आई कुठे काय करते!-२

Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00

आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Ho na..
आणि वीणा जरा ग्रे शेड चे पात्र वाटतेय...सगळे तिला दबकून आहेत.
तीही म्हणते की मी खूप चुका केल्या..आणि हे अन ते
हिंदी अनुपमा मध्येही ती बहीण आणलेली..मग तिला कसे अब्युज केले ते दाखविले आणि महान अनुपमा ने तिला बाहेर काढले त्या ट्रॉमा तून
इथेही तसेच दाखवतील
आणि ती वीणा किती वरवर तोंडातल्या तींडत बोलते..फारच लाडात आणि.....
लगे विजू दादा and all... विजय दादाच तर गेले १५ एपिसोड पूर्वी अवतरला आहे....!!!

(अरु हि गरीब घरातून सून बनून आली आहे >> २६ वर्शा पुर्वी, आता सो कॉल्ड प्रथितयश गायिका व मिलिऑनेअर बिझनेस म्यान ची पत्नी. हिच्या साड्यांच्या बजेट मध्ये मस्त साखरपुडा झाला असता. तसे सुद्धा मुलीच्या आनंदा साठी करतात अनेक पालक. एकेकदा करायची मजजा असते.
आता हिचा संबंध संपला ना मग का नाक खुपसते.

अनु पमा रोज जे साड्या कप्डे दागिने घालत अस्ते त्यात पण होउन जाईल. साड्या लै भारी असतात पण अनुपमाच्या.

वीणा जेव्हा गेली तेव्हा तीच लहान होती मग अनिश किती वर्षाचा होता. किती वर्ष झाले बोललो नाही असे अनिश म्हणाला Uhoh अनिरुद्ध सतत त्रासलेला, वैतागलेला, समोरच्याला कधी शब्दांनी ओरबाडून काढतो अशा आविर्भावात. अनिशची आई खलनायिका वाटते. वीणा शब्द नीट बोलत नाही, वरवर फेकते. कसे ते सांगता येत नाही पण काहीतरी वेगळीच बोलते. तू तीन मोठया मुलांची आई वगैरे खाजगी बोलायची काय गरज आहे, आली आहेस तर रहा, खा, पी आणि जा. मागेही अरु आणि आशुतोष कुठे पार्टीला जात होते तेव्हा अरु म्हणाली मला बाई ते शेअर्सचे भाव वगैरे काही माहिती नसतं. आशुतोषने मनात म्हटलं असेल मला तरी कुठे काय कळतं. कोट घालून जायचं, फोटो काढून घ्यायचे आणि यायचं. कुठल्या पार्टीमध्ये बायका शेअर्सचे भाव आणि राजकारण यावर चर्चा करतात.

वीणा डोक्यावर पडली होती हे सांगायचे राहून गेले साखरपुड्याच्या गडबडीत, तर आता वीणा स्वतः त्याचे पावलोपावली पुरावे देतेय. सामान्य पणे आपण पहिल्या भेटीत जे जे विषय टाळु ते सगळे तिने एकामागून एक अरु शी बोलताना काढले. मी तर म्हणते वीणा आणि अन्या च लग्न लावून द्यावेच लेखिकेने काट्याने काटा निघतो तसे एकामेकांच्या सहवासात दोघेही ताळ्यावर येतील.
बाकी वीणा आणि अनिरुद्ध ची पार्टनरशीप आणि पर्यायाने लेखिकेच त्या विषयातील ज्ञान अशक्य गंडलेला प्रकार आहे. ह्या लोकांना जराही लाज वाटत नाही का असं काहीच्या काही दाखवायला?

<<<<तुम्ही माझ्या नवऱ्याची बायकोमधल्या बिझिनेस डील्स पाहिल्या नाहीत का?>>>

लोल

मी मायबोली वर सुरूवातीला त्या सिरियल चा बीबी वाचायचे एकुण प्रकार फार अतर्क्य होता हे त्यातून कळले म्हणून कधी बघितली नाही.

"आई...." सपोज्ड टु बी बेटर दॅन द लॉट नाही का?

"आई...." सपोज्ड टु बी बेटर दॅन द लॉट नाही का?>>> दगडापेक्षा विट मौ असली लॉजिकचा कपाळमोक्ष ठरलेला असतो.

हहपुवा कमेंट आहेत सगळ्याच.. मी आई बघते मालिका तर तिथेच बसून ईतकी पिसे काढायचे की आई ने वैतागून आम्ही लोक घरी असताना ही मालिका लावणेच बंद केले.

ईथे जरा अवांतर आहे पण travelxp वर एक कुणीतरी भयाण बाई आहे ,ती एक शो मध्ये तिच्या ईक्वली भयानक मैत्रीणी बरोबर वाट्टेल ती बडबड करून डोक ऊठवतात. बोबडे ऊच्चार अन लाडिक हावभाव ईतके डोक्यात जातात माझ्या की बस

अरु वर्ल्ड टूरवर चालली आहे म्हणे- पात्राला गायब करायला काय काय करावं लागतं :ड , ईतकी फेमस झाली २ गाणी गाऊन.

