Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44
आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
नेफिवर 'कटहल' पाहिला. छान आहे
नेफिवर 'कटहल' पाहिला. छान आहे. साधी सरळ गोष्ट आहे. सगळ्यांचा अभिनय छान आहे.
बुक ऑफ मॉर्मन >> Definitely
बुक ऑफ मॉर्मन >> Definitely watch the musical. It is really funny. I still laugh remembering "Salta leka city"
Salta leka city आणि hassa
Salta leka city आणि hassa diga eboway दोन्ही एकदम हहपुवा आहे. संधी मिळाली की बघतो पण.
तू झुठी मै मक्कार पाहिला.हाय
तू झुठी मै मक्कार पाहिला.हाय सोसायटीतला एका लग्नाची दुसरी गोष्ट वाटला
इंटर्व्हल पर्यंत तर नुसतेच डायलॉग आणि स्वॅग वर भागवलेय.
कठल: आवडला. हलकी फुलकी स्टोरी
कठल: आवडला. हलकी फुलकी स्टोरी, का कुणास ठाऊक पण एखाद्य या वळणावर डार्क हपिल डार्क होईल वाटत राहिलं, पण झालं माही. छान आहे
बुक ऑफ मॉर्मन >> Salta leka
बुक ऑफ मॉर्मन >> Salta leka city>>> वरून नेटफ्लिक्स वरची Keep Sweet: Pray and Obey हा माहितीपट आठवला. Fundamentalist Church of Jesus Christ of Latter-Day Saints चा पाद्री आता तुरूंगात आहे. त्याचा बापही पाद्री होता. जितक्या जास्त बायका आणि मुले असतील तितके तुमचे स्वर्गातले स्थान उच्च असणार असे तिथल्या लोकांचे मत होते. त्या पाद्रीच्या ६५ बायका होत्या तर त्याच्या मुलाच्या ७८, त्यात १८पेक्षा लहान मुलीही होत्या. किती फालतूगिरी आहे ही!!
मला आधी वाटले जुन्या काळात घडले असेल पण २००६ मधे त्याला अटक केले.
मी पण कठहल पाहिला !
मी पण कठहल पाहिला !
नवनवीन कलाकार घेवून फणस चोरीची कथा मस्त फुलवली आहे . आमदाराच्या बागेतील दोन फणस चोरीला जाणे त्याच्या जावयावरच त्याचा संशय , त्या साठी चौकीतील अख्खी पोलीस फोर्स कामाला लावली जाणे वैगेरे मस्त फुलवले आहे .
त्या हावलदर ची चोरी गेलेली गाडीचे उपकथा पण छान जमली आहे .
एकंदरीत एकदा सुरू केलेला सिनेमा संपे पर्यंत तुम्ही पाहणारच .
बऱ्याच वेळा या धाग्यामुळे चांगलेच सिनेमे पाहायला मिळाले .....
<<बऱ्याच वेळा या धाग्यामुळे
<<बऱ्याच वेळा या धाग्यामुळे चांगलेच सिनेमे पाहायला मिळाले .....>>
एकदम सहमत..
Guardians of the Galaxy Vol.
Guardians of the Galaxy Vol. 3 मस्त वाटला. यातपण स्पेशल इफेक्ट्सची रेलचेल आहे. पहिले २ पाहिले नाहीत पण फरक नाही पडत.
A Man Called Otto मस्त आहे.
A Man Called Otto मस्त आहे. टॉम हँक्स बद्दल वेगळे काही लिहायची गरज नाही. एखादी भूमिका एखाद्या कलाकाराने एकदम उचलली आहे असे अनेकदा वाटते (उदा: माय कझिन विनी मधली मरिसा टोमेई) तशी ती यातली त्याची शेजारीण "मेरिसोल" आहे. तो रिअल इस्टेट वाला ड्रामा बर्यापैकी बाळबोध आहे पण सर्वांची कामे जमून गेलेली असल्याने आपण एंगेज होतो एकदम.
हॉस्पिटल मधे ओटोचा डायॉग्नॉसिस ऐकल्यावर मेरिसोलची प्रतिक्रिया - हा सर्वात भारी सीन आहे
मला ब्रेबॅ मधला "माइक" सुद्धा आवडला असता या रोल मधे. पण तो जरा जास्त गंभीर झाला असता.
“A Man Called Otto मस्त आहे.
“A Man Called Otto मस्त आहे. टॉम हँक्स बद्दल वेगळे काही लिहायची गरज नाही.” - टोटली अॅग्रीड! परवाच रात्री पाहिला. मस्त सिनेमा आहे. टॉम हँक्स अक्षरशः साखर पाण्यात विरघळावी तसा भुमिकेत एकरूप होतो. ‘मेरिसोल’ पण कमाल आहे.
तिने ‘अट्टो’ अशी हाक किती गोड
तिने ‘अट्टो’ अशी हाक किती गोड मारली आहे प्रत्येकवेळी!
