचा चेहरा अजिबात हलत नसे. ही overacting करते.>>> थॅन्क्स भरत ! त्या विणाच्या एन्त्रीपासुन ही कोणासारखी दिसते अस वाटत होत, कोण ते आठवत नव्हत, प्रिया राजवन्श कायम मोकळे केस सोडून असल्याने वीणाही तशीच वाटते.

वीणा-आशु-नितिन आणी मधे आलेली आशुची मैत्रीण हे एकाच वयाचे वाटतात, अरु काकु मात्र याच्यापेक्षा थोराड दिसतात...

बर वर्ल्ड टुर करायला विसा वैगरे लागत नाही का? दिड गाण्याच्या पॉप्युलेरिटी वर सगळ्या कन्ट्रीज ने विसा पण फॉर्म न भरताच यशने सान्गितल म्हणून दिलेला दिसतोय.

वीणा किशोर वर्तक...!!

हो ना...निदान विसा ॲप्लिकेशन वर तर अरू ची सही हवी होती....असे कसे सरप्राइज?.....
प्रिया राजवंश..ही लेडी भारत भूषण होती.
सेम न-अभिनय!

मला पण तो व्हिसाचा प्रश्न पडलेला. पर क्या की. प्यार में कभी कभी ऐसा भी होता होगा. असे वाटले. टूर साठी व्हिसा, सिमकार्ड पैशाचे कार्ड व हार्ड कॅश हे तर आपले आपण करावे लागते. आशूची एखादी ट्रॅवल एजन्सी असेल.

आजकाल अनुपमा जास्त जास्त स्टुपिड होउलागली आहे म्हणून ती आधी बघ ते. वाक्या वाक्याला ड्रामा दर एपिसोड मध्ये गौप्य स्फोट. तरी ती छान पैकी नटत असते. त्यामानाने हे धुवट वाटते. आता उद्या यश ला अ‍ॅक्सिडेंट. अप्पा चक्कर येउन पडतील. गौरी गौरी गौरी. ह्याला काही दिवस ठाण्याला एडमिट केले पाहिजे.

अमा.. Lol

हो..आणि इन्शुरन्स पण.
पण हे सर्व आपण सामान्यांसाठी...
अरुंधती साठी आशू ही काफी है...
तो आशू अजिबात ग्रेट बिझिनेस मन वाटत नाही...कुठल्याही अँगल ने..
फार तर एमार वाटतो !!!

.आणि इन्शुरन्स पण.>> यस्स. मध्ये लेक फिरायला जाउन आली तेव्हा प्रतेक ठिकाणी मी पिक अप करायला पैसे चंची मोकली सोडायला उभी होते. तिचा आधीचा १० इअर व्हिसा होताच. अरुचे तसे काही असायचा प्रश्न नाही. पहिलाच्च पर्देश प्रवास. आय हाय हाय. पण वर्ल्ड टुर कुठे? युरोप का अमेरिका का चायना जपान सिंगापूर थायलँड कोरिआ का सिरीआ टर्की जॉर्डन इराण इराक? का श्रीलंका नेपाळ पाकिस्तान भुतान बांगला देश?
का हळूच दुबई सौदी अबुधाबी? लेओवर इतकेच जाउन आले बाई मी परत. घरची कर्तव्ये वाट बघत होती.

कांचन तर अनघाला पण नवर्‍या बरोबर फिरू देत नाही. सारखे कोनीतरी हिचे पाय चेपत बसा.

त्या विणाच्या पात्राचं काय करायचं आहे तेच लेखिकेला कळलं नाहीये कधी ती आशू आणि पार्टीवर डाफरते तर कधी अन्यावर.

मागच्या वेळी अरु गायब होती तर अप्पांच आजारपण डिमेनशिया वगैरे करून दिवस भरून काढले , आता यश चा accident , त्यात घालवतील अरुची सुट्टी.

यश अतीच रडायला लागलाय. त्याला बघून अनीशपण रडायला लागलाय.
अन्याचं ते केकाटून बोलणं सहन होत नाही आता. सतत प्राॅब्लेम्स कसे काय यांच्या घरात? वीणा कशीच बरी वाटत नाही. टोटली मिसफिट्.