आज ऑफिसच्या सीनमधे अरु नुसती ऊभी होती शेजारी, पार्टनर आहे तर समोर बसावं ना.

अरु वर्ल्ड टूरवर चालली आहे म्हणे- पात्राला गायब करायला काय काय करावं लागतं :ड , ईतकी फेमस झाली २ गाणी गाऊन. >>>>लेखिकेने फारच उंच भरारी घेतली म्हणजे कानाला ऐकायला बऱ्या असणाऱ्या भारतातील वर्ल्ड फेमस गायिका सुद्धा वर्ल्ड टूर ला जायचा विचार नाही करणार जो लेखिकेने 'हरू' च्या बाबतीत केलाय पचतच नाही आहे हा विचार .

मधुराणी ॉॉ ऑस्ट्रेलियाला गेली आहे. म्हणून दाखवत असतील. मागे असंच काही कारण होतं तेव्हा आधी इंदूर आणि मग महाराष्ट्र दौरा काढला

मग आता पण इंदुर किंवा भारतात कुठेही म्युझिक स्कुल साठी दौरा दाखवायला हरकत नव्हती, फक्त दोन गाणे म्हटलेली गायिका वर्ल्ड टूर ला जाते हे पचवणं खरच अवघड आहे. पण अरु च्या बाबतीत लेखिकेला छोटेमोठे काही मान्य च नाही सगळं एकदम ग्रॅन्ड. नशिब आपलं सध्या च्या खडतर वाटाघाटीत बायडन काकांना मॉरल सपोर्ट म्हणून अरु गेली आहे असं नाही दाखवलं. अरु काहीही करु शकते!

वयाच्या १८ व्या किंवा त्याही आधीपर्यंत घरातच वडिलांकडून संगीत शिकलेली बाई त्यानंतर २५-३० वर्षांनी संगीत शाळा चालवू शकते तर वर्ल्ड टूर का नाही? तिथल्या तिथल्या महाराष्ट्र मंडळांत करेल कार्यक्रम Lol

हे सगळे लोक ती कॉलेजात शिकत होती हे विसरले का? म्युझिक् स्कूल सुद्धा वार्‍यावर.

मालिकांमधल्या पात्रांचे व्यवसाय आणि धंदे यावर अ आणि अ टाइप धागा बनता है.

नशिब आपलं सध्या च्या खडतर वाटाघाटीत बायडन काकांना मॉरल सपोर्ट म्हणून अरु गेली आहे असं नाही दाखवलं. अरु काहीही करु शकते! >>>>>>>हा हा हा हा हा हा सॉलिड लिहिलात , ती अनुपमा कधी गेली होती का डान्स च्या कार्यक्रमासाठी वर्ल्ड टूर ला

अनुपमा आता अमेरिका जाणार आहे. त्या आधी सवत नवृयाबरोबर मिरवून घेत आहे त्यामुळे दर दोन मिनिटाला अनुपमा अश्रु दाबायचे अ‍ॅक्टिन्ग करत आहे. पब्ब्लिक पण उसासे टाकत असेल. अरु ची वर्ल्ड टूर इस लै विनोदी. ती परत येइस्तो अन्या वीणा धंद्याचे वाट लावुन टाकणार नक्की.
देशमुख लोक्स जसे इशाला ट्रीट करतात तसेच केळकर वीणा ला ट्रीट करत आहेत. वीणाचा बिझनेस आता एकदम हॉट झाला आहे. भरपूर रिटर्न्स

आशू अरु ह्यांना कधीच साध्या कपड्यात - नाइट ड्रेस गाउन मध्ये, अरुचे केस मोकळे सोडलेले असे दाखवत नाहीत. अन्या संजनाला दाखवत असत एकेकाळी. इला भाटे पण नको तिथे भावनीक गळे काढत अस्ते.

. नशिब आपलं सध्या च्या खडतर वाटाघाटीत बायडन काकांना मॉरल सपोर्ट म्हणून अरु गेली आहे असं नाही दाखवलं. >>>> Rofl Rofl

हो, मी सुद्दा वाचलय हे. ती मालतीदेवी अनुजची खरी आई असते म्हणे. हिन्दीमध्ये सुलेखाताई उशिराच आल्या अरुला सपोर्ट करायला.

विकिपिडियाप्रमाणे - अनुज (आशुतोष) कापडियांचा (केळकरांचा) दत्तक मुलगा आहे . अनुजचे आईवडील त्याच्या चुकीमुळे अपघातात मेले.
वनराज (अनिरुद्ध) मालविका (वीणा) ला फसवून अनुज ( आशुतचे)चे सगळे बिझिनेस ताब्यात घेणार आहे.