Funny! मी काल रात्रीच My
Funny! मी काल रात्रीच My cousin Vinny कितीतरीव्यांदा पाहिला आणि तेवढीच हसले. जो pesci अणि Marisa Tomei just amazing! जेव्हा भारतात पाहिलेला तेव्हा आवडलेला पण अमेरिकेत पाहिल्यावर त्यातल्या बारीक बारीक जागा कळल्या. Alabama मध्ये ती दोन मुले प्रवेश करतात तो भाग, घाबरणारा/चिंतित Jewish मुलगा आणि सदैव कूल असणारा इटालियन अमेरीकन मुलगा, Yankees vs southerners, टिपिकल न्यूयॉर्क आणि साऊथचे accents अणि तशा व्यक्तिरेखा! Even जो pesci पहिल्यांदा त्या दोन मुलांना भेटायला तुरुंगात येतो तो प्रसंग... भारतात या बाबतीत काही माहीत नसल्याने फारसं कळलेले नव्हते एकाच वेळी जो pesci साठी निष्पाप आणि stan साठी dangerous असलेले संवाद धमाल चित्रपट!
हो मलाही पाहायचा आहे पुन्हा.
हो मलाही पाहायचा आहे पुन्हा. कधीही आवडतो पाहायला. अमेरिकन कल्चरल न्युआन्सेस जितके जास्त माहीत होतील तितका जास्त आवडेल हा पिक्चर. "कायद्याचं बोला" ही काही वाईट नाही पण मरिसा टोमेईची मजा त्यात नाही. आणि मूळ पिक्चर नक्कीच सरस आहे.
टॉम हँक्स अक्षरशः साखर पाण्यात विरघळावी तसा भुमिकेत एकरूप होतो. >>>
तिने ‘अट्टो’ अशी हाक किती गोड मारली आहे प्रत्येकवेळी! >>> टोटली. मला वाटले होते ती मुलेसुद्धा त्या स्नोमॅनला ओट्टो नाव देतात की काय
मला या कथेमधे आणि क्लिंट इस्टवूडच्या "ग्रॅन टोरिनो" मधे खूप साम्य वाटते. गंमत म्हणजे इथेही अमेरिकन कार्सचा संबंध आहेच.
“ कायद्याचं बोला" ही काही
“ कायद्याचं बोला" ही काही वाईट नाही पण मरिसा टोमेईची मजा त्यात नाही” - +१. शर्वरी जमेनिस च्या कॅरेक्टरला काही सिग्निफिकन्सच नाहीये.
हो शर्वरी जमेनिस नाव आठवत
हो शर्वरी जमेनिस नाव आठवत नव्हते त्यामुळे कर्मणी प्रयोग वापरावा लागला त्यात प्रि-बियर गाल मक्या, त्याचा तो हेल आणि म्हणींचा वापर धमाल होता.
हायला, मीही काल रात्री
हायला, मीही काल रात्री कितव्यांदातरी पाहिला ‘माय कझिन विनी’!
ऑल टाइम फेव्हरिट!!
त्यातले ते ‘माय बायलॉजिकल क्लॉक इज टिकिंग’, किंवा ‘नो सेल्फ रिस्पेक्टिंग सदर्नर यूजेस इन्स्टन्ट ग्रिट्स’, ‘दीज टू यूट्स’, आय (टाळी वाजवत) डेन्टिकल!’ वगैरे आमच्या घरातले इनसाइड जोक्स झालेत एव्हाना!
My cousin Vinny जबरदस्त.
My cousin Vinny जबरदस्त. Merissa Tomei येते आणि जिंकते.
‘कायद्याचं बोला’ ओके होता, पण
‘कायद्याचं बोला’ ओके होता, पण मूळ सिनेमाचा किमान इन्स्पिरेशन म्हणूनसुद्धा उल्लेख करायची तसदी न घेतल्याबद्दल माझा राग आहे त्यावर.
माझ्या पहिल्या व्हिसीडी
माझ्या पहिल्या व्हिसीडी प्लेअरसोबत पाच सिनेमे असलेल्या व्हिसीडीज मिळाल्या होत्या. त्यात एक माय कझिन विनी होता.
टॉम हँक्सचा बिग, मायकेल डग्लसचा शायनिंग थ्रू आणि वर्किंग गर्ल आणि आणखी एक होता. यातला बिग घरातल्या लहानांमुळे २४ तास चालू असायचा. नंतर घरात पाऊल टाकताना बिग चालू आहे का ही धास्तीच असायची. सीडी लपवली कि बाळगोपाळ घर डोक्यावर घेत .
“ कायद्याचं बोला" ही काही
“ कायद्याचं बोला" ही काही वाईट नाही पण मरिसा टोमेईची मजा त्यात नाही” - +१. शर्वरी जमेनिस च्या कॅरेक्टरला काही सिग्निफिकन्सच नाहीये. >> +११
आटो पाहुन इतके दिवस झालेत की
आटो पाहुन इतके दिवस झालेत की पुन्हा पहायची वेळ आली आहे.