मी आकुकाक ला टाटा बाय बाय करून झीवरची त्याच वेळी असलेली तू चाल पुढे ही दीपा परब मुख्य भूमिकेत असलेली मालिका बघतो.
दोन्ही मालिकांत साम्यस्थळे
इथे नवरा व्हिलन. तिथे घटस्फोटित नणंद . तिचा बॉयफ्रेंडही तिच्यापासून दूर जातोय. कारस्थानी व सूडबुद्धी.
इथे नवर्‍याने घरा बाहेर काढले. तिथे नणंदेने.
इथे सासू सासरे मुलां नातवंडासाठी अरुंधती परत परत येते. तिथे घरात यायला मनाई आहे म्हणून दारातून सासू सासर्‍यांना डबे देते. दोघी सुपरवुमन. सगळ्यांना आवडणार्‍या. राधिका मसाले वरून पुढे चालू.
ही महान गायिका. ती मिसेस इंडिया रनर अप.
ही दीड गाण्यामुळे जग प्रसिद्ध. ती मिसेस इंडियामुळे. तेच सगळं सेल्फी बिल्फी. पण ती अर्थार्जनासाठी काम करताना दिसते. तिचं ब्युटी पार्लर आहे.
ही लहानपणीची हौस म्हणून मुलीच्याच कॉलेजात अ‍ॅडमिशन घेते. ती आपल्याकडे क्वालिफिकेशन हवं म्हणून अ‍ॅडमिशन घेऊ पाहते आहे. दोन्हीकडच्या प्रिन्सिपॉल आयांच्या फॅन.
इथे ईशाच्या आयुष्यात फोटोग्राफर नील कामतमुळे वादळ. तिथेही तसेच. तिचे फोटो मॉर्फ करून भलत्याच उत्पादनांच्या जाहिरातीत.
तिथली मुलगी ईशासारखी आक्रस्ताळी नाही आणि आई उपदेशाचे डोस सतत पाजत नाही हा थोडासा फरक.

फेसबुकवर क्लिप दिसली. अभिषेकला आत्महत्येच्या आरोपात पोलिस अटक करतात आणि आशुतोष त्याला सोडवतो.

आत्महत्येचा प्रयत्न आता गुन्हा मानला जात नाही ना?

नवीन प्रोमो. अनिरुद्ध आणि वीणा आशुतोषच्या ऑफिसातून च् काम करणार.
आशुबाळाने आधी आपल्या पालकाचं म्हणजे नितीनचं न ऐकता पेपर्स वर सह्या केल्या. आता तो नको म्हणत असताना त्यांना ऑफिसात जागा दिली.
आशुबाळ जसं रोज अरुंधतीला न्यायला सकाळीच तिच्या घरी यायचा तसा अनिरुद्ध वीणाला न्यायला आशुतोषच्या घरी येणार. मज्जा!

देशमुखान्च्या तिन्ही मुलान्ना 'ब्रेकअप्स' नीट हाताळता येत नाही. अभिषेक अन्किताशी साखरपुडा मोडला तेव्हा दारु पिऊन तिच्या घराकडे तमाशा करतो, अनघा नीट वागत नाही म्हणून एक्सिडेण्ट करुन येतो, इशा आत्महत्येचा प्रयत्न करते ( साहिलच्या वेळी), आणि आता हा यश डिप्रेशनमध्ये गेलाय. कस होणार ह्या मुलान्च पुढे? निदान ह्यान्नी ह्यान्च्या आईवडिलान्कडे तरी inspiration म्हणून पाहाव.

यशची रीअ‍ॅक्शन मात्र जेन्युइन वाटतेय म्हणजे गौरीने त्याला लॉन्ग टर्म रिलेशन मधुन अचानकच डिच केलय त्यामुळे त्याला वाटणार्‍या भावना खर्‍या वाटतात.

पण यश आधी बरा होता, अरु गायब असल्याने फिलर म्हणून हा ट्रॅक आणल्याचं कळतयं.

नितिन मुद्दाम वीणासमोर अन्याची बदनामी करतो - २ वेळा असं झालं की ही येडी त्याची बाजू घेणार आणि वेडा आशु मान डोलावणार.

ह्या २-३ भागात खटकलेलं वाक्य - बहुतेक अनिशच्या तोंडी - मला असं करायला नको हवं होतं ...

कालच्या एपिसोडमध्ये अन्यामध्ये काय बाजीगरचा शाहरुख घुसला होता आशुच्या ऑफिसमध्ये असताना? काय तो एटीटयूड? काय ते खुर्ची फिरवण?

अरु नसल्याने कसेतरी एपिसोडस ढकलावे लागत आहेत. शाहीर प्रमोशनसाठी अनघाला गायब करावं लागत आहे बहुतेक.

बिझनेस म्हणजे गंमत आहे - वीणाचा आणि आशुचाही.

कालचे कान्चनचे लग्नाविषयीचे विचार हॉरिबल होते. ती प्रिया म्हणे स्वतन्त्र विचाराची आहे. आधी ह्या म्हातारीला विचाराव, हिला तरी चालते का स्वतन्त्र विचाराची मुलगी/ बाई देशमुखान्च्या घरात?

आज हि बाई पराक्रम करणार आहे. हिला आता कुठेही एकट सोडायला नको.

मला आवडला अन्या च्या सूटचा कलर ! लाईट ग्रीन - पिस्ता टाईप. वेगळा होता... छान!
पण बाकी एकदम भंगार संवाद, अ‍ॅक्टींग आणि सिक्वेंसेस!!
ती संजना अशी अचानक कशी काय भेटते यांना....रोड वर नुसतीच उभी राहिलेली? मुंबैत असे कोण थांबते?
अनुष्का कुठे गायब आहे आणि? आधी तीच फार सुलेखाताईंची प्रिय भाची होती... अती आगाऊपणा करायची !! आणि आता ही वीणा!!
केळकरांच्या घराला अशा चाभर्‍या, आगाऊ मुलींचा शाप ए !