मराठीत थोडं बदललंय वाटतं.

फक्त दोन गाणे म्हटलेली गायिका वर्ल्ड टूर ला जाते हे पचवणं खरच अवघड आहे>>> दोन पण नाही दिडच आहे. एक सोलो आणी एक ड्युवेट होत आशुबरोबरच जे परत परवा सापु मधे म्हटल.

फक्त दोन गाणे म्हटलेली गायिका वर्ल्ड टूर ला जाते हे पचवणं खरच अवघड आहे>>>केळकरांचा वशिला अजून काय!
बाकी अरू यांच्या हापिसात नक्की काय काम करते? आश्रमात जात नाही, संगीत विद्यालयात जात नाही, ती महाविद्यालयात जात नाही. एव्हढेच काय ती हनीमूनलाही गेली नाही पण अशूच्या कार्यालयात नियमीत जाते.

वीणाचे पात्र बळंच आहे!!
किती तो बालिश पणा वीणाचा!!
केळकर मंडळी ओव्हर प्रेमळ आहेत. कैच्या कै!
सतत काय त्या यश आणि नितीन ला एंटर टेन करायचे!

नितीन पात्र फारच लोचट आहे. रात्री जेवायला पण तिथेच. मुंबईत खरे तर लोक्स काम करुन सटकावे. घरी पोहचून एक मस्त शावर घ्यावा मग मनाला येइल ते खावे प्यावे फॅमिलीटाइ म. थोडा तरी अश्या मानसिकतेचे असतात.

यश फार दळतो.

वीणा हे अवघड जागेचे दुखणे आहे. एकंदरीत. तिच्या समोर इभाला जास्त रडवे तोंड व चिक्कट् गूळ संवाद असे ब्रीफिन्ग आहे वाट्ते. व जे नको तेच बोलते म्हातारी.

वीणाची चेहरेपटृटी प्रिया राजवंश सारखी आहे.
तिचा चेहरा अजिबात हलत नसे. ही overacting करते.

फेसबुकवर एक क्लिप पाहिली. यांच्या बिझिनेसच्या अदलाबदलीत अरुंधतीची सही कशाला?

मी नवा एपिसोड सकाळी साडे सहाच्या सुमारास बघते व तयार होउन हपिसला जाताना जुने भाग लावुन जाते. कुत्र्याला ऐकायला.
तर आज तो अन्या अरु चे नवे मंसु तोडतो तो भाग दिसला. तर ती चिडून म्हण ते की माझी वस्तु तर सोडाच माझ्या माण सांच्या जवळ जरी आलात तरी माझ्यासारखी वाइट कोणी नाही. व्हाव व्हाव. करते. पण आता बघितले तर अन्या वीणाचा सरळ गैरफायदा घेत आहे तर चक्क निघूनच गेली परदेशी. आता ह्या सिचुएशन चा राडा व्हायला वेळ लाग्णार नाही आहे. त्या वीणाला साधारण काही कळत नाही म्हणून संभालून घेतात असे वाटते. आशू सारखेच जवळ पास. दोघेही भाव नीक आदर्श वादी आहेत. प्रॅक्टिकल स्मार्ट दोघेही नाहीत.

अदलाबदलीत अरुंधतीची सही कशाला? >> अरु आशुची बिझनेस पार्टनर आहे , अर्धी मालकी अरु ची आहे म्हणून दाखवलं असेल प्लस अरु कशी मराठीत सही करते हे ही फोकस करायचं असेल . Happy

Btw एक कोडं घालते वीणा च संपूर्ण नाव काय ? Lol Lol Lol Lol

अरुंधती फक्त म्युझिक स्कूलमध्ये पार्टनर होती. तिला बाकीच्या धंद्यांत कधी पार्टनर केलं?

मला वाटतं नितीन आशुतोषच्या पार्टनर आहे.

अ चा बिझीनेस ब' ने चालवायचा तर power of attorney लागेल. तो पुन्हा ताब्यात घ्यायला ती रिव्होक करायची आणि पब्लिक अनाउन्समेंट करायची. त्यावर आशुतोषची सही का लागावी?

तिला बाकीच्या धंद्यांत कधी पार्टनर केलं? >> मध्यंतरी दाखवलं होतं हे एका एपिसोड मध्ये.

अ चा बिझीनेस ब' ने चालवायचा तर power of attorney लागेल. तो पुन्हा ताब्यात घ्यायला ती रिव्होक करायची आणि पब्लिक अनाउन्समेंट करायची. त्यावर आशुतोषची सही का लागावी? >> बरोबर पण आशू पार्टनर आहे बिझनेस मध्ये नितीनने त्याला अजून ही पार्टनर ठेवलं होतं जे अनिरुद्ध ने कट केलं. असो ...एवढा विचार केला सिरीयल बघताना तर आपण येडे होऊ. Happy

Pages