जमेनीस बद्दल पुर्ण अनुमोदन… ते पात्र नसतं तरी चाललं असतं. कझिनला पण पुन्हा पहायची वेळ आलीये.
नंतर घरात पाऊल टाकताना बिग चालू आहे का ही धास्तीच असायची >> (पाहिला नाहिये अजुन)
हायला, मीही काल रात्री
हायला, मीही काल रात्री कितव्यांदातरी पाहिला ‘माय कझिन विनी’!--
हाहा सहीच!
डायलॉग बाबतीत अगदीच अनुमोदन pesci Marisa Tomei ला deer hunting बद्द्ल सांगतो तो भाग ही हसून हसून पुरेवाट आहे. इथे फॅन क्लब झालाय वाटतं vinny चा
बॅम!!
बॅम!!
(No subject)
अबलखपूरका टबलक खान हा
अबलखपूरका टबलक खान हा चित्रपट पहायची खूप दिवसांची इच्छा आहे.
कुणीतरी बनवा !
कथल मस्त सिनेमा आहे.
कथल मस्त सिनेमा आहे.
Zee 50वर सिर्फ एक बंदा काफी
Zee 5 वर सिर्फ एक बंदा काफी है सिनेमा पाहण्यासारखा आहे.
आसाराम बापू च्या आश्रमातील दुष्कृत्या नंतर त्याला अटक करण्यापासून शिक्षा सुनावण्यापर्यंत च्या घडामोडी दाखवल्या आहेत,
त्या घटनेतील बारकावे बरेचसे जण विसरले असतील , पण या मूव्ही मूळे पुन्हा रिवाइंड होतील.
विशेष म्हणजे कोर्टरूम ड्रामा पाहण्यासारखा आहे , त्या पीडित मुलीच्या बाजूने कोणतेही वलय नसलेल्या एकट्या पी सी सोलंकी ने त्या मुलीची बाजू मांडताना प्रत्येक मुद्द्यांवर बिनतोड युक्तिवाद करून ज्या प्रकारे आसाराम च्या सुब्रमण्यम स्वामी , राम जेठमलानी सारख्या मातब्बर वकिलांना हरवले ते पाहण्यासारखे आहे .
म्हणूनच या मूव्ही चे नाव सिर्फ एक बंदा काफी है नाव ठेवले असावे .
त्या विजेत्या पी सी सोलंकी या वकिलाची भूमिका मनोज वाजपेयी ने उत्तम केली आहे .
हिंदू धर्मातील बुवाबाजी कुठे तरी थांबलीच पाहिजे याची जाणीव हा सिनेमा पाहताना होतेच ......
द डिसेंडट्स बघितला प्राईमवर.
द डिसेंडट्स बघितला प्राईमवर. जॉर्ज क्लुनीचा. कॉमेडी ड्रामा टाईप्स.
हवाई मधे राहणार्या फॅमिलीची गोष्ट. मॅट किंगची (जॉर्ज क्लुनी) बायको एका बोटींग अॅक्सिडेंट मुळे कोमा मधे गेलेली असते. त्यामुळे त्यांच्या २ मुलींचा सांभाळ करायची जबाबदारी त्याच्यावर येते. त्याने करिअर मुळे फारसं कधी फॅमिली कडे लक्ष दिलेलं नसतं. त्यामुळे या दोन मुलींचं वागणं कसं हँडल करावं कळत नसतं. तशातच एकदा बायकोच्या अनैतिक संबंधाबद्दलच्या काही गोष्टी त्याच्या मोठ्या मुलीकडून कळतात. बाप लेकीचे सुरवातीचे ताणलेले संबंध नंतर हळूहळू सहवासाने सुकर होत जातात. तशातच बायकोची लाईफ सपोर्ट काढायची वेळ येते. सगळ्या नातेवाईकांना एकदा तिला शेवटचं गुडबाय म्हणण्यासाठी एकत्र आणण्याचे तो प्रयत्न करत असतो. त्याची फॅमिली, त्यांची हवाईमधली प्रॉपर्टी विक्री, भावंडांमधे असलेले संबंध, त्याच्या सासर्याशी त्याचं वागणं हळूहळू उलगडत जातं. बायकोचे प्रेमसंबंध ज्याच्याशी असतात त्या माणसालाही तो जाऊन भेटतो आणि शेवटचं भेटायला येण्यासाठी विचारतो. तो येतो का? त्याच्या बायकोचं काय? नंतर मुलींचं आणि वडीलांचं नातं, बायकोला माफ करतो का? प्रॉपर्टीचे निर्णय असं बरंच काही आहे. क्लूनी साठी बघितला.
निसर्गरम्य हवाई आणि बीचेस फार आवडले. वन टाईम वॉच.
अंजली ++१
अंजली ++१
छान आहे हा सिनेमा. क्लूनीचे मी अलिकडे पाहिलेले दोन्ही सिनेमे चांगले आहेत. टिकीट टू पॅराडाइस आणि हा.
Pages