लेखिका फार धरसोड करते...!! नितीन कसा काय पडीक असतो यांच्याच कडे?

आजचा एपिसोड म्हणजे मेंदू switch off करून लिहिलेला आहे. एरव्ही जत्रा भरलेल्या घरात चक्क कांचन एकटी? आप्पा आता आहेत आणि आता नाहीत. चोर आल्यावर आशूतोषला फोन करून बोलावून घेतलं आणि एक्झॅक्टली चोर पळून जायच्या वेळीच आशू विथ नितीन हजर. मागून सगळी जत्रा पण हजर. आणि देशमुखांचं डेंजर मॅग्नेट इशा लगेच त्या चोराच्या हाती ओलीस.
नको रे बाबा.

म्हातारीने खरंच एका जागी बसून खादाडी कमी केली पाहिजे. केव्ढा तो पृ श्ठभाग व काय ते वजन. गुडघे दुखतील नाही तर काय?! गरम दूध चोरावर फेकते!!! देशमूख बावळट आहेत. वयस्कर जोडप्याला खाली एक बेडरूम पाहिजे ना? सारखे वर खाली कसे करतील ते व दाग दागिने घरीच काय ठेवते? लॉकर नाही का घेता येत.
अप्पा असा झोपला होता हसत की नक्की उर्सेकरीणी बरोबर गोव्यात बागडतो आहोत असे स्वप्न पडत असावे.
मला पण अन्याचा पोपटी सूट आव्डला. पिकल्या पानाचा देठ बाई हिरवा हिरवा.

चो र पण हिला संदर्भासहित सपश्टी करण देत बसतो. आरू नंतर आशूला डू गुडर नंबर २ असे चांदीचे पदक देण्यात हेत आहे. काहीही झाले तरी आशूच मदत करतो. हे जवळच राहतात का?

इशाचे जीव जायचे स्वप्न साकार होईल का? अन्याकी जान छूटी!!

अनु पमा मध्ये पण काहीही लपेटत आहेत. त्यातही नाचाची गुरू अगडबंब आहे.

अप्पांच्या डिमेनशिया चा विसर पडलाय साफ, सगळं किती संबद्ध बोलतात हल्ली, भागवत काकूंना मूळ बाळ नाही, त्यांच्या घरी लास्ट इअर मोठी चोरी झाली होती आणि त्या हल्ली इथे रहात नाहीत ..अगदी सगळं ए टू झेड आठवत होत त्याना.

पण ती लेखिका तरी काय करेल ? आयत्या वेळी अरूने कल्टी मारली आणि गायब झाली . आता कसे तरी भरून काढतायत एपिसोड च्या एपिसोड ..यश चा अपघात झाला , आता ही चोरी ..

आणि आपण बावळट बघतो रोज. पण इथे पिसं काढता येतात तीच मज्जा. आणि इतर सिरीयल पिसं काढण्याएवढ्या ही हातात धरवत नाहीत. ही त्यातल्या त्यात दगडा पेक्षा वीट मऊ एवढंच.

आशुतोष देशमुखांकडे एकटा गेला की नितीन होता सोबत?
अनिश ईशाला सोडवेल आणि स्वतः: जखमी होईल.
आशु अरू आश्रम सीन रिक्रिएटेड

कितीतरी दिवसांनी ही मालिका पाहिली. कालचा आणि आजचा भाग. माझे दोन अंदाज खरे ठरले. देशमुखांच्या घरी आशुतोष नितीनसोबत येतो. नितीनचं घर कुठे आहे? ठाणे सांगितलं होतं ना? नॅशनल पार्क खालून बोगदा तयार झाला वाटतं.
दुसरा अंदाज - आशुतोष त्या चोराला नोकरी देणार.
चोराने चाकू ईशाच्या गळ्यापासून फुटभर लांब धरला होता आणि ती स्वतःच त्यातून सुटली. त्यामुळे अनीशला हिरोगिरी करायला मिळेल हा अंदाज चुकला.
आजीबाईंना कधीपासून एकटं वाटतंय की त्या त्याबद्दल देवळात जाऊ आख्यान सांगताहेत? अनिरुद्ध तर आताच कामाला लागलाय. अन्घाही इतके दिवस घरीच होती. यशला काय कामधंदा आहे असं दिसलेलं नाही. ईशाचं कॉलेज संपलंय.
आशुतोषला एकट्या राहणार्‍या म्हातार्‍या लोकांची समस्या लक्षात आली आणि त्याने पनवेलच्या जागेत ओल्ड एज होम बांधायची पुडी सोडली. यांचं पनवेल बोरिवली आणि दहिसरच्या मध्ये आहे. ओल्ड एजचा प्लान अरुंधती आल्यावर तिच्याशी बोलून फायनल करणार.

उद्या वट पौर्णिमेवरून कांचन संजनावर उखडणार. ते रोप संजनाने वीणाला पास ऑन करावं.

Pages

Back to top